दिनांक 16 जुलै
कराड सतीश मोरे
कृतज्ञता हेच पुण्य, माऊलोंनो आभार !
28 जुन रोजी वारी साठी कराडहून आळंदीला निघालो, काल 15 जुलै आषाढी एकादशी झाली, पाडुरंगाचे दर्शन झाले. आज सकाळी एकादशीचा उपवास मारूती बुवा कराडकर मठात सोडला आणि साडे दहा वाजता ट्रकमध्ये बसून कराडच्या दिशेने निघालो. चार वाजता कराडात पोहचलो. पियुष न्यायला आला होता विठ्ठल चौकात.
गेल्या 19 दिवसात खुप सुंदर अनुभव आले, खुप पहायला मिळाले, ऐकायला मिळाले. ज्ञानात भर पडली. आई वडलांची पुण्याई आणि तुम्हा सर्वांचे बळ यामुळे विनासायास वारी पूर्ण झाली. माझी वारी पूर्ण होण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले त्याचे कृतज्ञता पुर्व आभार मानायलाच हवेत!
कराड ते आळंदी ते पंढरपूर ते कराड अशा प्रवासात ज्यांनी
मला मोलाची साथ दिली त्या माझ्या सहकारी वारकरी माऊलीचे आभार !
रस्ता दाखवला, तंबूत बसताना जागा धरली,
जीपमध्ये, ट्रक मध्ये बसायला जागा दिली, जागा धरली,
मला सारे काही दिले, अशा सहकारी माऊलींचे आभार!
माझे साहित्य, वळकटी, सॅक वाहून नेणारे ट्रक जीप चालक यांचे आभार!
हे साहित्य वाहनात टाकणारे, बॅगा वाहणारे सेवेकरी यांचे पण आभार!
आमच्या साठी प्रत्येक तळावर तंबू ठोकणारे, काढणारे सेवेकरी ,
प्रत्येक ठिकाणी आंघोळीचे पाणी उपलब्ध करून देणारे शेतकरी,
टॅकर चालक,शासकीय व खासगी यंत्रणा मधील लोक व संस्थाचे आभार!
आमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी झटणारे डाॅक्टर्स,
त्यांचे सहकारी, सेवाभावी संस्था, लायन्स , रोटरी क्लब,
धर्मादाय ससंस्था आपले पण आभार!
रस्त्यावर भुक लागली की
चहा, नाश्ता, जेवण मोफत देणारे दानशूर,
सकाळी आणि संध्याकाळी
स्वादिष्ट जेवण बनवणारे स्वयंपाकी, आचारी, सहायक ,
दानशूर अन्नदाते, भांडी कुडी देणारे,
घासणारे महिला सेवेकरी यांचे पण आभार!
पंढरीची वारी संयोजक,
चालक मालक, चोपदार, देवस्थान ट्रस्टी,
वारी यशस्वी करण्यासाठी झटलेले गावागातील हजारो हात,
वारीत सर्व सेवा पुरवणारे महसुल, पीडब्ल्लुडी,
जिल्हा परिषद, पोलीस यंत्रणेचे पण आभार!
मोबाईल चार्ज करण्यासाठी जागा देणारे,
अंधारात वाट दाखवणारे मशाल (टाॅर्च)धारी,
शौचालय युनिट उपलब्ध करून देणारे
भाजपायुमो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,
सेवाभावी संस्था यांचे खुप आभार!
माझ्या वारी दरम्यान चांगल्या प्रकारे
कार्यालय सांभाळणारे माझे सहकारी,
मी वारीला जाण्यासाठी प्रेरणा व परवानगी देणारी
माझ्या अनुपस्थित घर सांभाळणारी सौ गृहमंत्री तुझेही आभार!
ज्ञानेश्रर महाराज म्हणतात
श्रोता असेल तर वक्त्याला महत्त्व
तसेच वाचणारा असेल तर लिहणाराला महत्त्व !
रोज संध्याकाळी माझी वारी वाचणारे,मला प्रोत्साहन देणारे,
कौतुक करणारे आपण सारे वाचक आपले खुप खुप धन्यवाद.
अनेक ग्रुपमध्ये वारी पाठवून देणारे तुम्ही सारे माऊली,
आपल्या सर्वाचे खुप खुप आभार !
सर्व वारी तुमच्या पर्यंत पोचवण्यासाठी साथ देणारा टॅब आणि इंटरनेटचे पण आभार !
- सतीश मोरे 9881191302











