9881191302
रोज काहीतरी लिहीत जा असे माझे बाबा नेहमी सांगत. 1986 साली वाचकांची पत्रे सदरात पुणे तरूणभारत मध्ये पहिलं पत्र प्रसिद्ध झालं.1998 साली लोकमत ओगलेवाडी वार्ताहर म्हणून लेखनासाठी मार्ग खुला झाला. 2001मध्ये पुढारीत वार्ताहर म्हणून रूजू झालो.आजपर्यंत थोडंफार लिहीलं,अजून खुप लिहायचं आहे. करवडी,कराडची शाळा,काॅलेज पुढे ओगलेवाडी बनवडी भागात क्लासेसच्या निमित्ताने तसेच मिडियामध्ये सुंदर लोकांची साथ,सोबत लाभली.करवडी-कराड व्हाया ओगलेवाडी प्रवासात आलेले अनुभव लेखन हौस पुर्ण करण्यासाठी हा ब्लॉग प्रपंच!
फॉलोअर
०४ ऑगस्ट २०१६
माझी पंढरीची वारी YOUTUBE वर
9881191302
१९ जुलै २०१६
सत्कार घरच्या लोकांकडून
भक्तीमार्गातून समाज घडतो : अॅड. उदयसिंह पाटील
वारकरी सांप्रदाय आपल्या संस्कृतीचे वैभव: सौरभ पाटील
समाजाच्या जडणघडणीत वारकरी सांप्रदायाचे योगदान खूप मोठे आहे. भक्तीमार्गातून समाज घडतो हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील यांनी केले.
दै. पुढारी कराड कार्यालयाचे प्रमुख सतीश मोरे यांनी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करून वारीचे उत्कृष्ठ लेखण केल्याबद्दल कराड कार्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अॅड. पाटील बोलत होते.
कार्यक्रमास आदरणीय पी. डी. पाटील सह्याद्री बॅकेचे युवा नेते सौरभ पाटील, कराड बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील पोतलेकर, प्रा. संभाजी शेवाळे, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक जयवंतराव थोरात, राजू जाधव, अजिंक्य पतसंस्थेचे संचालक अशोक माने, खरात माऊली, लोहार माऊली, संदीप पाटील, जॉन्टी थोरात यांच्यासह कराड कार्यालयातील अमोल चव्हाण, प्रतिभा राजे, चंद्रजित पाटील, महेश पाटील, अर्जुन काटवटे, ,गणेश पाटील, विशाल देशमुख, धनाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस या प्रमाणे वारकरी सांप्रदायात अनेक संतांनी विचारांचे कळस रचण्याचे काम केले आहे. वारीत अमुलाग्र बदल झाले आहेत. वारीत सहभागी वारकऱ्यांची संख्याही प्रतिवर्षी वाढत आहे. यामधील युवकांचा सहभाग आत्मिक समाधान देणारा आहे. सतीश मोरे यांनी वारीचे केलेले वृतांकन समाजासाठी अत्यंत महत्वाचे असून वारीचे अनुभव पुस्तकरूपात यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सौरभ पाटील म्हणाले, वारकरी सांप्रदाय हे आपल्या संस्कृतीचे वैभव आहे. संत तुकाराम, संत चोखा मेळा, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्र , संत नामदेव यांचे समाजासाठीचे योगदान खूप मोठे आहे. या संतांनी उच्च शिक्षण घेतले नाही पण त्यांच्या विचारापुढे नतमस्तक व्हावे असे त्यांचे विचार महान आहेत. सर्व जाती- धर्माला सामावून घेणारा वारकरी सांप्रदाय आहे. कर्मकांडाला संतांनी नेहमीच विरोध केला म्हणून त्यांचे छळही झाले पण आज त्यांच्याच विचारांची गावोगावी पारायणे होत आहेत. सतीश मोरे यांनी वारी लिखानातून समाज प्रबोधनाचे काम केले आहे. हे लिखान समाजातील तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी ते पुस्तकरूपात प्रकाशीत व्हावे.
अशोकराव पाटील- पोतलेकर म्हणाले, सतीश मोरे यांचे अनेक पैलू मी पाहिले आहेत. आज ते ज्या पदावर आहेत त्यामागे त्यांनी केलेले प्रामाणिक काम आणि घेतलेले कष्ट महत्वाचे आहेत. भविष्यातही त्यांच्या हातून समाजाप्रति याच पध्दतीने काम व्हावे, अशी अपेक्षा आहे.
प्रा. संभाजी शेवाळे म्हणाले, वारीत वारकऱ्यांबरोबर उन्हा, पावसात चालत राहून वारीचे वृतांकन करणे खूप कठीण काम आहे, पण सतीश मोरे यांनी ते लिलया पेलले आहे. त्यांच्या "माझी वारी' या वारी वृतांकनामुळे प्रत्यक्ष वारी अनुभवता आली.
यावेळी सतीश मोरे यांनी वारीतील अनुभव विस्ताराने सांगितले. वारीत पावला पावलावर वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांमध्ये मला विठ्ठलाचे दर्शन झाले. वारी ही माणसाला सकारात्मक उर्जा देते याची प्रचिती वारीत भर पावसात चालताना आल्याचे त्यांनी सांगितले.
वैभव पाटील, बालीश थोरात, दिलीप धर्मे, अर्जुन काटवटे यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक मोहने यांनी सूत्रसंचालन केले.
विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजू पाटील यांनी आभार मानले.
१६ जुलै २०१६
१५ जुलै २०१६
सर्वाघटी राम ,देहा देही एक,
सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी ।।
म्हणजे सर्व देहात मला ईश्वर दिसतो आहे. याची प्रचिती पंढरीऱ्या वारीत येत आहे. पंढरीची वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर चालत जाणे,वारी म्हणजे ध्यान , वारी म्हणजे नामजपयज्ञ, वारी म्हणजे लोकसंग्रह, वारी म्हणजे संत संगती, वारी म्हणजे माऊलीची साथ सोबत, वारी म्हणजे दिंड्या, वारी म्हणजे पालखी सोहळा, वारी म्हणजे टाळ मृदंगाचा नाद, वारी म्हणजे विठ्ठल भेटीचा ध्यास, वारी म्हणजे वारकऱ्यांची साथ, वारी म्हणजे भगवान भेटीचा योग, मार्ग आणि ध्यास. गेली 18 दिवस वारीतून चालता चालता वारीचा थोडा अर्थ कळायला लागला, वारीत मला माऊली भेटले, देव भेटला, वारीत मला विठ्ठल दिसला.
कराड मधून जेव्हा वारकरी लोकांना नेणारा ट्रक शाहू चौकात पोहचला तेव्हा मागे बसलेल्या एका माऊलीची एक चप्पल खाली पडली. रस्त्यावरून अनेक जण ये- जा करत होते. अनेकांनी ते पाहीले, दुर्लक्ष केले. एक मुस्लिम युवकाने दुचाकी मागे वळवून ती चप्पल उचलली, ट्रकच्या मागे गाडी लावली, नाक्यावर आणून ती चप्पल परत दिली, होय त्या युवकात मला विठ्ठल दिसला. आळंदी मध्ये वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अनेक जण खुप लांब उतरून गावात येत होते, मठाचा पत्ता विचारत होते. एक पोलिस सर्व जणांना पत्ता सांगत होते. काहीना इच्छित स्थळी पोहचवत होते, तिथे मला विठ्ठल दिसला. माऊली सोहळा पुण्यात पोहचला. भरलेले रस्ते, उंच इमारती पाहून काही वारकरी थोडे भांबवले, त्याना रस्ता पार करायला मदत करणारे लोक मला दिसले. काहीनी त्यांना पीएमटीचा मार्ग दाखवला, बस मध्ये बसल्यावर डोक्यात टोपी, कपाळावर गंध पाहून कोणी जागा दिली, त्यामध्ये मला देव दिसला.
दिवे घाटाचा अवघड रस्ता पार करून वारकरी थकले होते, चालवत नव्हते, पायाला गोळे आले होते. या माऊलीचे पाय तेल लावून चोळणारे, चेपणारे योग विद्या मंडळाचे शेकडो लोक दिसले. रस्त्याकडेला वारकऱ्यांचे डोके मॉलिश करणारे वृद्ध मला दिसले, त्याच्यामध्ये मला विठ्ठल दिसला. सासवड मध्ये बोअर मधील पाणी पाईपने टाकून माऊलींना आंघोळ घालणारे शेतकरी दिसले, त्यामध्ये मला विठ्ठल भेटला. जेजुरीला वारकरी पोहचले तेव्हा पावसात चिंब भिजले होते, चिखल झाल्याने त्यांना रहायला जागा नव्हती, अशा वारकऱ्यांना घराचे दरवाजे उघडले, मंगल कार्यालय खुले केले, त्या माऊलीमध्ये मला विठ्ठल दिसला. वाल्हेकर तर माऊली सेवेसाठी तत्पर होते. लांब असलेल्या विहिरीतील पाणी घराजवळच्या विहिरीत टाकून हे पाणी वारकऱ्यांना उपलब्ध करून देणारा विठ्ठल वारीत दिसला. निरा कॅनालमध्ये वारकरी स्नानासाठी जात होते, पहाटेच्या वेळी चुकून एखादा पाण्यात पडू नये म्हणुन तिथे सतर्क असणारा पोलिस दुसरा कोणी नव्हे विठ्ठलच होता. निरा असो वा लोणंद, वारकऱ्यांना स्वतःचे घर आराम करायला उपलब्ध करून देणारा विठ्ठलच होता. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन वारकऱ्यांना खाऊ घालणारी पिंपरद, तरडगावची माऊली विठ्ठलरूप होती. फलटण मध्ये वारकरी लोकांच्या चपला मोफत दुरूस्त करणारे, मोफत केशकर्तन सेवा देणारे, पत्रकार माऊली विठ्ठलाचेच रूप होते. बरड मध्ये रस्त्यावर पडलेल्या केळाच्या साली उचलून बाहेर टाकणारा तो युवक विठ्ठलच होता. माऊली भक्तासाठी घर आणि पिर खुले ठेवणारे मुल्ला मौलवी विठ्ठलच होते ना!
![]() |
पंढरपूर : पंढरीच्या वारीत विठ्ठल पदोपदी दर्शन देत असतो. |
नातेपुते गावात येताना भुकेलेल्या माऊलींना पुरी भाजी देणारे, भुक लागेल तेव्हा तेव्हा माऊलींना शिरा, उपीट, पोहे, पिठलं भाकरी, भात खाऊ घालणारा विठ्ठल अनेक ठिकाणी भेटला. माळशिरस, वेळापूरमध्ये उघड्यावर शौचाला जाऊ नका म्हणून आवाहन करणारे, शौचालय युनिट उपलब्ध करून स्वच्छतेचा संदेश देणारा विठ्ठलच होता.
भंडीशेगाव असो वा वाखरी, वारी मार्गावर जेव्हा जेव्हा कोणी आजारी पडला, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, सेवा करणाऱ्या नर्स, सेवाभावी लोक हे सगळे दुसरे कोणी नाही तर विठ्ठलाचे रूप धारण करून आलेले लोक होते. वारकऱ्यांना खाऊ घालणारे, स्वयंपाक करणारे, अंधारात मार्ग दाखवणारे, तंबू उभे करून निवारा देणारे, स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करणाऱ्या महिला, मोफत मोबाईल चार्ज करून देणारे, नियोजनासाठी झटलेले, शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सेवक या सर्व माऊली मध्ये मला विठ्ठल दर्शन झाले. पंढरीच्या वारीत प्रत्येक जण माऊली असतो, त्या माऊलीच्या रूपाने विठ्ठल पूर्ण वारीत सहभागी असतो, हे मी ऐकले होते. गेल्या आठरा दिवसात तो विठ्ठल प्रत्यक्ष मी पाहीला.
१४ जुलै २०१६
वाखरी : सतीश मोरे
पंढरीचा पाडुरंग अवघ्या विश्वात आहे. जो नसानसा मध्ये ठासून भरलेला तो विठ्ठल. विठ्ठल नामाचा महिमा फार मोठा आहे आणि विठ्ठल भक्त जगभर आहेत. शेकडो वषार्र्ं पासून पंढरीचा वारकरी, वारी चूको ने दी हरी, हे लक्षात घेऊन वारीला जात आहे. वारीत सारे जण सहभागी झाले आहेत. गरिब- श्रीमंत, काळा -गोरा, सवर्ण- कनिष्ठ, लहान- मोठ्ठा असा कोणताही भेदभाव इथे नाही. प्रांत, देश, विदेश, जात पात या सर्व सीमा इथं नसतात, असतो फक्त माऊली. अवघ्या महाराष्ट्रातून आलेले, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र येथून आलेल्या वारकरी माऊलींची दिंडी सामाजिक ऐक्याचे प्रतिक आहे.
महाराष्ट्राबाहेर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात सुद्धा विठ्ठलाची जादू आहे. या प्रांतातून अनेक वारकरी माऊली सोहळ्यात सहभागी झाले आहेत. धोंडोपंत दादा पंढरपूर यांच्या दिंडीला अनेक वर्षाची परंपरा आहे. माऊली रथाचे मागे 20 नंबरवर असणाऱ्या या दिंडीत सुमारे 3000 वारकरी आहेत. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील वारकऱ्यांचा संगम पहायला मिळाला.
आंध्र प्रदेश राज्यातून वेगळे झालेल्या तेलंगणा राज्यातील महाराष्ट्र सीमारेषेवर असणारा निजामाबाद या जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचे अनेक लोक आहेत. अनेक वर्षे पंढरीची वारी करणारे वारकरी आहेत. यंदा पाऊस आला नव्हता, गेल्या वर्षी पण कोरडे पडले होते, तरीही पंढरीच्या वारीला या भागातील अनेक वारकरी आले आहेत. निंभोरे ओढा येथे अनेक जण भेटले. या दिंडीत पहिली पंगत बसताना शर्ट काढून बसावे लागते. जेवणाची पंगत उठल्यानंतर कन्नड स्टाईल मराठीत बोलू लागले. आमच्याकडे श्रीमंत देव आहे, पैसा आहे. पण विठ्ठलासारखा देव नाही. या देवाचे दर्शन घेतले की वर्षभर उर्जा मिळते. वारी सारखा आनंद जगात कोठेही नाही. आमच्याकडे भजन, कीर्तन नित्य नेमाने होतात. अनेक गावात विठ्ठल रूक्मिणी मंदीर आहे, असे त्यांनी सांगितले. कर्नाटक राज्यातून आलेल्या लोकांची संख्या पण फार आहे. गंगाधर महाराज पाटील चंडेगावकर मदनूर यांच्या पुढाकाराने आलेले वारकरी याच दिंडीत पहायला मिळाले. या माऊलींचे पाठांतर खूप आहे. तुकोबा गाथा मधील अनेक अभंग पाठ आहेत. अनेक गावांमध्ये भजनी मंडळे आहेत. पंढरीची वारी कधी चुकवत नाहीत. सुमारे 1000 किलोमीटर प्रवास होतो. सारे जण पंढरपूर मध्ये धोंडोपंत दादाच्या मठात एकत्र येऊन आळंदीला जातात. वारीमध्ये पालखी सोहळ्यात सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले.
![]() |
| वाखरी: उडीच्या खेळात टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर विठुनामाच्या गजरात तल्लीन होऊन नाचणारे वारकरी. |
रिंगण आणि उडीचे खेळ
वारकरी अखंड चालत असतात. दमतात, थकतात पण थांबत नाहीत. त्यांना आनंद, विरंगुळा देणारा क्षण म्हणजे उभे आणि आडवे रिंगण. शाळेत जसा पीटीचा तास तसेच हे वारकरी खेळ. या खेळात सात्विकता आणि आनंद असतो. माऊली ज्यावर सवार असतात असा माऊली अश्व, दुसरा शितोळे सरकार यांचा मानाचा अश्व. माऊलीचा अश्व मोकळा असतो, तो पुढे पळत राहतो. त्यामागे स्वार असलेला अश्व धावतो. माऊली अश्व रिंगणात एक दोन वेढे काढतो, आणि थांबतो. मग स्वार अश्व त्यापुढे जातो आणि रिंगण पुर्ण होते. माऊली माऊलीचा घोष होताना दोन्ही अश्व माऊली पालखी जवळ जातात आणि रिंगण संपते. त्यानंतर चोपदार सर्व दिंड्यांना उडीचे खेळासाठी निमंत्रण देतात. माऊली पालखी आणि घड्याळाचा काट्याप्रमाणे ओळी करून टाळकरी उभे राहतात. बाहेर गोलाकार सर्व मृदंगधारक, विणेकरी आणि झेंडेकरी असतात. टाळ मृदंगाची जुगलबंदी सुरू होते. चोपदार बंधू चार ठिकाणी उभे राहून सूचना देतात, त्यावर टाळकरी ठेका धरतात. झोपून, गुडघे टेकून, मागे, पुढे तोंड करून टाळकरी बेफाम होऊन नाचतात.अर्धा तास खेळ रंगतो. तुका म्हणे वृद्ध होती तरूण, अशी परिस्थिती असते. शेवटी चोपदार चोप वर करून उडी मारतात, उडीचे खेळ संपतात. सारेजण लोटांगण घालून नमस्कार करतात. यामागे संताची धुळ शरिराला लागावी हा उद्देश असतो.
Featured Post
ना बोलना जरूरी है
*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...
-
*अंतरंग* *परिसे गे सुनेबाई |* *नको वेचू दूध दही ||१* *आवा चालीली पंढरपुरा |* *वेसींपासुन आली घरा ||२* *ऐके गोष्टी सादर बाळे |* *करि जत...
-
प्रतिभाशाली युवा लेखक.....यशराज देसाई राजकारणी लोकांच्या घरी राजकारणी, डॉक्टरांच्या घरी डॉक्टर, शिक्षकाच्या घरी शिक्षक,आयपीएस अ...
-
डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष 2 जानेवारी 1940 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कराडात आले होते. कराड मुन्सिपाल्टीने त्यांना या...









