सेल्फी विथ खासदार अशोक चव्हाण
आज सकाळी हॉटेल पंकज मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकारांसाठी चहापाण्याला निमंत्रण देण्यात आले होते. पत्रकार परिषदेत यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना मी एक प्रश्न विचारला, संघर्ष यात्रा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर भाजप सरकार अपयशी कसे ठरले आहे याच्यावर झोड उठवत आहे. मात्र स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? जुन्या काही निष्ठावंत लोकांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेणार आहात का? तुमचे जवळचे मित्र अजूनही काँग्रेसमध्येच आहेत त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये मानाचे स्थान देणार का ?
माझ्या या प्रश्नावर खासदार अशोक चव्हाण यांनी कोण मित्र असा खोचक सवाल मुद्दामहून केला. यावेळी माझ्या पत्रकार मित्रानी विलास काका असे नाव घेताच काका पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत , त्यांच्याबाबत पृथ्वीराज चव्हाण बाबा हेच निर्णय घेतील असे सांगितले.
उंडाळकरांबाबत खासदार चव्हाण यांना विचारलेल्या प्रश्नाचा रोख त्यांनी चांगलाच ओळखला आणि शेवटी तुमच्या मनात आहे ते मला माहिती आहे असे म्हणत हसतमुखाने पत्रकार बैठक संपवली
त्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांनी मला जवळ बोलावून घेतले. तुमचा पेपर कोणता , नाव काय नाव काय हे विचारून चौकशी केली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी मला बाजूला घेतले, काय चालले आहे विचारून चौकशी केली. हर्षवर्धन पाटील यांना मी अशोक चव्हाण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी विचारले. पाटील यांनी अशोक चव्हाण यांना कराडचे हे पत्रकार आहेत त्यांना तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचा आहे असे सांगितल्यानंतर हो माझी त्यांचे आत्ताच ओळख झाली आहे .मोरे पुढारीचे पत्रकार आहेत असे सांगून सेल्फीसाठी पोज दिली. खासदार अशोक चव्हाण यांची एखाद्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवण्याचे खुबी मला आज चांगलीच आवडली.
दरम्यान पुन्हा बाहेर आमचे काही मित्रांनी पुन्हा खासदार अशोक चव्हाण यांच्याशी अनौपचारिकपणे बोलताना उंडाळकर काकांचा विषय काढला. यावेळी हा विषय कसा मिटवायचा , काय मार्ग आहे का,पर्यायी मतदारसंघ आहे का असा प्रतिप्रश्न खा. चव्हाण यांनी पत्रकारांना केला. मतदारसंघ नाही, मात्र विधानपरिषदेचा पर्याय आहे असे पत्रकारांनी सांगितले. काही असो उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण गटांमध्ये समेट ठेवावा अशी खासदार अशोक चव्हाण यांची इच्छा आहे हे तरी यानिमित्ताने दिसून आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा