🚩🚩🚩माझी वारी 🚩🚩🚩
सतीश मोरे
karawadikarad.blogspot.com
*आळंदी पुणे*
*२५/०६/२०१९*
राम कृष्ण हरी,
तीन वर्षे पंढरीची वारी पुर्ण केल्यानंतर गत वर्षी झालेली अर्धी वारी याची हुरहूर मनाला लागलेली होती, त्यामुळे चालू वर्षी पूर्ण वारी करण्याचा संकल्प केला होता. सकाळी सहा वाजता उठलो. बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत आळंदीला पोहोचण्याची गरज होती. रणजीत पाटील यांच्या कार मधून नऊ आम्ही सगळे आळंदीला जायला निघालो. यावर्षी प्रथमच वारी काय असते हे पाहण्याची उत्सुकता असलेले आमचे मित्र सह्याद्री इक्विपमेंटचे मालक देशमुख साहेब मुद्दामहून आमच्याबरोबर आलेले होते. पुढील अठरा दिवस घरदार पाहायला मिळणार नाही याचे थोडीस दुःख होतं. कारमध्ये बसून पुण्याला जायला निघालो. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी वारी निमित्त सर्व वाहनांना घेऊ नये अशी सूचना देऊनही सातारा जिल्ह्यातील टोल नाक्यावर वारीचे ट्रक व इतर वाहनांना टोलसाठी हुज्जत घालण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यात शिवापुर टोल नाक्यावर मात्र हा अनुभव आला नाही, पुणेकरांना वारीचे महत्त्व किती आहे आणि वारकऱ्यांच्या किती सन्मान आहे याचा प्रत्यय आला, सातारा जिल्ह्यातील आदिवासी टोल नाक्यावर मात्र वारीतील वाहनचालकांना वाईट अनुभव आले.
दुपारी दिडच्या सुमारास आळंदीत पोचलो,वैष्णवांचा मेळा आळंदीत जमा होऊ लागला होता. इंद्रायणीवर असलेल्या पुलावरून माऊलींच्या मंदिराचे दुरून दर्शन घेतले. यावर्षी प्रथमच जाणवले माऊलींच्या सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी गत दोन तीन वर्षाच्या तुलनेत फार कमी होती. या वर्षी पडलेला भीषण दुष्काळ आणि जून महिना उलटत आला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात न पडलेला पाऊस हे या कमी उपस्थिती कारण असल्याचे विविध भागातील भेटलेल्या व्यापाऱ्यांनी 'पुढारी ऑनलाइनशी बोलताना सांगितले.
इंद्रायणी पात्रामध्ये गेलो,हात पाय स्वच्छ धुऊन नमस्कार केला आणि पुढे आमच्या कराडकराच्या मठामध्ये पोहोचलो. या मठात दुपारच्या पंगती संपल्या होत्या , बारा नंबर दिंडीतील वारकरी विणेकरी निवांत पहुडले होते. विठ्ठल मंदिरात माऊलींचे आणि वैकुंठवासी मामांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आम्ही सर्वजण जेवायला बसलो.जेवण झाल्यानंतर लगेच माऊलींच्या मंदिराकडे प्रस्थान सोहळा च्या कार्यक्रमासाठी जायला निघालो.
माऊली सोहळ्यासाठी ज्ञानेश्वर मंदिरात एकेक दिंड्या जात होत्या. पूर्ण आळंदी गाव माउलीमय झाले होते वारकरी माऊलींचा उत्साह वाढत होता. मंदिराच्या प्रवेशद्वारा नजीक आमचे मार्गदर्शक सोहळ्याचे प्रमुख चोपदारर माननीय राजाभाऊ माऊली यांची भेट झाली. कडक शिस्तीच्या राजाभाऊ यांनी माऊलीच्या मंदिरात फक्त वारकरीच जावेत, दिंडी मधून कोणीही हौशीगौशी घुसू नयेत यावर चांगलेच लक्ष ठेवले होते. राजाभाऊंना नमस्कार करून पुढे जायला निघालो.
बारामती येथील युवा नेते रोहित पवार यांची योगायोगाने भेट झाली. रोहिदास दादांशी गप्पा मारल्या. कराडहुन आलेल्या आम्हा वारकऱ्यांची, माझी त्यानी वैयक्तिक चौकशी केली. किती वर्षे वारी करता, वाढीचा अनुभव कसा आहे, पुढारी मध्ये किती वर्षे काम करतात याची इत्यंभूत माहिती घेताना रोहित पवार यांच्याकडे एक वेगळा आदरार्थी भाव पाहिला मिळाला.रोहित पवार यांची वारी निमित्त एक छोटीशी मुलाखत घेतली, सोबत फोटो काढले ,कराडला येण्याचे त्यांना निमंत्रण दिले, त्यानीही आम्हाला बारामती मध्ये आल्यानंतर कधी मला फोन करा असा असे आग्रहाचे निमंत्रण दिले.
त्यानंतर आम्ही माऊलींच्या मंदिरात जाण्यासाठी पुढे निघालो. माऊली मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोलीस खात्याने अतिशय कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मंदिरात कमीत कमी वारकरी जावेत आणि फार गर्दी होऊन गोंधळ निर्माण होणे दाटीवाटी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले होते. चारच्या सुमारास माऊली मंदिरात प्रवेश केला. मंदिराला केलेली सजावट आणि तेथील भक्तिमय वातावरणात वातावरणात आलेला वेगळा सुगंध पाहून प्रवासाचा सर्व कंटाळा निघून गेला. आता मंदिरांमध्ये येथे एक दिंडी येत होती. वारकऱ्यांचा उत्साह वाढू लागला होता, प्रत्येक दिंडी येऊन माऊलींच्या मंदिरासमोर ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष करत होती, कोणी नाचत होता, कुणी गात होता. माऊली माऊली माऊली नावाचा जयघोष सुरू होता. साडेपाचच्या सुमारास बहुतांश दिंड्यांचे आगमन मंदिरामध्ये झाले होते.
आत माऊलींच्या प्रस्थानाची तयारी करण्यात गावकरी आणि विश्वस्त मंडळ व्यस्त होते तर बाहेर शेकडो वारकरी टाळकरी झेंडेकरी विणेकरी मृदंग वादक यांनी माऊली नावाचा ठेका,ताल धरला होता. सहाच्या सुमारासमाऊलींचेमानाचचे अश्व मंदिरा मध्ये दाखल झाले आणि पुन्हा वारकऱ्यांचा उत्साह वाढला. अश्वाला स्पर्श करण्यासाठी अनेकजण पुढे गेले. माऊलींच्या अश्वाने मंदिराला प्रदक्षिणा घालून दोन्ही अश्व पुन्हा मंदिरासमोरून थांबले. एव्हाना साडे सहा वाजले होते .सुमारे अडीच तीन तास टाळ-मृदंगाच्या तालावर नाचून दमलेले ,थकलेले वारकरी आता माऊली केव्हा येणार याची वाट पाहत होते.
सातच्या सुमारास माऊलींची आरती झाली. पंच मंडळींची आज चर्चा सुरू होती, बाहेर वारकरी माऊलींच्या पालखीच्या आगमनाची वाट पाहत होते. साडेसात वाजले, वारकऱ्यांचा उत्साह जराही कमी झाला नव्हता, अनेकांचे लक्ष माऊलींच्या कळसाकडे होते. मंदिराचा कळस माऊली मंदिरातून बाहेर पडतात तेव्हा हालतो, मंदिराला सुद्धा माऊली येथून जातात हे दुःख सहन होत नाही, अशी वारकऱ्यांची भावना आहे. अनेकांचे लक्ष त्या कळसाकडे होते.
घामाने चिंब झालेले वारकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. हवेची थंड झुळूक मधूनच त्यांना गारवा देत होती मात्र पाऊस काही येत नव्हता. माऊलीच्या नामामध्ये ते तल्लीन होऊन गेल्यामुळे त्यांना माऊलींच्या येण्याची प्रतीक्षा होती, दर्शनाची ओढ होती. सात वाजून 30 मिनिटांच्या सुमारास माऊलींची पालखी मंदिराबाहेर आली आणि वारकऱ्यांनी माऊली माऊली नामाचा जोरदार जल्लोष केला. अवघी आळंदी माऊली नामाने दुमदुमून गेली. पालखी जवळ जाऊन दर्शन घेण्यासाठी वारकरी पुढे सरकले, आळंदी ग्रामस्थ पालखी आपल्या खांद्यावर घेऊन नाचवत होते. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरा बाहेर पडली आणि आळंदी गावात वारकऱ्यांचा उत्साह पुन्हा संचारला.
माऊलींची पालखी नगर प्रदक्षणासाठी बाहेर पडली आणि आम्ही मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. आळंदी गावाबाहेर एक किलोमीटर अंतरावर आमची गाडी उभी केली होती तिथे पोहचलो. तीन-चार तास मोबाईलवर खूप काम झाल्यामुळे बॅटरी डाउन झाली होती मोबाईल चार्जिंग लावले, काही फोटो व बातम्याचे मुद्दे ऑफिसला पाठवले. चहा पाणी घेतले आणि पुन्हा पुण्याच्या दिशेने चालायला लागलो.
या अगोदर तीन वारी करताना मी आळंदी मध्ये मुक्काम केला होता व पहाटे पाच वाजता चालावयास सुरुवात केली होती मात्र यावर्षी थोडा बदल करण्याचे ठरवले .सायंकाळी साडेआठच्या सुमारास माझ्यासोबत असलेले रणजीत पाटील, माणिक पाटील ,प्रकाश पाटील आम्ही चौघांनी पुण्याच्या दिशेने चालावयास सुरुवात केली. आमच्या सोबत आमच्या सारखेच रात्री चालणारे अनेक वारकरी पुण्याच्या दिशेने निघाले होते मात्र ही संख्या फार कमी होती. आळंदी सोडून बाहेर आलो माऊली माऊली माऊली नामजप करत आम्ही मार्गक्रमण करत होतो. रस्त्याकडेला उभारण्यात आलेल्या खाजगी तंबत, फूटपाथवर व अनेकांनी निवारा तयार केला होता. रात्रीचे एक वेगळेच वारी दर्शन मला पहावयास मिळाले.पुलाखाली, रस्त्याकडेला, फुटपाथवर, दुकान गाळ्याखाली,पार्किंग जवळ एटीएम सेंटरच्या शेजारी मिळेल त्या जागेवर ारकर्याने निवारा चे स्थान शोधले होते.
तहान लागली होती.थांबण्याचा निर्णय घेतला. चौकात वसंतराव भोसेकर लोंढे प्रतिष्ठानच्यावतीने मंडप उभारण्याचे काम चालू होते. कार्यकर्ते पाण्याच्या बाटल्या त्या ठिकाणी आणून ठेवत होते. पाण्याची बॉटल मागितली, सहज बोलता-बोलता चौकशी केली माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष वसंतराव भोसेकर यांच्या वतीने प्रत्येक वर्षी वारकऱ्यांना एक लिटरच्या बाराहजार पाणी बाटली आणि दिंडी प्रमुखांना विठ्ठलाची मूर्ती भेट दिली जाते. वसंतराव भोसेकर नाना यांच्या विषयी माहिती विचारली, तेवढ्यात नानाच आले, नानांनी आम्हाला सर्व माहिती सांगितले.नानांचे चुलते वैकुंठवासी कीर्तनकार लोंढे माऊली फार मोठी विभूती होती. लोंढे माऊली यांनी पंढरपुरात आपला देह ठेवण्यापूर्वी त्यांनी आपल्या नावावरील 4 एकर जमिन वारकरी संप्रदायाला दान केली होती. वसंतराव नानामाऊली त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत.
वसंतराव भोसेकर यांचा एक विचार मला खूप आवडला. महाराष्ट्रात अनेक संत जन्माला आलेले आहेत आणि बहुतांश देव उत्तर भारतात जन्माला आलेले आहेत. महाराष्ट्रातील संतांनी ही भूमी संतविचाराने आणि बुद्धिमत्तेच्या समृद्ध केली, एकात्मता वाढवली, जातीभेद संपवले आणि महाराष्ट्र पुढे पुढे गेला.याच महाराष्ट्रात उत्तर भारतातील, देवाच्या भूमीतील लोक नोकरी ,कामासाठी येतात. इतका मोठा बदल संतांनी महाराष्ट्रात विचार वैचारीक प्रगल्भतेवर घडवला आहे. मला हा विचार खूप आवडला ना नमस्कार करून पुढे निघालो
सहा किलोमीटर अंतर पार पडल्यानंतर एका ठिकाणी पावणे अकराच्या सुमारास थांबण्याचा निर्णय घेतला. शुद्ध शाकाहारी उमंग हॉटेलमध्ये भोजन केले . इंग्लंड ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच शेवटच्या चार ओव्हर पाहण्याचा आनंद घेतला. तेथून बाहेर आलो पुणे शिवाजीनगर किती किलोमीटर आहे याचा अंदाज घेतला, पुन्हा चालण्याचा निर्णय घेतला. साडेअकरा वाजता आम्ही पुण्याकडे चालावयास निघालो.
रस्त्यावर वारकऱ्यांची गर्दी खुप कमी होती. दोन किलोमीटर झाले की आराम करायचा, निवांत चालत राहायचे असे आम्ही ठरवले होते. मिलिटरीच्या एरिया असलेल्या दिघी भागात आम्ही बाराच्या सुमारास पोचलो. एका ठिकाणी रस्त्यावरच बैठक मारली तेवढ्यात ग्राउंड वर असलेला एक फौजी तेथे आला. साहब यहा बैठने का नही, असे आम्हाला सांगू लागला. माऊली पाच मिनिट बसू द्या अशी त्याला विनंती केली. त्यानेही ती विनंती मान्य केली. पाच मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा चालायला सुरुवात केली . गेल्या तीन वर्षातील वारीच्या गमती जमती वेगवेगळे अनुभव यावर चर्चा करत रणजीत पाटील आणि मी पुढे होतो तर आमचे दोन सहकारी पाठीमागे होते.
विश्रांतवाडी दोन किलोमीटर अंतरावर होती, एका बाकड्यावर आम्ही बैठक मारली. साडेबारा वाजले होते. रस्त्याकडेला मिठाई आणि चहाची दुकाने सुरू होती. स्थानिक ग्रामस्थ तिथे बसले होते. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. एकच्या सुमारास आळंदी रोड पोलीस पोलीस चौकी चौकातून पुढे आलो. आता शरीर आणि मन दोन्ही साथ देत नव्हते. त्यामुळे थांबायचा निर्णय घेतला. रात्रीचा मुक्काम करण्यासाठी जागा शोधू लागलो. पुणे शहरांमध्ये अनेक नातेवाईक व मित्र आहेत त्यांनी फोन करून मुक्कामाला यावे असे कळवले होते,मात्र रात्रीच्या दिड वाजता कोणाला उठवायला जायचे, वारकऱ्यांच्या बरोबर वारकऱ्यांचे सारखे रहायला जी मजा आहे, ती घरामध्ये नाही असे नानानी बोलून दाखवले, मग मग झोपण्यासाठी स्वच्छ जागा शिरू लागलो. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी अनेक ठिकाणी स्वागत कक्ष उभे केले आहेत, मंडप उभे केले आहेत अशा मंडपामध्ये अनेक वारकरी झोपलेले आम्ही पाहिले होते. असाच एक मंडप पाहून त्या स्टेजवर अंथरूण टाकले.आमची गाडी शेजारी उभी केली आणि मध्यरात्री दीडच्या सुमारास अंथरुणावर अंग टाकून गेले.
माऊलींच्या कृपेने सर्व काही ठीक झाले. वारीचा अनुभव आज पासून रोज आपल्याला माझी वारी या माध्यमातून शेअर करणार आहोत
आपणास आवडेल अशी सदिच्छा.
😌जय माऊली😌
माऊली सतीश मोरे
Also available at

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा