फॉलोअर

०९ जानेवारी २०२६

उद्दीष्ट हट्टी मनोहर शिंदे

उद्दिष्ट ‌‘हट्टी‌’ राजकारणी..

मनोहर भास्करराव शिंदे हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं मलकापूर. मनोहर शिंदे आणि मलकापूर यांचं नातं इतकं घट्ट झालं आहे की या दोन्ही नावांना एक वलय प्राप्त झालं आहे. या नात्यासोबत आणखीन एक नातं आहे, ते म्हणजे मलकापूरची 24 बाय 7 योजना. मलकापूरच्या विकासासाठी, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःचं खरं करणाऱ्या ‌‘हट्टी मनोहर शिंदे भाऊ‌’ यांचा आज 9 जानेवारी रोजी वाढदिवस,त्यानिमित्ताने...

मलकापूरसारख्या छोट्या गावातील एक युवा कार्यकर्ता ते प्रगल्भ राजकारणी असा मनोहर शिंदे यांचा प्रवास मी गेल्या चोवीस वर्षांपासून अनुभवला आहे. माजी आमदार भास्करराव शिंदे यांचा मुलगा, केवळ अशी ओळख असणारे मनोहर शिंदे, ज्यावेळी ते काहीच नव्हते तेंव्हापासून मनोहर शिंदे यांना मी पाहत आलो आहे. आता मात्र ‌‘मनोहर शिंदे भाऊ‌’ या नावाचा ब्रँड कराड, मलकापूरसह जिल्ह्यात तयार झाला आहे. परंतु हा प्रवास छोटा नाही, सोपा तर अजिबातच नाही. या प्रवासात मनोहर शिंदे यांना जे यश, कीर्ती आणि नाव मिळालं आहे, याची माझ्या अभ्यासातून किंवा माझ्या मते केवळ दोन कारणे आहेत. ती म्हणजे विशिष्ट कामासाठी स्वतःला झोकून देणे आणि ते काम होत नाही तोपर्यंत सतत पाठपुरावा करत राहणे.

सुरुवातीला मलकापूर ग्रामपंचायत होती, आता मलकापूर नगरपालिका झाली आहे. यामध्ये मलकापूर नगरपंचायत नावाचा एक टप्पा येऊन गेला. हा टप्पा फार महत्त्वाचा होता. ग्रामपंचायतीची मलकापूर नगरपंचायत करणे म्हणजे अंगावर अनेक शत्रू ओढवून घेण्यासारखे होते. कर वाढणार, शासनाचे नियम वाढणार, घरपट्टी वाढणार, पाणीपट्टी वाढणार अशा काही गोष्टी नकोशा असणारे सामान्य नागरिक आणि त्यांना चिथावणी देणारे राजकीय नेते यामुळे शक्यतो कोणी नगरपंचायत करायच्या नादाला लागत नाही. मनोहर शिंदे यांनी हे अग्निदिव्य स्वीकारले आणि खा. पृथ्वीराज बाबा यांच्या पाठीमागे लागून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून मलकापूरची नगरपंचायत करून आणली. नगरपंचायत झाल्यामुळे मिळणारा भरघोस विकास निधी आणि त्यामुळे गावाचा होऊ शकणारा विकास याची जाण शिंदे यांच्याकडे होती. सुदैवाने मनोहर शिंदे यांच्याकडे मलकापूरची सत्ता आल्यानंतर राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. आणखी दुधात साखर पडली, 2010 साली पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. मग मलकापूरला भरभरून विकासाची गंगाच वाहू लागली. विकासकामे ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. एक विकास झाला की दुसरी विकासकामे पुढे उभी असतात. त्यामुळे कमी-जास्त होत असलं तरी मलकापूरमध्ये एके काळी काहीच नव्हतं, मात्र ते सगळं आणण्यासाठी मनोहर शिंदे यांनी केलेली धडपड, केलेले प्रयत्न मी स्वतः पाहिलेले आहेत. कराड शहरालगत मोठ्या वेगाने विकसित होत असलेले मलकापूर शहर म्हणजे नागरिकांसाठी राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण, तर व्यापाऱ्यांसाठी सोन्याची खाणच. सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांनी कृष्णा अभिमत विद्यापिठ व हॉस्पिटलच्या माध्यमातून मलकापूरच्या विकासाची कक्षा उंचावली. मलकापूर शहर वाढलं, विकसित झालं ते फक्त कृष्णा हॉस्पिटलमुळे. सर्व बाजूंनी विकसित झालेल्या मलकापूरमध्ये महामार्गालगत राहायला मिळणे, त्याबरोबरच कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सुविधा मिळणे, सर्व प्रकारचे शिक्षण मिळणे आणि हे सगळे कमी खर्चात उपभोगायला मिळणे, ही संधी कोण कशी बरे घालवेल? आणि याच गोष्टीमुळे मलकापूरचा विकास झपाट्याने होत गेला, लोकसंख्या वाढत गेली. भौतिक सुविधा कमी पडू लागल्या. मग डोळ्यासमोर विकासाची ब्ल्यू प्रिंट ठेवून मनोहर शिंदे यांनी शहर विकासाचे नियोजन केले.
उत्तम, भव्य आणि सुंदर रस्ते हा तर प्रत्येकाचा अधिकार आहेच. रस्ते मोठे झाले तरच शहराचा विकास होतो हे खरे असले तरी विकसित होत असलेल्या मलकापूरमध्ये सुरुवातीला घरोघरी शुद्ध आणि मुबलक पाणी गेले पाहिजे, हा विचार डोळ्यासमोर ठेवून मनोहर शिंदे यांनी 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना आखली. या योजनेच्या मंजुरीपासूनच ही योजना सुरू होणार का? चालणार का? टिकणार का? 24 तास पाणी कोणी देऊ शकतं का? 24 तास पाणी देऊन काय उपयोग होणार? मनोहर शिंदेंना यश मिळणार नाही? मलकापूर ग्रामपंचायत तोट्यात जाणार-अशा नकारात्मक आणि उलटसुलट चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र मनोहर शिंदे यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. देशभरात जिथे ही योजना सुरू आहे तिथे जाऊन माहिती घेतली, अभ्यास केला. 24 तास शुद्ध आणि मुबलक पाणी देणे शक्य आहे. हे पाणी दिलं तर पाण्याचा अपव्यय कमी होईल, लोकांना शुद्ध पाणी मिळालं की मलकापूरमध्ये लोक राहायला येतील, मलकापूरचा विकास होईल, लोकांना आरोग्य मिळेल-हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही योजना उभी केली, चालवली. देशात आदर्शवत ठरवत या योजनेच्या माध्यमातून मलकापूरचं नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलं. मनोहर शिंदे होते म्हणूनच ही योजना चालू शकली आणि यशस्वी झाली, यात काही शंका नाही. मनोहर शिंदे यांचा स्वभाव थोडासा हट्टी आहे, ते स्वतःचं खरं करतात. मात्र ते शहराच्या विकासासाठी हट्ट करतात, हे मी अनेकदा पाहिलं आहे. 24 बाय 7 योजना राबवताना त्यांनी हा हट्टच केला आणि या हट्टीपणामुळेच ही योजना यशस्वी झाली, हे त्रिवार सत्य आहे.

पालिकेत सलग दोन टर्म काँग्रेसच्या चिन्हावर बहुमत मिळणं हे सोपं काम नाही. मात्र मनोहर शिंदे यांना हे शक्य झालं कारण त्या काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तयार केलेलं नेटवर्क. मनोहर शिंदे हे पृथ्वीराज चव्हाण यांचे अतिशय जवळचे होते, आजही आहेत. कराड दक्षिणेत काँग्रेस पक्ष वाढीसाठी मनोहर शिंदे यांचं योगदान फार मोठं आहे. एकनिष्ठ असलेल्या मनोहर शिंदे यांनी जे जे मागितलं, ते तेे पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत मलकापूरला दिलं.

शहराच्या विकासकामांबाबत किंवा डोळ्यासमोर ठेवलेलं उद्दिष्ट पार पाडण्यासाठी राजकारणात काही तडजोडी स्वीकाराव्या लागतात. मनोहर भाऊंनाही त्यांच्या अलीकडच्या काळात एक राजकीय तडजोड करावी लागली. काँग्रेसचा हात सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागलं. त्यांनी हा निर्णय मलकापूर शहराचा विकास, प्रलंबित राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी राज्यात व केंद्रात असलेलं सरकार पाहून घेतला होता आणि त्यानुसार ते निवडणुकीला सामोरे गेले. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मनोहर शिंदे मनोहर भास्करराव शिंदे हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं मलकापूर. मनोहर शिंदे आणि मलकापूर यांचं नातं इतकं घट्ट झालं आहे की या दोन्ही नावांना एक वलय प्राप्त झालं आहे. या नात्यासोबत आणखीन एक नातं आहे, ते म्हणजे मलकापूरची 24 बाय 7 योजना. मलकापूरच्या विकासासाठी, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःचं खरं करणाऱ्या ‌‘हट्टी मनोहर शिंदे भाऊ‌’ यांचा आज 9 जानेवारी रोजी वाढदिवस, त्यानिमित्ताने...यांच्यासारखा अभ्यासू नेता भारतीय जनता पक्षामध्ये घेताना मलकापूर शहरातील विविध घटकांचा नक्कीच विचार केलेला असावा. आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली मनोहर शिंदे यांच्या सोबतीने नुकत्याच झालेल्या मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेलं यश निश्चितच उल्लेखनीय आहे. मनोहर शिंदे भाजपमध्ये गेल्यामुळे अनेक वार्डातील गणितं बदलली आहेत, हे प्रभागनिहाय मतदानाच्या आकडेवारीतून स्पष्ट होतं. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्व बाजूंनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला, त्यांना खाली खेचण्यासाठी मलकापूरात येऊन अनेकांनी प्रयत्न केले, मात्र धुरंधर भाऊ त्यांना पुरून उरले. ते निवडणूक लढवत असलेल्या प्रभागासह मलकापूरातील घराघरातील माणसांचा त्यांना असलेला अभ्यास आणि थेट संबंध त्यांच्या उपयोगी आले. अनेक वर्षे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व नेते म्हणून काम पाहिल्यानंतर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय त्यांना भविष्यकाळात फार मोठी संधी देऊन जाणार आहे. असं म्हणतात, कोणताही निर्णय चुकीचा किंवा बरोबर नसतो; घेतलेला निर्णय जो बरोबर करून दाखवतो, तोच खरा यशस्वी, तोच खरा खिलाडी. भविष्यात मनोहर शिंदे यांच्याकडून काय काम होणार, किती होणार आहे, हे पाहण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. मनोहर शिंदे यांच्या माध्यमातून अभ्यासू नेता सभागृहात मिळाल्यामुळे त्यांनाच पुन्हा उपनगराध्यक्ष करण्याचा निर्णय आ. अतुल भोसले यांनी घेतला. मलकापूरात अपूर्ण राहिलेली कामे आता आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होणार आहेत. मलकापूर शहराला जे हवं ते मिळण्यासाठी मनोहर शिंदे हे कार्य करत राहणार आहेत, यात ते यशस्वी होतील अशी खात्री वाटते. 
मनोहर भाऊंना तुम्ही कधीही मुंबईत, पुण्यात किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये भेटलात, तर त्यांच्या हातात भलीमोठी फाईल असते. नगरविकास खात्यासह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कुठल्या खात्यातून निधी कसा आणायचा, प्रस्ताव कसा दाखल केला की निधी मिळतो, हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. फाईल घेऊन कलेक्टरकडे जाऊन पाठपुरावा करणे, ती फाईल परत विभागीय आयुक्तांकडे गेली आहे का हे पाहण्यासाठी तिथे पोहोचणे आणि शेवटी मंत्रालयात ती फाईल कुठे पोहोचली आहे याचा पाठपुरावा करत त्या मंत्र्यापर्यंत पोहोचणे आणि ते काम करून घेणे, हे त्यांना चांगलं जमतं. परफेक्शन अर्थात परिपूर्णता हा शब्द मनोहर शिंदे यांना तंतोतंत लागू पडतो. राहणीमान असो, समाजात वावरण्याची किंवा बोलण्याची पद्धत असो किंवा पत्रव्यवहाराचा विषय असो-या सर्व ठिकाणी मनोहर शिंदे यांचा अचूकपणा ठळकपणे दिसून येतो. मंत्रालय स्तरावर द्यावयाची पत्रे, राज्य व केंद्रस्तरावर पाठवायची पत्रे मनोहर शिंदे अतिशय अचूकपणे तयार करतात. मुख्याधिकाऱ्यांना जी माहिती नसते, ती भाऊंना माहीत असते.
अनेक गोष्टींवर मनोहर शिंदे भाऊ आणि माझं एकमत असतं, मात्र कधी कधी आमचे तात्त्विक वाद होतात. त्यांच्या जवळच्या काही विघ्नसंतोषी लोकांनी अनेकदा आमच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला, मात्र भाऊंनी त्यांना वेळोवेळी अलगद फेकून दिलं. त्यामुळे आमच्या दोघांमधील वैयक्तिक संबंध कधीही दुरावले नाहीत. ‌‘पुढारी‌’च्या माध्यमातून अनेकदा मलकापूरच्या समस्यांबाबत वस्तुनिष्ठ बातम्या द्याव्या लागतात. मात्र हे छापून आल्यानंतर मनोहर शिंदे यांनी कधीही ‌‘ही बातमी का छापली?‌’ म्हणून मला फोन केला नाही. उलट, ‌‘ही बातमी छापून आल्यामुळे आमचा फायदा झाला. या बातमीचे कटिंग दाखवून मी मंत्रालयात गेलो आणि मलकापूर स्मशानभूमीसाठी निधी आणला,‌’ असं मनोहर शिंदे मला आनंदाने सांगतात. हा त्यांचा गुण खरंच उल्लेखनीय आहे आणि सर्व सत्ताधाऱ्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे. विरोधात छापून आलेल्या बातम्यांनाही जो सकारात्मकपणे घेतो, त्याचा फायदा उठवतो, असा राजकारणी मी क्वचितच पाहिलेला आहे. 
या पुढील काळातही मनोहर शिंदे यांच्या हातून मलकापूरवासीयांसाठी चांगली कामं होवोत, त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशा त्यांना शुभेच्छा!
- सतीश मोरे

०६ डिसेंबर २०२५

भगवान छप्पर फाडके देता है

आज आपल्या भेटीचा दिवस—
एकांतात तुझी खूप वाट पाहिली.
तु येणार होतीस, तु भेटणार होतीस,
हीच आशा मनात रुंजी घालत होती.

मला तुला भेटायला खूप आवडतं,
तुलाही मला भेटण्याची तितकीच ओढ आहे.
दोघंही भेटण्यासाठी आतुर होतो.
तो दिवस आज यायचा होता.
भेटीचा दिवस ठरला होता.
पण तुला येता आलं नाही…
तरीही मी तुझी खूप वाट पाहिली.

आपल्या दोघांच्या बेडवर पडून,
प्रत्येक क्षण तुझ्यासोबतचा
डोळ्यांसमोर फिरत होता.
तुझ्या आगमनाची मनोमन आशा होती.
तु आली नाहीस,
तरीही तुझ्या वाटेकडे नजरा लागल्या होत्या.
मधूनच फोनकडेही लक्ष जात होतं—
कधी येईल तुझा कॉल?
कधी सांगशील— “येते आहे…!”
मी 5 वाजेपर्यंत तुझी खूप वाट पाहिली.

आणि मग—
तु नाही आलीस, पण तुझा फोन आला.
“कुठे आहेस सती? दहा मिनिटात मंदिरात ये.”
मी अंगावर पांघरून घेतलेलं चादर झटकून
खडकन उठलो,
तयार झालो
आणि आपल्या नेहमीच्या जागी,
मंदिराबाहेर पोहोचलो…

आणि तिथे—
माझ्या देवीचं दर्शन झालं.
मन आनंदाने फुलून आलं.
खरंच, सुखाचा झरा उडाला.

आज देवाने माझ्यासाठी
खूप काही खास ठरवलं होतं.
याहून सुंदर क्षण असूच शकत नाही.
आम्ही नवरा-बायकोसारखे
रांगेत उभे राहून मंदिरात गेलो.
देवाची पूजा केली,
जोडीनं नमस्कार केला.
डोळे बंद करून
एकमेकांसाठी खूप काही मागितलं.

आपलं सुख—
परस्परांच्या सुखातच सामावलेलं आहे.

एकत्र प्रदक्षिणा पूर्ण केली.
आज देवावरची श्रद्धा आणखी दृढ झाली.
भगवान छप्परफाड देतो—
सच्च्या भक्तांना नेहमी ऐकतो,
जे करतो ते चांगलंच करतो.

ओ सबकुछ…
ओ देवीजी…

तुझा— फक्त तुझाच,
तुझ्यासाठी जगणारा,
क्षणोक्षणी तुझी वाट पाहणारा…

— सती

Today was the day of our meeting.
I waited for you in solitude for so long.
You were supposed to come,
you were supposed to meet me.

I love meeting you,
and you too are eager to meet me.
Both of us were longing for this moment.
That day was supposed to arrive today.
Our meeting was decided for today.
You couldn’t come…
but still, I waited for you endlessly.

Lying on our bed,
every moment spent with you
flashed before my eyes.
I was filled with the hope of your arrival.
You didn’t come,
yet my eyes remained fixed on your path.
Again and again, my gaze drifted to the phone—
expecting your call,
hoping you would say, “I’m coming.”
I waited for you till 5 pm.

You didn’t come,
but your call came.
“Where are you, Sati? Come to the temple in ten minutes.”
I got up with a jolt,
quickly got ready,
and reached our usual place—
outside the temple.

And there…
I saw my Goddess.
My heart overflowed with joy.
A stream of happiness poured within me.

Today God had planned something special for me.
Nothing could have been more beautiful than this.
We stood in the queue like husband and wife
and went inside the temple together.
We did the puja together,
bowed down together.
With closed eyes,
we prayed for each other with all our heart.

Our happiness lies in each other’s happiness.

We completed the circumambulation side by side.
My faith in God grew stronger today.
God gives in abundance,
He listens to true devotees,
and whatever He does—He does for good.

Oh my everything…
Oh my Goddess…

Yours— only yours,
living for you,
waiting for you every single moment…

Sati



१४ नोव्हेंबर २०२५

आशिर्वादावर तुमच्या तरतो मी


दादा अनेकदा कराडला येतात, 
गप्पा मारतात, आराम करतात,
नातवांना चार गोष्टी सांगतात. 
विषय निघाला तर 
जुन्या आठवणी ताज्या करतात.
 
अधूनमधून माझ्या डोळ्यात खोलवर पाहतात.
माझ्यातला छोट्या सतीशला ओळखतात.

शक्यतो त्यांच्या समोर व्यक्त होत नाही मी !
त्यांचं वय आणि आदर यामुळे, 
आतल्या आत शब्द गिळून घेतो मी !

आज खुप दिवसांनी 
त्यांनी मला एक प्रश्न विचारला. 

तुला मानसिक त्रास होतो का?
कसं सहन करतोस मग हे सारं?
काय करतोस मग अशा वेळी?

डोळ्यात पाणी आलं होतं,  
गळा दाटून आला होता !
पण आवरलं मी... ;
खिडकीतून दूर पाहत बोललो मी,

अहो दादा, 
सगळं पाठीवर टाकून पुढं जातो मी !
सतत माणसाच्या गर्दीत राहतो मी !

दुःखाचा बाजार का करायचा ?
आनंदाचा गुणाकार करतो मी !

छंद आवडीचे जपतो मी !
मित्रांसोबत रमतो मी !
मुलांकडे बघून जगतो मी,
आशिर्वादांवर तुमच्या तरतो मी! 
आशिर्वादांवर तुमच्या तरतो मी!



दादांचा सतीश 
१४.११.२५

११ नोव्हेंबर २०२५

एक मुलाखात जरूरी है


🌙 ग़ज़ल — “एक मुलाक़ात ज़रूरी है, दुलारी...” 🌙

मुझे कुछ अरज़ करना है, बहुत कुछ सुनना है,
सति के दिल में अब भी वही जुनूँ बसना है...

फिर उसी मोड़ पर, इक बार मिलना है,
जहाँ छोड़ा था वक़्त, वहीं फिर ठहरना है...

आपका दामन थामकर, आपको निखरना है,
दुलारी की आँखों में, सति को ढूँढना है...

बस ख़ामोश बैठना है, आपको तकना है,
देखकर आपको, आप में ही फ़ना होना है...

एक मुलाक़ात ज़रूरी है, दुलारी...
आज... कल... या आने वाला कोई पल प्यारी...

जीना है, संवरना है, हाथ थामकर कुछ कहना है,
लबों से नहीं, दिल से इज़हार करना है...

देखना है, दिखाना है, वो पल सजाना है,
लाडली को आगोश में लेकर मुस्कुराना है...

तड़प हैं सति, तड़पे हो आप भी,
धड़कन को धड़कन में समाना है अभी...

आपको सब पता है, सति का हाल बेहाल है,
बस एक मुलाक़ात ही अब सवाल है...

मुलाक़ात तो बहाना है, सजनी की नज़रों में झाँकना है,
प्यार का सिलसिला पुराना है, पर अब भी वही अफ़साना है...

एक मुलाक़ात ज़रूरी है, दुलारी...
आज... कल... या कल...

१५ ऑक्टोबर २०२५

बच्चन नामाच्या महिम्यामुळं तरलं २४ तास बच्चन गाण्याचं धनुष्य !



🎬 अमिताभ बच्चन नामाच्या महिम्यामुळं तरलं २४ तास बच्चन गाण्याचं धनुष्य !

कराडात घडला इतिहास आणि विक्रमही !

काही क्षण आयुष्यात असे येतात जे फक्त घडत नाहीत,ते इतिहास घडवतात.अमिताभ बच्चन यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये झालेला “२४ तास बच्चनप्रेमी बच्चनगाणी” हा सोहळा असाच एक क्षण होता. माझ्यासाठी,आमच्या ग्रुपसाठी आणि प्रत्येक बच्चनप्रेमीकरिता भावनांचा पर्वणीचा दिवस!

🌟 संकल्पाची सुरुवात – एक वेड, एक वचन

मी सतीश मोरे सतिताभ..सतीश मधला 'सती' आणि अमिताभ मधला 'ताभ' अर्थात सतिताभ. लहानपणापासून अमिताभ बच्चन यांचं जग माझ्या हृदयात वसलेलं आहे.त्यांचे संवाद, अभिनय, विचार, आणि संघर्ष — हे सगळं माझ्या आयुष्याचं मार्गदर्शन आहे. 

अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेमातून किंवा त्यांचा बाबत सतत चिंतन चर्चा करण्यासाठी अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचा जन्म 2015 साली 8 जानेवारीला झाला.अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपने गेल्या दहा वर्षात अनेक उपक्रम राबवले. महानायक अमिताभ बच्चन यांचे 'सिलसिला ,कालिया,नमक हलाल' यासारखे चित्रपटाचे स्पेशल शो कराडच्या प्रभात चित्रपटगृहात आयोजित केले. अमिताभ बच्चन यांच्यावरील गाण्याचा सुंदर कार्यक्रम 'एक शाम अमिताभ के नाम' आणि 'बेमिसाल अमिताभ' कराडमध्ये आयोजित केला. उल्लेखनीय म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये स्वच्छता अभियानामध्ये आम्ही भाग घेतला. याच निमित्ताने अमिताभ बच्चन साहेबांच्या वाढदिवसादिवशी आम्ही देशात पहिल्यांदाच एक आगळावेगळा उपक्रम राबवला. तो उपक्रम होता अमिताभ बच्चन यांच्या जीवनावरील व्याख्यान... होय अमिताभ बच्चन हा व्याख्यानाचा विषय आहे, होता आणि आणि असेल. ते व्याख्यान दिले नितीन बानगुडे पाटलांनी ! या कार्यक्रमाला हाऊसफुल्ल गर्दी झाली होती. दीड तास अमिताभ बच्चन या विषयावर बोलल्यानंतर नितीन बानगुडे सरांनी 'अमिताभ बच्चन हा 24 तास बोललं तरी कमी पडणारा विषय आहे' अशी एक वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

दरवर्षी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी खास करण्याची इच्छा असते. पण यंदा मनात एक आगळी कल्पना आली —
'२४ तास अखंड बच्चनगाणी ! बच्चन प्रेमी, बच्चन गाणी !

ही कल्पना जितकी सुंदर, तितकीच कठीण होती.अशा प्रकारचा कार्यक्रम याआधी कधी झाला नव्हता —२४ तास सतत गाणी, संवाद, उत्साह, आणि प्रेक्षकांचा सहभाग ! पण मनात एकच गोष्ट ठरवली होती — “हे स्वप्न पूर्ण करायचंच. हे माझं बच्चनप्रेमाचं अर्पण आहे.” आमच्या बच्चन प्रेमीच्या बैठकीमध्ये हा विचार बोलून दाखवला. बैठकीमधील उपस्थित निम्म्याहून आधी सदस्यांनी माझ्या या संकल्पानंतर गप्प राहणे पसंत केले कारण हे कसं शक्य असा विचार त्यांच्या मनामध्ये आलेला होता. मात्र कायम माझ्यावर विश्वास असणाऱ्या सर्व सदस्यांनी यांनी मूक संमती देऊन गोष्टीला फुल्ल पाठिंबा दिला. कारण ग्रुपच्या अध्यक्षावर त्यांचा विश्वास होता.अध्यक्षांनी जी कल्पना मांडली आहे त्या कल्पनेवर त्यांचा विश्वास होता आणि ते हे करू शकतात याची त्यांना गॅरंटी होती. माझ्या ग्रुप मधील सतीश भोंगाळे, राहुल पुरोहित, जाॅन्टी थोरात, संजय शिंदे माझे जवळचे 24 तास उपलब्ध शिलेदार आहेत, त्यांनी तरी हा विषय इतका उचलून धरला की मी ठरवलं हा कार्यक्रम करायचाच.

कार्यक्रम घ्यायचे ठरल्यानंतर पहिला प्रश्न आला कुठे घ्यायचा ? कराडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती सदन आणि वेणूताई चव्हाण सभागृह असे दोन मोठे सांस्कृतिक हॉल उपलब्ध आहेत. मात्र या ठिकाणी 24 तासाला लागणारे भाडे अवाक्या बाहेरचं होतं. शिवाय त्या ठिकाणी चोवीस तास सांस्कृतिक वातावरण कसे निर्माण करायचं, कसं टिकवून ठेवायचं याबाबत शंका आल्यामुळे तो नाद सोडला आणि पंकज एक्झिक्युटिव्ह हॉटेलचा एसी हॉल ठरवायचं निश्चित केलं. पंकज हॉटेलचे मालक राहुल शहा यांनी फक्त फोनवर ही कल्पना इतकी उचलून धरली की तुम्हाला हा उपक्रम माझ्या हॉटेलमध्येच करावा लागेल, मी तुम्हाला सर्व सहकार्य करायला तयार आहे, असे सांगितले .24 तासासाठी अत्यल्प दरामध्ये हा हाॅल उपलब्ध करून देऊन राहुल शहा यांनी आम्हाला पहिल्याच बैठकीत बळ दिलं. या कार्यासाठी लागणारा खर्च एक लाख रुपयाच्या घरात होता. आमच्या ग्रुपचे यंग आणि डायनॅमिक बच्चन अतुल शिंदे यांनी ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. दोन बैठकीमध्ये फक्त जाग्यावर बसून फोन लावून त्यांनी चांगले सहा प्रायोजक पाहिले आणि मग आमचा विषय मिटला. 

पुढचा प्रश्न होता या 24 तास बच्चन गाणी गाण्यासाठी गायक कोण ? ओपन फोरम ठेवला तर तिथे गायक येतील पण त्यांना स्लॉट कसे द्यायचे,नोंद कशी करायची हा विषय डोक्यात आल्यानंतर कराड मधील कराओके संगीत ग्रुप गायकांना आपण बोलवावं असा विचार मी मांडला, मी या विषयालाही सर्वांनी पाठिंबा दिला. किशोर कुमार फॅन क्लब च्या माध्यमातून नेहमी अग्रस्थानी असणारे डॉ. नितीन जाधव आणि सुधाकर बेडके यांच्यावर मी ही जबाबदारी दिल. दोघांनीही ही जबाबदारी पेलली. कराड मधील संगीत प्रेमी ग्रुपना आम्ही निमंत्रण दिले. ही कल्पना सांगितली. 24 तास बच्चनची गाणी होणार आहेत आणि एक रेकॉर्ड होणार आहे हे त्यांना पटवून दिल्यानंतर हसतमुखपणे याला पाठिंबा दिला. मग त्यांचे स्लॉट पाडणे त्यांना हे पण महत्त्वाचे होते. या सर्व ग्रुपनी सकाळी सहा वाजल्यापासून रात्रीच्या बारापर्यंत आम्ही या कार्यक्रमाला येऊ शकतो अशी संमती दर्शवली. मग विषय राहिला रात्री बारा ते सकाळी सहा काय करायचं? खरंतर ही अतिशय किचकट टाईम आहे किंवा अडचणीची वेळ आहे. झोपायची वेळ असलेल्या रात्री ते बारा ते सकाळी सहा दरम्यान गाणी कोण बरं म्हणणार? मग मी ही जबाबदारी आमच्या बच्चन प्रेमी ग्रुप मधील जे टॉप सिंगर आहेत त्यांच्यावर सोपवली डॉ. नितीन जाधव, सुधाकर बेडके, मंगेश हिरवे ,दीपक रैनाक, संजय शिंदे, माणिक बनकर यांनी रात्रीची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी त्यांच्या संपर्कातून कराडमधील टॉपचे गायकांना याच कालावधीत गाणी म्हणण्यासाठी निमंत्रित केले. महत्वाचे म्हणजे निशाचर जॉन्टी थोरात यांनी त्यांच्या संपर्कातील अनेक गायकांना फोन करून रात्री ते बारा ते सहा तुम्हाला यावंच लागेल असा दम दिला आणि अनेक जण जमा झाले. रात्रीच्या बारा वाजता समीर संदे, श्री व सौ विजय वळवडे,विजय शिंदे देवेंद्र साळुंखे यांच्यासहित अनेक जण पंकज हॉटेलच्या हॉलमध्ये उपलब्ध झाले आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. गुगल फॉर्मवर आम्ही नोंदणी केली होती.या नोंदणी मध्ये रात्री बारा ते सहा हा स्लॉट रिकामा ठेवला होता. या स्लॉटमध्ये ऑनलाइन नोंदणी केलेले अनेक गायकही रात्री बारा ते सहा या ठिकाणी उपस्थित राहिले.

---

🎶 २४ तासांचा संगीत प्रवास

शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता विजय पाटील यांच्या दमदार आवाजात आम्ही *‘अग्निपथ अग्निपथ’* च्या बच्चन स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर लगेच आमच्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचं थीम सॉंग 'एक दुसरे से करते है प्यार हम' हे आम्ही सर्वांनी एकत्रितपणे गायलं आणि आमची ताकद एकवटली.त्या क्षणापासून कराडचं पंकज एक्झिक्युटिव्ह हॉल संगीताच्या लहरींनी भरून गेलं.

रात्रीपासून पहाटे सहा पर्यंत ३५ कलाकारांनी बच्चनजींची गाणी सादर केली. या कालावधीत संजय शिंदे, दिपक रैनाक, मंगेश हिरवे , श्री व सौ विजय वळवडे, समीर संदे, देवेंद्र साळुंखे यांनी गायलेली गाणी अप्रतिम होती. खऱ्या अर्थाने रात्री बारा ते पहाटे सहा खरी महफिल झाली. पहाटे चार ते पाच या मैफिल मध्ये गायकांची संख्या दहाच्या वर होती होती आणि ऐकणारांची संख्या चार होती. मी स्वतः रात्री 12 ते 4 याठिकाणी उपस्थित होतो. चार नंतर सतीश भोंगाळे, जॉन्टी थोरात, राहुल पुरोहित, दीपक रैनाक मिलिंद रैनाक, शैलेंद्र कणसे यांच्याकडे सूत्रे सोपवून मी तिथेच झोपी गेलो. या टीमने पुन्हा पुढचे तीन तास महफिल गाजवली.सकाळी सात वाजता पुन्हा हजर झालो. 

पहाटेपासून दुपारपर्यंत ‘साथिया’, ‘स्वरसाज’, ‘रागमंजिरी’ आणि ‘रॉयल कराओके ग्रुप’च्या गायकांनी सभागृह दुमदुमवलं. दुपारी बारा पुन्हा केक कापून बच्चनजींचा वाढदिवस साजरा झाला — 

टाळ्यांचा कडकडाट, हसरे चेहरे, आणि डोळ्यांत चमक.

संध्याकाळी ‘साज और आवाज’, ‘स्वरसाधना’, ‘किशोर कुमार फॅन क्लब’, ‘कंम्पा अकॅडमी’ आणि ‘स्वरसंस्कार संगीत अकॅडमी’च्या कलाकारांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली.आणि मग रात्री अकरानंतर — टॉप सहा गायक मंचावर आले.त्याच्या सुरांनी कार्यक्रमाचं वैभव शिखरावर नेलं.मध्यरात्री पुन्हा बच्चनजींचा वाढदिवस साजरा करताना सभागृहात सगळ्यांच्या माझ्या सहित ग्रुप मधील सर्व सदस्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. नॉन स्टॉप संगीत 24 तास हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला त्याचा एक अभिमान वाटत होता.

---

🕰 थकवा नव्हता, फक्त उत्साह!

प्रामाणिकपणे सांगायचं तर,आठ दिवस मला झोप आलीच नाही. संपूर्ण तयारी, नियोजन, कलाकारांशी संपर्क — सगळं माझ्यासह टीम मधील सतीश भोंगाळे, राहुल पुरोहित पुरोहित, जॉन्टी थोरात, बंडा पाटील, सागर बर्गे, संजय शिंदे, दीपक रैनाक, प्रमोद गरगटे, सुधाकर बेडके आदी बच्चन प्रेमी सांभाळत होती. पण थकवा जाणवला नाही, कारण मनात एकच भावना होती —

> “हे बच्चनजींसाठी आहे. हे त्यांच्या प्रेरणेला सलाम आहे.” जेव्हा सभागृहात लोक डोळे मिटून गाण्यांत हरवलेले दिसत होते,तेव्हा वाटलं — याहून मोठं समाधान काहीच नाही.

---

🎨 रंगांनी घडलेला विक्रम – ८३ फुटांचा कॅनव्हास

या कार्यक्रमाच्या समांतर कला महाविद्यालयाचे प्रा. सतीश उपळावीकर यांनी इतिहास रचला.अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर आधारित ८३ फुट लांबीचं पेंटिंग त्यांनी २४ तास सतत रेखाटलं!एका बाजूला गीतांचा जल्लोष आणि दुसऱ्या बाजूला रंगांची साधना —असा संगम देशात पहिल्यांदाच झाला.
कला आणि संगीत एकत्र आल्यावर जो चमत्कार घडतो,
तो त्या दिवशी कराडमध्ये घडला. उपळावीकर सरांनी रात्रीच्या बारा वाजता हा उपक्रम सुरू केला. 83 वा वाढदिवस असल्यामुळे 83 फुटाचे कॅनवास त्यांनी आणले होते. अन्न न खाता त्यांनी 24 तास मांडी घालून बसून अमिताभ बच्चन यांची 50 हून अधिक चित्रे काढली, हा एक विक्रमच आहे.

🙌 माझी टीम – माझी ताकद

हा कार्यक्रम एकट्यानं शक्यच नव्हता.आमच्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी मनापासून पार पाडली. सतीश भोंगाळे, जगन पुरोहित,जॉन्टी थोरात, डॉ. नितीन जाधव, अतुल शिंदे, संजय शिंदे,पोपटराव साळुंखे,बंडा पाटील, सुधीर एकांडे, प्रमोद गरगटे, शेरखान पठाण, संजय क्षीरसागर, दिपक रैनाक, विजय वाटेगावकर, संजय बदीयानी, मंगेश हिरवे, विजय पाटील,सुधाकर बेडके, शेरखान पठाण, सागर बर्गे, बाळासाहेब पाटील, विजय पाटील, कुमार नलवडे, संभाजी शेवाळे, सचिन देशमुख, माणिक बनकर,संजय क्षीरसागर,सोनवणे सर

.. कुणाकुणाची नावं घेऊ ! सर्वांनी खूप कष्ट घेतले —प्रत्येकानं आपला वेळ, ऊर्जा आणि प्रेम या उपक्रमात दिलं.त्यांच्या शिवाय हा सोहळा अपूर्ण राहिला असता.

💖 भावनिक क्षण
कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा घड्याळ्यात बारा वाजले आणि पुन्हा केक कापण्यात आला,
तेव्हा वातावरणात एक अवर्णनीय भावना होती.
गायक थकलेले होते, पण डोळ्यांत समाधान होतं.
प्रेक्षक टाळ्या वाजवत होते, पण हृदय भरून आलं होतं. खरं तर रात्री बारा वाजता हा कार्यक्रम संपणार होता. मात्र एक वाजेपर्यंत मैफिल सुरू होती. शेवटी जेवायला जायचं होतं आणि आम्ही माईक ठेवला आणि तेथील इतर गायकाच्या सोपवला. पुन्हा रात्रीच्या दोन वाजेपर्यंत गाणी सुरू होती. उपक्रम 24 तासाचा होता मात्र 26 तास अखंड गाणी सुरू होती.
त्या क्षणी मला वाटलं —

> “हो… हे केलं आपण, अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप मधील सर्वांच्या सहकार्यामुळे, ताकदीमुळे! हा केवळ कार्यक्रम नव्हता — हा प्रेमाचा उत्सव होता.”

---

🕊️ कराडचा अभिमान 

या २४ तासांच्या सोहळ्यानं कराड शहरात बच्चनप्रेम आणि संगीत यांची एक नवी परंपरा निर्माण केली आहे. लोक मला विचारतात — “हे तुम्ही कसं केलंत?”माझं उत्तर साधं आहे —

> “प्रेमात गणित नसतं. हे सर्व अमिताभ बच्चन या नामाच्या महिम्यामुळे झालं. अमिताभ बच्चन या नावाची जादू फार मोठी आहे" कार्यक्रमात 24 तास १२५ हून अधिक गायक आणि गायिकांनी गाणी गायली. 24 तासात हजार हून अधिक रसिकांनी उपस्थित दाखवली"

हा कार्यक्रम 24 तास फेसबुक वरून लाईव्ह होता. या माध्यमातून पुन्हा एकदा हजारो लोकांनी हा कार्यक्रम मोबाईलवर पाहिला.अमिताभ बच्चन यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या कलेच्या आदरानं आम्ही हे केलं.आणि आज हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर माझं मन एकच म्हणतं —

> “ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं…”
आणि ही ज़िंदगी आम्ही २४ तास गाण्यांच्या रूपात मोठी केली आहे!

*आभार नव्हे कृतज्ञता..*

कार्यक्रमाचे मुख्य प्रयोजक हॉटेल प्यासा गार्डन, शिवराज अक्का मसूर धाबा, शिवनेरी अक्का मसूर धाबा, राजोरी स्टील, नाकोडा स्टील, मंगेश हिरवे, अभियंता एन एस पवार यांचे मनःपूर्वक आभार.

म्युझिक सिस्टिम चे सागर सूर्यवंशी हे 26 तास उपस्थित होते. कोणतीही तांत्रिक अडचण न येऊ देता त्यांनी 24 तास ही सेवा उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाच्या यशामागे हे ही मुख्य कारण आहे संगीत नियोजन. 

24 तास हॉल उपलब्ध करून देणारे हॉटेल पंकजचे मालक राहुल शहा, श्रीनिवास गौडा आणि त्यांचा सर्व स्टाफ, अतिशय सुंदर डिझाईन आणि सर्टिफिकेट बनवून देणारे वैभव कांबळे (स्पर्श)आणि विशाल देशमुख, ही सर्टिफिकेट ऑनलाईन देण्यासाठी कार्यशील असणारे प्रशांत लाड सर, सर्टिफिकेट आणि अमिताभ बच्चन यांचे फोटो अत्यल्प दरामध्ये प्रिंट करून उपलब्ध करून देणारे कुलबुर्गी डिजिटल आर्ट, मुकंदर का सिकंदर अभिमान पत्राचा ड्राफ्ट तयार करणारे जगन पुरोहित याचं खुप आभार.

एसी सभागृहात लावण्यात आलेले आकर्षक अमिताभ बच्चन यांचे लाईव डिजिटल फोटो करून प्रिंट करून देणारे राहुल आर्ट्स, 24 तास हा कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपित करणारे सुरेश पवार आणि विकास साळुंखे आणि सहकारी, प्री आणि पोस्ट व्हिडिओ करून देणारे हारुण मुलाणी, 24 तास कला सादर करणारे गायक आणि गायिका, २४ तास या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहीलेले प्रेक्षक आणि ऑनलाइनवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे.. आभार ...आभार... आभार..

---

💫 शेवटी…

मी मनापासून सांगतो —
अमिताभ बच्चन माझ्यासाठी केवळ अभिनेता नाहीत,ते माझ्या प्रेरणेचा स्रोत, माझ्या आयुष्याचा उत्सव आहेत.हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या कलेला आमचा नम्र अभिवादन! कराड शहराचं — बच्चनप्रेमींचं — सामूहिक स्वप्न जे अखेर सत्यात उतरलं, हे आनंददायी आहे.

---

🌹 “अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप कराड” – प्रेम, संगीत आणि प्रेरणेचा प्रवास अजून पुढे चालू आहे…कारण बच्चन म्हणतातच —

> “ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना आणि संगीताशिवाय आणि अमिताभ बच्चन शिवाय आम्ही जगूच शकत नाही!” 🎬✨

24 तास बच्चन प्रेमी बच्चन गाणी सोबत 24 तास कॅनव्हास वर अमिताभ बच्चन चे चित्र... हा उपक्रम देशात कुठेही झालेलं नाही. अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचे काम सुरू आहे. मात्र या उपक्रमाला कराड शहरातील रसिकांनी एक महफिल म्हणून जो प्रतिसाद दिला त्यासाठी कराडकरांना सलाम, कोपरापासून दंडवत. माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर जोशी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचेही आभार. तरुण, मध्यमवयीन, स्त्री पुरुष , बच्चन प्रेमी, जेष्ठ नागरिक यासह संगीत प्रेमी ग्रुपमधीलअडीचशे हून अधिक गायकानी या मैफिलमध्ये आपली कला सादर केली. असा संगीत महोत्सव अशी संगीत मेहफिल यापूर्वी कधी कराडात झालेली नाही, जिल्ह्यात नव्हे देशात झाली नसेल. हे सर्व शक्य झालं आहे केवळ आणि केवळ अमिताभ बच्चन यांच्या नामाच्या महिम्यामुळं..!

@सतीश मोरे सतिताभ

.. लेखन मर्यादा

२५ ऑगस्ट २०२५

ठरवून ठरवलं तरी


ठरवणं आणि ठरणं

आपल्या आयुष्यात प्रत्येकजण काही ना काही ठरवत असतो.
कधी एखादं ध्येय गाठायचं, कधी एखादं नातं टिकवायचं,
कधी एखादी चांगली सवय लावून घ्यायची—
"आजपासून मी हे करणारच!" असं ठाम मनाशी पक्कं ठरवतो.

पण प्रश्न असा आहे की,
ठरवलं तसं नेहमी घडतं का?
बर्‍याचदा आपल्याला वाटतं तसं होत नाही.
कधी परिस्थिती बदलते, कधी अडथळे येतात,
कधी आपल्या हातात नसलेल्या गोष्टी
संपूर्ण चित्र बदलून टाकतात.

म्हणूनच “ठरल्याप्रमाणे झालं, तर ठरवायला अर्थ आहे;
नाहीतर ती केवळ ठरवाठरवी ठरते” असं वाटतं.
आपल्या ठरवण्याला पूर्ण होण्यासाठी
वेळ, संधी आणि परिस्थितीची साथही हवीच असते.

तरीही जीवनाची गंमत हीच—
आपण न ठरवता देखील अनेक गोष्टी
आपोआप घडत जातात.
कधी न ठरवलेली माणसं भेटतात,
न ठरवलेल्या वाटा समोर येतात,
न ठरवलेल्या संधी आपल्याला उचलून नेतात.
तेव्हा लक्षात येतं की,
आपल्या पलीकडे कुणीतरी मोठा ठरवणारा आहे—
जो आपल्या आयुष्याची दिशा ठरवतो.

म्हणूनच जीवनाकडे पाहताना दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात—
१) आपण हवं ते नक्की ठरवणं, प्रयत्न करणं.
२) आणि न ठरलेलं जे घडेल त्याला समजूतदारपणे स्वीकारणं.

कारण शेवटी—
आपण ठरवतो तेवढंच नाही,
तर जे न ठरवता घडतं,
तेच कधी कधी आयुष्याला खरी दिशा देतं!

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...