प्रीतीसंगमावरून
दैनिक *पुढारी*
दिनांक २६ मार्च २०२०
*कुटुंबासाठी वेळ मिळत नव्हता आता मिळाला आहे, घरी बसून हे कराच !*
कराड *सतीश मोरे*
कोरोनाची भीती आता वाढू लागली आहे,आणि ही भीती मनात बसणे गरजेचेही आहे. उपचार करून हा आजार बरा करणे इतके सोपे नाही.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यापासून बरा होईपर्यंतच्या प्रक्रिया खूप किचकट आहेत. या काळात कुटुंब, नातेवाईकांपासून दूर राहणे, घरातील कुटुंबातील लोकांना त्रास होणे, कुटुंबातील आणखी काही लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणे, मुला-बाळांना याचा त्रास होणे, गल्लीतील लोकांना त्रास होणे, आपल्या घरातील लोकांना समाजाने वाळीत टाकणे किंवा एकूणच कोरोनामुळे होणार्या सामाजिक दुष्परिणामांना सामोरे जाण्याचे बळ, तयारी सामान्य माणसाकडे नाही. म्हणून कोरोनापासून दूर राहणे हा एकमेव पर्याय आज आपल्यासमोर आहे.
काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण राष्ट्राला संबोधित करताना संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर केले आहे. पंतप्रधानांचा हेतू अतिशय स्वच्छ आणि साफ आहे. कोरोना हे अखिल विश्वावर आलेले फार मोठे संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी अवघे जग एकवटले असले तरी आजपर्यंत कोरोनावर उपचारासाठी एखादी लस तयार करण्यात कोणालाही यश आलेले नाही. जगात अनेक लोक या विषाणूच्या प्रादुर्भावाने आजारी पडले आहेत. काही बरेही झाले आहेत. मात्र सोळा हजारांहून अधिक लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लस जेव्हा येईल तेव्हा येईल, मात्र कोरोनावर आजच्या घडीला नियंत्रण ठेवणे सर्व जगाला जिकिरीचे झाले आहे. प्रगत देशांनासुद्धा या रोगावर नियंत्रण करण्यासाठी तात्काळ उपाय योजना करता आल्या नाहीत. मात्र सुदैवाने भारतात हा विषाणू जरा उशिरा पोहोचल्यामुळे भारताला या लढ्याला तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांत महाराष्ट्र व निवडक काही राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र आता संपूर्ण देशभर बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाचे बाधित रुग्ण आढळले आहेत. हा आकडा आता 600 च्या पुढे गेला आहे. कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी एकमेकांपासून दूर राहणे हा एकमेव आणि रामबाण उपाय असल्यामुळे पंतप्रधानांनी देश बंद ठेवण्याचा निर्णय केला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जनसंपर्क कमी करणे हा सर्वोत्तम उपाय आहे आणि त्याचमुळे आपण घरात बसून राहणे हा सर्वात मोठा पर्याय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पंतप्रधान म्हणून नव्हे तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून तुम्हाला साद घालत हृदयस्पर्शी आवाहन केले. जीव वाचवणे ही आज सर्वात मोठी प्राथमिकता आहे.
भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये कोरोना महाराक्षसाने जर विळखा घातला तर देशाची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात कमी होईल, अनेक लोक मरण पावतील. या रोगातून जे काही वाचतील त्यांच्या हातात जाणारा देश पुन्हा मुळ पदावर आणण्यासाठी पुढची एकवीस वर्षे लागतील, अशी विद्वानांनी व्यक्त केलेली भीती आणि सुचवलेल्या उपायांचा विचार करून नरेंद्र मोदी यांनी घरात बसूनच देशसेवा करावी असे केलेले आवाहन योग्य आहे.
अनेकांना असा प्रश्न पडला असेल घरात बसून काय करायचे? घरात बसून जर आपला जीव वाचत असेल, आपल्या कुटुंबाचे रोगापासून संरक्षण होत असेल तर आपण घरात बसणे हेच योग्य आहे.
नुकताच अभिनेत्री काजोल यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, ‘आपण आपले आई-वडील, पती-पत्नी किंवा मुलांना नेहमी म्हणत असतो की, ‘माझ्याकडे वेळ नाही. मला नोकरी आहे, मला उद्योग आहे, पैसे कमवून मुलांना चांगले शिक्षण घ्यायचे आहे, त्यामुळे माझ्याकडे वेळ नाही. माझ्याकडे वेळ असता तर मी निवांत तुम्हाला घेऊन फिरायला गेलो असतो, तुम्हाला वेळ दिला असता’ अशी भावना आपल्यापैकी अनेक जण आपल्या कुटुंबाकडे व्यक्त करत असतो. मात्र आज तुमच्याकडे वेळच वेळ आहे. पुढचे एकवीस दिवस तुम्हाला तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी खूप वेळ आहे. एकवीस दिवस तुम्ही तुमच्या आई-वडीलांसोबत लहानपणी अनेक गोष्टी शेअर करत होता, त्या गोष्टी शेअर करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांसोबत गप्पा मारू शकता, खेळ खेळू शकता. पूर्वी अनेक घरांमध्ये एकत्र जेवायला बसण्याची पद्धत होती ती पद्धत गेले काही दिवस बंद पडली होती. आता संपूर्ण कुटुंब एकाच वेळेला घरात जेवायला बसू शकते.
आपण आपल्या कुटुंबाला अनेक नवीन गोष्टी,अनुभव सांगू शकता. तुमची मुले पुढील वर्गात जाणार आहेत, त्या वर्गातील अभ्यासक्रम शिकवू शकता. आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या विषयात पारंगत असतो. लहानपणी आपण ज्या विषयात पारंगत होतात त्या विषयाचे ज्ञान आपण आपल्या मुलांना देऊ शकता. आपल्या कुटुंबियांना जर अशा परिस्थितीत वेळ दिला तर कुटुंबासोबतचे तुमचे बंध अजून घट्ट होणार आहेत.
एकवीस दिवस कसे जाणार? असा प्रश्न अनेकांना पडला असेल मात्र 21 दिवसात रोज काय करायचे याचे नियोजन, वेळापत्रक तुम्ही स्वतःहून कुटुंबियांना विश्वासात घेऊन तयार करा. पुढचे 21 दिवसात प्रत्येक दिवशी कोणता बैठा खेळ खेळायचा, काय वेगळा उपक्रम राबवायचा याचं वेळापत्रक करा. भगवद्गगीता रामायण, ज्ञानेश्वरी, कुराण यासारखे धार्मिक ग्रंथ आपल्या घरामध्ये आहेत. अनेक वर्षे हे ग्रंथ देवघरात बाजूला पडले असतील. पूर्वी मंदिरामध्ये किंवा घराघरांमध्ये ज्ञानेश्वरीच्या अध्यायातील एक पान रोज वाचण्याची पद्धत होती. ही पद्धत आपण पुन्हा सुरू करू शकतो. धार्मिक कार्यक्रम किंवा धार्मिक पुस्तकांत अलीकडच्या मुलांना फार रस नसतो. मात्र ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीता किंवा कुराण हे ग्रंथ काय आहेत हे सांगण्याची आणि त्यातील ओव्या वाचण्याची, पसायदानाचा अर्थ समजून सांगण्याची हीच वेळ आहे.
जगासाठी ज्ञानेश्वरांनी मागितलेले पसायदान आपण जर आपल्या मुलांना शिकवले, तर एक वेगळी ऊर्जा घरांमध्ये निर्माण होऊन आपला दिवस सकारात्मकरीत्या सुरू होऊ शकतो.
जुन्या काळातील ययाती, मृत्युंजय, छावा यांसारखे ग्रंथ आपल्या घरामध्ये असतील. त्या पुस्तकातील रोज चार पानांचे सामूहिक वाचन आपल्या घरात मुलांकडून झाले तर त्यांना सुद्धा वाचनाची आवड निर्माण होऊ शकते. जर आपल्या घरात ही पुस्तके नसतील तर ऑनलाइन, फेसबुक, व्हाट्सअॅपवर ही सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व. पु. काळे यांच्या कथाकथनाचे वेड एकेकाळी आपल्याला लागले होते. त्या गोष्टी आज ऑनलाईन उपलब्ध आहेत. ब्लुटूथ स्पिकर लाऊन घरात बसून या गोष्टी ऐका. बाबासाहेब पुरंदरे यांचे पोवाडेही मुलांना ऐकवा.
आजचा दिवस कसा गेला, आज दिवसभरात मी काय केले याची डायरी मुलांना लिहायला सांगा, आपण स्वतः लिहा. ‘कोरोना लढाईचे ते एकवीस दिवस’ हा एक वेगळा अनुभव तुमच्या घराघरात डायरीच्या रूपातून जतन करता येऊ शकेल. पुढील काळात जेव्हा आपण या लढ्यावर विजय मिळवू, पुन्हा एकवटू.. उभे राहू तेव्हा आपल्या या आठवणी एकमेकांना शेअर करू. आम्ही काय वेगळं केलं? हे आपण जगाला सांगू शकू.
सद्यस्थितीत घरात बसणे हा एकमेव पर्याय असल्यामुळे घरात बसूनच आपण निरोगी राहू शकतो. घरात बसूनच आपण जिवंत राहू शकतो, याचे भान राखा. असे कोणतेही जगातले काम नाही की जे काम आपल्या जिवापेक्षा मोठे आहे. बाहेर जाऊन चौका-चौकात टवाळक्या करण्यापेक्षा आपल्या घरात निवांत गप्पा मारा. मुलांसोबत वेळ घालवा. हे एकवीस दिवस असेच जाणार आहेत. 21 दिवसांत भारत फार मोठी क्रांती करणार आहे. कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात आपण विजयी होणार आहोत. आपल्या इमारतीमधील, आपल्या गल्लीतील लोकांना कमी-जास्त काय लागले तर त्यांना मदत करूया. घरात बसूनच देशप्रेम वाढवूया. चला आपण कोरोनाला हरवूया.
✒️ *सतीश वसंतराव मोरे*
*पत्रकार दैनिक पुढारी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा