राम कृष्ण हरी,
दोन दिवस माऊलींचा पाहुणचार सासवडमध्ये अतिशय उत्तम झाला.माऊलींच्या आगमनाने सुखावलेल्या सासवडकरांनी दुष्काळी परिस्थिती असतानाही दोन दिवस माऊली पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या सुमारे साडेतीन लाख वारकऱ्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केली. दोन दिवस सासवडमध्ये भक्तीचा महापूर वाहत होता.वारकऱ्यांसाठी अनेकांनी आपली घरी खुली केली होती. घरात, घराबाहेरील शेडमध्ये, फ्लॅटमध्ये, पार्किंगमध्ये ,हॉटेलच्या परिसरात , कंपनीच्या कंपाऊंडमध्ये ,एसटी स्टँड दुकान जिथे मिळेल त्या जागेवर वारकरी आराम करत होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी परिसरातील नागरिकांनी चहापाणी नाश्ता सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या.
सासवडमधील नदीमध्ये पाण्याचा थेंबही नव्हता थोडी फारसे पाणी आले ते दोन दिवस पडलेल्या पावसामुळे. शेतीसाठी पाणी अजिबात नाही, दोन-तीन दिवस पिण्याचे पाणीही येत नाही.पिके करपली आहेत ,अशी परिस्थिती असतानाही वारकऱ्यांसाठी पाणी, बोअर उपलब्ध करून दिली. प्रशासनाने जागोजागी वारकऱ्यांच्या सेवेसाठी मदत केंद्र उभे केले होते. वारकरी सकाळी जेजुरी च्या दिशेने रवाना झाले
नऊच्या सुमारास आम्ही आम्ही बाहेर पडलो. सासवडच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर सोहळा सकाळच्या न्याहारीसाठी विसावला होता, या ठिकाणी अनेक वारकरी थांबले होते .काल एकादशी होती .द्वादशी आज उपवास सोडायचा होता. उपवास सोडण्यासाठी न्याहरी आणली होती. काहीनी सार्वजनिक मंडळाने दिलेला नाश्ता खाऊन उपवास सोडला. विसाव्याच्या ठिकाणी दोन वर्षानंतर बाबा महाराज यांचे नातू हभप चिन्मय महाराज आणि भगवती महाराज सातारकर यांची भेट झाली. कराडच्या किर्तन महोत्सवच्या आठवणींना उजाळा दिला .चिन्मय महाराजांची पुढारी आँनलाईन साठी मुलाखत घेऊन पुढे चालू लागलो.
पुण्यातील टेकडी ग्रुपचे पंधरा-वीस वारकरी सासवड ते जेजुरी असा टप्पा पार पडणार होते. या ग्रुप मध्ये पुण्याचे नवीन पाहुणे थोरात साहेब भेटले. या ग्रुपसोबत सातारा जिल्ह्याचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी पराड साहेब हे होते. मी त्यांची मुलाखत घेतली मात्र सुरुवातीला त्यांना ओळखले नाही त्यांनी स्वतःहून आमच्या सातारा भेटीविषयी आठवण करून दिल्यानंतर खूप आनंद झाला.
पुढे पुढे चालत राहिलो रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेले कराड ट्राफिक पोलीसचे वरिष्ठ कर्मचारी पाटील माझगावकर भेटले , त्यांनी आम्हाला चहा पाजला .
आम्ही हळूहळू पुढे वाटचाल केली. चारच्या सुमारास जेजुरीला पोहोचलो आणि जोरदार पावसाला पुन्हा यायला सुरुवात झाली. धो-धो पावसाने वारकऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली. पूर्वनियोजित मुलाखत आणि बातमीच्या कामानिमित्त पेशवे लॉज येथे पोचलो. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही काही कार्यकर्ते एका बातमीच्या विषयासाठी वाट पाहत बसले होते. त्यांच्याशी झालेल्या फोनवरून चर्चेनंतर सासवड नगरपालिका येथे सभागृहांमध्ये दोन तास बसलो. वेगळी माहिती मिळाली या विषयीची बातमी दोन दिवसात पुढारी मध्ये प्रसिद्ध होणार आहे. सेवाभाव काय असतो याचे मूर्तीमंत म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अनुभवायला आले.
सासवड पालिकेच्या इमारतीसमोर वारकऱ्यांनी जागा व्यापली होती. त्यानंतर पुढे सायंकाळी पालखीतळावर पोहोचलो. कराडकरांच्या दिंडीत जेवण केले माहिती घेत बसलो आणि रात्री उशिरा झोपायचं निघालो. एकंदरीत आजचा दिवस चांगला गेला.
🚩🚩🚩माझी वारी 🚩🚩🚩
*सतीश मोरे*
karawadikarad.blogspot.com