विद्युलता तु
तुच सहचरिणी
सखी तुच
साथी तु ही रे
उठता बसता मला
होतात तुझे भास
कानामागे जाणवतात
तुझे गरम श्वास.
तुझी साथ सावली मज
हवी क्षणोक्षणी
तुझ्याच सोबतीत
बहरतील गुजगाणी
तुझा विचार करता करता
चहा बनवून घेतो
जुन्या आठवणी स्मरताना
साखर विसरुन जातो.
खिडकी मध्ये बसतो
कप ओठास लावतो
मग चेहरा तुझा आठवतो
आणि चहा गोड होतो
......... सतीश मोरे.

