फॉलोअर

०२ डिसेंबर २०१७

Amitabh 4

*☑ महानायक अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध संवाद*

*🔺बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत.*
➖➖➖➖➖➖➖
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्त त्यांचे काही प्रसिद्ध संवाद...
🔲🔲🔲

“जब तक बैठने को ना कहाँ जाय शराफत से खडे रहो।ये पुलिस   स्टेशन  है
तुम्हारे  बाप  का  घर  नहीं , ,”जंजीर

“सौदा  करना  तो  आपको  नहीं  आता , आप  इस   बिल्डिंग  के  लिए  दस  लाख  भी  ज्यादा  मांग  लेते , तो  भी  मैं  खरीद लेता . यह  बिल्डिंग  मेरी  माँ  के  लिए  एक  तोहफा  है .” – दीवार

“आज  खुश  तो  बहुत  होगे तुम …..जो  आज  तक  तुम्हारे  मंदिर  की  सीढियां   नहीं  चढ़ा  ….जिसने  कभी  तुम्हारे  सामने हाथ  नहीं  जोड़े  वो  आज  तुम्हारे  सामने  हाथ  फैलाये  खड़ा  है …….ये  तुम्हारी  जीत  नहीं  हार  है  हार ……हम  घर  से  बेघर  हो  गए ……मेरा  बाप  जीतेजी  मर  गया …..मेरी  माँ  सुहागन  होते  हुए  भी  विधवा  बनी  रही ….लेकिन  आज  तक  मैंने  तुमसे  कुछ  नहीं  माँगा ….” – दीवार

“ये   देखो  ये  वही  मैं  हूँ  और  ये  वही  तुम . आज  मैं  कहाँ  पहुच  गया  हूँ  और  तुम  कहाँ  हो . आज  मेरे  पास  बिल्डिंगें   हैं , गाडी  है , बैंक  बैलेंस  है …. तुम्हारे  पास  क्या  है …. क्या  है  तुम्हारे  पास !!” – दीवार

“हाँ , मैं  साइन  करूंगा , लेकिन  मैं  अकेले  साइन  नहीं  करूंगा , मैं  सबसे  पहले  साइन  नहीं  करूंगा .जाओ   पहले  उस  आदमी  का  साइन ले  के  आओ , जिसने  मेरा  बाप  को  चोर  कहा  था ; पहले  उस  आदमी  का साइन  ले  के  आओ  जिसने  मेरी  माँ  को  गाली  दे के  नौकरी  से  निकल  दिया  था ; पहले  उस  आदमी  का  साइन  ले  के  आओ  जिसने  मेरे  हाथ  पे  ये  लिख  दिया  था … उसके  बाद , उस  के  बाद , मेरे  भाई , तुम जहाँ कहोगे मैं वहां साइन करदूंगा  .” – दीवार

“रिश्ते  में  तो  हम  तुम्हारे  बाप  लगते  हैं , नाम  है  शहेंशाह .”- शहेनशाह

“सही  बात  को  सही  वक़्त  पे  किया  जाये  तो  उसका  मज़ा  ही  कुछ  और  है , और  मैं  सही  वक़्त  का  इंतज़ार  करता  हूँ .”-त्रिशूल

“मैं  पांच  लाख  का  सौदा  करने  आया  हूँ , और  मेरे  जेब  में  पांच  फूटी  कौड़ी  भी  नहीं  है ! “-त्रिशूल

“जिसने  पचीस  साल  से  अपनी  माँ  को  थोडा  थोडा  मरते  देखा  हो , उसे  मौत का क्या  डर ?”-त्रिशूल

“और   आप , मि. आर. के. गुप्ता , आप  मेरे  नाजायज़  बाप  हैं . मेरी  माँ  को  आप  से  चाहे  ज़िल्लत  और  बेईज्ज़ती  के  सिवा  कुछ  ना  मिला  हो , लेकिन  मैं  अपनी  माँ , उसी  शांति  कि  तरफ  से  आपकी   सारी  दौलत  वापस  लौटा  रहा  हूँ . आज  आप  के  पास  आपकी   सारी  दौलत  सही , सब  कुछ  सही , लेकिन  मैंने  आप  से  ज्यादा  गरीब आदमी  आज  तक  नहीं  देखा . गुड  बाय , मि. आर. के. गुप्ता.”- त्रिशूल

“मूछें  हों  तो  नथ्थूलाल   जैसी  वरना  ना  हो.” – शराबी

“गोवर्धन  सेठ , समुन्दर  में  तैरने  वाले  कुओं  और  तालाबों  में डुबकी  नहीं  लगाया  करते  हैं .”-मुक़द्दर  का  सिकंदर

“वक़्त  कि  बिसात  पे  किस्मत  ने  जो  मोहरे  बिछाए  थे , उनका  रुख  पलट  गया .”-कालिया

“हम  जहाँ   पे  खड़े  हो  जाते  हैं , लाइन  वहीँ  से  शुरू  होती  है .”-कालिया

“आपने  जेल  की  दीवारों  और  जंजीरों  का  लोहा  देखा  है , जेलर  साहब , कालिया  की  हिम्मत  का  फौलाद  नहीं  देखा .”-कालिया

“बचपन  से  है  सर  पर  अल्लाह  का  हाथ , और  अल्लाह  रखा  है  मेरे  साथ , बाजू  पर  है  सात सौ  छियासी  का  बिल्ला , बीस  नंबर की बीडी  पीता  हूँ , काम  करता  हूँ  कुली  का  और  नाम  है  इकबाल .”- कुली

“तुम्हारा  नाम  क्या  है , बसंती ?”- शोले

“घड़ी – घड़ी  ड्रामा  करता  है , साला .”- शोले

“…विजय चौहान, पूरा नाम  विजय  दीनानाथ  चौहान , बाप  का  नाम , दीनानाथ  चौहान , माँ  का  नाम , सुहासिनी  चौहान , गाँव  मांडवा  , उम्र  छत्तीस  साल नौ  महिना …८ दिन ..१६ घंटा  चालू  है ….मालूम  !!! …”-अग्निपथ

” ये  टेलीफोन   भी  अजीब  चीज़  है  — आदमी  सोचता  कुछ  है , बोलता  कुछ  है  और  करता  कुछ  है .”-अग्निपथ

कंप्यूटर जी….लॉक किया जाए. – कौन बनेगा करोडपती

Amitabh 3

*अमिताभ बच्चन- अभिनयाची युनीव्हरसीटी*

तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले....दुर्दैवाने त्याच्या बाबतीत मात्र असे काहीच झाले नाही...उलट प्रचंड अपयश, टीका, टोमणे आणि फेल्युअरचा टॕग. राजेश खन्ना सारख्या पहिल्या सुपरस्टारच्या जमान्यात याची एंन्ट्री. चित्रपट सृष्टीमध्ये यश मिळेल असा कुठलाही गुण नसल्याचे त्यावेळच्या दिग्दर्शकांचे त्याच्याबद्दलचे मत. हडकुळा, सहा फुट उंची, घोगरा आवाज यातील कुठलीच गोष्ट त्याला हिरो बनवायला योग्य नव्हती...पण म्हणतात ना हिऱ्याची पारख हा एक जोहरीच करु शकतो असाच एक जोहरी प्रकाश मेहरा याने त्याच्यावर डाव खेळला...जंजीर.....या चित्रपटात...त्याची ईमानदार पोलीस इन्सपेक्टरची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना इतकी भावली कि त्यानंतर या माणसाने परत वळून बघितलेच नाही...अमिताभ बच्चन....एक असामान्य व्यक्तीमत्व, आज ज्याला ॲक्टींगची युनीव्हरसीटीच मानले जाते.....आशा पारेख, वहिदा रहेमान, नुतन, मौसमी चॕटर्जी पासून ते तब्बू, दिपीका, तापसी पन्नू पर्यंत अनेक अभिनेत्रींबरोबर आणि दिलीपकुमार, धर्मेंन्द्र, जितेन्द्र, विनोद खन्ना पासून ते अगदी इरफान खान, फरहान, धनुष सारख्या नवीन अभिनेत्याबरोबर काम करुन आजही एक अद्वीतीय अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत मानाने राज्य करणारा शहेनशहा.....जंजीर नंतर चे शोले, दिवार, त्रिशुल, दोस्ताना, राम बलराम, डाॕन, मि. नटवरलाल, मुकद्दर का सिकंदर सगळे एकसे एक बाप चित्रपट...प्रत्येक चित्रपटातील त्याची भुमिका त्याला एंग्री यंग मॕन चे लेबल आणि सुपरस्टारची पदवी मिळवण्यासाठीच लिहील्या गेल्या आणि त्याने अभिनयाने त्या सगळ्या जगल्याही....

त्याचे दिसणे, बोलणे, संवाद फेक, विनोदी असो वा सिरीयस, आनंदी असो वा दुःखी, सीन कुठलाही असो....संपुर्ण जीव ओतुन केलेला अभिनय....शोलेमधला त्याचा शेवटचा सीन असेल किंवा दिवार मधला मंदिरातला देवाशी बोलतानाचा सीन....अमर अकबर ॲन्थनी मधला विनोदी किंवा डाॕन मधला हेलनला पकडून पोलींसांसमोरुन घेऊन जाण्याचा सीन....फक्त बघत रहावे, ऐकत रहावे आणि त्याच्या अभिनयाचा एक भाग होऊन जावे.

१९९० मध्ये कुली च्या शुटींगच्या वेळी झालेला जिवघेणा अपघात...ते दोन दिवस....भारतातील प्रत्येक लहान मोठा अमिताभ प्रेमी ते दोन दिवस परमेश्वराकडे फक्त एकच मागणे मागत होता....त्याला वाचव....त्याला वाचव....आणि परमेश्वरालाही सगळ्यांची इच्छा ऐकायलाच लागली... जवळ जवळ सगळे डाॕक्टर हतबल झाले असताना तो वाचावा हा कलीयुगातील एक दैवी चमत्कारच होता....परमेश्वराने आणखी एक संधी दिली त्याला आणि त्या संधीचे त्याने सोनेच केले.

अपघातानंतरचा आणि आत्तापर्यंतच्या केलेल्या सगळ्या चित्रपटाचा कळस म्हणजे....शराबी....सुरुवात ते शेवट संपुर्ण कमर्शिअल....प्रकाश मेहरांच्या पडत्या काळात त्यांना कर्जबाजारीतून बाहेर काढण्यासाठी... अमिताभने किरकोळ मानधनावर स्वीकारलेला एक अप्रतीम चित्रपट....त्यातील संवाद कादरखान यांचे तर संगीत बप्पी लाहीरी यांचे....ओमप्रकाश, प्राण, जयाप्रदा आणि रणजीत यांच्यासारख्या मात्तबर स्टारकास्ट नी भरलेला एक आऊट ॲन्ड आऊट हिट चित्रपट.....सगळीच भट्टी संपुर्णपणे जमून आलेली...मुछें हो तो नथ्थुलाल जैसे....एक कलाकार इन्सान को ना पहेचान वो कलाकार नही होता.....वैसे तो छोटा है लेकिन घर हो तो ऐसाही होना चाहिए....या तो दिवाना हसें या तु जिसे तोफीक दे वरना इस दुनिया में आकर मुस्कुराता कौन है ....आॕंखे मुंद करके बैठे हो तस्सवुर मे किसीके और वो छम से आजाए....अरे मेरे बापके चमचो आज तुम यहाॕं किसलीए आए हो....मुझे छोडके मत जाओ मुनशीजी... एक एक संवाद, सीन, गाणी म्हणजे लाजवाब आणि या सर्वांवर कडी म्हणजे अमिताभचा जबरदस्त अभिनय....सगळंच सुप्पर डुप्पर हिट. त्यानंतर अग्निपथ ही असाच वेगळ्या धाटणीचा चित्रपट पहिल्यांदाच आवाज डब करुन काढलेला पण त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या आवाजाचेही चाहते असलेल्या प्रेक्षकांनी त्याच्या मुळच्या आवाजात परत डब केलेल्या चित्रपटालाच जास्त गर्दी केली.

राजकारण आणि चित्रपट कंपनी या दोन्हीमध्ये आलेल्या अपयशाने एखादा संवेदनशील कलाकार संपला असता, जीवनातुन उठला असता पण हाच फरक आहे बाकीच्यांमध्ये आणि अमिताभ मध्ये....येणाऱ्या काळाची आणि वेळेची पावले ओळखून त्याने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे  टेलीव्हिजन स्वीकारला....कौन बनेगा कोरडपती..... या मालीकेतुन वर्षानुवर्षे फक्त चित्रपटात दिसणारा हा सुपरस्टार सामान्य जनतेला समोरासमोर भेटायला लागला....हात मिळवू लागला....प्रत्येक भाग हा स्पेशल होऊ लागला....भाषेवरती प्रभुत्व, स्पष्ट उच्चार, आपुलकीने केलेले मार्गदर्शन आणि त्याच्या प्रचंड अनुभवाची झलक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू लागली....आणि परत एकदा हा माणूस करोडो फॕनचा दिवाना झाला.....यानंतर मात्र त्याला अभिनयात कोणालाच काही प्रुव्ह करुन दाखवायचे नव्हते....मग त्याने स्वतःला आवडतील त्या भुमिका करायला सुरुवात केली....वजीर, पिकू, तीन, पींक या चित्रपटात आजही त्याच्या अभिनयाची प्रचंड ताकद दिसून येते.

अपघातानंतर झालेल्या शस्त्रक्रिया, राजकारण आणि व्यवसायातील अपयश ही कारणे कधीही अडथळा म्हणून न घेता  या वयातही त्याचे वेळ पाळण्याची सवय, चालण्याची लकब, प्रचंड उत्साह आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न यामुळे आजही याचा चित्रपटसृष्टीवर प्रचंड दबदबा आहे.

११ आॕक्टोबरला २०१७ अभिनयाच्या शहेनशहाला ७५ वर्षे पुर्ण होतायेत...जवळ जवळ ५० वर्षे प्रेक्षकांच्या मनावर रात्रंदिवस राज्य करणाऱ्या या "विजय" चा वाढदिवस...

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छांबरोबरच दिर्घ आयुष्य आणि अजुन बऱ्याच नवनवीन भुमिका पहायला मिळोत हीच एका अमिताभवेड्या चाहत्याची मनापासूनची इच्छा.

कदाचीत या त्याच्या कलागुणांमुळेच....तो माझा "प्रोफेशनल गुरु" कधी झाला हे मला देखील कळले नाही. म्हणूनच कमीत कमी १०० पेक्षा जास्त वेळा शराबी चित्रपट पाहूनदेखील कधी हा चित्रपट टिव्हीवर चालु असेल तर आजही टिव्हीसमोरुन हलण्याची इच्छाच होत नाही.

Amitabh 2

त्रिशूल

अमिताभच्या पंचाहत्तरी निमित्त ही पोस्ट लिहिली पण उशीर झाला.

काल संध्याकाळी एका एफएम चॅनलवर एक आरजे लाडिक लाडिक स्वरात अमिताभला ट्रिब्युट वगैरे देत होती. त्याचे डायलॉग स्वतःच म्हणत होती. पिक्चर्स होते
मर्द, शहेनशहा, खुदा गवाह, मोहब्बते,अग्निपथ. एक अग्निपथ सोडल्यास बच्चनचे हे टुकार पिक्चर्स !! तिचा दोष नव्हता तिच्या वयाचा होता. अमिताभ कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्याचा शेवटचा सॉल्लिड रोल म्हणजे शराबी. त्यानंतर तिचा जन्म झाला असावा. पण रेडिओवर येताना जरा अभ्यासोनी प्रकटावे ना !!

अमिताभची तुफान डायलॉगबाजी म्हणजे दीवार आणि त्रिशूल. बाकी जंजीर,शोले,अमर अकबर अंथॉनी, डॉन ,मुकद्दर का सिकंदर,शक्ती,शराबी आहेतच पण दीवार आणि त्रिशूलची सर नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचे टॉप तीन चित्रपट काढले तर तिसरा कोणता घ्यावा यावर डोकेफोड करीन.

त्यातही डावे उजवे करायचे तर दीवारपेक्षा मला त्रिशूल जास्त प्रिय.माझ्यामते सलीम-जावेद यांची त्रिशूलची कामगिरी म्हणजे सुनील गावस्करच्या बंगलोरच्या ९६.

"जिसने पच्चीस बरस अपनी मां को हररोज थोडा थोडा मरते हुए देखा है असे मौत से क्या डर लगेगा" इथून सुरुंगाच्या वातीवर विडी पेटवून तो स्क्रीनला जी आग लावतो ती "आज आप के पास आपकी सारी दौलत है मगर  आप जैसा गरीब मैने जिंदगी में नही देखा" असे संजीवकुमारला सांगत विझवतो. गरीब हा शब्द जो काही उच्चरला आहे त्याला तोड नाही. सगळा त्वेष ओतलाय. या दोन सीन दरम्यान तो आपल्याला जी चित्रानुभूती देतो ती पुण्याच्या भाषेत "अशक्य" आहे.

सगळा पिक्चर त्याने खोल,दुःख दर्शवणाऱ्या नजरेवर (ब्रूडिंग लुक्स ), गोळीबंद आवाजात मारलेल्या जबरदस्त डायलॉग्सवर, संवादाच्या लयबद्ध चढउतारांवर आणि घेतलेल्या पॉजेसवर पेलला आहे.समोर संजीवकुमारसारखे अभिनयाचे दुसरे विद्यापीठ उभे असताना हे करणे म्हणजे खायचे काम नाही.

"यू आर राईट मिस्टर आर के गुप्ता" पासून सुरू होऊन "मेरी बनाई कॉलनी मे मकान चाहीये तो तकल्लूफ मत किजीएगा. मिल जायेगा" इथे संपणारा सीन म्हणजे बोर्ग मॅकेन्रो  १९८० ची मॅचच !!

"किताबों में छपते है चाहत के किस्से  हकीकत की दुनिया में चाहत नही है" असे साहिरचे जळजळीत शब्द गाणारा विजय  "मै आज तुमसे बहोतसी दोस्ती, बहोतसा प्यार मांगता हूं" असे म्हणत प्रेमाची हळवी कबुली देतो.

"मै चाहता हूं मिस्टर आर के गुप्ता के खानदान से न सिर्फ उनकी दौलत,उनकी इज्जत छिन लू बलकी उनके दिल की हर खुशी, होटोंकी हर मुस्कराहट को मिटा दू खतम कर दू "
इतका जळजळीत विखार बाळगणारा अमिताभ जेंव्हा त्याच आर के गुप्ताचा म्हणजे त्याच्या अनौरस बापाचा प्रेम चोप्रा जेंव्हा अपमान करतो तेंव्हा तितक्याच त्वेषाने कानाखाली जाळ काढतो तेंव्हा "खून खून होता है पानी नही" हे आनंद बक्षीचे शब्द आठवतात.

१९७८ च्या मे महिन्यात ५ तारखेला ( चू भू द्या घ्या )  रिलीज झालेला त्रिशूल इतका भिनला आहे अंगात की कोणाचे म्हणणे मान्य असेल तर आजही "यू आर राईट मिस्टर आर के गुप्ता"असेच तोंडातून बाहेर येते. कोणाला येतो म्हणून सांगताना "मै आ रहा हूं मिस्टर आर के गुप्ता"
अशी वॉर्निंग देतो आणि कोणी मित्र मैत्रीण भेटायला वेळ देत नसेल ,नखरे करत असेल तर "फिर किसी दिन मेरे पास वक्त नही होगा मिस्टर आर के गुप्ता" असे आपसूक सुनावले जाते.

आता हे "मिस्टर आर के गुप्ता" प्रकरण काय आहे ? संजीवकुमारच्या किरदाराचे नाव आहे. यात हे नाव अमिताभ प्रत्येक वेळेस संपूर्ण उच्चारतो एक दोन अपवाद वगळता. यात कोणाला काही खटकले का ? हे सहज झालेले नसावे . काहीतरी कारण असावे असे तेंव्हा वाटले होते. खूप नंतर एक किस्सा ऐकला. खरे खोटे देव जाणे. तो किस्सा नंतर कधीतरी !!

त्या आरजे मुळे त्रिशूल आठवला आणि विचार केला की साला आपुनभी "ट्रिब्युट" देनाईच मंगता है !!

अमिताभ बच्चन यांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आनंद देवधर

Amitabh 1

*भूलेंबिसरे गीत*

आज *भूलेंबिसरे गीत*मध्ये पाहू यात या *सदिचे महानायक अमिताभ बच्चन* यांच्या काही आठवणी.

*अँग्री यंग मॅन* म्हणून ज्या चित्रपटाने *अमिताभजींना ओळख दिली, त्या *जंजीर*च्या वेळची गोष्ट. *दीपक* होतकरू रंगभूषाकार होता. त्याचं काम *अमिताभजींना*  आवडलं. *अमिताभ* यांचा *खासगी मेकअपमन* होण्याची संधी मग त्याच्यासमोर चालून आली. दीपकनी ती स्वीकारलीच आणि सुरू झाला अमिताभ बच्चन यांचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून दीपक यांचा प्रवास. या गोष्टीला जवळजवळ ४५ वर्षे झालीत. आज दीपक ६९ वर्षांचे आहेत, तरीही ते तेवढ्याच उमेदीने आणि उत्साहाने अमिताभ यांच्याबरोबर काम करताहेत.

शोले’चं चित्रीकरण सुरू होतं. चित्रीकरणासाठीचं ठिकाण आणि निवासव्यवस्था यात अंतर होतं. एके दिवशी शूटिंग संपल्यावर अमिताभ आणि जया बच्चन निघाले. एकाच गाडीतून. पुढच्या सीटवर दीपक बसले होते आणि जया आणि अमिताभ मागच्या सीटवर. दीपक यांनी पुढचा दरवाजा ओढून घेतला आणि अचानक अमिताभ जोरात ओरडू लागले, ‘माझा हात, माझा हात, गेला माझा हात...’

दीपकच्या काळजाचा ठोकाच चुकला. जया बच्चनही गांगरून गेल्या. कोणाला काही कळेचना की झाले तरी काय? दीपकने घाबरत घाबरतच मागचा दरवाजा उघडला. तर ते जोरजोरात हसत होते. कोणालाही काही कळेच ना. मग लक्षात आलं, की ते  दीपकला उल्लू बनवण्याचा प्रयत्न होता. असा हा मिश्‍कील माणूस!’’

*एकाच महिन्यात चार चित्रपटांचं रिलिज आणि चारही सुपरहिट!* ही किमया *अमिताभ* यांनी  केलीय. *गंमत* म्हणजे त्यातल्या *दोन* चित्रपटांत त्याचा *डबलरोल* होता. ऑक्‍टोबर १९७८ मध्ये हा पराक्रम केला होता. या महिन्याच्या चारही शुक्रवारी अमिताभचे चार चित्रपट रीलिज झाले. *मुकद्दर का सिकंदर, कस्मे वादे, डॉन* आणि *त्रिशूल* हे ते चार चित्रपट होते! 

हिपॅटायटिस-बी विरोधातल्या मोहिमेच्या वेळी अमिताभने एक गौप्यस्फोट केला होता. हिपॅटायटिस बीमुळे त्यांचं ७५ टक्के यकृत निकामी झालं असून, सध्या फक्त २५ टक्के यकृत कार्यरत आहे. *‘जो भी है, उसीसेही काम चला रहा हूँ मैं’* हे त्याचे मिष्किल उद्‌गार होते, हे सांगताना! 

ते आज ७५ वर्षांचे असूनही त्याच उमेदीने काम करतात, जसे ४५ वर्षांपूर्वी सीनची तयारी करायचे, तशीच तयारी ते आजही करतात. असं वाटतच नाही, की ते ७५ वर्षांचे आहेत.

आज ऐकु या त्यांच्या आवाजातील एक सुंदर गाणं.

चित्रपट : *सिलसिला (१९८१)*
संगीतकार : *शिव हरी*
गीतकार : *जावेद अख्तर*
गायक : *अमिताभ बच्चन*

नीला आसमान सो गया..
नीला आसमान सो गया

ओ हो, ओंस बरसे रात भीगे होठ थर्राए
धड़कने कुछ कहना चाहे कह नही पाए
हवा का गीत माध्यम है..
समय की चाल भी कम है
नीला आसमान सो गया..

ओ, मेरी बाहो मे शरमाते लजाते ऐसे तुम आये
की जैसे बादलो मे चांद धीरे धीरे आ जाए
ये तन्हाई ये मै और तुम..
ज़मीन भी हो गयी गुमसुम
नीला आसमान सो गया...

*संग्राहक आणि संकलक:-  प्रफुल्ल गायकवाड*

२५ नोव्हेंबर २०१७

चेक

🏦✒🏦✒🏦✒🏦
➖➖➖➖➖➖➖
*☑ बँकचे ८ प्रकारचे चेक आणि त्या बद्दलची माहिती...*
➖➖➖➖➖➖➖
_अर्थमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केले की चेक चे व्यवहार बंद करण्याचा कोणताही विचार नाही... त्या निमित्ताने पुन्हा एकदा नजर .... चेकच्या व्यवहाराच्या ८ प्रकारावर..._

*▪१. बेयरर चेक किंवा ओपन चेक*
या चेकवर Bearer हा उल्लेख आढळतो. बेयरर चेकची रक्कम त्या व्यक्तीला दिली जाते जो व्यक्ती तो चेक बँकेत घेऊन जाईल किंवा ज्याचे नाव त्या चेकवर लिहिलेले असेल. परंतु असा चेक देणे धोकादायक असते कारण जर चेक हरवला आणि कोणत्याही अज्ञात व्यक्तीला तो मिळाला तर तो व्यक्ती याचा वापर करून रक्कम काढू शकतो मग त्याचे खाते त्या बँकेत असो वा नसो काही फरक पडत नाही.

*▪२. ऑर्डर चेक....*
जेव्हा चेकवर लिहिलेला Bearer हा शब्द पेनाने खोडला जातो आणि त्याच्या जागी ऑर्डर असे लिहिले जाते तेव्हा अश्या चेकला ऑर्डर चेक म्हटले जाते. अश्या चेकची रक्कम त्या व्यक्तीला दिली जाते ज्या व्यक्तीचे नाव या चेकवर लिहिलेले असते. याव्यतिरिक्त यामध्ये त्या व्यक्तीला सुद्धा रक्कम दिली जाऊ शकते ज्या व्यक्तीच्या नावावर चेक हस्तांतरीत केला गेला आहे.

*▪३. क्रॉस चेक किंवा अकाउंट पेयी चेक...*
या चेकच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात दोन समांतर रेषा ओढल्या जातात. किंवा त्यावर AC Payee असे लिहिले जाते. क्रॉस चेकमुळे ज्याला पैसे मिळणार आहेत त्याला बँकेत चेक सादर केल्यावर हातात रक्कम मिळत नाही, ती रक्कम त्याच्या खात्यामध्ये जमा केली जाते.

*४. अॅंटे-डेटेड चेक...*
जर एखाद्या चेकवर तो चेक बँकेत जमा करण्याच्या आधीची तारीख लिहिलेली असेल तर त्या चेकला पूर्व-तारखेचा चेक म्हणजेच अॅंटे-डेटेड चेक म्हटले जाते .याप्रकारच्या चेकची वैधता चेक दिल्यानंतरच्या तारखेपासून तीन महिन्यांपर्यंत असते.

*▪५. पोस्ट डेटेड चेक...*
जर एखादा चेक येणाऱ्या तारखेसाठी (Future Date) देण्यात आलेला असेल तर अशा प्रकारच्या चेकला नंतरच्या तारखेच्या चेक म्हणजे पोस्ट-डेटेड चेक म्हटले जाते.या प्रकारच्या चेकमध्ये त्यावर दिलेल्या तारखेच्या आधीच चेक वटवला जाऊ शकतो.

*▪६. स्टेल चेक....*
जर चेक दिल्यानंतरच्या तारखेनंतर बँक मध्ये पास होण्यासाठी आल्यास अश्या चेकला शिळा म्हणजेच स्टेल चेक म्हटले जाते. अशा प्रकारचा चेक बँकेकडून वटवला जात नाही, कारण रिजर्व बँकच्या नियमांच्या हिशोबाने चेक दिलेल्या तारखेनंतर ३ महिन्याच्या आत वटवला गेला पाहिजे म्हणजेच रक्कम काढली पाहिजे.

*▪७. सेल्फ चेक.....*
या प्रकारच्या चेकचा उपयोग खाते असणाऱ्या व्यक्तीला स्वतःसाठी रक्कम काढण्यासाठी होतो. पहिल्या नियमांनुसार या प्रकारच्या चेकने केवळ त्याच बँकेमध्ये रक्कम काढता येत होती, ज्या बँकेत खाते धारकाचे खाते आहे. परंतु आता या प्रकारच्या चेकने संपूर्ण भारतामध्ये कुठेही रक्कम काढता येते.

*▪८. कॅन्सल्ड चेक...*
अश्या प्रकारचा चेक हा वटवला जात नाही, या चेकने तुम्ही कोणतीही रक्कम काढू शकत नाही. या चेकचा उपयोग एखाद्या व्यक्तीला आपल्या बँक खात्याची माहिती देण्यासाठी केला जातो. Employee Provident Scheme (EPS) साठी सुद्धा या प्रकारच्या चेकचा उपयोग केला जातो.
➖➖➖➖➖➖➖
🔲◼🔲◼🔲◼🔲

२३ नोव्हेंबर २०१७

औषध expire means?

_*🙇🏻 🔺मनातील प्रश्न....*_

*👨🏻‍⚕◼औषध एक्सपायर होते म्हणजे नेमके काय...?*
➖➖➖➖➖➖➖
*_औषध एक्सपायर होतं म्हणजे नक्की काय होतं हेच आपल्याला कळत नाही. काहींना असं वाटतं औषध एक्सपायर झालं म्हणजे त्यात विष तयार झालं आहे. तर औषध एक्सपायर होतं म्हणजे त्याच्या लेबलवर त्या औषधाची जी Strength लिहिलेली असते, (उदा. अमुक एका गोळीवर लिहिलेले असते Each Tablet Contains Paracetamol 500 mg, तर 500 mg ही झाली या औषधाची Strength) ती ज्या दिवशी १० टक्क्यांनी कमी होते ती झाली त्या औषधाची एक्सपायरी डेट!_*
🔲🔲🔲
_एक्सपायरी डेट (Expiry Date ) साठी वापरला जाणारे शास्त्रीय नाव आहे t-९०%. यातला t म्हणजे Time. औषध जेव्हा ९०% उरते (म्हणजेच १० टक्क्यांनी कमी होते) तो वेळ म्हणजेच एक्सपायरी डेट. म्हणजेच एक्सपायरी डेट जेव्हा उजाडते तेव्हा त्यावर दिलेल्या डोसपेक्षा औषधाची मात्रा कमी झालेली असते. त्यामुळे त्याचा परिणाम थोडाफार कमी होतो, तो शून्य होतो असे अजिबात नव्हे._
🔲🔲🔲

*🔺औषधाची Strength १० टक्क्यांनी कमी होते. पण म्हणजे नक्की काय होतं....?*

५०० मिलीग्रॅमऐवजी हे प्रमाण ४५० मिलीग्रॅम होऊ शकतं. तर औषध हे एक रसायन आहे आणि काळानुसार ते हळू-हळू रासायनिक क्रियेमुळे त्याचा प्रभाव कमी होतो. सगळी औषधे ही एक्सपायरीनंतर हानिकारक नसतात तर काही विशिष्ट औषधेच एक्सपायरीनंतर हानिकारक ठरु शकतात. हवेतील ऑक्सिजनमुळे ऑक्सिडेशन होऊन किंवा हायड्रोजनमुळे रिडक्शन होऊन किंवा सूर्यप्रकाशामुळे किंवा इतर असंख्य रासायनिक क्रियामुळे हे औषध हानिकारक होते.
🔲🔲🔲
एका औषधाचे वेगवेगळ्या मार्गाने दर्जा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे एकाच वेळी त्याची वेगवेगळी उत्पादने (Reaction Products ) बनू शकतात. ही उत्पादने निरुपद्रवी असतील तर त्याचा परिणाम इतकाच होतो कि औषधाची Strength कमी होते. पण कधी-कधी मात्र ही उत्पादने अपायकारकही असू शकतात. एक्सपायरी डेटनंतरचा असा अभ्यास मात्र कंपनीने केलेला नसतो.
🔲🔲🔲
जर औषधावर लिहिलेली एक्सपायरी डेट २ वर्षे आहे. तर मग जो अभ्यास केला जातो तो या २ वर्षांचाच असतो. पण समजा हे औषध 2-3 वेगवेगळ्या Degradation Pathways ने त्याचा दर्जा कमी होते आहे, ज्यातला एक Pathway अत्यंत संथ आहे, त्याचे Reaction Product ४ वर्षानंतर बनतेय आणि ते अपायकारक आहे आणि असे औषध जर कुणी एक्सपायरी डेटनंतर घेतले तर अपाय होऊ शकतो.
🔲🔲🔲
औषधे ही त्यावर दिलेल्या सूचनांनुसार साठवली जायला हवीत. बहुतांश औषधे थंड आणि कोरड्या जागी ठेवायची असतात. त्यामुळे औषधावरील सूचना लक्षपूर्वक पाळली जायला हवी.
➖➖➖➖➖➖➖
💊💉💊💉💊💉💊

०९ नोव्हेंबर २०१७

कृतज्ञता

देवीओ और सज्जनौ ,
नमस्कार.

खरं तर हे शब्द अमिताभ बच्चन यांच्या  तोंडीच शोभून दिसतात.
आम्ही त्याचे अनुकरण केले  म्हणून काय  बिघडले ! 
आहोतच आम्ही पण बच्चन !

7 नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस होता.
माझ्या आॅफीसमधील सहकारी मित्रांनी तो वेगळ्या
उंचीवर नेऊन ठेवला.
दिवसभर मला शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक संस्थेत
जायचा योग घडवून आणला.

दिवसभर मला सामान्य वाचक, मित्र,हितचिंतक,
भाजीवाले, दुकानदार, पेपरवाले, पत्रकार,
गाववाले, शेतकरी, 
अशा अनेक जणांचे फोन आले.

राज्यपाल, माजी मुख्यमंत्री, आजी  माजी आमदार, खासदार,
युवकप्रिय नेते,  समाजसेवक, 
यासहीत नगराध्यक्ष, सरपंच, नगरसेवक अशा अनेक मान्यवरांचे
फोन आले, अनेकांनी भेटून शुभेच्छा दिल्या.

खरंच धन्य  झालो माऊलींनो,
तुमच्या प्रेम वर्षावाने !

धन्यवाद न मानता तुमच्या
ऋणातचं राहणं आवडेल मला !
कारण....

आपलं प्रेम आहे निशब्द,
शब्दांनाही न उमगणारं !

आपलं प्रेम आहे गुपित,
कुणालाही न उलगडणारं !

आपलं प्रेम आहे भावनिक,
स्पर्शालाही न कळणारं !

आपलं प्रेम आहे अव्यक्त,
शब्दांच्या पलीकडले !

..... सतीश मोरे

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...