फॉलोअर

०६ सप्टेंबर २०१८

दो रास्ते

आयुष्यात अशा काही वाटा असतात,ज्या वाटेकडे जावं लागतं, टाळावं लागतं किंवा जाण्याची आपल्यावर वेळ येते. आपण जेव्हा वाटा निवडतो तेव्हा ती वाट योग्य आहे की अयोग्य आहे याबाबत लगेच काही जण टीका करू लागतात, चर्चा करू लागतात,तुमच्या पायात आडवे येण्याचा प्रयत्न करतात.  मला पहायला मिळालेल्या , भावलेल्या दोन.वाटाबाबत मी आज बोलणार आहे



गेली 20 वर्षे कराड शहरात रहायला आल्यापासून माझे सोमवार पेठेतील घर ते ऑफिस  या मार्गावरून ऑफिसला येताना कामावर जाताना, कुठेही जाताना किंवा परत घरी येताना सकाळच्या वेळी येताना अथवा दुपारी सायंकाळी ऑफिसवरून परत जाताना मी हमखास दोन रस्त्यावरूनच , या वाटेवरूनच घरी परततो, याची कारणेही आहेत. ती  ती कारणे सांगण्याचा मी आज प्रयत्न करत आहे. काहीना हे आवडेल किंवा आवडणार नाही. माझा जाण्याचा येण्याचा दिवसभरातील एक मार्ग निश्चित आहे हा मार्ग थोडासा वेगळा आणि आपणास न पटेल असा पद्धतीचा आहे.

आज हा प्रसंग पाठवण्याची किंवा लिहिण्याची आठवण मला आली कारण काही दिवसांपूर्वी राष्ट्र संत तरुण सागर महाराज यांचे निधन झाले. 2003 मध्ये तरूण सागर महाराज यांचे इस्लामपूर येथे तीन दिवस कडवे प्रवचन येथील जैन बांधवांनी आयोजित केले होते. तरूण सागर महाराज यांचे टीव्हीवरील आणि वृत्तपत्रातील रकान्यांमध्ये व प्रसिद्ध झालेले कडवे विचार ऐकून मी त्यांच्या विचारांकडे थोडाफार आकृष्ट झालो होतो आणि याच भावनेतून मी सहकुटुंब इस्लामपूर येथे तरूण सागर महाराज यांचे प्रवचन यासाठी तीन दिवस गेलो होतो. तरूण सागर महाराज यांचा एक प्रभावी व कडवा असा विचार मला खूप आवडला.

तरूण सागर महाराज म्हणतात, मनुष्य  अतिशय हुशार प्राणी आहे. त्याने विचारपूर्वक मंदिरे गावाच्या मध्यभागी बांधली आहेत आणि त्याहून अधिक विचारपूर्वक स्मशानभूमी गावाच्या बाहेर बांधलेल्या आहेत. गावाच्या मध्यभागी बांधलेल्या मंदिरात तो जाता-येता वेळ मिळेल तेव्हा देव दर्शन घेतो, देवाजवळ भीक मागतो, इच्छा व्यक्त करतो. फक्त संकट आले की देवाचा धावा करतो .हातात संपत्ती आणि प्रसिद्धि आली की तो मौजमजेत गुंग राहतो आणि केवळ दुःख आले की त्याला देवाची आठवण होते. संत कबीर म्हणतात दुखमे स्मरण सब करे ,सुख मे करे ना कोई, जो सुख मे स्मरण करे, दुख कायेको होए . मात्र मनुष्य हे सर्व विसरून जाऊन फक्त दुःखाच्या वेळेतच ईश्वराचे स्मरण करतो. मंदिरात जातो आयुष्यभर मौजमजा करतो पण त्याला आपण कधीतरी मरणार आहोत याचे भान राहत नाही. मृत्युच्या भीतीने किंवा मी मरणारच नाही, मी अमर आहे ,मला काही होतय, मी सर्वांच्या पेक्षा मोठा आहे या अविर्भावात राहतो. मृत्यूकडे दुर्लक्ष करतो. तरूण सागर महाराज पुढे म्हणतात खरे तर मंदिरे गावाच्या बाहेर निवांत ठिकाणी डोंगरावर असली पाहिजेत आणि स्मशानभूमी गावाच्या मध्यभागात असली पाहिजे. असे असेल तर महिन्यातून एकदा दोनदा त्याला गावाच्या मध्यभागी कुणाचेतरी प्रेत जळताना पहावयास मिळेल, कुणाचा तरी मृत्यू झालेला आहे, याची त्याला जाणीव होईल आणि कधीतरी मला या ठिकाणी जायचे आहे, मला मृत्यू येणार आहे याचे भान त्याला राहिल,असे तरूण सागर महाराज म्हणतात .

तरुण सागर महाराजांचा हा विचार जेव्हा मी इस्लामपूर मधील कार्यक्रमात ऐकला तेव्हा मलासुद्धा या विचाराने प्रभावित करून सोडले. बालपण संपते, तरुणपण येतं ,परत प्रौढत्व येतो म्हातारपण येत आणि माणसाचा शेवट होतो.  कधीतरी माझा मृत्यू होणार आहे या जाणीवेतूनच मनुष्य चांगल्या विचारांचा किमान विचार तरी करतो आणि या भावनेतूनच मलासुद्धा कराड मधील मंगळवार पेठेत असलेल्या स्मशानभूमीकडे जाणारा आखरी रास्ता आवडू लागला. रोज घरातून बाहेर पडताना या स्मशानभूमीच्या उताराकडे माझी पावले वळू लागली. ऑफिसला जाण्याची वेळ दहा असल्यामुळे याच दरम्यान या स्मशानभूमीचा आखरी रास्ता वर मला रक्षाविसर्जन विधी अथवा दशक्रिया विधीसाठी येणारे लोक पाहायला मिळू लागले. कधीतरी एकादी अंत्ययात्राही पहायला मिळाली. या लोकांच्याकडे पाहिल्यानंतर मृत्यूचं सत्य मला उलगडलं . जो मृत्यू होऊन निघाला आहे त्यालाही माहिती होतं की त्याचा मृत्यू येणार आहे. मृत्यूच्या या रस्त्यावर जाण्यापूर्वी आपण काहीतरी वेगळं करावं असा विचार येत राहतो. मला एखादी अंत्ययात्रा पाहायला मिळाली की समोरून येणाऱ्या अंत्ययात्रेत मी सहभागी होत नाही. मात्र तिरडीवर बांधलेल्या त्या निर्जीव देहाकडे पाहून माझे हात आपोआप जोडले जातात आणि मनातून प्रार्थना बाहेर पडते. हे ईश्वरा, या व्यक्तीने आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी खूप खस्ता खाल्ल्या असतील .त्याच्या जाण्याने समाजाचे कुटुंबाचे फार मोठे नुकसान झाले आहे. या कुटुंबाच्या दुःखात तर आम्ही सहभागी आहोत. या कुटुंबाला ही व्यक्ती पुन्हा कधी भेटणार नाही. व्यक्ती संपला की त्याची कारकीर्द संपते. या व्यक्तीच्या वारसदाराने त्याचे कर्तृत्व पुढे चालवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी प्रार्थना माझ्या तोंडातून आपोआप बाहेर पडते.  गेल्या आठ ते दहा वर्षात स्मशानभूमीचा हा आखरी रास्ता मला खूप भावतो. अनेकजण म्हणतात समोरून अंत्ययात्रा आलेले चांगले नसतं, अशुभ असतं. माझा अनुभव वेगळा आहे, आनंददायी आहे.  एवढ्या वर्षात या रस्त्यावरून जाताना मला अनेक अंत्ययात्रा पहायला मिळाल्या, रक्षाविसर्जन विधीसाठी जाणारे अनेक लोक पहायला मिळाले. त्यांच्या डोळ्यात एक दुःख पहायला मिळाले आणि या दुःखातूनच मृत्यू अटळ आहे. जिंदगी तो बेवफा हे, एक दिन ठुकरायेगी, मौत मेहबुबा है, अपने साथ लेकर जायेगी, हे माझ्या आवडत्या हिरो अमिताभ बच्चन यांचे मुकंदर का सिकंदर मधील गाणे माझ्या डोळ्यासमोर येते. म्हणूनच हा रस्ता कधी सोडलेला नाही, टाळलेला नाही.

फार वर्षांपूर्वी महाविद्यालयीन काळात एक कादंबरी वाचलेली होती . मला लेखकाचे नाव आठवत नाही मात्र त्या लेखकाने हिंदुस्थानात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एका समाज व्यवस्थेबाबत एक टिप्पणी केली होती. ही टिप्पणी होती कुंटणखाना ,वेश्याव्यवसाय आणि अलीकडच्या काळातील शब्द घ्यायचा तर कॉलगर्ल रेडलाईट येरीया बाबत. ही एक व्यवस्था अनेक वर्षापासून समाजात कार्यरत आहे. सर्वच प्श प्रमुख शहरात असा एक भाग आहे ज्याला वेश्यावस्ती, कुंटणखाना अशा नावाने ओळखले जाते. या भागाकडे कोणीही चांगल्या नजरेने पाहत नाही एक घाणेरडा भाग म्हणून लोक तिकडे पाहतात. त्या गावातील स्थानिक स्वराज संस्थाही या लोकांना चांगल्या नागरी सुविधा कधी पुरवत नाहीत. ही समाजव्यवस्था कुणी सुरू केली आहे ,कधी सुरू केली आहे, ती योग्य आहे का अयोग्य आहे? स्त्रीला  देवी मानणाऱ्या भारतात स्त्रीचा असा व्यवसाय कोणी सुरू केला? याच्या खोलात गेलो तर याची उत्तरे सापडतीलही. मात्र या समाज व्यवस्थेमुळे समाजाचे आरोग्य सुस्थितीत राहिले आहे असे त्या लेखकाने त्याच्या एका लेखात मांडले होते. हे पटवून देताना त्या लेखकाने पुढे असे म्हटले होते, जर ही व्यवस्था नसती तर समाजात रावणरुपी, कंसरुपी,  गिधाडरुपी काही लोक आहेत त्यांनी भर दिवसा स्त्रियांना ओरबाडून खाल्ले असते. ही व्यवस्था असल्यामुळे अशा प्रकारचे वासनांध  आपली वासना शमवण्यासाठी त्या विभागात जातात. पैसे देऊन आपली भूक भागवतात. हेच लोक बाहेर येऊन उच्चभ्रू समाजात मी नाही त्यातला या भावनेत वावरतात.  मात्र या लोकांनी आपली भूक जर अशा वेश्यावस्तीत जाऊन भागवली नसते तर हे तर हे लोक समाजात,  घरात घुसले असते. रस्त्यावर स्त्रियांना त्यांनी ओरबाडून खाल्ले असते, म्हणून ही व्यवस्था योग्य आहे असे त्या लेखकाने मांडले होते. हा विचार मी माझ्या मनात कायम राहिला होता. याबाबत माझ्या सद्गुरु महाविद्यालयातील एका प्राध्यापकांनाही मी प्रश्न चालला होता. त्यांनीही याला दुजोरा दिला होता.  रामायण, महाभारत आर्वाचीन काळापासून समाजात राक्षसरुपी लोक आहेत आणि त्यांची भूक भागवण्यासाठी त्याच लोकांनी अशा प्रकारची व्यवस्था करून ठेवली आहे, असे मला एका प्राध्यापकांनी सांगितले होते. हा विचार मनातून जात नव्हता परंतु अशा प्रकारच्या महिलांना समाजात वाईट नजरेने पाहिले जाते मला पटत नव्हते. ज्या स्त्रिया पुरुषांच्या वासनेसाठी स्वतःला बळी देतात, स्वतःच्या देहाचे लचके तोडण्याचे अधिकार त्या पुरुषाला देतात , त्यांना वाईट का म्हणायचे ? पोटासाठी हा व्यवसाय करणाऱ्या अशा स्त्रिया समाजाचे सुद्धा सरंक्षन करत आहेतच ना ! मग त्यांना वाईट का बोलायचे ,असे मला सतत वाटत होते . 2001 मध्ये जेव्हा मी पुढारी वृत्तपत्रात वार्ताहर घेऊन हजर झालो. माझ्या कार्यालयाच्या पाठीमागे एसटी स्टँड परिसरातच  ही वस्ती आहे. स्टँड परिसरात गिर्‍हाईकाच्या शोधात उभे असलेल्या या स्त्रिया पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना सतत निर्माण होत होती. या स्त्रियांसाठी आपण काही करू शकत नसलो तरी किमान समाजाच्या आरोग्यासाठी स्वतःच्या शरीराचा बळी देणार्‍या या स्त्रियांप्रती कृतज्ञतेचा भाव सतत माझ्या मनात येत राहिला. समोरून अशा प्रकारची महिला आली तर मी अंतकरणापासून तिचे आभार मानत होतो . माऊली , तुझ्यामुळे समाजातील माझ्या बहिणींची आईची अब्रू वाचते आहे, मी तुझा खूप ऋणी आहे अशा प्रकारचे भाव सतत माझ्या मनात येत राहिले .

2008 झाली आम्ही पुढारी कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवले त्यानंतर याच काळात मी सोमवार पेठ रहायला गेलो. मात्र घरी जाताना किंवा कार्यालयात येताना एकदातरी मी या परिसरातून जातो. या वस्तीकडे पाहून कृतज्ञतेचा भाव माझ्या मनात सतत येत राहतो. या स्त्रियांनी फक्त पैसे कमावण्यासाठी हा मार्ग स्वीकारलेला नाही, त्यांनासुद्धा आई-वडील बहिण-भाऊ आहेत. शरीराचा व्यवसाय करून या माऊली कर्नाटकात त्यांच्या आई-वडिलांना पैसे पाठवतात, आई वडिलांची सेवा करतात, याची मला माहिती मिळाली.

लाखो रुपये पगार असणाऱ्या काही मंडळींचे आई-वडील वृद्धाश्रमात आहेत ,ते त्यांना सांभाळत नाहीत. अशी एकीकडे परिस्थिती असताना स्वतःच्या शरीराचा व्यवसाय करून आई-वडिलांचा सांभाळ करणाऱ्या या माऊली कितीतरी पटीने त्या उच्चभ्रू लोकांपेक्षा श्रेष्ठ आहेत, याची मला जाणीव झाली..

आखरी रास्ता हा येणारच असतो, मिळणारच असतो, आपल्याला मृत्यू च्या वाटेला जावे लागणारच आहे, इच्छा असली तरी नसली तरीही ! दुसरीकडे शरीराचा व्यवसाय करणारा हा रस्ता या महिलांनी मनापासून कधी स्वीकारला नसेल, त्यांच्या पण काहीतरी अडचणी असतील.

दो रास्ते  प्रती माझा कृतज्ञतेचा भाव आयुष्यभर राहील.

सतिताभ@
karawadikarad.blogspot.com

०३ सप्टेंबर २०१८

Selfie with Ex CM Ashok Chavan

सेल्फी विथ खासदार अशोक चव्हाण

आज सकाळी हॉटेल पंकज मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकारांसाठी चहापाण्याला निमंत्रण देण्यात आले होते. पत्रकार परिषदेत यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना मी एक प्रश्न विचारला, संघर्ष यात्रा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर भाजप सरकार अपयशी कसे ठरले आहे याच्यावर झोड उठवत आहे. मात्र स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात?  जुन्या काही निष्ठावंत लोकांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेणार आहात का? तुमचे जवळचे मित्र अजूनही काँग्रेसमध्येच आहेत त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये मानाचे स्थान देणार का ?

माझ्या या प्रश्नावर खासदार अशोक चव्हाण यांनी कोण मित्र असा खोचक सवाल मुद्दामहून केला. यावेळी माझ्या पत्रकार मित्रानी विलास काका असे नाव घेताच  काका पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत , त्यांच्याबाबत पृथ्वीराज चव्हाण बाबा हेच निर्णय घेतील असे सांगितले.

उंडाळकरांबाबत खासदार चव्हाण यांना विचारलेल्या प्रश्नाचा रोख त्यांनी चांगलाच ओळखला आणि शेवटी तुमच्या मनात आहे  ते मला माहिती आहे असे म्हणत हसतमुखाने पत्रकार बैठक संपवली

त्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांनी मला जवळ बोलावून घेतले. तुमचा पेपर कोणता , नाव काय नाव काय हे विचारून चौकशी केली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी मला बाजूला घेतले, काय चालले आहे विचारून चौकशी केली. हर्षवर्धन पाटील यांना मी अशोक चव्हाण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी विचारले.  पाटील यांनी अशोक चव्हाण यांना कराडचे हे पत्रकार आहेत त्यांना तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचा आहे असे सांगितल्यानंतर हो माझी त्यांचे आत्ताच ओळख झाली आहे .मोरे पुढारीचे पत्रकार आहेत असे सांगून सेल्फीसाठी पोज दिली. खासदार अशोक चव्हाण यांची एखाद्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवण्याचे खुबी मला आज चांगलीच आवडली.

दरम्यान पुन्हा बाहेर आमचे काही मित्रांनी पुन्हा खासदार अशोक चव्हाण यांच्याशी अनौपचारिकपणे बोलताना उंडाळकर काकांचा विषय काढला. यावेळी हा विषय कसा मिटवायचा , काय मार्ग आहे का,पर्यायी मतदारसंघ आहे का असा प्रतिप्रश्न खा. चव्हाण यांनी पत्रकारांना केला. मतदारसंघ नाही, मात्र विधानपरिषदेचा पर्याय आहे असे पत्रकारांनी सांगितले. काही असो उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण गटांमध्ये समेट ठेवावा अशी खासदार अशोक चव्हाण यांची इच्छा आहे हे तरी यानिमित्ताने दिसून आले.

२९ ऑगस्ट २०१८

Facebook remind me Delhi

फेसबुकने जागवली दिल्लीची आठवण !

आठ वर्षांपूर्वी लोकसभेमध्ये अणुऊर्जा संदर्भात एक बिल सादर करण्यात आले होते. हे बिल सादर करण्या मध्ये तत्कालीन पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली होती. याच कालावधीत दैनिक पुढारी च्या एका महत्त्वपूर्ण कामासाठी संपादक साहेब आदरणीय प्रतापसिंह जाधव यांनी माझी दिल्ली दौऱ्यासाठी पाचारण केले होते.
याची आठवण मला फेसबुकने आज करून दिली.

माननीय संपादक प्रतापसिंह जाधव यांच्यामुळेच मला यावेळी पहिल्यांदाच विमानात बसण्याची संधी मिळाली. विमानात कसे जायचे, कसे बसायचे, तिकीट कसे काढायचे , प्रवेश करायचा याबाबत काहीही माहिती नव्हती. मात्र अचानक एके रात्री साहेबांचा फोन आला तुला तुला उद्याच्या उद्या दिलेल्या जायचे आहे. त्यानंतर साहेबांचे स्वीय सहाय्यक रणजित झेंडे यांनी मेलवर विमानाचे तिकीट पाठवून दिले दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुंबईला जायला निघालो. ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांच्या सोबत मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन पोहोचलो. तानपाठक साहेबांच्या सहकार्यामुळे पहिला विमान प्रवास अगदी सहज झाला. मुंबईतून नऊ वाजता फ्लाईट होते. रात्री अकराच्या सुमारास आम्ही दिल्ली विमानतळावर उतरलो. विमानतळावर उतरल्यापासून पुन्हा विमानतळावर येईपर्यंत काय करायचे, टॅक्सी कुठे पकडायची, दिल्लीतले मुख्य रस्ते कोणते, मेट्रोने प्रवास कसा करायचा याची सर्व माहिती मला तानपाठक यांनी दिली. आमच्या दिल्ली ऑफिसमधील सहकारी रितेश भुयार आणि गिरीश अवघडे यांनी मला सारी दिल्ली फिरून दाखवली.

नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मला लोकसभेत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाहण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत पुढारीने टोमॅटो एफ एम नुकताच सुरू केला होता, या चॅनेल साठी अन उर्जा आणि अणुकरार याचे महत्व या विषयावर नामदार पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घ्यावी आणि ती टप्प्याटप्प्याने टॉवर प्रसारित करावी असा विचार आमचे आमचे युवा प्रबंध कार्यकारी संपादक योगेश प्रतापसिंह जाधव यांनी मांडला.

मी हा विषय तेव्हाचे दिल्लीचे पुढारी चे प्रमुख धर्मानंद कामत यांच्याबरोबर जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्या कानी घातला.  पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या घराशेजारी पृथ्वीराज चव्हाण यांचे शासकीय निवासस्थान होते. या निवासस्थानात जाऊन माननीय बाबांच्या कानावर मी ही कल्पना मांडली. बाबांनी माननीय साहेबांशी चर्चा केली आणि होकार दिला. दोन दिवसांनी माननीय योगेशदादा दिल्लीत पोहचले.

अणुऊर्जा आणि अणुकरार या विषयावर माननीय योगेश दादा, धर्मानंद कामत, श्रीराम जोशी आणि मी नामदार पृथ्वीराज चव्हाण यांची सविस्तर मुलाखत घेतली. ही मुलाखत टोमॅटोसाठी रेकॉर्ड करण्यात आली आणि त्यानंतर प्रसारित झाली या घटनेला आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत .

या कालावधीतच मला नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत अनेक विषयावर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासूनच बाबांचे आणी माझे संबंध दृढ होत गेले.

पुढारीकारांमुळेच हे सर्व शक्य झाहले.

२४ जुलै २०१८

मनोयन

दोन पाऊलं
तुझ्या सोबतची
मज भावून गेली!
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

तुझ्या सोबतचे दोन क्षण,
मला वेडाऊन गेले
मन तव गुंतले
ह्दय धडधडले.!
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

हाय तुझी अदा,
उफ तेरी एक नजर,
धडकन वाढवून गेले !
तुझ्या सोबतचे दोन क्षण
मला वेडाऊन गेले !
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

तु जवळ आहेस,
हे स्वप्नच भासले
दिल खुश झाहले !
तुझ्या सोबतचे दोन क्षण
मला वेडाऊन गेले !
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

तुझा एक कटाक्ष
तुझी चोरटी नजर
बेधुंद करून गेले
तुझ्या सोबतचे दोन क्षण
मला वेडाऊन गेले !
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

@ सतिताभ

२२ जुलै २०१८

प्रेमत्रागा

प्रेमत्रागा

आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !
तुझं माझ्यावर प्रेम आहे का?
हे पण विचारणार नाही !

माझी आठवण काढतेस का?
माझ्या साठी झुरतेस का?
मला मिस करतेस का?
हे पण विचारणार नाही !
आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !

माझी सावली होणार काय ?
माझ्या साठी काय करशील ?
मी तुला का आवडतो ?
हे पण विचारणार नाही !
आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !

तु माझी आहेस ना ?
तुझ्या ह्दयात मला जागा आहे का ?
माझ्यासाठी तुला वेळ आहे का?
हे पण विचारणार नाही !
आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !

किती दिन माझ्यावर प्रेम करणार?
माझ्या साठी काय काय करणार?
माझ्यासाठी किती वेळ वाट पाहणार?
हे पण विचारणार नाही !

आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !

का म्हणू तुला
लव्ह यु ?
जे आहे ते तुला
माहितच आहे !
फक्त मी
म्हणत राहू अन्
तुझ्या लव्ह यु
साठी किती
वाट पाहू ?

@ सतिताभ.

२१ जुलै २०१८

प्रर्जेन्य नक्षत्रे कोणती

⛈🌈⛈⛱⛈🌈⛈
➖➖➖➖➖➖➖
_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

*☑ विज्ञानाचा आधार न घेता शेकडो वर्षांपासून पावसाचे अंदाज आणि ठोकताळे कसे बांधले जातात...??*

*🌀 पर्जन्य नक्षत्रे कोणती..???*

*🌀 पावसाला पडलेली नावे कोणती..??  तरणा पाऊस, म्हातारा पाऊस म्हणजे काय..??*
➖➖➖➖➖➖➖
_*📚

तुम्हाला बिरबल-बादशहाची ती गोष्ट माहीत असेल. एकदा बादशहाने बिरबलाला विचारले की, ‘सत्तावीसातून नऊ गेले तर उरले किती?’

बिरबलाने उत्तर दिले ‘ शून्य!’

बादशहाने हे कसे असे विचारताच बिरबल म्हणाला, ‘सत्तावीस नक्षत्रांपैकी जर जास्त पावसाची मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त ही नक्षत्रे कोरडी गेली, पाऊस पडला नाही तर काहीही उरणार नाही!’ बिरबलाच्या या चतुर उत्तरावर बादशहा खूश झाला.
🔲🔲🔲

*🌀 पर्जन्य नक्षत्रे कोणती..???*

सूर्य ज्यावेळी मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती या नक्षत्रात असतो त्यावेळी आपल्याकडे जास्त पाऊस पडतो. त्यामुळे या नक्षत्रांना ‘पर्जन्य नक्षत्रे’ असे म्हणतात. प्राचीन काळापासून हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश आहे. हिंदुस्थानात बऱ्याचअंशी शेती ही पावसावर अवलंबून असते. त्यामुळे दरवर्षी पाऊस कसा पडणार हे जाणून घेण्याची सर्वांचीच इच्छा असते.
🔲🔲🔲

*◼पावसाचा अंदाज आणि ठोकताळे कसे बांधले जातात....??*

पूर्वी विज्ञान आताच्या इतके प्रगत नव्हते. त्याकाळी अद्ययावत वेधशाळाही नव्हत्या. पावसाविषयी नक्षत्र वाहनांवरून ठोकताळे बसविले जायचे. पर्जन्य नक्षत्रांची वाहने पाहून पावसाविषयी अंदाज केले जायचे. नक्षत्रांचे वाहन ठरविण्याचा नियम असा आहे. सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करील त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्र नक्षत्रापर्यंत नक्षत्रसंख्या मोजावी व त्या संख्येस नऊने भागवावे. जी बाकी राहील तिच्यावरून वाहन जाणावे. शून्य बाकी राहिली तर हत्ती, १-घोडा, २-कोल्हा, ३-बेडूक, ४-मेंढा, ५-मोर, ६-उंदीर, ७-म्हैस, ८-गाढव अशी वाहने ठरविली जातात.

▪घोडा वाहन असता डोंगर-पर्वतावर पाऊस पडेल.
▪कोल्हा व मेंढा वाहन असता पाऊस पडणार नाही.
▪मोर, गाढव व उंदीर वाहन असता कमी पाऊस पडेल.
▪बेडूक, म्हैस व हत्ती वाहन असता खूप पाऊस पडेल असे समजले जाते.

अर्थात यावरून तुमच्या लक्षात येईल की, या नियमाला कोणताही वैज्ञानिक आधार नसतो. हा केवळ ठोकताळाच असतो. कधी तो अंदाज चुकतो तर कधी तो अंदाज बरोबर येतो. पण ही पद्धत शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे.

🔲🔲🔲

*◼पावसालाही पडलेली नावे...*

स्वभावाप्रमाणे एकमेकाला नावे ठेवण्याची माणसाची सवयच आहे. त्याप्रमाणे प्रत्येक नक्षत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावरून पावसालाही नावे ठेवण्यात आलेली आहेत.

*▪तरणा पाऊस -* दरवर्षी सूर्य साधारणतः ५ ते १८ जुलै या काळात पुनर्वसू नक्षत्रात असतो. या काळात साधारणतः सतत मुसळधार पाऊस पडत असतो. म्हणून पुनर्वसूच्या पावसाला ‘तरणा पाऊस’ म्हणतात.
*▪म्हातारा पाऊस -* पुष्य नक्षत्राचा काळ १९ जुलै ते १ ऑगस्ट हा असतो. या कालात पाऊस मध्ये मध्ये थांबत असतो म्हणून पुष्य नक्षत्रात पडणाऱया पावसाला ‘म्हातारा पाऊस’ म्हणतात.
*▪आसळकाचा पाऊस -*
आश्लेषा नक्षत्र २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असते. या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘आसळकाचा पाऊस’ म्हणतात.
*▪सासूंचा/सासवांचा पाऊस -*
सूर्य १६ ते २९ ऑगस्ट मघा नक्षत्रात असतो. या नक्षत्रात मेघगर्जनेसह जोरात पाऊस पडतो म्हणून मघा नक्षत्रात पडणाऱया पावसाला ‘सासूंचा पाऊस’ म्हणतात.
*▪सुनांचा पाऊस -*
३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालात सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात असताना पाऊस शांतपणे पडतो म्हणून या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘सुनांचा पाऊस’ असे म्हणतात.
*▪रब्बीचा पाऊस -* उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील १३ ते २५ सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस रब्बीच्या पिकांना उपयुक्त ठरतो म्हणून या पावसाला ‘रब्बीचा पाऊस’ म्हणतात.
*▪हत्तीचा पाऊस -* २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालात पडणाऱ्या हस्त नक्षत्रातील पावसाला ‘हत्तीचा पाऊस’ म्हणतात.

Astro विशारद दा. कृ. सोमण यांच्या माहितीतुन..

_*📚 ..✒*_
➖➖➖➖➖➖➖
⛈🌈⛈⛱⛈🌈⛈

२७ जून २०१८

पाऊस कसा पडतो

_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

💦🌧⛈💦🌧⛈💦
➖➖➖➖➖➖➖
*☑ नेमका कसा पडतो पाऊस..? ढगांचे प्रकार कोणते...? पावसाचे ढग कोणते...? पावसाचे प्रकार किती...?*
➖➖➖➖➖➖➖

भूप्रुष्ठावरील मोठ्या प्रमाणावरील पाणीसाठ्याची (जसे समूद्राचे पाणी) सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते आणि ती वरती आकाशाकडे जाते . या सततपणे तयार होणाऱ्या वाफेचे ढग बनतात.वाढत्या उंचीप्रमाणे वातावरणातल्या दाबाच्या जास्त- कमी फरकाने हवा एका ठिकाणाहून दुसरीकडे हे ढग घेऊन वाहू लागते. विशिष्ट उंचीवर ती हवा संतृप्त बिंदू (ज्या तापमानाला हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिकतम असते ते तापमान) गाठते . मात्र या बाष्पाचे पून्हा द्रवीकरण होण्यासाठी हवेत पुरेशा संख्येने आर्द्रतेस शोषणारे केंद्रके उपस्थित असावे लागतात तरंच बाष्पाचे जलबिंदूत रूपांतर होते.
🔲🔲🔲

_*◾ढगांचे ढोबळमानाने चार प्रकार आहेत.*_

*◼१) राशीमेघ वा क्युम्युलस (ढिगाप्रमाणे दिसणारे) ढग.-* ह्या ढगांमधे पाणी बाष्प व द्रव रूपात असून पाण्याचे प्रमाण कमी असते. ह्या ढगांची भूपृष्ठापासूनची उंची जास्त नसते. हे सहसा चमकदार पांढर्‍या रंगाचे असतात (‘कापूस पिंजून ठेवलाय जसा’ वाला ढग).
*◼२) वर्षामेघ वा निंबस (पावसाळी) ढग.-* हे ढगही ढिगाप्रमाणे दिसतात आणि त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण खूप अधिक असल्याने काळे दिसतात व जास्त उंचावर नसतात. हे ढग पाऊस देतात._
*◼३) तंतूमेघ वा सिरस (पिंजलेल्या दोर्‍याप्रमाणे वा पिंजारलेल्या केसांप्रमाणे दिसणारे) ढग.-* हे राशीमेघ वा वर्षामेघांपेक्षा अधिक उंचीवर असतात.
*◼४) स्तरीमेघ वा स्ट्रॅटस ढग.-* हे पांढरे असून विरळ चादरीप्रमाणे दिसतात. ह्यातील पाणी हे हिमकणांच्या रूपात असते. हे वातावरणामध्ये बर्‍याच उंचीवर असतात.
🔲🔲🔲
ह्या चार प्रकारातील काही प्रकार मिळून तयार होणारे ढग उपप्रकारात मोडतात. तंतूस्तरमेघ वा सिरोस्ट्रॅटस हा उपप्रकार तंतू व स्तरी प्रकारचे ढग मिळून तयार झालेला असतो.
🔲🔲🔲

*◾ढगांची जाडी :* हवेच्या दाबानूसार ढग सतत फिरत असतात. त्यात जलबिंदू असले तरी ते पाऊसरूपाने जमिनीवर पडतीलच याचा नेम नसतो. साधारणपणे ढगांची जाडी जसजशी वाढत जाते तसतशी त्यांची पर्जन्यक्षमताही वाढते. ३,६५० मी. पेक्षा अधिक जाडी असलेल्या ढगांतून हमखास पाऊस पडतो. ढगात सूक्ष्म जलकणांचे मोठ्या पर्जन्यबिंदूत रूपांतर होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सहजच उपलब्ध असतात त्यापैकी सर्वांत प्रभावी म्हणजे जलबाष्पयुक्त हवेची ऊर्ध्वगती, पाऊस किती पडेल हे यावर बहुतांश अवलंबून असते. अशा प्रकारे दव, धुके, मंद तुषार , अतिवृष्टी , गारा ,हिमवर्षाव असे निसर्ग आविष्कार पहायला मिळतात.
🔲🔲🔲
जेव्हा जलकणांचा व्यास २० ते ४०μ असतो तेव्हा त्यांचा वातावरणातून खाली येण्याचा वेग ०.०१ ते ५.०० सेंमी./से. असतो आणि ते पर्जन्यरूपाने खाली पडूच शकत नाहीत. मंद तुषारांत जलबिंदूचा व्यास ०.२ मिमी. ते ०.५ मिमी. असतो. हे कण साधारणपणे हवेच्या मंद प्रवाहांबरोबर भ्रमण करीत असतात. जेव्हा जलबिंदू व्यास २ ते ६ मिमी आणि त्याचा खाली येण्याचा वेग ७० सेंमी./ से. ते ९ मी./ से. असा असतो तेव्हा पाऊस पडतो. या जलबिंदूचे पाऊस म्हणून रूपांतर होवून जमिनीवर येतानाच्या प्रवासात हवेची उर्ध्व वा आडवी गती याप्रमाणे थेंबांचे आकार कमी-जास्त होतात, त्यांचा पतनवेगही वाढतो वा कमी होतो आणि त्यानुसार थेंब पर्जन्यरूपाने खाली पडू लागतात वा अधःप्रवाह रूपाने दुसऱ्या दिशेने वाहून जातात. काही शीत ढग हिमरेषेपेक्षा म्हणजे वातावरणात ०° से. तापमान असलेल्या पातळीपेक्षा उंच वाढतात. बर्फकणांवर अतिशीत जलबिंदूचे आक्रमण होवून बर्फकणांचे आकारमान वाढून ते बर्फवर्षाव म्हणून खाली पडू लागतात. हि झाली पाऊस पडण्याची प्रक्रिया.... ,
🔲🔲🔲

*◾यानूसार पावसाचे प्रमुख तीन प्रकार केलेले आहेत.*

*🌀१. आरोह किंवा अभिसरण पर्जन्य :* विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर हवा थंड होते. हवेच्या अशा प्रकारे वरच्या दिशेस जाण्याच्या प्रक्रियेला आरोह असे म्हणतात. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते त्यामुळे या हवेचे सांद्रीभवन होऊन जलकणात रूपांतर होऊन पाऊस पडतो. ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते; तसेच क्षितिज समांतर रेषेत ती फारशी होत नाही अशा प्रदेशात या प्रकारचा पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो.

*🌀 २ . प्रतिरोध पर्जन्य -* समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे बाष्पयुक्त वारे मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे अडवले जावून. पर्वताला अनुसरून वरवर जाऊ लागतात. उंचीवरील कमी तापमानामुळे या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि पाऊस पडतो. अडथळ्यामुळे हा पाऊस पडतो म्हणून अशा पावसाला प्रतिरोध पर्जन्य म्हणतात. ज्या दिशेने वारे पर्वताला अनुसरून वरवर जातात, त्या उतारावर पाऊस जास्त पडतो, तर पर्वत ओलांडल्यावर येणाऱ्या भागात वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने व हवेची बाष्पधारण क्षमता वाढल्यामुळे पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. अशा कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात.

*🌀३. आवर्त पर्जन्य -* एखाद्या प्रदेशात आवर्ताची निर्मिती होत असताना आवर्तातील हवा वर जाऊ लागते. हवा वर जात असताना तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो, अशा पर्जन्यास आवर्त पर्जन्य म्हणतात. आवर्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतात ते ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. अशा प्रकारचा पाऊस समशीतोष्ण पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात पडतो. तसेच उष्ण पट्ट्यामध्येदेखील काही प्रमाणात "आवर्त पर्जन्य' पडतो तो वादळी स्वरूपाचा असतो.
🔲🔲🔲
_जगात सर्वांत जास्त भागात वरील तीन प्रकारच्या पावसापैकी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आरोह प्रकारच्या पावसात तशी निश्चितता असते परंतु त्यामानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारांत काही वेळेस अतिवृष्टी, पूर, तर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते._

_
➖➖➖➖➖➖➖
💦🌧⛈💦🌧⛈💦

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...