फॉलोअर

१० जानेवारी २०१९

देत रहा

*अंतरंग*

कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये माझे शालेय सर्व शिक्षण झाले. प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात आमच्या शाळेत उपक्रम राबवला जायचा , त्याचं नाव होतं विद्यार्थी दानकलश योजना !  गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी इतर सर्व विद्यार्थ्यांकडून किंवा दानशूर व्यक्तींच्या कडून देणगी गोळा करून गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या पुस्तके याचे वाटप केले जायचे .

हा कार्यक्रम आमचे कडक शिस्तीचे पण विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक रा.गो. प्रभुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असे. या कार्यक्रमादरम्यान प्रत्येक वर्षी प्रभुणे सरांचे भाषण असायचे. स्पष्ट आणि कडक आवाजात त्याचे ऐकलेलं भाषण आजही कानात घुमतंय. ते म्हणत, आपल्या कडे जे काही देता येईल ते आपण द्यायला हवे. दान करण्याइतका जगात दुसरा कोणताही आनंद नाही. *देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ,घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे .*

भाषण संपल्यानंतर विद्यार्थ्यांना वस्तू वाटल्या जायच्या. वस्तू वाटल्यानंतर त्या मुलांच्या चेहर्‍यावर जे समाधान दिसायचे ते समाधान फक्त आम्हाला त्यावेळी कळत, दिसत होते. मात्र प्रभूणे सरांनी जे वाक्य सलग सहा वर्षे आमच्या कानावर बिंबवले होते त्याचा खरा अर्थ आज समजू लागला आहे.

खरंच आपल्याजवळ आहे ते देण्यात जो आनंद आहे ,जी मजा आहे ती घेण्यात कधीच नसते. घेणाऱ्याचे हात नेहमी पसरलेले असतात, देणार्‍यांचे हात नेहमी आतुरलेले असतात. देताना हाताची पाच बोटे एकत्र असतात.

'कराग्रे वसते लक्ष्मी'
म्हणजे आपल्या बोटात, हातात लक्ष्मी असते. पाच बोटातील लक्ष्मी (पाच बोटे) आपण जेव्हा एखादी वस्तू देतो तेव्हा एकत्र येते, मात्र ही पाच बोटे दुसऱ्या कडून काहीही घेताना लांब जातात. (करून पहा)

एकत्र आलेली लक्ष्मीदेवी  तुम्हाला इतरांना द्या, समाजातील दीन दुबळ्या लोकांना दान करा, तुमच्या आयुष्यात आनंद आला आहे आता त्याच्या डोळ्यात आनंद आणा असे सांगत असते.

कालच यशवंत महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना अतुल शास्त्री भगरे गुरुजी म्हणाले , कोट्यवधी रुपयांची संपत्ती असणारे,अफाट श्रीमंत असणारे लोक पुन्हा रस्त्यावर आलेले तुम्ही पाहिले असतील. करोडपती रोडपती झालेला तुम्ही पाहिला असेल ! मात्र  दान केलेली व्यक्ती रस्त्यावर आली आहे, भीक मागत आहे असे तुम्हाला कधीच दिसणार नाही.  कारण *दान करणारा माणूस कधीही गरीब होत नाही उलट तो श्रीमंत आणि समृद्ध होतो. तो जेवढे देतो त्या दुपटीने, चौपटीने देण्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते.*

©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*

१०.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

०७ जानेवारी २०१९

फक्त हसुया तरी

*अंतरंग*

भारतीय वंशाचे तत्ववेत्ते रॉबिन सिंग यांचे एक पुस्तक खूप लोकप्रिय आहे. *'तुम्ही मेल्यावर कोण रडणार आहे ? Who will cry when you due? '* हे पुस्तक मी दोनदा वाचून काढले आहे. त्यात ते म्हणतात, मनुष्य जन्माला येतो तो किती दिवस जगतो यापेक्षा त्याने त्याला मिळालेल्या आयुष्यात जगासाठी काय केलं हे महत्त्वाचे असते. त्याने स्वतःसाठी काय केलं , कुटुंबासाठी काय केलं , किती संपत्ती मागे ठेवली याचा हिशोब नातेवाईक करतात. मात्र जग आठवणीत ठेवतं फक्त त्या व्यक्तीने समाजासाठी काय केले तेच !

पाठीमागे ठेवलेली संपत्ती त्याची मुले,मुलगी व नातेवाईक त्यांच्या पश्चात वापरतात ,काही जण त्यात भर घालतात ,काही जण विकून टाकतात मग काय माग राहतं?

एखाद्या व्यक्तीने केलेलं वेगळं काम हेच पाठीमाग राहतं. आपण केलेल्या काम चांगलं असेल तर पुढच्या अनेक पिढ्या त्या कामावर समाजात ताठ मानेने जगतात,आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामात आपण काहीतरी भर घातली पाहिजे.आपला जन्म हा पूर्वजांनी मिळवलेली संपत्ती विकण्यासाठी नव्हे तर ती टिकवून ठेवत आणि सामाजिक कार्यात भर घालत समाजासाठी काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी आहे.

समाजाचा आपल्यावर फार मोठा उपकार असतो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत समाजातला प्रत्येक घटक आपल्यासाठी काहीतरी करत असतो.  प्रत्येक व्यक्ती मोलाची आणि महत्त्वाची आहे. या व्यक्तीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण समाजाला काय दिले पाहिजे .

आपण समाजासाठी काय देऊ शकतो याचा विचार अनेकांना पडेल. मात्र आपल्या परीने जे काही देता येईल तेही आपण करू शकतो.

तत्त्ववेत्ते राँबिनसिंग असे म्हणतात, *तुम्हाला जर काही देता आलं नाही तर किमान रोज दिवसभरात पाच अनोळखी व्यक्तींच्या कडे बघून हसा, त्या व्यक्तीला आनंद द्या.* हसणे ही अशी वस्तू आहे की जी देण्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत .आपल्या समोर आलेल्या अनोळखी व्यक्तींकडे बघून हसल्यावर तोही आपल्याकडे बघून हसेल आणि आनंदाची देवाणघेवाण होईल.

*जगात आपण जन्माला आलोय आहे, आनंद लुटण्यासाठी ,आनंद वाटण्यासाठी !*

© @ *सतिताभ*

७.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

०६ जानेवारी २०१९

Art of understanding other people

*अंतरंग*

आपण जेव्हा एखाद्यावर आरोप करतो, त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो किंवा त्याने केलेल्या चुकीबद्दल पापाबद्दल किंवा अव्यवहाराबाबत त्याला लगेच जबाबदार धरतो , तेव्हा आपण आपलं दुसरी बाजू पाहायला नेहमी विसरतो .

मला बारावीच्या इंग्रजी पुस्तकात एक धडा होता , *'आर्ट ऑफ अंडरस्टँडिंग आदर पिपल*'. त्यामध्ये वाचलेलं एक वाक्य मला अजूनही आठवते. आपण जेव्हा एखाद्याला जबाबदार धरून केलेल्या चुका बाबत त्याला पिंजऱ्यात उभा करतो तेव्हा आपण त्याच्या दुसऱ्या बाजूचा कधीही विचार करत नाही .

खरंतर दुसऱ्याला समजून घेणं ही फार मोठी कला आहे . एखाद्याने चूक केली किंवा न विचारता एखादी वस्तू घेतली, तुमच्या पासून एखादी गोष्ट लपवली तर आपण त्याला डायरेक्ट आरोपी समजतो, याला दोषी ठरवतो.  मात्र ते करण्यापूर्वी *त्याने ते का केलं असावं ? याचा विचारही आपण केला पाहिजे.अशा वेळी आपण पहिल्यांदा त्याच्या जाग्यावर आपल्या स्वतःला उभ करावं. त्याच्या नजरेतून आपल्याकडे पहायला हवं.* त्याने असं का केला असावं याचाही विचार करावा, त्याच्या जागेवर जाऊन  हे पाहिले तर कदाचित आपल्याला त्याची उत्तरे मिळतील.

आपण दुसऱ्याला समजून घेतले तर पुढील बरेच अनर्थ टळतील. रागाच्या भरात एखाद्यावर केलेले आरोप किंवा एखाद्याला दोषी ठरवले तर आपले नातेसंबंध तुटू शकतात. त्या व्यक्तीने असे का केले आहे हे जेव्हा आपल्याला समजल्यानंतर हळहळ करत बसण्यापेक्षा एखाद्याबाबत तात्काळ मत व्यक्त करू नका.

© @ *सतिताभ*

६.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

२२ डिसेंबर २०१८

सर्वांत लहान दिवस आणि सर्वात लहान रात्र

🌎🌞🌎🌞🌎🌞🌎
➖➖➖➖➖➖➖
*☑ २१ डिसेंबर......*
*आज असतो वर्षातील सर्वात लहान दिवस*
➖➖➖➖➖➖➖
वर्षातील प्रत्येक दिवस तसा वेगळा असतो.त्यामधील २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस असतो. याला विंटर सोलस्टाइस नावानेही ओळखले जाते. पृथ्वीच्या आपल्या अंतरावरील आवर्तना दरम्यान वर्षातील एक दिवस असा येतो जेव्हा दक्षिण गोलार्धात सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वात जास्त असते. परिणामी २१ डिसेंबर हा दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस असतो आणि रात्र सर्वात मोठी असते. या दिवसाला विंटर सोलस्टाईस असे म्हटले जाते.

*🌀 सोलस्टाईस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ ‘सूर्य स्थिर आहे’ असा होतोय.*

भारतात पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात रात्र मोठी असते आणि दिवस लहान होत. २१ डिसेंबर या दिवशी रात्र सर्वात मोठी आणि दिवस सर्वात लहान अशी स्थिती असते.
🔲🔲🔲
आजच्या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. २५ डिसेंबर पासून दिवस मोठा होण्यास सुरूवात होतो. २१ डिसेंबर रोजी सूर्य किरण हे मकर रेषेत लंबवत होत कर्क रेषेले तिरप्याहोत स्पर्ष करतात. यामुळे लवकर सूर्यास्त होतो आणि रात्र लवकर होते. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते.
🔲🔲🔲

*🌀21 डिसेंबरसह वर्षातील 3 दिवस असतात खास.... वर्षातील प्रत्येक दिवस तसा वेगळा असतो मात्र खगोलशास्त्राच्या दृष्टीने वर्षातील चार दिवस हे महत्त्वाचे मानले जातात.*

21 डिसेंबरसह वर्षातील 3 दिवस असतात खास, जगभरात असे केले जातात सेलिब्रेट
वर्षातील प्रत्येक दिवस तसा वेगळा असतो मात्र खगोलशास्त्राच्या दृष्टीने वर्षातील चार दिवस हे महत्त्वाचे आणि खास असतात.

*🌞 21 डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस असतो. याला विंटर सोलस्टाइस नावानेही ओळखले जाते.*

*🌞 याशिवाय 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दोन्ही दिवशी दिवस आणि रात्रीची वेळ समसमान असते. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी वर्षातील सर्वाधिकवेळ सूर्य दर्शन होते.* 
🔲🔲🔲

*🌀21 डिसेबरचा दिवस सर्वात छोटा का?....*

पृथ्वीच्या आपल्या अंतरावरील आवर्तना दरम्यान वर्षातील एक दिवस असा येतो जेव्हा दक्षिण गोलार्धात सूर्याचे धरतीपासूनचे अंतर सर्वात जास्त असते. परिणामी 21 डिसेंबर हा दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस असतो आणि रात्र सर्वात मोठी असते. या दिवसाला विंटर सोलस्टाईस असे म्हटले जाते.
- 21 डिसेंबरला सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. या दिवशी सूर्य किरण हे मकर रेषेत लंबवत होत कर्क रेषेले तिरप्याहोत स्पर्ष करतात. यामुळे लवकर सूर्यास्त होतो आणि रात्र लवकर होते.
🔲🔲🔲
२१ डिसेंबर रोजी सूर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस व रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येतो. कोणत्याही वस्तुच्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकतो. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा अक्षाच्या कलतीच्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैष्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनीक छेंदन बिंदू आहे. यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो, याला शरद संपात बिंदू असे म्हणतात, या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो.
➖➖➖➖➖➖➖
🌎🌞🌎🌞🌎🌞🌎

फुलुया चला

चला आपण पण फुलुया !

ही फुलं मला हसायला शिकवतात !

ही फुलं मला बहरायला शिकवतात !

ही फुलं मला सतत खुश राहिला शिकवतात !

ही फुलं मला आनंद लुटायला  शिकवतात !

ही फुलं मला आनंद कसा द्यायचा हे शिकवतात !

ही फुलं माझ्या रोमारोमात आनंद निर्माण करतात !

ही फुलं मला चिखलातून बाहेर कसं निघायचं हे शिकवतात !

ही फुलं मला चिखलात अडकू नको हेही शिकवतात !

ही फुलं मला प्रियजनांची आठवण ठेऊन देतात !

तर मग चला आपण पण फुलुया !

@सतिताभ

१९ नोव्हेंबर २०१८

पहले प्यार कि पहली मुलाखात

पहले प्यार कि पहली मुलाखात

अभिनयाचे देव म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या अमिताभ बच्चन यांना 26 ऑक्टोबर रोजी 'याची देही याची डोळा' पाहण्याचा योग आला.

याबाबत यापूर्वीच दोन ब्लॉगमध्ये लिहिले आहे.
karawadikarad.blogspot.com

कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर आज त्या सेट वरील फोटो उपलब्ध झाले.

हम ..... बच्चन जी के साथ !











०९ नोव्हेंबर २०१८

Positive Vibes Birthday

बर्थडे गिव्ह मी पाँझिटी्ह व्हाईब'

वाढदिवस हा खरंतर ऊर्जा देणारा  परंतू आयुष्यातील एक वर्ष कमी करणारा दिवस असतो. पण या दिवशी जर आपले जवळचे भेटले तर ही ऊर्जा तर वाढतेच आणि पुढील 364 दिवस काम करण्याची प्रेरणा मिळते,
सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. ती मलाही मिळाली.


7 नोव्हेंबर हा माझा वाढदिवस.
माझ्या वाढदिनी अनेकांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. टीम पुढारी सहकारी , किशोर कुमार फँन क्लब,अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपसोबत केक कापला. 

फेसबुकवर माझ्या 10 मित्रांनी मला टँग करून माझे फोटो पोस्ट केले, फेसबुकच्या माध्यमातून मला शुभेच्छा दिल्या. यावर
हजार हून अधिक कमेंट पडल्या आहेत. व्हाट्सअप समुह आणि वैयक्तिकरित्या मला अनेकांनी शुभेच्छा मेसेज पाठवले, फोन वरुन, प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

या शुभेच्छाच्या माध्यमातून मला मोठे बळ मिळाले आहे. आपण सर्वांनी मला शुभेच्छा देऊन मला यापुढील काळातही सकारात्मक पद्धतीने काम करण्याची प्रेरणा दिली आहे.
माझ्या एका मित्राने मला पॉझिटिव्ह व्हाईब' (सकारात्मक लहरींचा स्त्रोत) असे वेगळं स्वनिर्मित कँनव्हास  देऊन मला सुखद भेट दिली.  (सोबत मी ते शेअर करत आहे)


आपल्या सर्वांचे आभार मानायलाच हवेत. असं असलं तरी आभार मानण्यापेक्षा मी आपल्याच ऋणातच राहणे पसंत करतो.
आपले प्रेम व आशीर्वाद यापुढील काळातही माझ्यावर राहू देत.

सतीश वसंतराव मोरे'
      सतिताभ







Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...