रोज काहीतरी लिहीत जा असे माझे बाबा नेहमी सांगत. 1986 साली वाचकांची पत्रे सदरात पुणे तरूणभारत मध्ये पहिलं पत्र प्रसिद्ध झालं.1998 साली लोकमत ओगलेवाडी वार्ताहर म्हणून लेखनासाठी मार्ग खुला झाला. 2001मध्ये पुढारीत वार्ताहर म्हणून रूजू झालो.आजपर्यंत थोडंफार लिहीलं,अजून खुप लिहायचं आहे. करवडी,कराडची शाळा,काॅलेज पुढे ओगलेवाडी बनवडी भागात क्लासेसच्या निमित्ताने तसेच मिडियामध्ये सुंदर लोकांची साथ,सोबत लाभली.करवडी-कराड व्हाया ओगलेवाडी प्रवासात आलेले अनुभव लेखन हौस पुर्ण करण्यासाठी हा ब्लॉग प्रपंच!
फॉलोअर
०४ नोव्हेंबर २०१६
विस्कळीत आघाड्यांतील सेटलमेंट
२९ ऑक्टोबर २०१६
पाणाडे पाणी कसे ओळखतात
*शुभ दिपापली*
*सतीश मोरे, विद्या मोरे आणि कुटुंबीय*
karawadikarad.blogspot.in
〰〰〰〰〰〰〰〰〰
* मनातील प्रश्न....*
*पानाडे पाणी कसे ओळखतात..*
*महत्वाची जागा कशी शोधाल..!!!*
〰〰〰〰〰〰〰〰〰
_भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे – कसे साठविले जाते, हे विहीर – कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे. या साठवणुकीतच विहीर – कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते. या साठवणुकीतच विहीर खोदली तर हमखास वर्षभर पिण्याचे पाणी मिळेल. नेमके हे ठिकाण शोधणाऱ्यास वॉटर विचर्स किंवा पाणाडे म्हणतात. पाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात._
जमिनीवर पडलेले पाणी प्रथम जमिनीत जिरते. मातीच्या मगदूर व जमिनीच्या उताराप्रमाणे अतिरिक्त पाण्याला गती मिळते. जमिनीची धूप; ओहोळ, नाले, नदी यांच्या निर्मितीचे मूळ कारण पाण्याला मिळालेली गती हेच आहे. पाणी जमिनीवर वाहताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्याला आकर्षित करते व त्यामुळेच झरे, कूपनलिका, विहिरी यांना पाणी मिळते.
माळरानात सहसा झिरोफाइट्स जसे निवडुंग, काटेरी झुडपे, कोरफड, खुरटे गवत अशा प्रकारच्या कमी पाण्याची गरज असणाऱ्या वनस्पती उगवतात. या भागात पाणी नसते याची जाणीव पाणाड्यांना असते.
प्रथम केंद्रबिंदूतील मुलगा स्थिर असतो. फिरणारा मुलगा पाण्याच्या जागेवर आला की केंद्रबिंदूतील मुलगाही हलतो किंवा फिरतो. ज्या ठिकाणी फिरणाऱ्या मुलामुळे केंद्रित मुलाची सहज व जास्त हालचाल होते, त्या ठिकाणी फिरणारा मुलगा थांबतो.
जिथे मुलगा थांबतो, ती जमिनीतील पाण्याची जागा निश्चित होते. जिथे केंद्रित मुलगा फिरणाऱ्या मुलासोबत फिरतो त्या परिघात भरपूर पाणी असल्याचे समजावे.
*पाणी शोध हा बहुधा तार्किक असतो म्हणुन भोंदू लोकांना पैसे देउन होणारी फसवणूक टाळावी. म्हणून तज्ज्ञ व्यक्तीकडून व यंत्र प्रमाणित करूनच वापरावे.*
〰〰〰〰〰〰〰〰〰
२१ ऑक्टोबर २०१६
कराड पत्रकार भवन : प्रवास आणि प्रवासी भाग 1
वर्षा मुख्यमंत्री निवासस्थान
दिनांक... 22 मे 2013.
तुम्ही लोक कधीच माझ्या कडे काहीच मागायला येत नाही.
पण मला तुमच्या साठी काहीतरी करायची इच्छा आहे.
काहीही सार्वजनिक काम घेऊन या ..... ना. पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
![]() |
| मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई |
![]() |
| कराड विश्रामगृह येथे मुख्यमंत्यासोबत चर्चा |
कराड पत्रकार भवनासाठी 55 लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, या आशयाचा जी आर 5 सप्टेंबर 2014 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर अपलोड झाला आहे, अशी माहिती फोनवरून तोरस्कर साहेबांनी कळवली. हा निधी जिल्हाधिकारी साताराकडे वर्ग झाल्याचा उल्लेख त्यात होता. याच दरम्यान आम्ही मुंबई येथे होतो. मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन बाबांची भेट घेतली, आभार मानले. जी आरची प्रिंट काढली. सर्वाना कळवले, आणखी महत्वाचा एक टप्पा पार पडला होता .
.........पुर्वार्ध (2013-2014)
२० ऑक्टोबर २०१६
कधीकधी मी खुप हळवा होतो !
वाऱ्याकडे पुन्ह स्पर्श तुझा मागतो
१९ ऑक्टोबर २०१६
सत्प्रिया
विद्युलता तु
तुच सहचरिणी
सखी तुच
साथी तु ही रे
११ ऑक्टोबर २०१६
अमिताभ बच्चन
🎉🎊💐☄🎂☄💐🎊🎉
〰〰〰〰〰〰〰〰〰
*☑बच्चन तो बच्चन है!*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*🔺मुंबई बी-टाऊन बुक्समध्येही ‘बिग बी’ अग्रेसर*
‘बच्चन तो बच्चन है साब. इसलिये उनकी किताबें हम सबसे उपर रखते है. उनका बार्गेनिंग भी ज्यादा नहीं होता. क्यो की लेनेवाले को भी पता होता है की, वो बच्चन साथ ले जा रहे है. सब से ज्यादा डिमांड बच्चन साब की ही होती है,’ हे उद्गार आहेत, हुतात्मा चौकात रस्त्यालगत पुस्तके विकाणाऱ्या एका विक्रेत्याचे. आज मोठमोठाल्या मॉल्समध्ये पुस्तकांची एसी दुकाने उभी राहिली आहेत.
🔲🔲🔲
*दिलीपकुमारांपासून चेतन भगतपर्यंत अनेक पुस्तके आली. _पण बिग बींच्या पुस्तकांची मागणी कधीच कमी झाली नाही,_ हेच या विक्रेत्यांशी बोलताना जाणवते.*
🔲🔲🔲
या रस्त्यांवर बहुतांश सेकंड हँड पुस्तके विकली जातात. त्यात काही नवी कोरी पुस्तकेही असतात. पुस्तकांची आवड असलेले मुंबईतले तरुण इथे येऊन स्वस्तात पुस्तक खरेदी करतात. या तरुण वाचकांमध्येही बिग बींना प्रचंड मागणी आहे.
🔲🔲🔲
हुतात्मा चौकसमोर असलेल्या सर्वांत मोठ्या ओपन बुक मार्केटमध्ये एक फेरफटका मारल्यानंतर पुस्तकांचे गठ्ठे दिसतात. या गठ्ठ्यांमध्ये, प्रत्येक विक्रेत्याकडे उठून दिसतात ती अमिताभ बच्चन यांचे फोटो असलेली पुस्तके. ‘बिग बींच्या पुस्तकांना इथे प्रचंड मागणी आहे. अनेक विक्रेते दिवसाला बच्चन यांची डझनावारी पुस्तके विकतात,’ अशी माहिती मुंबई नॉवेल बुक वेल्फेअर असोसिएशनचे खजिनदार राजेंद्र चंडेल यांनी दिली. आजही दिवसाला विकल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्ये किमान चार पुस्तके बिग बींची असतात, अशी माहिती फोर्टमधल्या एका पुस्तक विक्रेत्याने दिली.
🔲🔲🔲
या पुस्तकांची किंमत आठशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामध्ये विशेषतः खालिद महोम्मद लिखित 'टू बी ऑर नॉट टू बी : अमिताभ बच्चन', भावना सोमय्या लिखित 'अमिताभ बच्चन: द लिजंड' आणि जेसिका हाईन्स लिखित 'लूकिंग फॉर द बिग बी' या तीन कॉफी टेबल बुक्सच्या पठडीत मोडणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे. खालिद यांनी लिहिलेले पुस्तक ‘बिग बीं’च्या ६०व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आले होते. यात बच्चन यांचे दुर्मिळ फोटो आहेत. तर सोमय्या यांनी त्यांच्या पुस्तकात बच्चन यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. ‘बिग बीं’च्या खालोखाल दिलीपकुमार, देवानंद, रजनीकांत यांच्या पुस्तकांना मागणी असल्याचे चंडेल सांगतात.
〰〰〰〰〰〰〰〰〰
🎉🎊💐☄🎂☄💐🎊🎉
*महानायक श्री अमिताभ बच्चन जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!*
~~~~~~s~~~~~~~~
11 Oct 2016
अमिताभ @ ७५
मोठा ‘माणूस’
----------------

अमिताभ बच्चनच्या वागण्या-बोलण्यात, वावरण्यात एक खानदानी आदब दिसते. अलाहाबादच्या श्रीवास्तवांचे संस्कार लख्ख दिसतात. पिता थोर कवी आणि साहित्यिक असल्याचा सर्वाधिक परिणाम अमिताभच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला स्पष्ट कळून येतो. अमिताभ अभिनेता म्हणून किती श्रेष्ठ आहे किंवा महान आहे, यावर कदाचित एक वेळ चर्चा होऊ शकेल. मात्र, तो एक उत्तम ‘माणूस’ आहे, याबद्दल दुमत होण्याची शक्यता नाही. आजच्या काळात हे माणूसपण दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेलं असताना अमिताभसारख्या बुजुर्ग कलाकाराचं आपल्या आसपास असणं हे किती सुखावह आणि आश्वासक आहे!
अमिताभच्या तरुणपणी जेव्हा तो ‘अँग्री यंग मॅन’ साकारत होता, तेव्हा त्याला प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं नाही. आम्ही कळत्या वयाचे झालो, तेव्हा अमिताभच्या कारकिर्दीचा पूर्वार्ध संपून गेला होता. त्याचं पडद्यापलीकडचं अस्तित्व तेव्हा फार काही जाणवायचं नाही. त्या काळात माध्यमेही मर्यादित होती. शिवाय अमिताभ तेव्हा काही फार मीडिया-फ्रेंडली नव्हता, म्हणे. ते काही असो... अमिताभमधलं हे सुसंस्कृत माणूसपण भावलं ते त्याच्या उतारवयात! दुसऱ्या इनिंगमध्ये म्हणजे साधारणतः ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभला आपण पाहिलं, तेव्हा मात्र त्याच्यातला हा गुणविशेष सर्वांच्याच प्रकर्षानं लक्षात आला. एक तर तेव्हा तो जवळपास ५६-५७ वर्षांचा झाला होता. या वयात येणारी एक गोड परिपक्वता त्याच्या अंगात ठायी ठायी भिनली होती. या कार्यक्रमातला त्याचा वावर बघण्यासारखा होता. अमिताभ तेव्हा ऑलरेडी ‘महानायक’ पदाला पोचला होता. सामान्य लोकांना थेट त्याच्याशी संवाद साधण्याची मिळालेली संधी आणि स्वतःच्या प्रतिमेची जाणीव असूनही अमिताभचं त्या सर्वसामान्य लोकांशी वागणं खूप सहज होतं. अमिताभच्या वागण्या-बोलण्यातली नम्रता, आदब कमालीची मोहवणारी होती. थोडं यश मिळालं, की माणसं बहकल्यासारखी वागतात. डोक्यात हवा गेल्यासारखी उडायला लागतात. अमिताभसारखं उत्तुंग यश तर फारच थोड्यांना मिळतं. या पार्श्वभूमीवर त्याचं हे सार्वजनिक कार्यक्रमातलं वागणं खूपच आपुलकीचं आणि संस्कारशील होतं. कुणी म्हणेल, अशा कार्यक्रमांत मोठे लोक मुद्दाम तसे वागतात-बोलतात. हे काही अंशी खरंही आहे. मात्र, अमिताभच्या वागण्यात-बोलण्यात कुठेही हा बेतीवपणा दिसला नाही. तो सुसंस्कृतपणा त्याच्या रक्तातच होता; असला पाहिजे. सर्वसामान्य लोकांशी, विशेषतः महिलांशी बोलताना, त्यांना त्या खुर्चीवर बसवताना, त्यांच्याशी हास्य-विनोद करताना अमिताभ कुठंही अॅक्टिंग करत होता वा त्याचा हा सगळा बेतीव सभ्यपणा होता, असं कुठंही वाटलं नाही. किंबहुना अशा कार्यक्रमात यजमानानं कसं वागावं-बोलावं याचा वस्तुपाठच त्यानं घालून दिला. अमिताभच्या या आदबशीर वागण्यानं घरातल्या एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीविषयी वाटतो तसा आदर त्याच्याविषयी सर्वांना वाटू लागला हे निश्चित.

अमिताभच्या आयुष्याकडं नीट पाहिलं, तर लक्षात येतं, की एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याप्रमाणेच त्याच्याही आयुष्यात अनेक चढ-उतार आले. सुख-दुःखाचे प्रसंग आले, आशा-निराशेचे क्षण आले. अमिताभचं कुटुंब म्हणजे अलाहाबादमधलं एक प्रतिष्ठित कुटुंब. वडिलांची कीर्ती केवळ त्या शहरातच नव्हे, तर देशभरात पसरलेली. शिवाय इंदिरा गांधी आणि एकूणच नेहरू-गांधी घराण्याशी अत्यंत जवळचे संबंध. राजीव गांधी आणि अमिताभ हे बालमित्र. अशा वेळी अमिताभचं आयुष्य सर्वसामान्यांसारखं असणार नव्हतं, हे उघडच होतं. पण एका वेगळ्या पातळीवर अमिताभलाही संघर्ष टळला नाहीच. त्याचं आयुष्य यशापयशाच्या रोलरकोस्टर राइडसारखं भासतं. त्याला सुरुवातीला रेडिओवर मिळालेला नकार, नंतर लंबूटांगा नट म्हणून होणारी हेटाळणी, मग एकदम मोठं यश, सुपरस्टारची बिरुदावली, मग प्रेमाचा त्रिकोण, नंतर अचानक झालेला जीवघेणा अपघात, नंतर राजकारणात प्रवेश, तिथली अपयशी खेळी, मग पुन्हा खासदारकीचा राजीनामा, नंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन, चुकीच्या चित्रपटांची निवड, मग पुन्हा काही चित्रपटांना यश, मग दीर्घकाळ विश्रांती, मग कंपनीची दिवाळखोरी, मग पुन्हा त्यातून सावरण्यासाठी राजकीय मित्रांची मदत, नंतर पुन्हा सेकंड इनिंग, ‘कौन बनेगा करोडपती’चं तुफान यश आणि त्यात एक से बढकर एक चांगल्या भूमिका साकारण्याची संधी...
अमिताभच्या या सर्व प्रवासात सर्वसामान्यांना आपल्याही आयुष्याशी असलेलं साम्य जाणवतं. अमिताभकडं असलेलं वलय आणि पैसा यांची तुलना सामान्यांशी होत नसली तरी हे साम्य त्यांना जाणवतं, हे विशेष! याचं कारण अमिताभनं स्वतः कधी आपल्या या स्थानाचा आणि वलयाचा सामान्यांसमोर गवगवा केलेला नाही आणि हेच त्याच्या ‘मोठा माणूस’ असण्याचं गमक आहे.
बिग बी...!
महानायक .....!!
सुपरस्टार .....!!!
पद्मभूषण!!!
The Star Of The Millennium!!!
अनेक पुरस्कारांचे धनी....!!!!
एक सुसंस्कृत भारतीय अभिनेते!!!!
मा श्री अमिताभ बच्चन साहब यांचा आज वाढदिवस!
आजही आम्हाला बालपण आठवतयं!
चित्रपट काय असतो हे समजण्याच्या आतच आम्ही मा. अमिताभ बच्चन जी यांचे चाहते झालेलो; कारण त्यांच्या अभिनयाची आणि आवाजाची जादूच अशी होती की, आम्हालाही कळले नाही की आम्ही अमिताभजी यांचे चाहते झालोत!
अमिताभ जी जणू अगदी घरातलीच कुणी व्यक्ती आहे असे मानायला लागलो होतो! इतक्या भारावलेल्या अवस्थेतच त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने त्यांना "कुली" चित्रपटाच्या शुटिंगसमयी अपघात झाला!
झाले!
आमचेच काय पण अखिल भारताचे प्राण कंठाशी आलेले अशी हतबलता!
विशेष म्हणजे तो काळ हा प्रसार माध्यमांचा नव्हताच मूळी! रेडिओ आणि वृत्तपत्रांतून काय त्यांच्या प्रकृतीविषयी जुजबी माहिती मिळायची.. तेवढीच!
अमितजींची तब्येत लवकरच बरी व्हावी म्हणून नवस-सायास, उपवास करणारे केवळ आम्हीच होतो असे नव्हे तर भारतातील अगणित चाहते आमच्यासोबत होते! वेळीच उपचार झालेत आणि सोबत अखिल भारतीयांच्या दुवा...
अमितजी ठिकठाक झालेत तेव्हाच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडल्याचे आजही स्पष्ट आठवतयं, इतकी ही घटना मनावर कोरली गेलीय!
विशेष म्हणजे मनमोहन देसाई यांच्या या "कुली" चित्रपटाच्या मूळ कथानकात अमितजींचे इक्बाल नावाचे पात्र मरण पावते असा शेवट होता; पण अपघाताने संपूर्ण भारतातून आलेल्या प्रतिसादाद्वारे अमितजींबद्दलचे प्रेम पाहुन दस्तुरखुद्द मनमोहन देसाई जी ही गहिवरले आणि त्यांनी कुली चित्रपटाचा दुखांत शेवट हा सुखांतात केला!
~~~~~s~~~~~~~~
*अमितजींविषयी...!*
अमिताभ बच्चन जी (मूळ नाव- अमिताभ हरिवंश राय बच्चन,
जन्म: ११ ऑक्टोबर १९४२) हे आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत.
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील संतप्त तरूण (एंग्री यंग मॅन) अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली आणि चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे. १९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेसाठी निवडले गेले होते.
अमितजींबद्दल आणखी बोलायचे तर अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद , उत्तरप्रदेश येथे एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते तर त्यांची आई तेजी बच्चन या मूळच्या फैसलाबाद (पाकिस्तान) येथील हिंदू शीख कुटुंबातील होत्या.
अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन (बालसुलभ) या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले. अमिताभ यांच्या वडिलांचे २००३ मध्ये तर आईचे २००७ मध्ये निधन झाले.
डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे. त्यांच्या भावाचे नाव अजिताभ आहे. त्यांच्या आईला रंगभूमीची आवड होती आणि त्यांना एका फिल्ममध्ये भूमिकाही देऊ करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याऐवजी घर सांभाळण्याला प्राधान्य दिले.
अमितजी अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमध्ये शिकले. त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले.
"सात हिंदुस्थानी" या चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले तेव्हा अमितजींची उंच अंगकाठी बघून आणि घोगरा आवाज ऐकून या सात हिंदुस्थानी चित्रपटाचे हक्क ही कुणी विकत घ्यायला तयार नव्हते!
मात्र मा. प्रकाश मेहेराजींचा "जंजीर" चित्रपट आला आणि
अमितजींनी संथ हिंदी चित्रपटांच्या जंजीर मधून हिंदी चित्रपटसृष्टीला
बंधनमुक्त केले!
या जंजीर नंतर मात्र अमितजींनी मागे वळून पाहिलेच नाही... ते अगदी आजतागायत!
चित्रपट, दूरचित्रवाणी, जाहिराती यातून ते आजही काम करीत आहेत !
त्यांचे कष्ट आणि कार्यामागची भावना पाहिली असता उर भरुन येतो!
आदरणीय अमितजींना....,
श्री ईश्वर सदैव सुख-समृध्दी, यश, किर्ती, भरभराट आणि निरोगी दीर्घायुष्य देवो ही ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना !
आदरणीय अमितजी ...!
आपणांस पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
.
अमिताभ बच्चन लेख
Featured Post
ना बोलना जरूरी है
*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...
-
*अंतरंग* *परिसे गे सुनेबाई |* *नको वेचू दूध दही ||१* *आवा चालीली पंढरपुरा |* *वेसींपासुन आली घरा ||२* *ऐके गोष्टी सादर बाळे |* *करि जत...
-
प्रतिभाशाली युवा लेखक.....यशराज देसाई राजकारणी लोकांच्या घरी राजकारणी, डॉक्टरांच्या घरी डॉक्टर, शिक्षकाच्या घरी शिक्षक,आयपीएस अ...
-
डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष 2 जानेवारी 1940 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कराडात आले होते. कराड मुन्सिपाल्टीने त्यांना या...








