राम कृष्ण हरी,
वेळापूर ते भंडीशेगाव असा महत्त्वाचा टप्पा पार करण्यासाठी माऊलींची पालखी सकाळी निघाली. वेळापूर हे अंतर 18 किलोमीटर आहे, हा टप्पा महत्त्वाचा यासाठी म्हटले आहे कारण या टप्प्यात वारकऱ्यांना 2 प्रमुख सोहळ्यातील अनेक वारकरी भेटतात, अनेक दिंड्या भेटतात. ज्ञानोबा माऊली तुकोबाराय सोपानदेव या तिन पालखी सोहळ्यातील दिंड्या आणि वारकरी एकत्र येण्याचा आजचा दिवस होता.
11 वाजण्याच्या सुमारास बोंडले येथे सोपानदेव काका यांची पालखी पोहोचले, त्यानंतर काही तास नंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी या मार्गावर आल्यानंतर हा मार्ग फुलून गेला. तत्पूर्वी माऊली पालखी सोहळ्यातील मोकळ्या समाजातील वारकरी या मार्गावर पुढे मार्गक्रमण करत होतेच. तोंडले-बोंडले येथे सोपानकाका आणि ज्ञानेश्वर माऊली या दोन रथ जवळून गेले,दोन बंधू एकमेकांना भेटले आणि हा क्षण टिपण्यासाठी वारकरी निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असा जयघोष केला. मोठ्या आवाजात माऊली माऊली असा जयघोष झाला.
त्यानंतर आम्ही दुपारच्या भोजनासाठी विसाव्यासाठी आमच्या कराडकर दिंडी कडे मार्गक्रमण केले.पंढरीच्या वारीत ज्ञानेश्वर माऊली सोहळ्यात असणाऱ्या सर्व दिंड्या आणि या दिंड्यांचे मुक्कामाचे ठिकाण ठरलेले आहे.
प्रत्येक दिंड्यांचा दुपारच्या जेवणाचा विसावा कुठे असतो हे ठिकाणी ठरलेले आहे, एवढेच नव्हे तर दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळी जेवणात काय मेनू असावा हेही काही दिंड्यांमध्ये पद्धती ठरलेले आहेत. कराडकर दिंडी नंबर 12 येथे तोंडले-बोंडले याठिकाणी दुपारच्या जेवणावेळी गेल्या 36 वर्षांपासून चकुल्या हा पदार्थ केला जातो. चकुल्या हा महाराष्ट्रातला अतिशय आवडता पदार्थ आहे. वारकरी चुकल्याचा आस्वाद घेऊन तृप्त होतात. खूप दिवसानंतर आज चकुल्याचा स्वाद घेतला, भरपेट जेवलो.
तोंडले-बोंडले या गावापर्यंत आळंदी ते पंढरपूर हा जो महामार्ग आहे या मार्गाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असे नाव आहे. मात्र तोंडले-बोंडले मध्ये संत तुकाराम महाराज यांची पालखी या महामार्गाला येऊन मिळते तिथे या महामार्गाचे नाव बदलते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी महामार्ग असे या महामार्गाचे नामकरण होते. हे पाहताना महाराष्ट्रातील हे दोन दिग्गज ज्ञान संत एकाच मार्गावरून चालत असल्याचा भास होतो.
संत तुकाराम महाराज आणि सोपान काका यासहित अनेक पालख्या तोंडले-बोंडले येथून पुढे गेल्यानंतर मगच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या रस्त्यावरून पुढे जाते. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सुमारे एक लाख तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात दिड लाख वारकरी सहभागी असतात या दोन्ही पालखी सोहळ्यात मिळून तितकेच खुल्या म्हणजेच मोकळ्या समाजातील वारकरी असतात असा मिळून हा आकडा साधारण साडेपाच सहा लाखांवर पोहोचला आहे. त्यातच लहान-मोठ्या गावातून येणाऱ्या सातारा सांगली कोल्हापूर पुणे या जिल्ह्यातील पालख्या हळू या मार्गावर येतात आणि हा आकडा सात लाखांवर पोहचतो, त्यामुळे तोंडले-बोंडले नंतर पालखी महामार्ग म्हणजे ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज यांचा नामाचा महासागरच बनलाय असे चित्र आहे.
भंडीशेगाव येथे पालखी तळावर आज गर्दी फुललेली होती हवा वाहत होती, भंडी शेगाव ग्रामस्थांनी माउलींच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली होती. मात्र संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे जात नाही. तोपर्यंत माऊलींची पालखी येत नाही त्यामुळे रात्री उशिरापर्यंत माऊली येणार नाहीत अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे पालखीतळावर फेरफटका मारायला निघालो. पालखीतळावर गेल्या तीन वाजेदरम्यान एक हमखास व्यक्ती आम्हाला भेटते, ते म्हणजे पोलीस कीर्तनकार विठ्ठल माने. तळावर आत गेल्यानंतर पाहिले विठ्ठल माने यांचे कीर्तन सुरु होते.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक आयपीएस मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या माऊलींच्या सोहळ्यांमध्ये वारी नारी शक्तीची असा एक रथ तयार केला आहे. या रथामध्ये पोलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत. दिंडीच्या मार्गावर हे पोलीस मार्गदर्शन करतात या पथकात कृष्णा चव्हाण सुरेश कांबळे रमेश ठोंबरे सुरेश माने अतुल सुरवणे हेही पोलीस सहभागी आहेत. या पथकामध्ये एक सेवानिवृत्त सहायक फौजदार विठ्ठल माने हे कीर्तनकार आहेत. पोलिसांच्या या किर्तनाला वारकरी फार प्रतिसाद देतात. एक पोलीस तोही किर्तन करतो याचे लोकांना अपूर्व वाटते. विठ्ठल माने यांना यांच्याशी बातचीत केली.
माऊलींची पालखी रात्री सायंकाळी साडे आठ वाजता बंडीशेगाव येथे मुक्कामाला पोहचले तर संत तुकाराम महाराजांची पालखी सुरुली येथे मुक्कामाला पोहचली, खूप उशीर झाल्यामुळे रात्री दहापर्यंत रस्ते माऊलींच्या गर्दीने फुलून गेले होते. आता भंडी शेगाव येथे कराडकर यांच्या दिंडीमध्ये जेवायला थांबले तर मुक्कामाच्या ठिकाणी जायला आणखीन वेळ होईल म्हणून आम्ही पुढे चालायला निघालो.
आज आमचा मुक्काम भंडी शेगाव येथील एका मित्रांच्या शेतावर होता, अर्बन बँकेतील महेश शिंदे यांचे क्लासमेट मारुती गीते गिड्डे यांच्या शेतावर मी रात्री उशिरा मुक्कामाला पोहोचलो. हे फार्महाऊस म्हणजे चारी बाजूला डाळिंबीची बाग आणि मध्ये शेतातील घर. या घरात निसर्गाच्या सान्निध्यात माउलीने आमची व्यवस्था केली होती.
मुक्कामाला पोहचण्यापूर्वी आज जेवायचे कुठे हा प्रश्न होता. रस्त्याला कुठे हाँटेलात झुणका-भाकर मिळते का याचा मी शोध सुरू केला. एका ठिकाणी झुणका-भाकर चे हॉटेल आहे समजून आम्ही गेलो तर ती बीडमधील एक दिंडीचा छोटा टेम्पो होता. त्यांना आम्ही जेवायला मिळेल का असे विचारले त्यावेळी त्यांनी अहो माऊली आमची दिंडी आहे, हाँटेलात नाही. तुम्ही आमच्याकडे जेवा असा आग्रह करून आम्हाला जेवायला वाढले. अतिशय आग्रहानी आम्हाला झुंणका भाकर खायला दिले. माऊलीच्या सोहळ्यातील कोणी उपाशी राहत नाही हे आम्हाला माहिती आहे. गेले
तीन वर्षे मी तो अनुभव घेतो आहे. मात्र मला स्वतःला कुठे जेवायला जाण्याचा अशी वेळ आली नव्हती.आजवर कराडकर यांच्या दिंडी मध्ये जेवणाची व्यवस्था होती.आज मात्र एक वेगळा अनुभव आला. माऊलींनी आमची व्यवस्था केली, आम्हाला पिठलं भाकरी खायची इच्छा झाली होती त्यासाठी आम्ही हॉटेल शोधत होतो मात्र एका दिंडीमध्ये माउलीने आम्हाला जेवणाची व्यवस्था केली,तिथेही आम्हाला खायला पिठले भाकरीच मिळाले .एक वेगळा योगायोग आणि अविस्मरणीय असा क्षण होता तो.
एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला.
माऊली माऊली!
😌जय माऊली😌
माऊली सतीश मोरे
Also available at
karawadikarad.blogspot.com