फॉलोअर

१६ मे २०१८

तुम्ही तुमच्या जागेवर जा, आम्हाला आमची जागा द्या



‘ तुम्ही तुमच्या जागेवर जा, 

आम्हाला आमची जागा द्या ’

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मनोमिलनाच्या गप्पांचा आनंद जिल्हावासिय (विशेषत: कराडकर) लुटत आहेत. जे कधी होणारच नाही त्या मिलनाच्या, त्यानंतरच्या गळाभेटीच्या आणि मधुमिलनाच्या गप्पा पारावर सुरु आहेत. मात्र या दोन टोकाच्या नेत्यांमधील एकमेकांप्रती असलेला दु:श्वास,अहंकार तसेच माझी जागा मला द्या, तुम्ही तुमच्या जागेवर जा! ही उंडाळकर गटाची असलेली आग्रही मागणी या प्रमुख तीन कारणांमुळे काका-बाबा गटाच्या एकत्रिकरणावर प्रश्नचिन्ह आहे. 

सलग सात टर्म कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सातारा जिल्ह्यावर अनेक वर्षे प्रभुत्व होते. 2010 साली अनपेक्षितरित्या कॉंग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी दिल्लीहून निवड झाली. यानंतर उंडाळकर गटाला हळूहळू ग्रहण लागले. कॉंग्रेसचे आमदार असूनही 2010 ते 2014 या काळात पृथ्वीराज चव्हाण यांनी उंडाळकरांना फारसे जवळ केले नाही. 2014 विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री पदावरील पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्णय कॉंगे्रस पक्षाने घेतला. सक्षम असूनही उंडाळकर यांना डावलण्यात आले आणि पृथ्वीराज चव्हाण यांना कॉंग्रेसने दक्षिणचे तिकिट दिले. उंडाळकरांनी कार्यकर्त्यांच्या रेट्याच्या जोरावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. भाजपचे अतुल भोसलेही रिंगणात होते. मुख्यमंत्री पदाचे वलय, मतदारसंघात दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी आणि सत्ता आली तर कराडला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल, या आशेवर कराडकरांनी पृथ्वीराज चव्हाण यांना निवडून दिले. हा इतिहास ताजा आहे. 

2014 पासून गेल्या चार वर्षांत पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव उंडाळकर यांच्या गटात फारसे सख्य राहिले नाही. या कालावधीत झालेल्या सर्व निवडणुका उंडाळकर गटाने अपक्ष म्हणून लढवल्या आहेत. वास्तविक, 2014 च्या निवडणुकीत उंडाळकरांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ऑफर होती. काकांनी त्यावेळी राष्ट्रवादीचे तिकिट घेतले असते तर कदाचित निकालही वेगळा दिसला असता. भाजपानेही त्यांना तिकिटासाठी पायघड्या घातल्या होत्या. मात्र कॉंग्रेस पक्षाच्या जडणघडणीत तयार झालेल्या काकांनी कॉंग्रेस सोडून कुठल्याही पक्षात जाण्यास नकार दिला आणि याच मुद्यावर गेल्या काही वर्षांत काकांचे कॉंग्रेस पातळीवर वजन व ‘इमेज’ आणखी वाढली आहे. राजकीय कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने डिसेंबर 2017 मध्ये काकांनी कराडात फार मोठे श्नतीप्रदर्शन केले. कोणतीही सत्ता नसताना, आमदारकी नसताना काकांच्या या मेळाव्यास भर उन्हात हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासहित अनेक कॉंग्रेसचे दिग्गज, ज्येष्ठ पत्रकार यांच्यासमोर मार्गदर्शन करताना उंडाळकरांनी कॉंग्रेस माझ्या र्नतात आहे. कॉंग्रेसच देशाला तारू शकते, असा नारा दिला.  त्यानंतरच्या काळात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत दक्षिणेत कार्यक्रम झाले. काही दिवसांपूर्वी विलासराव उंडाळकर यांनी एका कार्यक्रमात कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे रहा, असे पुन्हा आवाहन करताना राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर विलासराव पाटील-उंडाळकर यांचा दिल्ली दरबारी संपर्क वाढला  आणि उंडाळकर यांना पुन्हा कराड दक्षिणचे तिकिट मिळण्यासाठी जोरदार लॉबिंग आतापासूनच सुरु आहे, अशा चर्चा होत्या. दरम्यान, कधी पुण्यातून, कधी कराडमधून तर कधी मुंबईहून सोशल मिडीयातून  पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. बाबा दिल्लीला जाणार आणि काकांना कराड दक्षिण मतदारसंघ दिला जाणार, उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण गट एकत्र येणार, अशा वावड्या उठल्या. दरम्यान, पोतले येथील एका कार्यक्रमात उंडाळकर काकांनी येणारी विधानसभा मी लढणार नाही अशी घोषणा केली. मात्र त्याच कार्यक्रमात त्यांनी भावी आमदार रयत संघटनेचाच असेल, असेही स्पष्ट केले. 

विधानसभा लढणार नाही या काकांच्या घोषणेमुळे अत्यानंद झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत बोलताना आमच्या दोघांच्यात काही वाद नव्हताच. उंडाळकरांचे तिकिट मी नव्हे तर पक्षाने कापले होते, असे व्नतव्य केल्यानंतर कार्यकर्त्यांनाही गुदगुल्या झाल्या आणि दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना ऊत आला. दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोमिलनाबाबत मला काहीच माहिती नाही, असे म्हणत विधान परिषदेवर उंडाळकर गेल्यास मला आनंदच होईल, अशी गुगली टाकली. पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव उंडाळकर यांची गेल्या काही वर्षांतील राजकारण करण्याची पद्धत आणि दोघांच्याही राजकारणाचा अभ्यास केला तर हे दोघेही कधीही एकत्र येणार नाहीत अशीच परिस्थिती आहे. याचे मुख्य कारण उंडाळकर गटाला पृथ्वीराज चव्हाण यांचे कराड दक्षिणमधील येणे कधीच पचलेले नाही. लादलेले मुख्यमंत्री, लादलेले उमेदवार, जनसंपर्क नसलेले नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत. त्यांनी दक्षिणमध्ये न येता दिल्लीचे राजकारण पहावे आणि कराड दक्षिण मतदारसंघ उंडाळकरांना मोकळा करून द्यावा, अशी उंडाळकर गटाची मागणी आहे. ‘त्यांनी त्यांच्या जागेवर जावे, आम्हाला आमची जागा द्यावी’, असे उंडाळकर गटाचे कार्यकर्ते नेहमी बोलून दाखवतात. 2019 च्या निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव झाला आणि कॉंग्रेसचे सरकार आले तर पृथ्वीराज चव्हाण केंद्रात मंत्री म्हणून जातील आणि दक्षिणच्या जागेवर उंडाळकर यांचा पुन्हा दावा राहील. उंडाळकरांनाच कॉंग्रेसचे तिकिट मिळेल आणि ते निवडुनही येतील, असा विश्वास आणि अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. अधुन-मधून बाबा दिल्लीला जाणार, अशा पुड्या हेच कार्यकर्ते सोडत असतात. (विलासराव पाटील-उंडाळकर विधानपरिषदेवर जाणार आणि कराड दक्षिणमध्ये त्यांचा गट येणाऱ्या निवडणुकीत बाबा गटाच्या पाठीशी राहणार, अशी पुडी पृथ्वीराज चव्हाण गटाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच सोडली आहे.)

2019 मध्ये कॉंग्रेसचे सरकार दिल्लीत येईल किंवा न येईल या जर-तरच्या गोष्टी आहेत. सद्यस्थितीचा विचार करता कॉंगेससाठी ‘दिल्ली अभी दूर है’ अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिशय सावध भूमिका घेत गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणावरच लक्ष केंद्रित केले आहे. राज्यभर संपर्क ठेवत असताना आठवड्यातील दोन-तीन दिवस ते मतदारसंघात देतात. गत आठवड्यातच त्यांनी मी दक्षिणमध्येच राहणार, असे हवेलवाडी येथील एका कार्यक्रमात जाहीर केले होते.  विधानसभा निवडणूका वर्षानंतर आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे दक्षिणचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे तिकिट वाटपावेळी त्यांचा या जागेवर अग्रक्रमाने दावा असेल. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेतेही याचा विचार करणार आहेत. विलासराव उंडाळकर यांना या जागेसाठी तिकिट मिळावे म्हणून त्यांचे जुने मित्र सुशिलकुमार शिंदे, शिवराज पाटील यांच्यासहित ज्येष्ठ मंडळी अंतर्गत प्रयत्नही करतील. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या तिकिटाला कोणीही थेट विरोध करणार नाही. अशा परिस्थितीत कॉंग्रेसमध्ये राहून उंडाळकरांना तिकिटासाठी संघर्ष करावा लागेल. मात्र अखेरच्या क्षणी पृथ्वीराज चव्हाण गटच बाजी मारण्याची श्नयता आहे. त्यामुळे काकांना उमेदवारी मिळणार नाही. बाबा दिल्लीला जाणार नाहीत. कराड दक्षिण मतदारसंघ काकांसाठी खाली होणार नाही आणि ‘तुम्ही तुमच्या जागेवर जा, आम्हाला आमची जागा द्या’ ही उंडाळकर गटाची मागणी कदापिही पूर्ण होणार नाही आणि त्यामुळेच या दोन्ही गटाचे मनोमिलन सुद्धा होणार नाही. ‘येणारी निवडणूक मी लढणार नाही, मात्र आमदार रयत संघटनेचा असेल’, ही काकांची घोषणा आणि मी कराड दक्षिणमध्येच राहणार ही पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा हेच अधोरेखित करतात. मात्र दुसरीकडे काका येणारी निवडणूक लढवणार नाहीत, हे कदापिही पटणारे नाही. काकांचे वय झाले असले तरीही त्यांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे कराड दक्षिणमधील संपर्क दौरे, गावागावांतील कार्यकर्त्यांमध्ये असणारे नेटवर्क आणि राज्यभरातील दिग्गज नेत्यांचा संपर्क वाढतच चालला आहे. उदयसिंह पाटील आमदार व्हावेत, अशी काकांसहीत त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे, स्वप्न आहे. उदयसिंह पाटील यांना योग्य वेळी विधानसभेवर पाठवण्यात काका कमी पडले आहेत. ही एक बाजू असली तरी उदयसिंह पाटील यांच्यावर मधल्या काळात दाखल झालेला गुन्हा आणि याच काळात बॅकफूटवर गेलेला त्यांचा गट आणि याचा विचार करता काकांनी एकतर्फी लढविलेली खिंड वाखाणण्यासारखी आहे. कराड दक्षिणेत आजही काकांची ताकद दखलनीय आहे. उदयसिंह पाटील यांच्यासाठी, कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर आणि वयोमानाचा विचार करता उंडाळकरांनी मी लढणार नाही, असे सांगितले आहे.

पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला गेले तर दक्षिणचे तिकिट उदयसिंह पाटील यांना मिळेल. काका त्यासाठी प्रयत्न करतील, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला जाणार नाहीत. दक्षिणमध्येच राहतील, या दृढ श्नयतेचा विचार केला तर येणाऱ्या निवडणुकीत विलासराव पाटील-उंडाळकर हेच त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा उभे राहण्याची अधिक श्नयता आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर, जनतेच्या रेट्यामुळे, कराड दक्षिणमधील वाड्या-वस्त्यांवरील लोकांच्या आग्रहास्तव  ही कारणे पुढे करून उंडाळकर काका हेच पुन्हा निवडणुकीत उतरतील, अशीच जास्त श्नयता आहे. त्यामुळे बाबा-काका कॉंग्रेस मनोमिलन खूप दूर वाटतेय. शेवटची एक श्नयता आहे ती म्हणजे सध्या राज्यात कॉंग्रेसला नेतृत्व नाही. मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करून पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्वाखाली विधानसभा लढविण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला तर चव्हाण यांना राज्यभर स्टार प्रचारक म्हणून फिरावे लागेल. अशा परिस्थितीत पक्ष त्यांना दक्षिणेत अडकून ठेवणार नाही, ही श्नयताही नाकारात येत नाही. उंडाळकरांना उमेदवारी  मिळण्याची श्नयता आहे. तसे झाले तरच हा प्रश्न मिटू शकतो. अन्यथा दोन टोके असलेल्या काका-बाबा यांना एकत्र करणे अश्नयप्राय आहे.

०१ मे २०१८

महाराष्ट्र राज्य दिन आणि कामगार दिन

⛳🌾⛳🌾⛳🌾⛳
➖➖➖➖➖➖➖
*☑१ मे महाराष्ट्र दिन......*
➖➖➖➖➖➖➖
_🔺बहु असोत सुंदर संपन्न की महा,_
_प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा !!!_
_महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!_
🔲🔲🔲
*महाराष्ट्र... नावातच राष्ट्राची, राज्याची महानता दिसून येते... ज्ञानोबांच्या ओवीपासून तुकोबांच्या अभंगांमध्ये तल्लीन होणारा महाराष्ट्र... संत नामदेव, चोखामेळा यांची संत परंपरेच्या भक्तीचा महाराष्ट्र... शिर्डीचे साईबाबा-शेगावचे गजानन महाराज या दैवी माणसांची देवभूमी असलेला महाराष्ट्र...*
🔲🔲🔲
ताठ मानेनं जगायला शिकवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र... धर्मवीर संभाजी राजेंच्या पराक्रमानं दिल्लीलाही घाम फुटतो असा महाराष्ट्र... संत गाडगे महाराजांपासून ते महात्मा ज्योतिबा फुले, विनोबा भावे, बाबा आमटेंसारख्या समाजसुधारकांनी समाजासाठी जीवन वाहिले असा महाराष्ट्र...
🔲🔲🔲
फुले-शाहू-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र... सह्याद्रीच्या कड्या कपारीपासून इतिहासाची साक्ष देणा-या गड-किल्ल्यांचा महाराष्ट्र... आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, लतादीदी-सचिन तेंडुलकर- अमिताभ बच्चन अशा दिग्गजांचा महाराष्ट्र.. मात्र या सगळ्यांत महाराष्ट्रासाठी रक्त सांडणा-या 106 हुतात्म्यांना विसरुन कसं चालेल..
🔲🔲🔲
*आपल्या प्राणाची आहुती देऊन त्यांनी महाराष्ट्र एकसंध ठेवला... या सर्व हुतात्म्यांना आणि महाराष्ट्रासाठी आयुष्य वेचलेल्या प्रत्येकाला अभिवादन करुन सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....*
➖➖➖➖➖➖➖
⛳🌾⛳🌾⛳🌾⛳
➖➖➖➖➖➖➖
🛠🌎🛠🌎🛠🌎🛠
➖➖➖➖➖➖➖
*☑१ मे जागतिक कामगार दिन.....*
➖➖➖➖➖➖➖
_औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव घेतला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो._
🔲🔲🔲

*🔺भारतातील पहिला कामगार दिन..*

भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.
🔲🔲🔲

*🔺आंतरराष्ट्रीय कामगार दिन*

देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगातील ८0 देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणार्या कामगारांचा गौरव करण्यात येतो.

*सर्वांना जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!*

*.✍🏼_*
➖➖➖➖➖➖➖
🛠🌎🛠🌎🛠🌎🛠🌎🛠

२८ एप्रिल २०१८

बार कोड

_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

🖥♻🖥♻🖥♻🖥
➖➖➖➖➖➖➖
*☑‘बारकोड’ म्हणजे काय? विविध वस्तूंवर हे बारकोड कशासाठी असतात...??? जाणून घ्या इत्यंभूत माहिती....*
➖➖➖➖➖➖➖
आजकाल ‘व्हॉट्सअॅप’वर चिनी बनावटीच्या वस्तूंबद्दल अनेक संदेश फिरत आहेत. त्यात प्रामुख्याने बारकोडवरून चिनी बनावटीच्या वस्तू कशा ओळखायच्या हा संदेश सातत्याने वाचनात येत आहे. चीनमध्ये उत्पादित दूध व दुधाच्या पदार्थावर आपल्याकडे बंदी आहेच; पण इतरही अनेक उत्पादने ग्राहकांसाठी पुरेशी सुरक्षित असतात असे नाही. उदा. खेळण्यांच्या रंगामध्ये सापडलेले शिसे.
🔲🔲🔲
अमेरिकन जनतेने तर चिनी बनावटीच्या वस्तूंचा विशेषत खाद्यपदार्थाचा धसकाच घेतला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे चीन, व्हिएतनाम, हाँगकाँग, थायलंड या देशांमध्ये ‘अन्न व खाद्यपदार्थ नियमन समिती’ अस्तित्वात नसल्याने हे देश ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका व युरोपमध्ये निर्बंध घातलेल्या घातक रसायनांचा वापर खाद्यपदार्थामध्ये सर्रास करतात. शिवाय चिनी उत्पादक तर आपल्या उत्पादनांच्या लेबलवर ‘मेड इन चायना’ असे स्पष्टपणे उल्लेख करण्याचे टाळतात.
🔲🔲🔲
आपण मॉल, सुपरमार्केटमध्ये जेव्हा खरेदी करतो तेव्हा बििलग काऊंटरवर बसलेला माणूस आपण खरेदी केलेल्या वस्तूंवरील बारकोड स्कॅन करून पटापट बिल बनवतो. काय बरे असतो हा बारकोड? त्यातून आपल्याला काय माहिती मिळते ते पाहूया. ‘बारकोड’ म्हणजे वेगवेगळी रुंदी व अंतर असलेल्या समांतर रेषांचा मर्यादित आकाराचा एक संच....
🔲🔲🔲

*♻बारकोडचे दोन प्रकार आहेत.*
_◼१) एकमितीय (ONE Dimensional )- यात फक्त समांतर रेषांचा वापर केला जातो._
_◼२) द्विमितीय (TWO Dimensional ) – QR CODE - चौरस किंवा आयताकृती रचना असून त्यात २डी चिन्हे किंवा भूमितीय आकारांचा वापर केला जातो._
🔲🔲🔲
एकमितीय बारकोडचा उपयोग किराणा माल, कमी किमतीच्या वस्तू जसे की पेन, इलेक्ट्रोनिक गोष्टी इत्यादींवर केला जातो. द्विमितीय आणि एकमितीय बारकोड मध्ये फारसा फरक नसतो. त्यातला मुख्य फरक हा की दोघांना समान जागा लागत असेल तर एकमितीय पेक्षा द्विमितीय बारकोड मध्ये तुलनेने जास्त माहिती साठवता येऊ शकते.
🔲🔲🔲

*♻ बारकोड कसा तयार केला जातो?*

एका बारकोडला ९५ ब्लॉक असतात. त्या ९५ पैकी १२ ब्लॉकमध्ये बारकोड लिहिला जातो. पैकी तीन ब्लॉक हे लेफ्ट गार्ड, सेंटर गार्ड आणि राईट गार्ड या नावाने ओळखले जातात.
🔲🔲🔲
बारकोडमध्ये वस्तूबद्दलची माहिती जसे उत्पादन क्रमांक, साखळी नंबर, बॅच नंबर.. संकलित केलेली असते. यामुळे वितरण, साखळीतील वस्तूची ओळख व मार्गक्रमणा यांचा मागोवा घेणे सुलभ होते.
🔲🔲🔲
बारकोडची संकल्पना अमेरिकेतील मि. बर्नाड सिल्व्हर आणि मि. नॉर्मन वूडलॅड यांना समुद्रकिना-यावरील वाळूत रेघोटया ओढताना सुचली. १९७३मध्ये अमेरिकेतील प्रमुख उद्योजकांनी एकत्र येऊन उत्पादन ओळख करण्यासाठी एकच मानक असावे असे ठरविले. सुरुवातीला बारकोडचा वापर हा अन्न आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सुपरमार्केटमधील वितरण व्यवस्थेसाठी करण्यात आला.
🔲🔲🔲
जून १९७४मध्ये रिग्लेज च्युईंग गमच्या पाकिटावर प्रथम बारकोडचा वापर करण्यात आला. अमेरिकेत रिटेल वस्तूंसाठी UPC-A (युनिफॉर्म प्रॉडक्ट कोड) या कोडचा वापर केला जातो. यात बारा अंक असतात. कोणत्याही देशाचा काहीही संदर्भ दिला जात नाही. युरोप व इतर देशांमध्ये EAN-13 (युरोपियन आर्टकिल नंबरिंग) हा कोड वापरला जातो. यात तेरा अंक असतात व देशाच्या कोडचा अंतर्भाव केलेला असतो.
🔲🔲🔲
बारकोडमधील पहिले दोन किंवा तीन अंक हे उत्पादकाने कोणत्या अधिकृत देशामध्ये (GS1 समितीचा सभासद) उत्पादन /वस्तूचा कोड नोंदणी केलेला आहे याची माहिती कळते. म्हणजेच बारकोडमधील पहिल्या तीन अंकांवरून तो पदार्थ /वस्तू कुठे तयार केली गेली आहे याची माहिती मिळत नाही, याची कृपया सर्वानी नोंद घ्यावी. तर त्या उत्पादनाची नोंदणी कुठे केलेली आहे ही माहिती मिळते.
🔲🔲🔲
बारकोडवरील डावीकडचे पहिले पाच अंक उत्पादकाची ओळख देतात व सगळ्यात उजवीकडचे पाच अंक उत्पादन कोडची माहिती देतात. १९९०मध्ये अमेरिका व इतर आंतरराष्ट्रीय संघटना एकत्र येऊन जागतिक स्तरावर EAN-UPC ही संघटना स्थापन केली. GTIN म्हणजेच ‘ग्लोबल ट्रेड आयटम नंबर’ या संघटनेने विकसित केला. हा क्रमांक ८,१२,१३ किंवा १४ अंकी असतो.
🔲🔲🔲
२९९१ मध्ये GS1 डेटाबार तयार केला. त्याचे वैशिष्टय़ असे की, बारकोडपेक्षा तो आकाराने लहान असूनसुद्धा अधिक माहिती संकलित करतो. २००५मध्ये या संघटनेचे GS1 (ग्लोबल स्टँडर्स वन) असे नामकरण करण्यात आले. त्यामुळे या संघटनेकडून घेतलेल्या अधिकृत कोडला GS1 कोड असे म्हणतात.
🔲🔲🔲
GS1 बारकोड हे जागतिक स्तरावरील सर्वात सुप्रसिद्ध व मान्यताप्राप्त बारकोड आहेत. भारताने १९९६मध्ये GS1चे अधिकृत सभासदत्व घेऊन GS1 इंडियाची स्थापना केली. GS1 ही ना नफा ना तोटा सहकारी तत्त्वावर उद्योजकांनी चालविलेली जागतिक अधिकृत संघटना आहे. त्यांचे मुख्य ऑफिस ब्रसेल्स, बेल्जियम व प्रिस्टन, न्यूजर्सी येथे आहे. आज जगातील १००पेक्षा जास्त देश त्यांचे सभासद आहेत.
🔲🔲🔲
गेल्या तीस वर्षापासून GS1 जागतिक मानकांची निर्मिती व त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वितरण साखळीतील वापर यावर काम करत आहे. आज वैद्यकीय सेवा, खाद्यपदार्थ, पुस्तके, कपडे, संरक्षण सामग्री, ऑटोमोबाईल अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये बारकोडचा वापर केला जातो. आजकाल जागतिकीकरणामुळे जगभरातील विविध खाद्यपदार्थ आपल्याला सहज उपलब्ध होत आहेत.
🔲🔲🔲
हे मशीन वाचलेली रेषांच्या रूपातली माहिती बायनरी कोडमध्ये (0 or 1) मध्ये रुपांतरीत करते. संगणक फक्त ही बायनरी रुपात असलेली माहिती वाचू शकतो. आणि हीच माहिती हो स्क्रीनवर दाखवतो. सेंटर गार्डच्या डाव्या बाजूला असलेल्या आकड्यावरून ती वस्तू प्लास्टिक किंवा तत्सम मानवनिर्मित पदार्थावरून बनलेली आहे की नैसर्गिक पदार्थापासून बनलेली आहे, शाकाहारी आहे कि मांसाहारी हे संगणकाला कळते. शून्याच्या जागी दोन हा आकडा लिहिलेला असेल तर त्यातून हा खाद्यपदार्थ आहे असे कळते. ‘3’ हा आकडा लिहिले असेल तर तो औषध आहे असे कळते.
🔲🔲🔲
जेव्हा आपण इतर देशांमधून आयात केलेली फळे विकत घेतो, तेव्हा त्या प्रत्येक फळावर स्टीकर लावलेला असतो. (उदा. सफरचंद, पेर, किवी, ड्रॅगन फ्रूट). या स्टीकरला PLU Code किंवा प्राईस लुक अप क्रमांक म्हणतात. त्यातून आपल्याला त्याबद्दलची खालील माहिती मिळू शकते.

◼१) चार अंकी कोड असेल तर ते उत्पादन हे पारंपरिक पद्धतीने कीटकनाशकांचा वापर करून उत्पादित केलेले असते.
◼२) कोडमधील शेवटची चार अक्षरे ते कोणत्या प्रकारचे फळ आहे ते दर्शवितात (उदा. केळे, ४०११)
◼३) जर कोड क्रमांक पाच अंकी असेल व तो ‘८’ या क्रमांकाने सुरू होत असेल, तर ते फळ किंवा भाजी जनुकीय संरचना बदलून उत्पादित केलेले असते.
◼४) जर पाच अंकी कोड ‘९’ या क्रमांकाने सुरू होत असेल, तर ते सेंद्रिय पद्धतीने केलेले उत्पादन असते.
स्टीकरसाठी वापरला जाणारा गम फूडग्रेडचा असतो.
🔲🔲🔲
पण या सगळ्यातील खरी गोम अशी आहे की, अमेरिकेत असे स्टीकर लावणे कायद्याने बंधनकारक नाही. तसेच जनुकीय संरचना बदलून केलेल्या उत्पादनाला अधिकृतरीत्या पारंपरिक उत्पादनच म्हटले जाते.
🔲🔲🔲
बारकोड हा उत्पादनाच्या वितरण साखळीचा (उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत) अविभाज्य घटक झाला आहे. हे GS1 हे जागतिक अधिकृत मानक असल्यामुळे उत्पादकाला आपले उत्पादन जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी सहज उपलब्ध करून देता येते. बारकोडचे उत्पादकासाठी अनेकविध फायदे आहेत ते असे.

▪१. माहितीचे अचूक व जलद संकलन
▪२. उत्तम ट्रॅकिंग यंत्रणा (जगभरात कुठेही)
▪३. वेळेची बचत (वस्तूंची यादी करणे).
▪४. कमी मनुष्यबळ
▪५. कमीत कमी चुका, त्रुटी

पण तुम्ही सर्वानी एक गोष्ट लक्षात घ्या की, बारकोड हा कायदेशीरदृष्टया बंधनकारक नाही. उत्पादकांनी उत्पादनाचे वितरण साखळीतील सहजसुलभ ट्रॅकिंगसाठी निर्माण केलेली ही एक खासगी तरीही जागतिक स्तरावर अधिकृत मानक असलेली यंत्रणा आहे. तेव्हा सोशल मीडियावरील विशेषत ‘व्हॉट्सअॅप’, इंटरनेट यावरील संदेशाची सत्यता पडताळून पाहा. माहिती मिळवत राहून स्वत:ला अधिकाधिक जागरूक व सुरक्षित करा.
➖➖➖➖➖➖➖
🔲◼🔲◼🔲◼🔲

१७ एप्रिल २०१८

गनिमि कावा

*_🤔 🔺DO YOU KNOW_*

⚔🗡⚔🗡⚔🗡⚔
➖➖➖➖➖➖➖
*☑ शिवरायांच्या गनिमी काव्याचा वापर करून व्हिएतनामने केली होती अमेरिकेवर मात..!!!*

*◾युद्धानंतर व्हिएतनामच्या राष्ट्रध्याक्षांनी शिवाजी महाराजांच्या गनीमी काव्याचा या युद्धात आम्ही वापर केल्याची कबुली दिली होती....*
➖➖➖➖➖➖➖
_शिवाजी महाराज हे मराठी माणसांसाठी दैवतच आहेत. महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप युद्धं जिंकली. त्यांचे नाव ऐकून शत्रू थरथर कापत असे. त्यांनी बळाने नाहीतर बुद्धीने प्रत्येकवेळी शत्रूवर मात केली. त्यामुळे त्यांच्यापेक्षा दहा पटीने बलाढ्य असलेल्या शत्रूला देखील त्यांनी युद्धाच्या रणांगणावर मात दिली होती. शिवाजी महाराजांची ख्याती काही वेगळीच आहे. फक्त भारतातच नाही, तर जगभरातील लोकांच्या मनात त्यांच्यासाठी आदराची भावना आहे._
🔲🔲🔲
आपल्या राजाला सर्व जगात एवढा मान दिला जातो, हे पाहून छाती अभिमानाने आणखी फुगते. शिवाजी महाराजांनी शत्रूला त्यांच्या गनिमी कावा ही पद्धत वापरून खूप वेळा शह दिली. आता तुम्ही विचार करत असाल की, आम्ही शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याबद्दल का सांगत आहोत. ते तर आम्हाला माहित आहे…! हो ते सर्वांनाच माहित असेल, कारण शिवाजी महाराज आपल्या मनामनात घर करून आहेत. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्याच या रणनीतीबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करत व्हिएतनामने बलाढ्य अश्या अमेरिकेचा पराभव केला होता. चला तर मग जाणून घेऊया की, व्हिएतनामने अमेरिकेला कश्याप्रकारे त्याचा अहंकार मोडीत काढत हरवले होते.
🔲🔲🔲
व्हिएतनाम युद्ध अगदी काही तासांत जिंकता येईल असे अमेरिकेला वाटत होते. त्यासाठी तशा स्वरुपाची तयारी देखील करण्यात आली होती. एकाबाजूला सुपरपावर अमेरिकेचे बलाढ्य लष्कर तर दुसरीकडे कमकुवत व्हिएतनामचे मोजकेच सैनिक होते. पण व्हिएतनामी लोकांची लढवय्यी वृत्ती आणि शिवाजी महाराजांच्या गनीमी काव्याचा पुरेपूर वापर यांच्या बळावर जोरदार संघर्ष तेथे उभा राहिला. अमेरिकेला या युद्धामधून अखेर माघार घ्यावी लागली. व्हिएतनामी जनतेचा, तेथील सरकारचा रोमहर्षक विजय झाला.
🔲🔲🔲
*अमेरिकेच्या बलाढ्य लष्कराचा थेट सामना करणे व्हिएतनामच्या सैन्याला काही शक्य नव्हते. त्यामुळे व्हिएतनामी लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनीमी काव्याचा सखोल अभ्यास केला होता. त्यानंतर युद्धनितीत सकारात्मक बदल केले. व्हिएतनामची भूमी गनीमी कावा करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे अमेरिकेच्या लष्कराला जागोजागी मोठी हानी सहन करावी लागली. अमेरिकेला व्हिएतनामवर पूर्णपणे विजय मिळवता आला नाही. अखेर दररोज होणारी प्रचंड लष्करी नुकसान बघून अमेरिकेने माघार घेण्याचा निर्णय घेतला. युद्धानंतर व्हिएतनामच्या राष्ट्रध्याक्षांनी शिवाजी महाराजांच्या गनीमी काव्याचा या युद्धात आम्ही वापर केल्याची कबुली दिली होती.*
🔲🔲🔲
व्हिएतनाम, लाओ आणि कंबोडियाच्या भूमिवर सुमारे २० वर्ष हे युद्ध लढले गेले. सुरवातील उत्तरेकडील व्हिएतनाम आणि दक्षिणेकडील व्हिएतनाममध्ये युद्ध झाले. उत्तर व्हिएतनामच्या बाजूला कम्युनिस्ट समर्थक देश होते तर दक्षिण व्हिएतनामला अमेरिकेसारख्या कम्युनिस्ट विरोधी देश होते. डिसेंबर १९५६ पासून एप्रिल १९७५ पर्यंत हे युद्ध चालले.
या युद्धात अमेरिका खऱ्या अर्थाने ९ फेब्रुवारी १९६५ रोजी उतरली. उत्तर व्हिएतनामचे नेतृत्व हो ची मिन्ह करीत होते. १९६९ मध्ये या युद्धाने गंभीर स्वरुप प्राप्त केले होते. अमेरिकेने चक्क पाच लाखांचे लष्कर या युद्धात उतरवले होते. परंतु, नित्याच्याच हिंसाचाराने त्रस्त झालेल्या अमेरिकी जनतेने सरकारवर दबाव निर्माण केला. शिवाय व्हिएतनाम झुकण्यास तयार नव्हता. अखेर अमेरिकेने परत जाण्याचा निर्णय घेतला.
🔲🔲🔲
या युद्धात उत्तर व्हिएतनाम आणि अमेरिकेच्या लष्कराचे मोठे नुकसान झाले. अमेरिकेला व्हिएतनामी लष्कराचा गनीमी कावा मोडून काढता आला नाही. अखेर माघार घ्यावी लागली. एखादे युद्ध न जिंकता तेथून माघार घेण्याची अमेरिकेची ही पहिलीच वेळ होती. या युद्धात व्हिएतनामच्या जनतेची अपरिमीत नुकसान झाले. कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडले. ठिकठिकाणी मृतदेहांचे ढीग लागलेले होते. सगळीकडे आक्रोश नजरेस पडत होता. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांवर गोळीबार करण्यात आला. लहान मुले बेवारसपणे रस्त्यांवर फिरताना दिसत होते. जिवलगांच्या मृत्यूवर लोक शोक करत होते.
🔲🔲🔲
हे युद्ध जिंकून व्हिएतनामने जगाला दाखवून दिले की, कधीही स्वतःला कमी समजून कोणापुढेही लगेच हार न मानता, शेवटपर्यंत लढा देत शत्रूवर युक्तीने मात करावी आणि हा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे.
➖➖➖➖➖➖➖
⚔🗡⚔🗡⚔🗡⚔

०८ एप्रिल २०१८

Toothpaste Tube color

_*🔺🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

*☑टूथपेस्ट ट्युबच्या खालच्या पट्टीवर वेगवेगळे कलर पाहायला मिळतात त्याचा नेमका अर्थ काय..??*

*◾टूथपेस्टवरचा हा कलरमार्क तपासा आणि प्रकार जाणून घ्या...*
➖➖➖➖➖➖➖
विविध कंपन्यांच्या या टूथपेस्टवर सर्वात खालच्या बाजूला एक विशिष्ट रंग असतो. आता हा रंग नेमका कशासाठी असतो आणि तो काय दर्शवतो याबाबत माहिती करुन घेऊया...
🔲🔲🔲
आपल्या दैनंदिन आयुष्यातील अशा अनेक वस्तू आहेत ज्या आपण रोज वापरतो पण त्याबाबतच्या ठराविक गोष्टी आपल्या लक्षातही येत नाहीत. आता हेच पाहा ना सकाळी उठल्यावर सर्वात पहिल्यांदा आपण कोणते काम करत असू तर ते असते दात घासण्याचे. यासाठी वापरण्यात येणारी टूथपेस्ट आपल्यापैकी प्रत्येक जण वर्षानुवर्षे वापरत आहेत. पण विविध कंपन्यांच्या या टूथपेस्टवर सर्वात खालच्या बाजूला एक विशिष्ट रंग असतो. आता हा रंग नेमका कशासाठी असतो आणि तो काय दर्शवतो याबाबत फारच कमी जणांना माहीती असेल. यामध्ये लाल, निळा, हिरवा आणि काळा असे ४ रंग असतात. त्या विशिष्ट टूथपेस्टमध्ये रासायनिक पदार्थ आहेत की नैसर्गिक याबाबतची माहीती हे रंग देतात. तर जाणून घेऊयात टूथपेस्टच्या खालच्या बाजूला असणाऱ्या या वेगवेगळ्या रंगांविषयी…
🔲🔲🔲

*◾काळा रंग.....*

हा रंग अतिशय धोकादायक म्हणून ओळखला जातो. हा रंग असलेल्या टूथपेस्टमध्ये रासायनिक पदार्थ असल्याचे सूचित केले जाते. त्यामुळे ही टूथपेस्ट घ्यायची का नाही याबाबत विचार करणे आवश्यक आहे हे नक्की.

*◾लाल रंग.....*

हा रंग असलेल्या टूथपेस्टमध्ये काळ्या रंगापेक्षा काही प्रमाणात कमी धोका असतो. कारण ही पेस्ट रासायनिक पदार्थांबरोबरच नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन तयार केली जाते.

*◾निळा रंग.....*

ही टूथपेस्ट पूर्णपणे नैसर्गिक वस्तूंचा वापर करुन तयार केलेली असते. तर यामध्ये काही औषधी पदार्थांचाही वापर केलेला असतो. त्यामुळे आरोग्यासाठी ही पेस्ट अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे तुम्ही दात आणि हिरड्या बळकट करण्याचा विचार करत असाल तर पेस्टच्या खालच्या बाजूला निळा रंग असेल असे बघा.

*◾हिरवा रंग.....*

हा रंग म्हणजे टूथपेस्टमध्ये केवळ नैसर्गिक पदार्थांचा वापर केलेला असतो. त्यामुळे लहान मुलांसाठी तसेच वयस्कर व्यक्तींसाठी तुम्ही या पेस्टचा नक्कीच विचार करु शकता.
➖➖➖➖➖➖➖
🔲◾🔲◾🔲◾🔲

०६ एप्रिल २०१८

पहला पहिला

पहिलं पीक
जसं तुझं रूप

पहिला किरण
जसं तुझे नयन

पहिला पाऊस
जशी तुझी हौस

पहिला श्रावण
जसं तुझं नटणं

पहिला प्रवास
जसा तुझा सहवास

पहिला स्पर्श
तुझा माझा हर्ष

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...