फॉलोअर

०८ जून २०१८

13 आकडा

_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

❓1⃣3⃣❓1⃣3⃣❓
➖➖➖➖➖➖➖
*🔴🌀 केवळ एका (अंध?) श्रद्धेपोटी ......*

*◾मुंबईसह जगभरातील मोठमोठ्या शहरात मधील अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये तुम्हाला 13 वा मजला सापडणार नाही.....*

*◾काही विमानांमध्ये तुम्हाला 13 नंबरची Row दिसणार नाही आणि अगदी अनेक मोठ्या हॉटेल्स आणि हॉस्पिटल्स मध्ये १३ नंबरची रुम तुम्हाला सापडणार नाही....*

*🤔 काय कारण असावं बरं..??*
➖➖➖➖➖➖➖
तुम्ही कधी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये गेलात तर सहज १३ नंबरच्या रुमची चौकशी करुन पाहा. सहसा अशा नंबरची रुम तुम्हाला हॉटेल किंवा हॉस्पिटलमध्ये आढळणार नाही. जुन्या इमारतींमध्ये या नंबरच्या रुम आढळतील किंवा १३ ऐवजी १२अ अशा रुम आढळतील. यामागे नक्की काय कारण आहे याची पडताळणी केल्यास काही गोष्टी समोर येतात…
🔲🔲🔲
जगातील इतर शहरांसारखं मुंबई देखील खास प्रसिद्ध आहे ते गगनचुंबी आणि भल्यामोठ्या ईमारतींसाठी! पण या दिमाखदार इमारतींपैकी अनेकांमध्ये १३ वा मजला तुम्हाला सापडणारच नाही…!!! कधी मुंबईमधल्या प्रसिद्ध हॉटेल्स किंवा इमारतींमध्ये गेलात ज्यांना १३ पेक्षा जास्त मजले आहेत, तर लिफ्ट मध्ये गेल्यावर १३ नंबरचा आकडा शोधा. ९०% इमारतींमध्ये तुम्हाला १३ नंबरचे बटन सापडणारचं नाही.  तर काही विमानांमध्ये तुम्हाला १३ नंबरची Row सापडणार नाही... काय दचकलात ना हे ऐकून? चला तर मग जाणून घेऊया या मागचं कारण आहे तरी काय!
🔲🔲🔲
_*संकलन - सचिन मणियार...✍🏼*_

*☑ सगळ्यात पहिलं हे समजून घ्या की ही लोकांची श्रद्धा (अंधश्रद्धा?) आहे....*

१३ नंबर भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये अशूभ मानला जातो. १३ नंबरच्या रुममध्ये किंवा १३ नंबरच्या मजल्यावर राहणं धोक्याचं मानलं जातं. इमारत बनवणारे बिल्डर्स सुद्धा १३ क्रमांकाचा आकडा हा अशुभ मानतात. त्यांच्या मते शुक्रवारी जर १३ तारीख आली तर ती अजून अशुभ असतें, कारण या वेळेस दुष्ट शक्ती जाग्या होतात. आणि या गोष्टीचे पुरावे म्हणून हे लोक शुक्रवारी १३ तारीख आलेल्या दिवशी जगभरात आजवर घडलेल्या अनेक वाईट घटनांचे दाखले देतात.
🔲🔲🔲
बिल्डर्स १३ वा मजला न बांधता स्वत:च्या मनाला अशी खात्री करून देतात की आता आपली बिल्डींग सुरक्षित आहे. त्यावर कोणत्याही वाईट शक्तींचे सावट नाही. एखादी इमारत ३० मजल्याची असेल तर १३ व्या मजल्याला १३ क्रमांक न देता त्याला १४ क्रमांक दिला जातो.
🔲🔲🔲
नरीमन पॉइंट वरच हॉटेल ट्रायडंट तर सर्वांनाच माहित असेल. मुंबईमध्ये केवळ या हॉटेलच्या इमारतीमध्ये १३ वा मजला आहे. पण या मजल्याला टाळा लावून ठेवला आहे. येथे येण्याची परवानगी कोणालाही दिली जात नाही. हॉटेल ट्रायडंटच्या व्यवस्थापनाकडून असे सांगण्यात येते की, पूर्वी हा मजला सुरु होता. अनेक ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचा येथे राबता असायचा, परंतु कालांतराने या १३ व्या मजल्यावर अनेक विचित्र गोष्टी अनेक जणांनी पहिल्या आहेत. तसेच या मजल्यावरून बऱ्याचदा भयानक आवाज येत असतात. म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मजला बंद ठेवण्यात आला आहे.
🔲🔲🔲
नरीमन पॉइंट वर अजून एक होईचस्ट हाउस म्हणून इमारत आहे. या इमारतीमध्ये १३ व्या मजल्यावर राहून गेलेल्या रहिवाश्यांनी अशी तक्रार केली की, बाथरुममधून सारखा नळातून पाणी टपकण्याचा आवाज येतो, पण जेव्हा आम्ही जाऊन बघितले तर नळ पूर्णपणे बंद होता. आणि कुठेही पाणी दिसत नव्हते.
🔲🔲🔲
मुंबईमध्ये मेकर चेम्बर्स IV नावाचे अजून एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या इमारतीमधील १३ व्या मजल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अशी तक्रार केली की, मजल्यावरच्या लाईट्स बंद असल्या तरी त्या सारख्या चालू-बंद होत असतात. अनेकवेळा त्यांची दुरुस्ती देखील केली, पण हा प्रकार सतत सुरु होता.
🔲🔲🔲
बरं हे १३ क्रमांकाचं प्रकरण केवळ मुंबईमध्ये आहे असं काही नाही. भारतातील इतर शहरांमध्ये देखील १३ आकडा टाळला जातो. अहो अमेरिका देखील या गोष्टीवर विश्वास ठेवते. अमेरिकेमधील ८५% इमारतींमध्ये तुम्हाला १३ वा मजला सापडणार नाही.

__
➖➖➖➖➖➖➖
❓1⃣3⃣❓1⃣3⃣❓

जागतिक समुद्र दिन

💦🌊💦🌊💦🌊💦
➖➖➖➖➖➖➖
*☑८ जून आज 🌐जागतिक समुद्र दिन... World Oceans Day...*
*_🌀 समुद्राची स्वच्छता राखली तरच पृथ्वीचे आरोग्य उत्तम_*
➖➖➖➖➖➖➖
पृथ्वीचे हृदय म्हणजे समुद्र. आपल्या शरीरात ज्याप्रमाणे हृदयाचे कार्य अविरत आणि आपल्याही नकळत सुरू असते व त्यावर आपले जीवन अवलंबून असते, त्याचप्रमाणे संपूर्ण पृथ्वीचे आरोग्य समुद्रावर अवलंबून आहे. वातावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि जगातील लाखो लोकांकरिता पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला समुद्र पृथ्वीवर प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.
🔲🔲🔲
या पार्श्‍वभूमीवरच यंदा हेल्थी ओशन, हेल्थी प्लॅनेट अर्थात स्वच्छ समुद्र, स्वच्छ पृथ्वी अशी संकल्पना संयुक्त राष्ट्रांतर्फे राबविण्यात येणार आहे. प्लास्टिकचे प्रदूषण ही समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला भेडसावत आहे. विशेषत: समुद्राच्या पाण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मिसळल्या जाणार्‍या प्लास्टिकमुळे सागरी जीवांचे, समुद्री प्राण्यांचे जीवनच धोक्यात आले आहे. त्यामुळेच समुद्र दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाचे या अत्यंत महत्त्वाच्या मुद्याकडे आणि पर्यायाने सागरी आरोग्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिन साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रांकडून जाहीर करण्यात आले आहे.
🔲🔲🔲

*🔺का साजरा केला जातो जागतिक समुद्र दिन.....*

▪- प्रत्येकाच्याच दैनंदिन जीवनात समुद्राची महत्त्वाची भूमिका आहे.
▪- मोठ्या प्रमाणावर प्राणवायू देण्याचे काम समुद्र करतो.
▪- यानिमित्ताने समुद्र बचावाची जगभरात एक चळवळ उभारली जावी.
▪- समुद्रांचा शाश्‍वत विकास साधण्यासाठी जगातील लोकांना उद्युक्त करणे.
▪- औषधी, अन्न, पाणी व प्राणवायू यासाठी समुद्र हा एकमेव मोठा स्रोत आहे, हे जाणून त्याकडे लक्ष पुरविणे.
▪- समुद्री संपत्तीचे जतन व संवर्धन करणे हा हेतू.
🔲🔲🔲
*‘‘समुद्रांच्या क्षमतेपेक्षा अनेक पटींनी अधिक भार आपण समुद्रांवर लादतो आहोत. समुद्रात मोठ्या प्रमाणावर मिसळले जाणारे अशुद्ध पाणी, प्लास्टिकचा प्रचंड मोठा कचरा यामुळे सागरी जीवन व समुद्रच धोक्यात आले आहेत. भविष्यात समुद्राचे जीवन वाचविण्यासाठी आजच समुद्रांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.’’*

_*- बान की मून, सरचिटणीस युनो*_
🔲🔲🔲

_*संकलन -सचिन मणियार..✍🏼*_

१९९२ साली रिओ दी जानेरिओ येथे झालेल्या पहिल्या पृथ्वीविषयक परिषदेत हा दिन साजरा करण्याबाबत विचारमंथन झाले. *त्यानंतर ५ डिसेंबर २००८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसामान्य सभेत ८ जून हा दिवस जागतिक समुद्र दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव झाला.* यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सागरीव्यवहार आणि समुद्री कायदेविषयक विभागातर्फे जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. युनेस्कोच्या आंतरसरकारी समुद्र विज्ञान आयोगातर्फे जागतिक समुद्र नेटवर्कला प्रायोजकत्व देण्यात आले आहे.
🔲🔲🔲

*🔺समुद्रच बेपत्ता....*

पर्यावरणाच्या मोठ्या प्रमाणावर होणार्‍या हानीमुळे आणि प्रचंड प्रदूषणामुळे पृथ्वीवरील एक अख्खा समुद्रच बेपत्ता झाला आहे. मध्य आशियातील कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान दरम्यान असलेला अरल समुद्र आता वाळवंटातच रुपांतरित झाला आहे, ही धक्कादायक बाब नुकतीच एका वृत्तवाहिनीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उघड केली होती.
काही तथ्य आणि आकडेवारी ...
🔲🔲🔲

▪- पृथ्वीवरील ९७ टक्के जलसाठा समुद्रात आहे.
▪- समुद्रावर तब्बल ३ अब्ज लोक अवलंबून आहेत
▪- जगभरात, समुद्र व सागरी संसाधने आणि त्यावर अवलंबून असलेल्या बाजारपेठांचे मूल्य प्रतिवर्षी तीन ट्रिलियन डॉलर अर्थात जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५ टक्के आहे.
▪- सुमारे ३० टक्के कार्बन डायऑक्साईड समुद्र शोषून घेतो यामुळे प्रदूषणाचा परिणाम कमी करण्यास अप्रत्यक्षपणे थेट मदत होते.
▪- सागरी मासेमारीवर जगभरात तब्बल २०० दशलक्ष लोक अवलंबून आहेत.
_
➖➖➖➖➖➖➖
💦🌊💦🌊💦🌊💦

२४ मे २०१८

वेडा

तु वेडी आहेस !
तु वेड लावतेस !
तुझं वेड लागलं !
तुझं हसणं वेडं लावतंय !
तुझ्यासाठी वेडा झालोय !
तुझा वेडेपणा सतावतोय !
तुझं माझं प्रेमही वेडं आहे !
तुझ्यावर वेड्यासारखा मरतोय !
तुझ्या माझ्या प्रेमाची वेडी कहानी !
तुझा वेडसरपणा प्रेमाचा एक भाग आहे !

तुझा वेडा दिवाना !

Rail Terminal , Junction

*_🔺🙇🏻‍♂मनातील प्रश्न.._*

🚂🚋🚋🚋🚋🚋🚋
➖➖➖➖➖➖➖
*☑ भारतीय रेल्वेच्या टर्मिनस, सेंट्रल, जंक्शन आणि स्टेशन मधला फरक..!!!*
➖➖➖➖➖➖➖
भारतीय रेल्वे म्हणजे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क होय. आपल्या भारत सरकारचे रेल्वे मंत्रिमंडळ अतिशय प्रभावीपणे हे अवाढव्य काम सांभाळते असून देशातील रेल्वेच्या वाहतुकीसाठी ते जबाबदार आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत ९२०८१ किलोमीटर रेल्वे रूळ असून ते ६६६८७ किलोमीटरचे अंतर व्यापतात. आपल्या भारतीय रेल्वेने जवळपास २२ दक्षलक्ष प्रवासी दरोरोज प्रवास करतात. तर असा हा प्रवास सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेने ७२१६ स्थानके भारताच्या वेगवेगळ्या भागात तयार केली आहेत. त्यांची नावेही वेगवेगळी आहेत. काहींचे नाव जंक्शन, काहींचे टर्मिनस तर काहींचे सेंट्रल. पण तुम्हाला माहीत आहे.?? जंक्शन, टर्मिनस आणि सेंट्रल या तिन्ही प्रकारच्या रेल्वे स्थानकांमध्ये काय फरक आहे.??
🔲🔲🔲

*🌀 टर्मिनस...*
ज्या स्थानकाला टर्मिनस/टर्मिनल म्हटले जाते, त्या स्थानकात रेल्वे ज्या बाजूने आत येते त्याच बाजूने बाहेर जाते. कारण ह्या स्थानकातील रूळ एका बाजूला संपतात, म्हणून रेल्वे एकाच बाजूने जाते आणि येते.
*▪उदारणार्थ:*
➡छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई
➡छत्रपती शाहुजी महाराज टर्मिनस कोल्हापूर
🔲🔲🔲

*🌀 सेंट्रल...*
सेंट्रल स्थानक हे शहरातील खूप व्यस्त आणि महत्त्वाचे स्थानक असते, या स्थानकावर खूप साऱ्या ट्रेन येत असतात आणि जात असतात. ही स्थानके बहुतांश करून जुनी असतात. भारतात केवळ पाच सेंट्रल स्थानके आहेत.
*▪उदाहरणार्थ :*
➡मुंबई सेंट्रल (BCT)
➡चेन्नई सेंट्रल (MAS)
➡त्रिवेंद्रम सेंट्रल (TVC)
➡मंगलोर सेंट्रल (MQC)
➡कानपूर सेंट्रल (CNB)
🔲🔲🔲

*🌀जंक्शन...*
ज्या स्थानकात कमीत कमी ३ रेल्वे मार्ग आत येतात आणि बाहेर जातात, अश्या स्थानकाला जंक्शन म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एक रेल्वे जाण्यासाठी-येण्यासाठी कमीतकमी २ मार्गांचा वापर करते.
*▪उदाहरणार्थ:*
मथुरा जंक्शन (७ मार्ग)
सालेम जंक्शन (६ मार्ग)
विजयवाडा जंक्शन (५ मार्ग)
बरेअली जंक्शन (५ मार्ग)
मिरज जंक्शन
🔲🔲🔲

*🌀 स्थानक...*
स्थानक म्हणजे एक असे ठिकाण जेथे रेल्वे प्रवाश्यांना आणि वस्तूंना चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी येते, काहीवेळ थांबते आणि निघून जाते.

*🔺नोट :*
_चेन्नई सेंट्रलला ही टर्मिनस म्हटले जाते पण हे ही भारतामधील एक जुने स्थानक आहे, त्यामुळे याला सेंट्रल असे नाव पुढे चालू ठेवण्यात आले._
➖➖➖➖➖➖➖
🚂🚋🚋🚋🚋🚋🚋

१६ मे २०१८

तुम्ही तुमच्या जागेवर जा, आम्हाला आमची जागा द्या



‘ तुम्ही तुमच्या जागेवर जा, 

आम्हाला आमची जागा द्या ’

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मनोमिलनाच्या गप्पांचा आनंद जिल्हावासिय (विशेषत: कराडकर) लुटत आहेत. जे कधी होणारच नाही त्या मिलनाच्या, त्यानंतरच्या गळाभेटीच्या आणि मधुमिलनाच्या गप्पा पारावर सुरु आहेत. मात्र या दोन टोकाच्या नेत्यांमधील एकमेकांप्रती असलेला दु:श्वास,अहंकार तसेच माझी जागा मला द्या, तुम्ही तुमच्या जागेवर जा! ही उंडाळकर गटाची असलेली आग्रही मागणी या प्रमुख तीन कारणांमुळे काका-बाबा गटाच्या एकत्रिकरणावर प्रश्नचिन्ह आहे. 

सलग सात टर्म कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सातारा जिल्ह्यावर अनेक वर्षे प्रभुत्व होते. 2010 साली अनपेक्षितरित्या कॉंग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी दिल्लीहून निवड झाली. यानंतर उंडाळकर गटाला हळूहळू ग्रहण लागले. कॉंग्रेसचे आमदार असूनही 2010 ते 2014 या काळात पृथ्वीराज चव्हाण यांनी उंडाळकरांना फारसे जवळ केले नाही. 2014 विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री पदावरील पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्णय कॉंगे्रस पक्षाने घेतला. सक्षम असूनही उंडाळकर यांना डावलण्यात आले आणि पृथ्वीराज चव्हाण यांना कॉंग्रेसने दक्षिणचे तिकिट दिले. उंडाळकरांनी कार्यकर्त्यांच्या रेट्याच्या जोरावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. भाजपचे अतुल भोसलेही रिंगणात होते. मुख्यमंत्री पदाचे वलय, मतदारसंघात दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी आणि सत्ता आली तर कराडला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल, या आशेवर कराडकरांनी पृथ्वीराज चव्हाण यांना निवडून दिले. हा इतिहास ताजा आहे. 

2014 पासून गेल्या चार वर्षांत पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव उंडाळकर यांच्या गटात फारसे सख्य राहिले नाही. या कालावधीत झालेल्या सर्व निवडणुका उंडाळकर गटाने अपक्ष म्हणून लढवल्या आहेत. वास्तविक, 2014 च्या निवडणुकीत उंडाळकरांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ऑफर होती. काकांनी त्यावेळी राष्ट्रवादीचे तिकिट घेतले असते तर कदाचित निकालही वेगळा दिसला असता. भाजपानेही त्यांना तिकिटासाठी पायघड्या घातल्या होत्या. मात्र कॉंग्रेस पक्षाच्या जडणघडणीत तयार झालेल्या काकांनी कॉंग्रेस सोडून कुठल्याही पक्षात जाण्यास नकार दिला आणि याच मुद्यावर गेल्या काही वर्षांत काकांचे कॉंग्रेस पातळीवर वजन व ‘इमेज’ आणखी वाढली आहे. राजकीय कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने डिसेंबर 2017 मध्ये काकांनी कराडात फार मोठे श्नतीप्रदर्शन केले. कोणतीही सत्ता नसताना, आमदारकी नसताना काकांच्या या मेळाव्यास भर उन्हात हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासहित अनेक कॉंग्रेसचे दिग्गज, ज्येष्ठ पत्रकार यांच्यासमोर मार्गदर्शन करताना उंडाळकरांनी कॉंग्रेस माझ्या र्नतात आहे. कॉंग्रेसच देशाला तारू शकते, असा नारा दिला.  त्यानंतरच्या काळात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत दक्षिणेत कार्यक्रम झाले. काही दिवसांपूर्वी विलासराव उंडाळकर यांनी एका कार्यक्रमात कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे रहा, असे पुन्हा आवाहन करताना राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर विलासराव पाटील-उंडाळकर यांचा दिल्ली दरबारी संपर्क वाढला  आणि उंडाळकर यांना पुन्हा कराड दक्षिणचे तिकिट मिळण्यासाठी जोरदार लॉबिंग आतापासूनच सुरु आहे, अशा चर्चा होत्या. दरम्यान, कधी पुण्यातून, कधी कराडमधून तर कधी मुंबईहून सोशल मिडीयातून  पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. बाबा दिल्लीला जाणार आणि काकांना कराड दक्षिण मतदारसंघ दिला जाणार, उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण गट एकत्र येणार, अशा वावड्या उठल्या. दरम्यान, पोतले येथील एका कार्यक्रमात उंडाळकर काकांनी येणारी विधानसभा मी लढणार नाही अशी घोषणा केली. मात्र त्याच कार्यक्रमात त्यांनी भावी आमदार रयत संघटनेचाच असेल, असेही स्पष्ट केले. 

विधानसभा लढणार नाही या काकांच्या घोषणेमुळे अत्यानंद झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत बोलताना आमच्या दोघांच्यात काही वाद नव्हताच. उंडाळकरांचे तिकिट मी नव्हे तर पक्षाने कापले होते, असे व्नतव्य केल्यानंतर कार्यकर्त्यांनाही गुदगुल्या झाल्या आणि दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना ऊत आला. दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोमिलनाबाबत मला काहीच माहिती नाही, असे म्हणत विधान परिषदेवर उंडाळकर गेल्यास मला आनंदच होईल, अशी गुगली टाकली. पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव उंडाळकर यांची गेल्या काही वर्षांतील राजकारण करण्याची पद्धत आणि दोघांच्याही राजकारणाचा अभ्यास केला तर हे दोघेही कधीही एकत्र येणार नाहीत अशीच परिस्थिती आहे. याचे मुख्य कारण उंडाळकर गटाला पृथ्वीराज चव्हाण यांचे कराड दक्षिणमधील येणे कधीच पचलेले नाही. लादलेले मुख्यमंत्री, लादलेले उमेदवार, जनसंपर्क नसलेले नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत. त्यांनी दक्षिणमध्ये न येता दिल्लीचे राजकारण पहावे आणि कराड दक्षिण मतदारसंघ उंडाळकरांना मोकळा करून द्यावा, अशी उंडाळकर गटाची मागणी आहे. ‘त्यांनी त्यांच्या जागेवर जावे, आम्हाला आमची जागा द्यावी’, असे उंडाळकर गटाचे कार्यकर्ते नेहमी बोलून दाखवतात. 2019 च्या निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव झाला आणि कॉंग्रेसचे सरकार आले तर पृथ्वीराज चव्हाण केंद्रात मंत्री म्हणून जातील आणि दक्षिणच्या जागेवर उंडाळकर यांचा पुन्हा दावा राहील. उंडाळकरांनाच कॉंग्रेसचे तिकिट मिळेल आणि ते निवडुनही येतील, असा विश्वास आणि अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. अधुन-मधून बाबा दिल्लीला जाणार, अशा पुड्या हेच कार्यकर्ते सोडत असतात. (विलासराव पाटील-उंडाळकर विधानपरिषदेवर जाणार आणि कराड दक्षिणमध्ये त्यांचा गट येणाऱ्या निवडणुकीत बाबा गटाच्या पाठीशी राहणार, अशी पुडी पृथ्वीराज चव्हाण गटाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच सोडली आहे.)

2019 मध्ये कॉंग्रेसचे सरकार दिल्लीत येईल किंवा न येईल या जर-तरच्या गोष्टी आहेत. सद्यस्थितीचा विचार करता कॉंगेससाठी ‘दिल्ली अभी दूर है’ अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिशय सावध भूमिका घेत गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणावरच लक्ष केंद्रित केले आहे. राज्यभर संपर्क ठेवत असताना आठवड्यातील दोन-तीन दिवस ते मतदारसंघात देतात. गत आठवड्यातच त्यांनी मी दक्षिणमध्येच राहणार, असे हवेलवाडी येथील एका कार्यक्रमात जाहीर केले होते.  विधानसभा निवडणूका वर्षानंतर आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे दक्षिणचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे तिकिट वाटपावेळी त्यांचा या जागेवर अग्रक्रमाने दावा असेल. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेतेही याचा विचार करणार आहेत. विलासराव उंडाळकर यांना या जागेसाठी तिकिट मिळावे म्हणून त्यांचे जुने मित्र सुशिलकुमार शिंदे, शिवराज पाटील यांच्यासहित ज्येष्ठ मंडळी अंतर्गत प्रयत्नही करतील. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या तिकिटाला कोणीही थेट विरोध करणार नाही. अशा परिस्थितीत कॉंग्रेसमध्ये राहून उंडाळकरांना तिकिटासाठी संघर्ष करावा लागेल. मात्र अखेरच्या क्षणी पृथ्वीराज चव्हाण गटच बाजी मारण्याची श्नयता आहे. त्यामुळे काकांना उमेदवारी मिळणार नाही. बाबा दिल्लीला जाणार नाहीत. कराड दक्षिण मतदारसंघ काकांसाठी खाली होणार नाही आणि ‘तुम्ही तुमच्या जागेवर जा, आम्हाला आमची जागा द्या’ ही उंडाळकर गटाची मागणी कदापिही पूर्ण होणार नाही आणि त्यामुळेच या दोन्ही गटाचे मनोमिलन सुद्धा होणार नाही. ‘येणारी निवडणूक मी लढणार नाही, मात्र आमदार रयत संघटनेचा असेल’, ही काकांची घोषणा आणि मी कराड दक्षिणमध्येच राहणार ही पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा हेच अधोरेखित करतात. मात्र दुसरीकडे काका येणारी निवडणूक लढवणार नाहीत, हे कदापिही पटणारे नाही. काकांचे वय झाले असले तरीही त्यांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे कराड दक्षिणमधील संपर्क दौरे, गावागावांतील कार्यकर्त्यांमध्ये असणारे नेटवर्क आणि राज्यभरातील दिग्गज नेत्यांचा संपर्क वाढतच चालला आहे. उदयसिंह पाटील आमदार व्हावेत, अशी काकांसहीत त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे, स्वप्न आहे. उदयसिंह पाटील यांना योग्य वेळी विधानसभेवर पाठवण्यात काका कमी पडले आहेत. ही एक बाजू असली तरी उदयसिंह पाटील यांच्यावर मधल्या काळात दाखल झालेला गुन्हा आणि याच काळात बॅकफूटवर गेलेला त्यांचा गट आणि याचा विचार करता काकांनी एकतर्फी लढविलेली खिंड वाखाणण्यासारखी आहे. कराड दक्षिणेत आजही काकांची ताकद दखलनीय आहे. उदयसिंह पाटील यांच्यासाठी, कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर आणि वयोमानाचा विचार करता उंडाळकरांनी मी लढणार नाही, असे सांगितले आहे.

पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला गेले तर दक्षिणचे तिकिट उदयसिंह पाटील यांना मिळेल. काका त्यासाठी प्रयत्न करतील, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला जाणार नाहीत. दक्षिणमध्येच राहतील, या दृढ श्नयतेचा विचार केला तर येणाऱ्या निवडणुकीत विलासराव पाटील-उंडाळकर हेच त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा उभे राहण्याची अधिक श्नयता आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर, जनतेच्या रेट्यामुळे, कराड दक्षिणमधील वाड्या-वस्त्यांवरील लोकांच्या आग्रहास्तव  ही कारणे पुढे करून उंडाळकर काका हेच पुन्हा निवडणुकीत उतरतील, अशीच जास्त श्नयता आहे. त्यामुळे बाबा-काका कॉंग्रेस मनोमिलन खूप दूर वाटतेय. शेवटची एक श्नयता आहे ती म्हणजे सध्या राज्यात कॉंग्रेसला नेतृत्व नाही. मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करून पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्वाखाली विधानसभा लढविण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला तर चव्हाण यांना राज्यभर स्टार प्रचारक म्हणून फिरावे लागेल. अशा परिस्थितीत पक्ष त्यांना दक्षिणेत अडकून ठेवणार नाही, ही श्नयताही नाकारात येत नाही. उंडाळकरांना उमेदवारी  मिळण्याची श्नयता आहे. तसे झाले तरच हा प्रश्न मिटू शकतो. अन्यथा दोन टोके असलेल्या काका-बाबा यांना एकत्र करणे अश्नयप्राय आहे.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...