फॉलोअर

०२ डिसेंबर २०१७

Amitabh 9

#बंदा रुपया...

आज म्हणजे अकरा ऑक्टोबरला हा माणूस पंचाहत्तर पूर्ण करून शहात्तरीत शिरला. बेचाळीस साली 'चले जाव' आंदोलन झालं हा जसा इतिहास आहे तसाच हा माणूस त्याच साली जन्माला आला हा ही इतिहास आहे, इतिहास असा सांगड घालून शाळांतून शिकवला तर पोरं अभ्यास करतील बघा. आमचे एक शिक्षक कवितेला गाण्याची चाल लावायचे, विनासायास कविता पाठ होऊन जायची. आपण एकेरी हाक कुणाला मारतो, आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याला आणि आपल्या आवडत्या माणसाला. मुलगा आईला, आजीला अरे तुरे करतो, तसाच आहे तो. लता, किशोर, आशा, सुनिल, सचिन सगळेच एकेरी प्रेमातले. विंडीजच्या टीमबद्दल कुठल्याही क्रिकेट कळणा-या रसिकाला असतं तसंच कुठल्याही वयातल्या सिनेरसिकाला त्याच्याबद्दल विशेष ममत्व आहे. क्रिकेटमध्ये ऑलराउंडरचं कौतुक असतं ते त्याच्या नशिबात आहे, त्याने काय केलं नाही पडद्यावर? गाणं गायलं, ऍक्शन केली, रडवलं, उत्तम विनोद करून हसवलं, अन्यायाविरुद्ध लढा दिला. आपल्याला जे जे आवडतं ते सगळं त्याने केलं. काळाच्या ओघात करमणुकीचे संदर्भ बदलत जातात, काही गोष्टी कालबाह्य होतात, काही हास्यास्पद होतात. आपल्याला हे आवडत होतं एकेकाळी? असा प्रश्नं आपणच आपल्याला विचारून मनाशीच हसतो. याला हा प्रकार लागू नाही. त्याच्या आजूबाजूचा प्रकार कदाचित कंटाळवाणा असू शकेल पण तो नाही.

त्याचे सिनेमे बघत गेले की कळतं, काय काय बारकावे टिपलेत त्याने ते. मुद्राभिनय, हातांचा वापर, पॉझेस, उभं राहणं, कशाकशावर बोलणार. तो अनुभवण्याचा विषय आहे. तो स्कॉचसारखा आहे, चवीने बघाल तर अजून आवडत जाईल. त्याचे सिनेमे अनंतवेळा बघण्याचं ते एक कारण आहे मला. मजा येते बघताना. दरवेळेला काहीतरी नवीन सापडत जातं आणि वाटतं, 'अरे, हे या आधी लक्षातच नाहीत आलं'. 'डॉन'मधलं पळणं, जिना चढणं, 'शक्ती'मधे दिलीपकुमारकडे बघताना आणि राखीकडे बघताना त्याचे डोळे बघाल, किती सांगतो तो त्यातून. चित्रपट शब्दबंबाळ नसावा, ते नाटक नव्हे. आवाजासाठी प्रसिद्ध असलेला हा माणूस चेह-याने किती बोलका आहे ते एकदा समजलं की मजा येते. उन्मळून पडणे, उध्वस्त होणे, विश्वासघाताचा धक्का, जिगर, बदले की आग, खर्जातले संवाद, चेह-याच्या हलणा-या नसा वगैरे गोष्टी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या बघण्यापेक्षा के.भाग्यराजनी लिहिलेला तमिळ 'कमल हसन अभिनित - Oru Kaidhiyin Diary' चा हिंदी अवतार 'आखरी रास्ता' बघावा. संपूर्ण चित्रपटात इन्स्पेक्टर विजय हा 'त्या'च्या चित्रपटात शशी, ऋषी कपूर जसे दबलेले असतात तसा आहे. अर्थात ही किमया 'त्या'ची आणि पटकथेची. कुठेही 'विजय' वरचढ वगैरे वाटत नाही. जेलात जायच्या आधीचा खेळकर डेव्हिड आणि बाहेर आल्यावर गंभीर झालेला बुढ्ढा डेव्हिड, दोन वेगळी पात्रं, वेगळ्या देहबोली आहेत. त्याने या चित्रपटात सरसर बदलणारे चेहरे काय अप्रतिम दाखवलेत. नेमक्या वाक्याला, शब्दाला त्याचा चेहरा जो काही बदलतो ना त्याला तोड नाही (तो ज्या भोळेपणानी रडतो, दलीप ताहिलला विश्वासानी सांगतो, ते बघाच). पात्राच्या वयोमानानुसार बदललेला आवाज ऐकणीय आहे त्याचा. डेव्हिडचा आधीचा गमत्या आवाज, विजयचा कठोर माणसाचा आवाज, म्हाता-या डेव्हिडचा खर्जातला, राग दाबलेला आवाज.

'शोले' मधले बडबडे वीरू आणि बसंती आणि जोडीला अबोल जय आणि राधा. काय सुरेख लिहिलीयेत ती पात्रं. त्यातला त्याचा मुद्राभिनय बघा, ते म्हशीवरून उतरणं असो, माऊथऑर्गन वाजवताना वरच्या मजल्यावर बघणं असो किंवा शेवटाला ये कहानी भी अधूरी रह गयी म्हणणं असो, चेहरा बोलतो बॉस. 'रोटी कपडा' मधे त्याला चंद्रा बारोटने घ्यायला लावलं होतं मनोजकुमारला. ज्याचा क्यामेरामन होता 'चौदहवीका चांद'वाला नरिमन इराणी. तिथली दोस्ती त्यांची, तो, झीनत, इराणी आणि बारोट. बुडालेल्या नरिमन इराणीला बाहेर काढण्यासाठी त्यांनी 'डॉन' केला होता. इराणी अपघातात गेला रिलीज व्हायच्या आधीच पण त्याला मरणोपरांत कर्जमुक्तं केलं. मला नेमकं आठवत नाही पण गीतकार(?) समीर की त्याचे वडील अंजानच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं अमिताभच्या हस्ते. बोलता बोलता तो म्हणाला, 'मी आलोच असतो प्रकाशनाला, माझं करिअर घडवण्यात अंजानसाहेबांच्या 'खईके पान बनारसवाला'चा मोठा वाटा आहे.' अशी कृतज्ञता आता दुर्मिळ आहे. पाय जमिनीला घट्ट चिकटलेले असले की माणसं आभाळा एवढी मोठी होतात हेच खरं. किती लिहिणार त्याच्या सिनेमांवर. जागा पुरायची नाही. 'त्रिशूल', 'दिवार', 'अमर अकबर', 'मुकद्दर का सिकंदर', 'काला पत्थर', 'अग्नीपथ' किंवा अलीकडचा 'पिंक', 'पा', 'सरकार' काय दुर्लक्ष करायच्या लायकीचे आहेत का? एकाच माणसाचे महिन्यात सलग शुक्रवारी सिनेमे रिलीज होतायेत आणि ते सगळे हिट होतायेत, संमोहनच ते. सिंगल स्क्रीनला महिनोन महिने एकावेळी दोनपेक्षा जास्ती एकट्याचे सिनेमे हाऊसफुल्ल ठेवणे हे खायचं काम नाही. अनेक टुकार पटकथा त्याच्या नावामुळे हिट होऊन गेल्या.

तो काही फार मोठा नृत्यं येत असलेला माणूस नाही. आपल्या भगवानदादांची आधुनिक स्टाईल असाच तो नाचतो खरंतर पण तो जे करतो ते आवडतं असा सगळा प्रकार आहे. अरुणा इराणीने किस्सा सांगितला होता. 'देखा ना हाय रे' गाणं काही केल्या जमत नव्हतं त्याला. प्रचंड फ्रस्ट्रेशन आलेलं त्याला, आपल्यामुळे शूटिंग खोळंबलंय याची बोच जास्ती होती त्याला. मेहमूद आणि बाकी सगळ्यांनी त्याला धीर देण्यासाठी सतत हास्यंविनोद चालू ठेवले आणि सरतेशेवटी एकदा ते झालं. पहिले काही चित्रपट सोडले तर नंतर तो क्वचित हास्यास्पद दिसलाय पडद्यावर. तो जे करत होता ते त्याला सूट होत होतं, लोकांना आवडत होतं म्हणूनही तसं वाटलं असावं पण नाचताना तो धर्मेंद्र, राजकुमारसारखा हास्यास्पद दिसला नाही, उंच आहे म्हणून कुठल्याही अभिनेत्रीबरोबर ऑकवर्ड वाटला नाही, नवीन काळात तंत्रज्ञान आणि कलाकारांसमोर आऊटडेटेड वाटला नाही, गाडी जसा अलगद रूळ बदलते तसा त्याने अलगद ट्रॅक बदलला. तो उत्तम श्रोता आहे. शम्मीकपूरच्या तोंडी त्याने 'नीला आसमाँ सो गया'ची चाल 'जमीर'च्या सेटवर ऐकली होती ती 'सिलसिला'साठी वापरायला त्याने यश चोप्राला सांगितलं. त्याच्याच वडिलांनी लिहिलेलं 'रंग बरसे' आणि 'अग्नीपथ'ची कविता पडद्यावर म्हणायचं भाग्यं त्याला लाभलं. सतत पदरी अपयश पडलेल्या माणसाला यश मिळालं की तो जमिनीवर रहात असावा. सलग सात सिनेमे धाराशायी पडल्यावर एक 'जंजीर' त्याला मुक्तं करून गेला अपयशातून. यश माणसाला देखणं करतं, एरवी घोडयासारखा चेहरा, बिनकामाची उंची, रेडिओवर नाकारला गेलेला आवाज असे दुर्गुण असलेला हा माणूस काय विलक्षण देखणा दिसतो.

कशी गंमत असते ना, हिरा पारख्याच्या हातात पडला पाहिजे. एका ठिकाणी त्याचं डबिंग चालू होतं. बाहेर राजकपूरने त्याचा आवाज ऐकला, त्याला माहित नव्हतं कुणाचं डबिंग आहे ते. त्याने न बघता सांगितलं, 'ये आदमी एक दिन राज करेगा'. यश मिळाल्यावर कौतुक होणं आणि कुणीहि नसताना त्यात गुण आहेत हे कळण्यासाठी पारख हवी. राजेशखन्नाने सांगितलं होतं, 'आनंद' त्याच्या बरोबर करणं ही माझी चूक होती. तो न बोलता काम करत राहिला, कुणी काय म्हटलं याकडे फार लक्ष त्याने दिलं नाही. एक ऐकीव किस्सा आहे. रॉबर्ट रेडफोर्डला त्याने अपॉइंटमेंट मागितली होती. अडीच मिनिटांची होती. हा इथला सुपरस्टार होता पण त्याने कमीपणा मानला नाही, तो वेळेत गेला, भेटला आणि ठरलेल्या वेळेपेक्षा जास्ती गप्पा मारून आला. वेळेत जाणारा माणूस आहे तो शूटिंगला सुद्धा. कर्तृत्वाचा दबदबा म्हणजे काय ते त्याच्याकडे पाहून कळतं. नाटकी किंवा ओढून ताणून आणलेला विनम्रपणा कळतो, लक्षात येतो, मुखवटे असतात ते. हा माणूस नखशिखांत शिस्त आहे. आदर्श म्हणजे काय असतं शेवटी, त्याच्यासारखं आपण असावं असं वाटणं म्हणजे आदर्श. एकूण काय तर तो दोनचार लेखात संपण्याचा विषय नव्हे.

लिहायला घेतलं की त्याच्याबद्दल काय लिहिणार असा प्रश्नं मला नेहमी पडत आलाय. न कळत्या वयात त्यालाच पहिल्यांदा पाहिल्यामुळे असेल पण त्याचा अमिट ठसा एकदा उमटला तो उमटलाच. त्याच्या अभिनयाबद्दल किती बोलणार, आता कंटाळा येईल इतकं बोलून झालंय. रसिक, प्रेक्षक आणि समीक्षक ह्या भिन्न गोष्टी आहेत. कुठलंही पूर्वग्रह मनात न ठेवता बघतो तो प्रेक्षक अशी आपली कॅटेगरी आहे. समीक्षक जे बघतो ते बघू दे बापडा, उगाच पृथ्थकरण करून मजा घालवायची नसते हे कळलं की झालं. दोन चार घटका आपल्या विवंचना विसरायला लावून त्या मायावी दुनियेत तो आपल्याला रमवून टाकतो हे त्याचे मोठे ऋण आहेत आपल्यावर. त्याची जादूच वेगळी आहे. पण तो नुसता उंचीनीच मोठा नाहीये. गुणांनी पण मोठा आहे. जिवंत दंतकथा. सुसंस्कृत, नम्र. एक प्रामाणिक माणूस, सगळी कर्तव्यं पार पाडणारा, कुणाचाही रूपया न बुडवणारा, संकटांना सामोरा जाणारा आणि हरलेली बाजी जिंकणारा. नम्रता आणि कृतज्ञता हे त्याचे सर्वात मोठे गुण आहेत. म्हणून एक अभिनेता यापेक्षा या सगळ्या गुणांसाठी तो मला जास्ती आवडता आणि आदरणीय आहे. लोक सगळ्या बाजूने बोलतात पण सगळ्या बाजूंवर बोलत नाहीत. 'हत्ती आणि सहा आंधळे' या बोधकथेसारखा तो प्रत्येकाला वेगळा दिसू शकेल. त्यामुळे मला ज्यासाठी आवडला तसाच दुस-यांना आवडेल असं नाही.

माणूस एकदा प्रेमात पडला की  दोष दिसत नाहीत किंवा दिसले तरी खुपत नाहीत. एकदा आपण भक्तं झालो की मग आपल्याला वाईट दिसत नाही. पण मी काही भक्तं नाही मी एक त्याच्यावर अतोनात प्रेम करणारा माणूस आहे. पण टीका करायला फार बुद्धी लागत नाही,त्यात वेळ घालवण्यापेक्षा पुलं म्हणाले तसं समोरच्यातलं चांगलं काय दिसतं ते बघावं, सांगावं. चुका सांगायला जगात तज्ञांची कमी नाहीये. व्यक्तिपूजा हा आपला राष्ट्रगुण आहे. तरीपण त्याचा 'मृत्यूदाता' पहाताना मी काळझोप लागल्यासारखा झोपलो होतो, 'मर्द', 'गंगा जमना सरस्वती', 'आज का अर्जुन' बघताना तुफान हसलो होतो, 'इन्सानियत' बघताना लाजून काळवंडलो होतो. 'जादूगर', 'अजूबा', 'तुफान' मी अजून पूर्ण बघू शकलेलो नाही. 'द लास्ट लिअर' मी पाहिलेला नाही. तसे त्याचे बरेच नविन चित्रपट मी पाहिलेले नाहीत. त्यामुळे माझं काही अडलेलंही नाही. त्याचे 'डॉन', 'मुकद्दर का...'. 'अमर अकबर...', 'चुपके चुपके', 'मिली', 'अभिमान', 'त्रिशूल', 'काला पत्थर', 'फरार', 'दिवार', 'सत्ते पे सत्ता', 'अग्नीपथ', 'आखरी रास्ता' 'सौदागर', 'मजबूर', 'जंजीर' आणि एक छोटासा हिट 'शोले' पुरेसे आहेत. 'सुहाग', 'कस्मे वादे', 'कालिया', 'शहेनशाह', 'देशप्रेमी', 'हम', 'खुदा गवाह', 'दोस्ताना', 'परवरीश', 'हेरा फेरी' चॅनल बदलताना दिसले तर क्षणिक घुटमळायला बरे आहेत. (लिस्ट थांबवण्यात येत आहे, किती लिहिणार ना).

त्याची माणुसकी अफाट आहे जी मला कायम मोह घालत आली आहे. कुठेही वाच्यता न करता चांगलं काहीतरी करत रहाणं अवघड असतं. 'इन्सानियत' टिटो टोनीचा ('राम बलराम', 'दो अंजाने' त्याचेच) होता. ८९ ला सुरु झालेला सिनेमा नूतन, विनोद मेहरा गेल्यामुळे तसाही रखडलाच होता. तो, सनी, चंकी, सोनम, रविना, जयाप्रदा अशी एकदाच एकत्रं आलेली स्टारकास्ट होती. तेंव्हा त्याचा वाईटकाळ होता. तरीपण ९४ ला फिल्म रिलीज झाली. आपटणार हे कन्फर्म होतं. पण त्याचा सिनेमा एक आठवडा भारतभर चालला तरी कॉस्ट वसूल होते म्हणून त्याने फिल्म पूर्ण केली. त्याच्या करिअरला फटका बसलेलाच होता, हा रिलीज करून अजून खपली निघणार होती पण तरीही त्यानी मान्यता दिली. निर्माता आयुष्यातून उठला नाही त्यामुळे. त्याच्या केवळ या कृत्यापोटी कृतज्ञता म्हणून मी 'विजय'ला जाऊन हा सिनेमा बघितला होता. प्रत्येकवेळेला पैशाचा मोबदला मिळतो असं नाही आणि एरवी कितीही पैसे टाकले तरी ऋणाची परतफेड करता येईलंच असं नाही. ठपका नको म्हणून त्याचा आणि मुमताजचा 'बंधे हाथ' मला बघायचाय. काळाचा महिमा असतो, 'परवाना' आला तेंव्हा नविन निश्चलनी अल्फाबेटीकली नामावली द्यायला विरोध केला होता कारण 'त्या'चं नाव पहिलं आलं असतं. 'मंगला'ला रिरन मधे पाहिला मी तेंव्हा नविन निश्चल कोप-यात निश्चल होता आणि व्हिलन 'तो' पोस्टर व्यापून. नावात काय नसतं, झेडवरून चालू झालं अस्त तरी काही फरक नसता पडला. कर्तृत्व असलं की तो म्हणालाय तसंच, 'हम जहाँ खडे होते है, लाईन वहांसे शुरु होती है'.

आई बाप सुसंस्कृत असले म्हणजे मुलं असतीलंच असं नाही. सुनील दत्तनी 'यादें' मधे दिलेला पहिला रोल तो आजपर्यंत विसरलेला नाहीये. 'रेश्मा और शेरा' मधे ऐनवेळी रोल अदलाबदली झाले आणि तो मुका झाला आणि विनोद खन्ना बोलका पण सुनील दत्तच्या शब्दावर तो काही बोलला नाही. संजय दत्तच्या पाठीशी परतफेड म्हणून तो कायम उभा असतो. 'नाम' (सलीमचा एकट्याचा 'दिवार') रिलीज झाल्यावर त्याने त्याला सोन्याची साखळी आणि पत्रं दिलं होतं. 'सात हिंदुस्थानी'मध्ये संधी देणा-या ख्वाजा अहमद अब्बास यांच्या आजारपणात त्यानी त्यांची काळजी घेतली होती. पंकज पराशरच्या पहिल्या मोठ्या चित्रपटासाठी ('जलवा') त्यानी दोस्तीत स्पेशल अपिअरन्स केला होता. रजनीकांतची हिंदीत एंट्री सुखकारक व्हावी म्हणून 'अंधा कानून' केला. एबीसीएल काढली आणि त्यात तो बुडला. बुडणारच होता, माणूस भिडस्तं असला की वेगळं काय होईल. नाहीतर मग पळून गेला असता की तो. पडद्यावरचा नायक नावाला नव्हता तो. त्याच्यासारखाच धीराचा आणि सरतेशेवटी विजय मिळवणारा होता. पेशन्स लागतात, नैराश्यं आलं की धीर खचतो, सल्लागार वाढतात, कुणीही अक्कल शिकवायला लागतं. काही न बोलता काम करत राहणं सोपं नसतं. 

दुर्धर 'मायस्थेनिया ग्रेव्हीस', पुनीत इस्सारबरोबरची फायटिंग, टी.बी.सगळ्यातून तरला, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून परत आला. संपूर्ण देश एखाद्यासाठी प्रार्थना करतो याला पुण्याई लागते. कुणी नवस बोललं, कुणी देवाला उलटं चालत गेलं. नोंद नसलेल्या अनंत प्रार्थना पाठीशी उभ्या राहिल्या, कशामुळे? त्याने जे काही दिलं इतक्या वर्षात त्याची ती मूक परतफेड होती. रेखा, परवीन, माधवी अनेक नावं जोडून झाली, तो एक शब्दंही कधी बोलला नाही. 'बावर्ची'च्या सेटवर तो जयाला घ्यायला जायचा तेंव्हा खन्ना त्याच्याशी बोलणं लांब, ओळख सुद्धा द्यायचा नाही पण तो एक शब्दंही कधी बोलला नाही, उलट त्याला कायम पहिला सुपरस्टार म्हणून वंदत आला.  बोफोर्स प्रकरणात एकदाही आक्रस्ताळं तो बोलल्याचं मला आठवत नाही किंवा निर्दोष सुटला म्हणून 'जितं मया' करत बोलत सुटला नाही. मौनात मोठी ताकद असते. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणं कधीही चांगलं, तो तेच करत आलाय. पेशंस पाहिजेत बॉस. मला त्याला बघितलं की एक शेर आठवतो, 'अपने खिलाफ बातोंको अक्सर मैं खामोशी से सुनता हूं ... क्योंकी...जवाब देनेका हक मैंने वक्तको दे रखा है'! आदर्श असे गल्लोगल्ली मिळत नसतात. वर म्हटलं ते आणि आदर्श म्हणजे काय याची अजून एक व्याख्या आहे माझी. आपल्याला सोयीस्कर असतो तो आदर्श नसतो, त्याच्यासारखं वागणं, जगणं आपल्याला जमणार नाही असं वाटून जातं तो माणूस 'आदर्श' असतो.

टॅक्स भरण्यासाठी त्याने 'दो बूंद जिंदगीके' जाहिरात केली होती. पैसे किती मिळाले यापेक्षा त्याच्या नावामुळे पोलिओचे डोस खेड्यापाड्यात दिले गेले आणि अशिक्षित लोकांनीही घेतले याचं क्रेडिट मोठं आहे. शब्दाला वजन हवं, ओ द्यायला हाक मारणारा माणूसही तास हवा. कर्जातून बाहेर पडण्यासाठी एका संध्याकाळी यश चोप्रांकडे जाऊन काम मागण्यात त्याला कमीपणा वाटला नाही. कुठल्याही फालतू जाहिराती करतो तो पण त्याला कारण आहे. आर्थिक दुरावस्था कदाचित त्याच्या मनात भीती धरून आहे. खरंतर आता गरज नाही पण आपण त्याला सांगायचं हे चुकीचं आहे. सगळे गुणच असतील तर देवत्व मिळतं, तो माणूस आहे तेच बराय. छोट्या पडद्यावर यायला मोठ्या कलाकारांचा धीर व्हायचा नाही. अतिपरिचयाने किंमत कमी व्हायची भीती असते. हा माणूस या वयात सगळ्यात जास्ती टीआरपी खेचतोय. नाव आल्यावर त्याच्याकडे जाताना माणसं सद्गदीत होतात. त्याला भेटणं, त्याच्यासमोर बसणं, बोलणं, त्याला स्पर्श करणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं, आहे. प्रश्नांची उत्तरं समोर पीसीवर दिसतात पण इतर जे बोलतो ती त्याची बुद्धी आहे, स्क्रिप्टच्या बाहेरचं बोलायला वाचन लागतं, अभ्यास हवा. समोरच्याला न्यूनगंड वाटू नये, दडपण येऊ नये यासाठी त्याची वागण्याची पद्धत बघा. त्याचं कौतुक केल्यावर त्याची होणारी कुचंबणा बघा. नकली नसलेला सभ्यपणा त्याच्यात आहे. त्याची माझी भेट होण्याची सुतराम शक्यता नाही. पण तेच बरंय. शब्दं फुटणार नाही एकतर आणि डोळे भरून येतील त्यामुळे तो धूसर दिसेल.

त्याच्या सुसंस्कृतपणाचा एक फारसा प्रसिद्ध नसलेला किस्सा आहे. खूप वर्ष झाली. प्रसिद्ध गोगटे कुटुंबियांकडून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमधे त्याचा सत्कार झाला होता. कसला तरी पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम होता. सत्कार झाला, भाषणं झाली. सगळ्यांना मंत्रमुग्ध करून तो निघाला. मग मागे मुख्यमंत्री, गोगटे कुटुंबीय व इतर मान्यवर गप्पा मारत उभे होते. उत्सवमूर्ती गेल्यामुळे काही लोक बाहेर गप्पा मारायला आले. बघतात तर काय, तो पार्किंग मधे गाडीला टेकून उभा. एकजण अचंबित होऊन पुढे गेला (ज्यानी मला हा किस्सा सांगितलाय तो). कारण विचारलं, काही राहिलंय का, कुणी येणार आहे का? नाहीतर आत चला, मी थांबतो कुणी येणार असेल तर. त्यानी दिलेलं उत्तर वेड लावणारं  होतं. "नाही, तसं काही नाही, पण मुख्यमंत्री हे राज्याचे प्रथम नागरिक आहेत, त्यांनी गेल्यावर आपण जायचं हा शिष्टाचार आहे. म्हणून थांबलोय." बातमी वा-यासारखी पसरली. मग मुख्यमंत्री गेले मग हा गुणांनी पण उंच असलेला माणूस गेला.  बारा फुटी फ्लेक्स लावून उपयोग नाही अशी उंची गाठण्यासाठी मुळात तेवढं उंच असावं लागतं माणसानी. 'वाहतो ही दुर्वांची जुडी' मधे (चू.भू.दे.घे.) बाळ कोल्हटकर फार सुंदर म्हणून गेले आहेत - "नियतीने उत्कर्षाच्या प्रत्येक क्षणी एक घसरण्याचा क्षण ठेवलेला असतो". उंचीवर पोचलेला माणूस म्हणजे सतत स्लीपर घालून तेल सांडलेल्या जमिनीवरून चालणारा माणूस. एक क्षण पुरतो पतन व्हायला, घसरायला. म्हणून त्याच्याकडे बघून मी एवढंच शिकलोय आणि लक्षात ठेवलंय की 'मान वर हवी ती अजून किती उंची गाठायची आहे ते बघण्याकरता, नाहीतर ठेच आहेच'.

आमची पिढी सगळ्यात नशीबवान. आम्ही लता, आशा, सचिन, द्रविड, मार्शल, रिचर्ड्स, प्राण, आरडी, किशोर पाहिले, ऐकले.  त्याच्यासारखं यश, प्रेम परत कुणाला मिळालं नाही. तुलना करूच नये. आकड्यांवर सिद्ध होणार माणूस तो नव्हे. काळ काय झरझर सरला. तो पंचाहत्तर वर्षांचा झाला. तो अमर नाही, आपणही नाही. पण तो अजरामर आहे. पुढली अनेक शतके थेटरात अंधार होईल, डोअरकीपर दरवाजे लावेल, टायटल्स संपतील आणि मग त्याचा संमोहनाचा खेळ सत्तर एमएमवर चालू होईल. त्याच्या चेह-यावर हलणारी नस, डोळ्यांपाशी होणारी मायक्रो हालचाल, गळ्याशी ताणल्या जाणा-या शिरा, तो अंगावर काटा आणणारा आवाज, कुठल्याही भूमिकेतला तो सुसंस्कृत, अभ्यासपूर्ण वावर असेल. आम्ही कदाचित नसू ते बघायला. पुढच्या पिढ्या बघतील, त्या चकीत होतील. अरे कोण रे हा? म्हणतील, मग त्याला शोधतील आणि हरखून जातील. आम्ही तुला वर्षांनुवर्षे पाहिलं, ऐकलं हे आमचं भाग्यं. तुला निरोगी शंभर वर्ष आयुष्यं लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

पूर्वी सोळा आण्याचा रुपया होता. पूर्ण काम झालं की सोळा आणे काम झालं असं म्हणायची पद्धत होती. एखादा माणूस परिपूर्ण असेल तर त्याला बंदा रुपया म्हटलं जायचं. दशमान पद्धतीत शंभर पैशाचा रुपया झाला. चार आठ आणे तर कधीच वापरातून कमी झाले. वयाचे बारा आणे पूर्ण झाले त्याचे पण तो मुळातच #बंदा रुपया आहे, माणूस म्हणून अभिनेता म्हणून, आदर्श म्हणून. अजून काय बोलू, तुझे ऋणको आहोत आम्ही. 

जयंत विद्वांस

बंदा रुपया...(मराठी विवेक) http://evivek.com//Encyc/2017/10/10/amitabh-bachchan-75th-birthday.aspx

लेखाच्या शेवटी भाषणाची लिंक आहे 'विवेक'च्या कार्यक्रमातल्या, बघाल :)

Amitabh 8

[12/2, 7:48 PM] सतीश वसंतराव मोरे: *अमिताभ बच्चन जन्मदिवस*
(११ ऑक्टोबर १९४२)

*"आज तो बहुत खुश होगे तुम..."* आणि *"मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता।"* 'दीवार'
*"हम जहां से खड़े होते हैं लाइन वहीं से लगती है।"* 'कालिया'
*"यह पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं!"* 'जंजीर'

हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेता. जन्म अलाहाबाद येथे. त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे हिंदी साहित्यातील ख्यातनाम कवी होते. त्यांच्या आईचे नाव तेजी बच्चन. अमिताभ बच्चन यांचे शिक्षण अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण नैनितालच्या शेरवूड महाविद्यालयात झाले आणि त्यानंतर दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कोलकाता येथे एका कंपनीत काम केले.  नंतर चित्रपटात संधी शोधण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या *सात हिंदुस्थानी* (१९६९) या चित्रपटात सर्वप्रथम भूमिका मिळाली. त्यानंतर हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित *आनंद* (१९७१) या चित्रपटात त्यावेळचे लोकप्रिय सुपरस्टार कलाकार राजेश खन्ना यांच्यासमवेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी आनंदमधील भूमिकेचे सोने केले. त्यावर्षीचा सर्वोष्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला. *नमक हराम* (१९७२, दिग्द. हृषीकेश मुखर्जी) या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. त्या पाठोपाठ आलेला जंजीर (१९७३, दिग्द. प्रकाश मेहरा) चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका विशेष गाजली आणि येथूनच त्यांची संतप्त तरुणाची (अंग्री यंग मॅन) प्रतिमा जनमानसात प्रस्थापित झाली. प्रचलित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंडखोरी व क्रोध व्यक्त करणाऱ्या संतप्त युवकाचे प्रतिनिधित्व त्यांनी पडद्यावर आपल्या भूमिकांद्वारे केले. त्यामुळे त्यांच्या भूमिका रसिकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे, भारदस्त घनगंभीर आवाज आणि गहिरी भावगर्भ अभिनयशैली यांमुळे बच्चन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच *'सुपरस्टार'* (अभिनय सम्राट) पदावर पोचले व रूपेरी पडद्यावर जणू अमिताभ युग सुरू झाले. आजतागायत त्यांच्याइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही. बच्चन हे त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. अमिताभ बच्चन चित्रपटात असले म्हणजे चित्रपट आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरणार, असा चित्रपट उद्योगाचा वर्षानुवर्षांचा अनुभव होता. आतापर्यंत त्यांनी सुमारे १६८ चित्रपटांतून भूमिका केल्या असून त्यांचे मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, यश चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर केलेले चित्रपट विशेष गाजले. त्यांच्या यशस्वी, लोकप्रिय चित्रपटांत *अभिमान* (१९७३, दिग्द. हृषिकेश मुखर्जी), *दीवार* (१९७५, दिग्द. यश चोप्रा), *शोले* (१९७५, दिग्द. रमेश सिप्पी), *कभी कभी* (१९७६, दिग्द. यश चोप्रा), *अमर अकबर अँथनी* (१९७६,दिग्द. मनमोहन देसाई), *मुकद्दर का सिकंदर* (१९७८, दिग्द. प्रकाश मेहरा), *त्रिशूल* (१९७८, दिग्द. यश चोप्रा), *डॉन* (१९७८, दिग्द. चंद्रा बारोट), *काला पत्थर* (१९७९, दिग्द. यश चोप्रा), *नसीब* (१९८०, दिग्द. मनमोहन देसाई), *लावारीस* (१९८१, दिग्द. प्रकाश मेहरा), *सिलसिला* (१९८१, दिग्द. यश चोप्रा), *नमक हलाल* (१९८२, दिग्द. प्रकाश मेहरा), *कुली* (१९८३, दिग्द. मनमोहन देसाई), *शराबी* (१९८४, दिग्द. प्रकाश मेहरा), *अग्निपथ* (१९९०, दिग्द. मुकुल आनंद) यांसारख्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल.

बच्चन यांनी १९ चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. मि.नटवरलाल या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. धीरगंभीर, भारदस्त आवाज हे बच्चन यांचे आणखी एक वैशिष्ट्य. आपल्या भारदस्त आवाजाचा वापर त्यांनी भूमिका साकारताना तर केलाच, शिवाय काही चित्रपटांना त्यांनी आपल्या भारदस्त आवाजात पार्श्व-निवेदनही दिले  आहे. त्यांत भुवनशोम (१९६९, दिग्द. मृणाल सेन), शतरंज के खिलाडी (१९७८, दिग्द. सत्यजित रे), लगान (दिग्द. आशुतोष गोवारीकर) आदी चित्रपटांचा उल्लेख करता येईल.

ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार जया बच्चन (भादुरी) या त्यांच्या पत्नी होत. १९७३  मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन व सून ऐश्वर्या राय हेही हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे सुप्रसिद्ध कलावंत होत.

१९८४ मध्ये ते अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे मताधिक्यही विक्रमी ठरले. राजकारणातली त्यांची कारकीर्द मात्र त्यांना मानवली नाही. तीन वर्षांनंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजिनामा दिला. त्यांच्या लोकप्रियतेचे एक उदाहरण म्हणजे, १९८२ साली *कुली* या चित्रपटाच्या चित्रीकरणाप्रसंगी त्यांना अपघात झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली; त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देशभर प्रार्थना, नवस केले व शुभेच्छा दिल्या.

आतापर्यंत त्यांना १४ वेळा *फिल्मफेअर पुरस्कार*, तर दोनवेळा *उत्कृष्ट अभिनया*साठी *राष्ट्रीय पुरस्कार* मिळाले असून, भारत सरकारने त्यांना *पद्मभूषण* व *पद्मविभूषण* या किताबांनी गौरविले आहे. या शिवाय अनेक मानद उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत. विदेशांतही त्यांचे सन्मान झाले आहेत.

त्यांनी १९९६ मध्ये 'ए बी सी एल्' (अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि.) ही चित्रपट निर्मितिसंस्था स्थापन केली होती. आर्थिकनुकसानीमुळे त्यांना ती बंद करावी लागली. २००० मध्ये *'कौन बनेगा करोडपती'* या दूरचित्रवाणीवरील प्रश्नमंजुषा मालिकेने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठच बच्चन यांनी आपल्या निवेदनाने घालून दिला. आजही ही मालिका भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय व वाहिन्यांना सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी मालिका म्हणून ओळखली जाते. प्रारंभी स्टार टीव्हीवर व नंतर सोनी टीव्हीवर ही मालिका आजही सुरू आहे. वाढत्या वयानुसार बच्चन यांनी आपल्या भूमिकांचा बाज बदलला असला, तरी त्यांचा अभिनय उत्तरोत्तर अधिकाधिक परिपक्व होत गेलेला दिसून येतो. *मोहब्बते (२०००), कभी खुशी कभी गम  २००१), बागबान (२००३), ब्लॅक (२००५), सरकारराज (२००८), पा (२००९)* इ. चित्रपटांचा या संदर्भात उल्लेख करता येईल.

अमिताभ बच्चन यांची कारकीर्द अद्यापही चालू असून वयाच्या सत्तरीतही ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत आहेत. त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. 

*सौजन्य : मराठी विश्वकोश*
*संकलन : प्रफुल्ल गायकवाड*
[12/2, 7:48 PM] सतीश वसंतराव मोरे: तू कोण ?
अभिनेता,ॲंग्री यंग मॕन ,बिग बी,
की विजय दिनानाथ चौहान ?
तू फक्त बच्चन आहेस हेच खरं
बच्चन म्हणजे चलचित्र
बच्चन म्हणजे पडद्यावरचा आवाज
बच्चन म्हणजे प्रत्येक तरूण मुलांचे सोनेरी स्वप्न
मुल जशी वयात येतात तीच प्रक्रिया हीरो म्हणून आतमध्ये अपसूकच येते
तुझ्या असण्या दिसण्याने
विविधांगी भूमिका साकारताना तू आमचे प्रतिनिधित्व करत राहतोस
तुझ्यामधे मी असतो
आणि माझ्यामधे तू...

तुझ्यावर कित्येक पिढ्यांनी
ओवाळून टाकला जीव
टूरिंग टॉकीज,व्हिडीओ सेंटर थिएटर,
मल्टिप्लेक्स, यामधे तू वेगवेगळ्या पध्दतीने
पुढे येत गेलास खरा
पण तू प्रत्येकाच्या मनात खोल होत गेलास
हे कळलेच नाही
तुझी प्रतिमा लार्जर द्यान
लाईफ करत रोमारोमात हळूवार भिनलास

माणसानं माणूस असावे
हा साधा संकेत पाळलास तू
हे खरंच आहे की माणूस म्हणून तुम्ही मोठे असला की कोणत्याही क्षेत्रात "बच्चन" होता येत
मी,बच्चन माझा बाप बच्चन,
माझा आजोबा बच्चन
बच्चन होणे सोप आहे
फक्त माणूस बनायला हवं
खरं ना !

लहानपणी फिल्मचा तुकडा  घेऊन
त्यावर दुर्बिण लावून मोठे होता येत नाही
हे कळलेच नाही
दुर्बिणीचे चटके सोसायला "मर्द" असावे लागते
भली मोठी "दिवार" तोडावी लागते,
"कुली" बनून सा-या व्यथा वेदनेचा
भार सोसावा लागतो,
"जंजीर" अशी एका हिसक्यात तुटत नाही
हे कळलेच नाही कित्येकांना
कित्येकांना बच्चन व्हायचे होते ,
पण केवळ बोलबच्चन झाले
तुझ्या हाताच्या रेषा ठळक होत गेल्या
तुझ्या पाऊलखुणा अधिक स्पष्ट होत गेल्या
तू पाहिलस आर-पार
म्हणून तू जिथं उभारतोस
तिथून लाईन सुरू होते ,
कारण बच्चन एकच असतो
आणि
"तो" तू आहेस

। अभिजीत पाटील सांगली ।

Amitabh 7

7 ½ lessons in personal finance from the screen life of of Superstar Amitabh Bachchan on his 75th birthday....🎁🎊🎉

Lessons from his famous dialogues. Do focus on point number 3!

1. *Deewar* – Main aaj bhi phenke hue paise nahin uthata....

Earn money with respect. Even when Amitabh’s role was played by a child artist, he tells Iftikhar, “Mein pheke hue paise nahin uthata, saab.” Later, Amitabh Bachchan reminds him of the incident and repeats the same lines.

Whether he had money or not, he never picked up money that was thrown at him. He respected money and he expected the others to respect labour of anyone.

2. *Kaalia* – Hum jahan khade hotey hain, line wahin se shuru hoti hai

In a famous scene Bachchan speaks these lines in a jail. Now, let us understand very clearly. He is Amitabh Bachchan. He has the right to utter these lines. He is the superstar. How many of us can claim to be even good at investing? None. So we tweak this above dialogue and say “Jahan line hoti hai, hum wahan khade ho jaate hain.” So many investors queue up to buy (or sell) something only because all the others are doing it. We call it herd mentality. This is seen across centuries, across countries and across investment options – we have seen it happening in equity shares, IPOs, real estate, gold, and currently Bitcoins.

Standing is queue may be good in certain situations – man is a social animal, after all. However, in financial markets, those in queue may end up buying costly or selling cheap.

Learn about an investment and take independent decisions. If you cannot, take the help of wise experts.

3. *Satte pe Satta*

Ek dost ki party mein gaya tha, wahan jabardasti chaar baatli pila diya.

Many of us remember this scene for what follows next in the dialogue – “Daaru peeney se liver kharab hota hai”, but we are focusing on the above line for a specific reason.

There are so many instances when the investor says that someone came and sold a product. Well, that may be true, but it is exactly like saying what Amitabh said in the lines mentioned above. While someone may come and offer any product or service, it is our duty to always remember “Caveat Emptor” or “Buyer Beware”. Ask questions till you do not understand the pitch. There is no hurry.

4. *Trishul*

Aaj aap ke paas aap ki saari daulat sahi, sab kuch sahi, lekin maine aap se jyaada garib aaj tak nahin dekha. Good-bye, Mr. R. K. Gupta.

Trishul was an epic battle between a father and the son of his discarded lover. After Sanjeev Kumar strains his relationship with his family and is left alone at his luxurious house, with all his wealth, Amitabh utters the above words.

Wealth is nothing if the family is not with one. After all, what do we earn the wealth for, if that does not make us happy and fulfilled in life?

5. *Laawaris*

Apun woh kutte ki dum hai, jo baara baras nalli ke andar daal ke, nalli tedi hoti, apun seedha nahin hota!

This is superb depiction of human nature. Our experiences have shaped the way we take decisions. It is not just one lifetime, but the cumulative experiences accumulated since the birth of the first humans that we have learnt how various things work and those lessons influence our decisions and actions.

Many of those actions, and biases are reflected in the way we deal with money – sometimes such biases protect us and on other occasions, put us into troubles. Very often, it is our limited abilities that we do not know which lessons to apply when. 'Hum to FD hi karenge'.

6. *Chupke Chupke*

Dr. Parimal Tripathi, played Amitabh Bachchan was asked to pretend to be Dr. Sukumar Sinha in the movie. However, when he went in front of Vasudha, played by Jaya Bachchan, he fell in love and was in two minds: whether to play the role of Sukumar Sinha or that of Parimal Tripathi – his original self in the movie. This confusion lands him into trouble.

In the world of money, a large number of people are confused of their own role – whether they are investors or speculators. While they try to be investors in the beginning, the moment they see Vasudha – be it financial news; or any hot tip; or simply their own emotions of greed, hope or fear – they forget that they are supposed to be investors and start acting like speculators. This gets them into trouble.

7. *Baghbaan*

The whole movie is around an old couple that spent their life and their life’s savings on their kids, only to find in their golden years that the kids were not in a position to help them at all.

Many parents have assigned a lower priority to their own retirement years and spent every bit of saving on education and marriage of their kids. The lesson in the movie is very powerful. You are on your own in your retirement years. Please plan properly.

And now the message # 7 ½:

It is a half message as it is taken from the small screen. This lesson is from the popular game show – Kaun Banega Crorepati.

 As you know, the time allotted for each question is 45 seconds in the beginning. Once you cross the first “padaav”, the time available for each question goes up to 60 seconds. On crossing the second “padaav”, there is no time limit and in the words of Mr. Bachchan, “kaantaben shaant ho jayegi”. This is the *real meaning of wealth – the significance of wealth in life.* As you get wealthy, you should have more time available. If wealth is not releasing your time, you are living a life of bartering life for money – a really bad deal.

Copied from Amit Trivedi's blog

Swanand Kulkarni
www.askinvestments.in

Amitabh 6

१९८२ मधली ही गोष्ट .  मुंबई दूरदर्शनला असताना वरळी  ते माहीम  प्रवास करताना  प्रभादेवी -कॅडेल रोड ला एक फलक लक्ष वेधून घ्यायचा . त्यावर याचं छायाचित्र आणि गेट वेल सून या अर्थाच्या ओळी लिहिलेल्या असत . दिवस बदलला  की आज १५ वा दिवस ,३२ वा दिवस... धावणारी मुंबई  हा बोर्ड वाचून  थबकत असे  आणि मनातल्या  मनात तो लवकर बरा व्हावा  अशी प्रार्थना ही करत होती,अर्थात मी ही त्याला अपवाद नव्हतो .. माझ्या आयुष्यातल्या अनेक संध्याकाळी या अभिनेत्यानं हसीना केल्या आहेत आणि अजूनही  करत आहे मृत्यूशी झगडून हा बाहेर पडला आणि बघता बघता एक दंतकथा बनला ..   

एखादी व्यक्ती फेनॉमिना का होते हे शोधणं  हे नेहेमीच आव्हानात्मक असतं 
कारण यात त्या व्यक्तीचे गुण ,अवगुण ,सामर्थ्यस्थळं ,व्यक्तिमत्व आणि मुख्य म्हणजे त्या व्यक्तीच्या  व्यक्त होण्याच्या अनेक  छटांना समाज कसा आणि किती प्रतिसाद देतो;तो प्रतिक्रयात्मक असतो की तो सातत्यपूर्ण आणि सकारात्मक असतो, असे करताना त्या व्यक्तीला देवत्वाचे गूण चिकटवले जातात, का माणूस म्हणूनच त्याचं मूल्यमापन  झालेलं असत ,होत राहातं  अशा अनेक गोष्टींचा धांडोळा घेतला तर कदाचित आपण यांच्या उत्तराच्या आसपास पोहोचू शकू.
हो याचं मंदिर झालं आहे ,याच्या मूर्तीची नियमित पूजा करणारी भक्तमंडळी आहेत , हा बरा व्हावा म्हणून सिद्दीविनायक मंदिर,मुंबई  ते बडोदा असे  पायी अंतर उलटे चालत जात काटणारे अरविंद पंड्या सारखे भक्त  त्याला लाभले आहेत.  तरीही त्याच्यातला उमदा माणूस ,संवेदनशील नागरिक हा त्याला बहाल केल्या गेलेल्या देवत्वांपेक्षा किती तरी उंच आहे .
त्याला पडद्यावर  पाहिल्यावर पिटातले प्रेक्षक हर्षभरित होतात   आणि बाल्कनीत बसलेले रसिक ही सुखावतात ही सिनेसृष्टीतील क्वचितच घडणारी घटना त्याच्या बाबतीत खूप वेळा घडते.  पण दुसरीकडे हे ही सत्य नाकारता येत नाही की त्याच्या पडेल सिनेमाची संख्या ही लोकप्रिय चित्रपटांपेक्षाही जास्त आहे मग याचा ताळमेळ कसा लावायचा ... ?

काय आहे त्याच्यात जे दुसऱ्यात नाही ? आवाज ... राजकुमार पासून नाना पाटेकर पर्यंत आणि बलराज सहानी पासून अमरीश पुरी पर्यंत  अशी मोठी  यादी देता येईल ज्यांच्याकडे एक आकर्षित करणारा आवाज होता ..
हिरो मटेरियल ला लागणारं देखणेपण ही त्याच्याकडे नाही .....
उंची .. ही त्याची असेट कधीच नव्हती आणि नसेल किंबहुना अनेक व्यक्तिरेखा सादर करताना ती थोडी अडसरच बनली...
त्याच्याकडे आहे एक आत्मविश्वास .. जो त्यांनी कठोर परिश्रमांनी आणि अफाट स्वाध्याय करून कणाकणाने गोळा केला आहे .. तो इतका सूक्ष्म होता की तो आपल्याला चटकन जाणवला नाही पण पाहता पाहता त्या आत्मविश्वासाने त्याला अशा उंचीवर नेवून ठेवले की तिथपर्यंत आपली नजर पोहोचते आहे हे ही समाधान  थोडं नाही असंच आपल्याला वाटत राहतं .

त्याचा  अभिनय पाहणे हा एक देखणा उत्सव असतो .  खरं म्हणजे तो अभिनय करत नाहीच  पडद्यवरची व्यक्तिरेखा  तो  आपल्याला पटेल ,भावेल ,रुचेल अशीच आपल्या पुढ्यात आणून ठेवतो  मग तेव्हा तो त्याच्या आवाजाचे  भांडवल करत नाही, की भूमिका उत्तम समजली आहे अशी वेगळी चमक ही आपल्या डोळ्यातून दाखवत नाही आणि हे त्याचे न दाखवणे हेच त्याला त्या कथासूत्रात त्या भूमिकेच्या गौरीशंकर शिखरावर घेऊन  जाते .
एक इंडस्ट्री  मधला मित्र सांगत असे  हा  सर्वात कमी वेळात डबिंग पूर्ण करणारा हा  कलाकार आहे. (सिनेमात चित्रीकरणाचं वेळेला बोललेले संवाद ओठांच्या हालचाली पाहत पुन्हा ध्वनी मुद्रित करतात आणि हे करताना मूळ ढाच्यात , अवधीत एका फ्रेमचा ही बदल चालत नाही )
मी म्हणलो  अरे  'हे का ते असा संभ्रम नसलेला हा कलाकार आहे',   याला एकच भाषा येते आणि ती आहे सातत्याची भाषा ...

शिवाय याच्या अभिनयात त्याचं वाचन डोकावतं  ,त्याची जगाबद्दलची  असलेली उत्सुकता दिसते ,घरातील बाबूजींचे साहित्यिक  संस्कार , तेजी सारख्या बुद्धिमान आई कडून आलेली एक अश्वस्त करणारी जगण्याची शैली , अपयशाशी अनेकवेळा झालेली गळाभेट ,समोरच्याला गृहीत न धरण्याची एक आदबशीर अभिव्यक्ती आणि त्यातून  खऱ्या आत्मसन्मानाची झालेली जिवलग जवळीक या सगळ्याचा मिळून तयार झालेला अर्क तो गेली ४  तपे आपल्या भूमिकांवर शिंपडत आहे .
अस्तित्वासाठी धडपड ,सुलतानी संकटं ,जीवघेणी आजारपणं,दिवाळखोरी , अब्रू वेशीवर टांगणारे आरोप   यातून ही तो सुखरूप बाहेर पडला  का ,कसा याला ठोस उत्तर नाही पण   यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर .. मग हा थांबला नाही पुढे जात राहिला जिंकत  राहिला... आणि हे  त्याचं लढणं आजही त्याच जिगरीनं सुरु आहे. 
सटवाईनं त्याच्या कपाळावर हे कधीच लिहिलं नव्हतं ते त्यांनी स्वतः कोरलं , ते आता इतक्यात कुणाला या फिल्म इंडस्ट्रीत पुसता  येईल असं वाटत  नाही 'हम जहाँ खडे होते है वहासे  लाईन  शुरु  होती है ' असं  ज्याला कधी सांगावं  लागलं नाही तो हा या फिल्म जगताचा बेताब बादशहा .शहेनशहा अमिताभ ...
'अमृत' या शब्दाला आपल्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानं   .. एक वेगळी  झळाळी  देणारा ...
बहुत सारी शुभकामनाए अमितजी ! - माझे मित्र श्री उल्हास साठे , फलटण ।।

Amitabh 5

Amitabh everywhere....

Amitabh Bachchan is probably one who has touched every aspect of the life through his movies whether through likes n similarity or by opposites.

On his 75th birthday, an attempt with his 75 movies.

See the fun...

Color
Amitabh Bachchan is in Black, he is in Khaakee n then he is in Pink as well

People
he is in Hum n in akela....

Number of occurrence
He is in kabhi kabhi n he is in silsila as well

Family
he is in family, he is in Parvarish n then in Lawaris as well....

Patriotism
he is in Deshpremi n in Faraar....

Freedom
he was in main azaad hoon n he was in Zanjeer, Bandhe haath n also in Geerftaar

Justice
he was in Andha kanoon n also in Adaalat....

Obligation
he was in namak halaal n then in namak haraam....

Profession
he was in saudagar, jaadugar n then in baghban as well....

Mannerism
he was in Zameer n in besharam....

Communication
he was in nishabd n in pukaar....

Power
he was in Shahenshah n in Ghulami...

Magic stories
he was in Aladdin n in Ajooba as well...

God
he was in bhootnath n in God tussi great ho....

Belief in god
he was in khuda gawah n also in naastik....

Taste
he was in cheeni kum n then in garam masala....

Luck
he was in naseeb, he was in sanjog n in mukaddar ka sikandar also...

Freedom fight
he was in Inquilab n in Satyagrah....

Parents
he was in baabul n in Paa....

Self esteem
he was in abhimaan n in shaan....

Senses
he was in aankhen n in jabaan....

Voice
he was in chupke chupke n toofaan....

Promises
he was in Kasme Vaade n in hera pheri as well...

No gender bias
he was in amar akbar anthony n in ganga jamuna sarswati too....

Friendship
He was in Yaaraana, he was in Dostaana as well

Mahabharat
he was in Aaj ka arjun n in Eklavya too....

Achievement
He was in Bemisaal, he was in Mahaan n then he was in Majboor as well

Maths
He was in Teen n then he was in Do aur do paanch as well

Playing cards
He was in Satte pe satta, n then he was in Teen patti as well

Target
he was in Manzil, in Aakhari raasta and then in Deewar as well..

Test
he was in Kasauti n in Lakshya as well ...

Fire
he was in Sholay, he was in Agneepath n he was in Mashaal as well

N finally, Emotions
he was in Krodh, n in Anand as well..

One advantage Amitabh Bachchan, or Big B, has had over others is that he’s forever with the times. For years, he has embodied the classic Indian hero, inventing and reinventing, branding and un-branding himself miraculously as and when the need has presented itself.

Happy Birthday AB..... 😍

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...