मैत्री हे आयुष्याला पडलेले एक सुखद स्वप्न आहे.
दोस्त, यार, जोडीदार, मैतर, खासकिल, सखा, फ्रेन्ड, सोबती
किती तरी सुंदर शब्द आहेत या नात्यासाठी !
दोस्त, यार, जोडीदार, मैतर, खासकिल, सखा, फ्रेन्ड, सोबती
किती तरी सुंदर शब्द आहेत या नात्यासाठी !
जरा चार पाच वर्षाचा झाल्यावर, मैदानावर खेळायला गेले की, शाळेत जायला लागल्यावर आपल्या विचारांशी सहमत, सम आवडीचा , सवयीच्या सहकारी शोध सुरू होतो. तुला काय खायला आवडते? तुझी पेन्सिल, माझी पेन्सिल सेम टू सेम यातून जवळ येतात. डबा शेअर करतात, एकत्र खेळतात, एकाच बेंचवर बसतात. .. आणि मैत्री सुरू होते.
ज्याचे मित्र जास्त तो सर्वात श्रीमंत असे म्हणतात. मनासारखे करू देणारा,
मनात नसलं तरीही बरोबर येणारा, चुकीचे असले तर सांगणारा,
वाट्टेल तेव्हा वाट्टेल तेथे येणारा मित्र मिळणे खरंच भाग्याचे आहे.
मनात नसलं तरीही बरोबर येणारा, चुकीचे असले तर सांगणारा,
वाट्टेल तेव्हा वाट्टेल तेथे येणारा मित्र मिळणे खरंच भाग्याचे आहे.
निम्र भरलेयां उणे |ते पाणी ढलो चि नेणें ||
तेवि अनतोखौनि जाणे | सामोरेयां ||
तेवि अनतोखौनि जाणे | सामोरेयां ||
अर्थात मार्गात खड्डा आला तर वाहते पाणी त्याला वळसा घालून पुढे जात नाही,
तो खड्डा पुरा भरूनच पुढे वाहते. त्याच प्रमाणे दयाशील माणुस दु:खिताचे दुःख पुर्ण नाहीसे करूनच पुढे पाऊल टाकतो.मला वाटते हा दयाशील माणुस म्हणजे माझे मित्र.
तो खड्डा पुरा भरूनच पुढे वाहते. त्याच प्रमाणे दयाशील माणुस दु:खिताचे दुःख पुर्ण नाहीसे करूनच पुढे पाऊल टाकतो.मला वाटते हा दयाशील माणुस म्हणजे माझे मित्र.
एखादी अडचण आली आहे ,
कशाची तरी गरज आहे , कुठेतरी जायचं आहे, काय पण करायचे आहे.
अशा परिस्थितीत माझे मित्र मला कधीही डावलून गेले नाहीत.
या मित्रामुळेच माझ्या आयुष्यातील अडथळेरूपी खड्डे भरले गेले.
या मित्रामुळेच माझ्या आयुष्यातील अडथळेरूपी खड्डे भरले गेले.
मला आयुष्यात खूप छान मित्र मिळाले.
शाळेत, कॉलेजात, व्यवसायात, नोकरीत चांगले मित्र, सहकारी मिळाले
म्हणून खुप काही करू शकलो, करणार आहे.
व्यक्ती विशेष या सदरात भविष्यात मी मला भावलेले मित्र, व्यक्ती आणि मार्गदर्शक
यावर लिहणार आहेच. परवा मैत्रीवर सहज बाहेर पडलेले हे शब्द तुम्हालाही आवडतील.
यावर लिहणार आहेच. परवा मैत्रीवर सहज बाहेर पडलेले हे शब्द तुम्हालाही आवडतील.
दोस्तो का दोस्ताना
सारी दुनिया एका बाजूला,
दोस्त सोबतीला
माझ्या सारखा पाॅवरफुल मीच !
दोस्त सोबतीला
माझ्या सारखा पाॅवरफुल मीच !
सगळे काही संपलं,
तरीही फ्रेन्ड जोडीला
माझ्या सारखा भाग्यवान मीच !
तरीही फ्रेन्ड जोडीला
माझ्या सारखा भाग्यवान मीच !
सारे फक्त सोबतीला,
मित्र सारं सावरायला
माझ्या सारखा स्ट्राँगेस्ट मीच !
मित्र सारं सावरायला
माझ्या सारखा स्ट्राँगेस्ट मीच !
सर्व कामात मदतीला,
मैतर अडचणीत जोडीला
माझ्या सारखा भारदस्त मीच !
मैतर अडचणीत जोडीला
माझ्या सारखा भारदस्त मीच !
ए टू झेड मताशी सहमत,
चुकल्यावर कानफाड ढोस
माझ्या सारखा नशीबवान मीच !
चुकल्यावर कानफाड ढोस
माझ्या सारखा नशीबवान मीच !
सरणार जाईपर्यंत नाही
आमच्या दोस्तीचा अंत
माझ्या सारखा भाग्यवंत मीच !
आमच्या दोस्तीचा अंत
माझ्या सारखा भाग्यवंत मीच !
म्हणूणच म्हणतो
दुनियेची नाही पर्वा आम्हाला
सलामत रहे दोस्ताना हमारा !
सलामत रहे दोस्ताना हमारा !
...........सतीश मोरे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा