फॉलोअर

२३ मार्च २०१८

हवामान दिन

⛈💨🌪⛈💨🌪⛈
➖➖➖➖➖➖➖
*☑२३ मार्च जागतिक हवामान दिन (World Meteorological Day)*
➖➖➖➖➖➖➖
_हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र (Meteorology मीटिअरॉलजी) असे म्हणतात. वातावरणातील या घडामोदींचे निरिक्षण करुन त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार निकटच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा होतो._
🔲🔲🔲

*🔺इतिहास.....*

इसवी सन पूर्व सातव्या शतकात बॅबिलॉनमध्ये ढगांच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जात असे दिसून येते.ग्रीस, चीन व भारतात विविध नैसर्गिक निरीक्षणांचा व खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जात असे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील निरिक्षणांनुसार हस्त, मृग नक्षत्राच्या राशीतील स्थानानुसारपाऊस कधी पडणार, याचा अंदाज घेतला जात असे. परंतु हे ठोकताळे दर वेळी अचूक असतील असे घडत नसे. शिवाय ज्योतिषाच्या अभ्यासानुसार त्यात फरकही होण्याची शक्यता असे.
🔲🔲🔲
इ.स. १९२२ मध्ये लुइस फ्राय रिचर्डसन या हवामान शास्त्रज्ञाने अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धती सुचवली. या पध्हतीनुसार निरिक्षणांच्या सांख्यिक विश्लेषणानुसार सारखेपणा शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तविता येऊ लागले. मात्र ही आकडेवारी मोठी असत असे.
🔲🔲🔲

*🔺सद्य स्थिती.....*
संगणकाच्या शोधाने हवामानशास्त्राचा अभ्यास सुकर झाला. हवामान निरीक्षणांचा उपयोग करून, अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धतीने गणिते करून, त्यानुसार अंदाज वर्तविण्याचे काम संगणक करू लागले. या नुसार नकाशेतयार करण्याचे कामही संगणक करू लागले.
🔲🔲🔲

*▪वार्‍याचा वेग मोजण्याचे साधन -*

*🔺अ‍ॅनोमिटर...*
हवामान निरीक्षणासाठी अनेक प्रकारची साधने वापरली जातात. या साधनांच्या मदतीने हवामानविषयक घटनेचे भौगोलिक स्थान, तिची तीव्रता, वेग, प्रकार, तिच्यामुळे होणारे तापमानातील बदल अशा निरीक्षणांची नोंद केली जाते. ही उपकरणे जमीन, समुद्र आणि वातावरण अशी तिन्ही ठिकाणी निरिक्षणासाठी नियुक्त केली जातत.

*🔺जमिनीवरील साधने -*
ही प्रामुख्याने हवामानवेधशाळांमध्ये असतात.

*▪रडार -* ठिकठिकाणी उभारलेले रडार रेडिओलहरींच्यासाहाय्याने विविध प्रकारच्या वृष्टीचा-पाऊस, गारा, बर्फवृष्टीइत्यादींचा अभ्यास करतात. यातील पल्स डॉपलरप्रकारच्या रडारमुळे वाऱ्याचा वेग व दिशा यांची नोंद करता येते.

*▪समुद्राच्या पाण्यावरील साधने -* समुद्राच्या पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या फुग्यांसारख्या तरंगणाऱ्या वस्तूंना बांधलेली उपकरणे पाणी व वारा या दोन्हींच्या वर्तणुकीची नोंद करतात.

*▪वातावरणात सोडली जाणारी साधने -* फुग्यांच्या साहाय्याने पृथ्वीच्या वातावरणात सोडले जाणारे रेडिओ संच तेथील विविध घटकांची निरीक्षणे रेडिओ-लहरींद्वारे पृथ्वीवर पाठवतात. अवकाशात पृथ्वीप्रदक्षिणा करणारे काही मानवनिर्मित उपग्रह खास हवामान निरीक्षणासाठी असतात व बदलांवर लक्ष ठेवून ते बदल कळवत राहतात. या शिवाय चक्रीवादळांचा अभ्यास करण्यासाठी त्या हवामानाच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावरून घिरटय़ा घालत नोंदी करणारी खास विमाने सोडली जातात. ही विमाने म्हणजे एक प्रकारच्या उडत्या हवामान वेधशाळा असतात.
🔲🔲🔲
वरील सर्व प्रकारे केलेल्या निरीक्षणांचा उपयोग हवामान साच्या मध्ये (वेदर मॉडेल्स) करून नजीकच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज वर्तविला जातो.

*▪हवामान साचे.....*
हवामान साचे म्हणजे हवामान कसे बदलेल किंवा वागेल, याची तयार केलेली प्रतिकृती होय. प्रवाही पदार्थाच्या हालचालींविषयी समीकरणे तयार केली जातात. या समीकरणांच्या आधारे विविध स्थितीतील हवामानाचे संगणकीय साचे बनविले जातात.
🔲🔲🔲

*🔺निसर्ग आणि हवामानात सातत्याने होणारा बदल ....*

निसर्गचक्र आता पूर्णपणे पालटले असून वातावरणात कधीही, कोणतेही अनपेक्षित बदल घडून येतात. वातावरणातील बदलाची ही स्थितीत भारतातच नव्हे, तर परदेशातही आहे. म्हणूनच हवामान बदल व पर्यावरण हे विषय जागतिक पातळीवर चर्चिले जात आहेत. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताची कृषी व्यवस्था हवामानातील बदलांवर आधारित आहे. तरीही भारतात हे क्षेत्र कायम दुर्लक्षिले गेले आणि तरुण पिढी हवामान बदलाच्या अभ्यासाकडे वळायला तयार नाही. त्या तुलनेत अमेरिकेत मात्र यातील नवनव्या प्रयोगात तरुण पिढीचा सहभाग अधिक आहे.
🔲🔲🔲
गारपीट, वादळ याचा सामना भारतीयांना करावा लागतो. त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्याचा सामना अमेरिका आणि इतर देशांना करावा लागतो. मात्र, या देशांमध्ये हवामान बदलाचे संकेत वेळोवेळी देणारी आधुनिक यंत्रणा आहे. ही यंत्रणा तयार करणारी पिढी तरुण आहे. भारतात अजूनही हवामानक्षेत्रात जुनीच यंत्रणा वापरली जात आहे. त्यामुळेच हवामानाचे अंदाज चुकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ढग, वारा, गारा, याची स्थिती दर्शविणारे डॉप्लर रडार भारतात आहेत, पण अध्र्याहून अधिक जुने आणि बंदच आहेत. हवामान बदलाच्या कोणत्याही स्थितीला जागतिक तापमान वाढीचे कवच पांघरूण मोकळे होण्याची आणखी एक सवय भारतीय हवामान खात्याला आहे. या सर्व गोष्टींना हवामान खातेच जबाबदार नाही, तर नवनवे प्रयोग करणारी तरुण पिढी या क्षेत्रात नसल्यामुळेसुद्धा हे परिणाम दिसून येत आहेत.
🔲🔲🔲

*🔺‘फारच कमी विद्यापीठात अभ्यासक्रम’*

हवामानाचे क्षेत्र हे संशोधनाचे क्षेत्र आहे आणि भारतात संशोधनाकडे वळणारी तरुण पिढी फार कमी आहे. यासाठी केंद्र सरकारने शिष्यवृत्ती जाहीर केली, पण त्याचाही उपयोग तरुण पिढीला करता आलेला नाही. हवामानाचे क्षेत्र हे दुर्लक्षित असून यातही करिअर असते, हे अजूनही तरुण पिढीला ठावूक नाही.
➖➖➖➖➖➖➖
⛈💨🌪⛈💨🌪⛈

२२ मार्च २०१८

जलदिन

💦🌎💦🌎💦🌎💦
➖➖➖➖➖➖➖
*☑२२ मार्च – जागतिक जल दिन.....*
➖➖➖➖➖➖➖
*_२२ मार्च हा दिवस दर वर्षी जगभर जागतिक जल दिन म्हणून पाळला जातो. पण पाण्याचे महत्त्व कोणाला समजावून सांगायची आवश्यकता आहे का? ते आधीच सर्वांना ठाऊक आहे. पाणी ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे. पण इतर सजीवांत आणि मानवात मोठा फरक हा की, मानव पाण्याचा अपव्यय करतो, गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतो._*
🔲🔲🔲
जागांच्या कमतरतेमुळे जेथे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही तेथे घर बांधणे, शेती करणे, व्यवसाय कारखाने उभारने भाग पडते म्हणून.....
🔺पाण्याचे नियोजन करा,
🔺पाणी काटकसरीने वापरा,
🔺पाणी साठवा,
🔺पाणी जिरवा.
🔲🔲🔲
माणसाला चांगला निवारा नसला तरी तो कसाबसा जगू शकतो. अन्नाशिवाय तो काही दिवस काढू शकतो. पाण्याविना मात्र तो फार वेळ टिकाव धरू शकत नाही. जसे माणसाच्या शरीराला पाणी मिळणे आवश्यक आहे. पाणी हे जीवन आहे..!!!
🔲🔲🔲

*◾भविष्यासाठी पाणी वाचवा.....*

विजेनंतर घरात सर्वाधिक वापरली जाणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पाणी. खरं तर विजेइतकंच पाणीदेखील आपण अतिशय बेजबाबदारपणे वापरत असतो, ज्याची बचत करणं आजच्या काळात अधिक गरजेचं आहे. घरातला पाणीवापर कसा आटोक्यात ठेवता येईल त्यावर प्रकाश टाकूया.
🔲🔲🔲
असं म्हटलं जातं की जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यावरूनच होईल. आता जागतिक युद्धाचं राहू द्यात पण पाण्यावरून गल्ली-मोहल्ल्यात कितीतरी भांडणं होताना आपण रोजच पाहत असतो.
🔲🔲🔲
पाणीटंचाई केवळ ग्रामीण भागातच जाणवते असं नाही तर तिची तीव्रता शहरी भागातदेखील तेवढीच आहे. शहरात फक्त घराघरात हाताशी धो धो पाणी वाहणारे नळ असतात, त्यामुळे ही तीव्रता तेवढय़ा गंभीरतेनं जाणवत नाही एवढंच. पण शहरातही कित्येकदा अचानक बोअरिंग वेलचा पंप बंद पडल्यानंतर किंवा नगरपालिकेनं पाणीकपात जाहीर केल्यावर नळाचंच नव्हे तर आपल्याही तोंडचं पाणी पळतं व त्रेधा उडते. परंतु अशी वेळ येण्यापूर्वीच आपण पाण्याची बचत केली तर चांगलं नाही का..
🔲🔲🔲
घरात आपण दहा टक्के पाण्याचा वापर हा एकटय़ा किचनमध्ये करत असतो. शिवाय कपडे-भांडी धुणं, स्वयंपाक आणि इतर कामांसाठीही करत असतो. त्याव्यतिरिक्त पाणी अंघोळीसाठी, शौचालयात व साठवण्याच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणावर वापरलं जातं. आता हे प्रमाण आपल्याला नियंत्रणात कसं ठेवता येईल ते पाहू.
🔲🔲🔲
पाण्याचा जास्त वापर स्वयंपाकासाठी केला जातो. तिथं पाण्याचा वापर कमी होतो आहे असं वाटलं तरी ते बरेचदा फुकट जात असतं.

🔺भाज्या, तांदूळ, डाळ धुतलेलं पाणी शक्यतो साठवून ठेवावं आणि इतर ठिकाणी वापरात आणावं. उदाहरणार्थ हेच पाणी तुम्ही कुकरमध्ये तळाला घालू शकता.

🔺डिप फ्रिझरमधून वस्तू काही तास आधीच काढून ठेवाव्यात, त्या नॉर्मल तापमानाला आणण्यासाठी पाण्यानं धुऊ नयेत.

🔺अन्नपदार्थ उकडण्यासाठी पाण्याऐवजी शक्यतो वाफेचा वापर करावा.

🔺किचनमधील भाज्यांसारखे पदार्थ किंवा वस्तू धुण्यासाठी एकाच मोठय़ा भांडय़ात पाणी घेऊन त्यातच धुवा, वाहत्या नळाचा वापर करू नका.

🔺आज भरून ठेवलेलं पाणी उद्या फेकून देण्याची चूक कधीही करू नका. साठवणीच्या पाण्याच्या बाबतीतही अनेक जण बेपर्वाईनं वागत असतात. अनेकांच्या घरी एक किंवा दोन पाण्याच्या टाक्या असतात. त्यामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी अशी माणसं पर्वा करत नाहीत. टाकी साफ करायची वेळ येईल तेव्हा शक्यतो पाणी कामांसाठीच वापरून टाकी रिकामी करा, नंतरच ती साफ करायला घ्या.

🔺बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये आपण घरातल्या ७५ टक्के पाण्याचा वापर करतो. यात सर्वाधिक पाणी फुकट जातं ते शॉवरखाली अंघोळ केल्यामुळे किंवा वाहत्या नळाखाली भांडी घासणं, कपडे धुणं या प्रकारांमुळे. त्याऐवजी मोठय़ा टबात आवश्यक तेवढंच पाणी साठवून ही कामं केली तर पाण्याची खूप बचत होईल.

🔺झाडांना पाणी घालताना शक्यतो ऋतुमानानुसार पाण्याची गरज ओळखूनच झाडांना पाणी घालावं. उन्हाळ्यात ठिबक सिंचनाचा वापर करावा.

🔺घरातील नळांची गळती अजिबात होऊ देऊ नये. थेंब थेंब गळणाऱ्या नळातून दिवसाला ३० ते ४० लिटर पाणी वाया जाते याचे भान राखणे महत्त्वाचे आहे. त्वरित उपाययोजना करून ही गळती थांबवावी.

🔺इमारतींच्या गच्चीवर पावसाचे पाणी पडते त्याला वाट करून देऊन ते जमिनीत मुरविले तर पुढचे ६-७ महिने तेच पाणी नलिकाकूप विहिरीतून वापरता येईल. इमारतीची गच्ची ४० मी. ४० मी. असेल तर मुंबईच्या पावसात चार महिन्यांत ३२ लाख लिटर पाणी जमिनीत मुरवता येईल!

🔺दात घासताना किंवा दाढी करताना नळ चालू ठेवू नका. भाज्या किंवा फळे धुताना नळाखाली न धुता जर त्यासाठी परात किंवा भांडय़ाचा वापर केला तर ते पाणी फेकून न देता झाडांसाठी वापरता येईल. इमारतीच्या आवारातील झाडे तेथे वास्तव्य करणाऱ्या सदस्यांनी दत्तक घ्यावीत व त्यासाठी पाण्याचा असा उपयोग करावा. कुकरमधील पाण्याचा वापरदेखील असाच करता येईल. तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी वनस्पतींना पोषक असते म्हणून ते त्यासाठीच वापरा.

🔺पाण्याच्या बाटल्या अर्धवट पिऊन तशाच टाकून देऊ नका. निसर्गाची ती एक मोठी प्रतारणा आपण करीत आहे व म्हणूच तो अक्षम्य गुन्हा आहे. पाणी संपणार नसेल तर आजूबाजूच्या झाडांना घाला व त्यांचा दुवा मिळवा. कपडे धुण्यासाठी धुलाई यंत्र वापरत असाल तर त्याचा वापर पूर्ण क्षमतेनेच करा. आठवडय़ातून दोन-तीन दिवसच त्याचा वापर तारतम्याने केला तर ऊर्जा व पाणी या दोन्हीची चांगली बचत होऊ शकते.

🔺न्हाणीघरातील व स्वयंपाकघरातील पाणी ऑक्सिडेशन करून बागेसाठी व शौचालयाच्या टाक्यांसाठी वापरता येईल. यासाठी तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध आहे.

🔺इमारतींच्या आवारात जर बाग वाढविली असेल तर दिवसा त्यावर एका विशिष्ट जातीचे प्लास्टिक अंथरून पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. अर्थात त्यासाठी सदस्यांना थोडे कष्ट करावे लागतील अथवा माळ्याला उचलून पसे द्यावे लागतील. आवारातील झाडांना ठिबक पद्धतीने (पाण्याच्या बाटलीला छोटेसे छिद्र पाडून) पाणी दिले तर पाण्याची बचत होईल. झाडाच्या बुंध्याजवळ जर नारळाच्या शेंडय़ा किंवा मॉस ठेवले तर पाणी कमी वापरावे लागेल.
🔲🔲🔲
एकूणच वाहत्या नळाखाली काम करणं टाळलंत तर बरीच मोठी पाणीबचत होईल. शेवटी पाण्याची बचत म्हणजे आपल्या भविष्यासाठीचीच बचत या दृष्टीनं आजच पाण्याचा योग्य तितकाच सांभाळून वापर करायला सुरुवात करा.
➖➖➖➖➖➖➖
💦🌎💦🌎💦🌎💦

१५ मार्च २०१८

करवडीचा शिवाजीराव पाटील चहावाला

पहाटे साडेपाच वाजले असतील. गाढ झोपेत होतो.   दादांचा फोन आला, जागा झालो. गावात थोडासा पाऊस पडतोय, विहिरीजवळ सिमेंट उघडं पडलं असेल, लवकर निघ, असं दादांनी सांगितलं. पटकन उठलो, आवरलं, बूलेट बाहेर काढली आणि जायला निघालो नाक्यावर पोहोचलो. सदाशिव गडावर जाण्यासाठी ओळखीचे  काही मित्र भेटले, त्यांनी गडावर येण्याचा आग्रह केला मात्र मला जायचे आहे पाऊस पडत आहे असे सांगुन तेथून निघालो.

आज इतक्या सकाळी सकाळी खूप दिवसांतून  बाहेर पडलो होतो. पहाटे गार वारा वाहात होता.  रस्त्यांवर अनेक जण चालत होते, व्यायामासाठी बाहेर पडले होते.  कृष्णापुल ओलांडला,  गजानन सौसायटी मध्ये आलो. चौपदरीकरणाचे काम झाल्यामुळे कराड ओगलेवाडी दरम्यान वाहतूक सुसह्य झाली आहे.  त्यामुळे वेगाने निघालो,  रेल्वे पुलावर काही वृद्ध लोक व्यायाम करत होते.  काही समोरून चालत येत होते. एका वृद्धाने काठीला रेडियम लावलेले होते, सोबत बॅटरी पण होती. समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईट पडल्यामुळे रेडियम चमकावे, त्याला माणूस दिसावा म्हणून त्या बाबांनी ती काळजी घेतली होती. आता ओगलेवाडी सोडून करवडी रस्त्याला लागलो.  समोरून अनेक वाहने येत होती. करवडीत पोहचलो. ओळखीचे एक भेटले त्यांच्याशी बोलताना  लक्षात आले आज गुरुवार आहे बाजारासाठी जनावरे घेऊन अनेक टेम्पो कराडला निघाले होते.

पावणे सहाच्या दरम्यान मी रानात पोहचलो होतो. अजुनही अंधार होता.  किरकोळ पाऊस  पडून  गेला होता. काही अडचण नव्हती.   बुलेट थेट शेतात विहिरीजवळ नेली लांबूनच पाहिले सिमेंट पोती झाकलेली होती.  गाडी परत वळवली, कराड फलटण रस्त्यावर येऊन थांबलो.  अजूनही दाट अंधार होता समोरून उसतोड बैलगाड्या निघाल्या होत्या. गाडीवान गाडी हाकत होता. बैलगाडीमध्ये गाडी मालकीण मागच्या बाजूस झोपलेली होती. ओळीने जाणाऱ्या या बैलगाड्या, त्यांची कुटुंबे पाहून ऊसतोड कामगारांचं आयुष्य काय असते,  त्यांना किती कष्ट करावे लागतात याचा सहज विचार आला.

पुढे आलो. करवडी स्टॅंडवर टपरीवजा चहाच्या गाड्यावर लाईट चालू होती, भक्तीसंगीताचा आवाज ऐकू आला.  मगाशी येतानाच येतानाच मी लाईट पाहिली होती.  इतक्या सकाळी हॉटेल ते ही करवडीत उघड असेल याचा मी विचार केला नव्हता.  थांबलो आमच्या गावचे शिवाजीराव आनंदराव पाटील यांनी यांचे हे हाँटेल आहे. बुलेट साईटला उभी केल़ी.  इतक्या सकाळी मला पाहून शिवाजीरावांनी आज सकाळी सकाळी इकडे कुठे, असे म्हणून त्यांनी  चौकशी केली.  लगेच किटली मधून चहा भरायला लागले  मात्र मी चहा पीत नसल्याचं सांगून गरम पाणी देण्याची विनंती केली. मग आमच्या गप्पा सुरू झाल्या इतक्या लवकर हाँटेल उघडता असा आश्चर्याने सवाल केल्यानंतर अहो मी तीन वाजताच उघडतो असे त्यांनी सांगितले. 

करवडी गावातील एक माणूस तोही पाटलाच्या घरातला, एसटी स्टॅण्डवर चहाची टपरी वजा हाँटेल काढतो आणि पहाटे तीन वाजता कामाला सुरुवात करतो याचं मला अप्रूप वाटलं.  आमच्यातील पत्रकार जागा झाला चला आता यांची मुलाखत घेऊ असे म्हणून प्रश्नावली सुरू झाली.  शिवाजीराव पाटील यांच्या बोलण्यातून मिळालेली माहिती आणि त्यांच्या कुटुंबाचे कष्ट पाहून मराठी माणूस कुठेही कमी नाही, फक्त त्याने पैसा कमावण्यासाठी कामाची लाज वाटता कामा नये आणि शिवाजीराव पाटील यांनी ती लाज न बाळगता मोठ्या धाडसाने कष्टाने आणि सातत्यपूर्वक काम केल्यामुळेच आज त्यांना चांगले पैसे मिळताहेत, कुटुंब स्थिरस्थावर झालं आहे, याचा आनंद वाटला.

शिवाजीराव पाटील यांचं कुटुंब मध्यमवर्गीय. १० वर्षांपूर्वी त्यांनी कराड मंडईत भाजी विक्रीचा व्यवसाय केला तेव्हापासूनच त्यांना पहाटे काम करायची सवय लागली. चार वाजता उठून  शामराव पाटील भाजी मार्केट मधून भाजीपाला खरेदी करून शिवाजीराव पाटील  सहा सात वाजता मंडईतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा शेजारी भाजीपाला बसायचे. १२ वाजता त्यांचा मुलगा गणेश त्यांच्या मदतीला यायचा. गणेशने भाजीपाला विकत वडिलांना हातभार लावलाच शिवाय एमकॉमचे शिक्षणही पूर्ण केले. पुण्यामध्ये त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली मात्र एक महिना रात्रपाळी आणि एक महिना दिवसपाळी यामुळे नोकरीचा वैताग आला आणि नोकरी सोडून तो गावाकडे आला. दरम्यान शिवाजीरावांनी  करवडीत चहाची टपरी सुरू केली होती.  तो वडिलांना हातभार लावू लागला.  चांगला जम बसला, चहाची टपरी चांगली चालू लागली लागली. रोज मोठी उलाढाल होऊ लागली.  चांगला जम बसला. मिळालेले पैसे वाचवले पाहिजे म्हणून बचत सुरू केली पिग्मी खाते काढले रोज चांगली रक्कम वाचू लागली.

कराड फलटण रस्त्यावर खुप वाहतूक असते. सकाळी सकाळी चहा प्यायला पुसेसावळी पर्यंत एकही हाँटेल सुरू नसते. याचा अंदाज घेऊन शिवाजीराव पाटील यानी तीन वाजताच काम सुरू करतात. पहाटे 3 ते 9 दरम्यान शिवाजीराव टपरीवर काम करतात नऊ वाजता त्यांचा मुलगा मदतीला येतो. दिवसभर त्यांचा मुलगाच काम करतो. पहाटे 3 ते रात्रीं नऊ पर्यंत ही टपरी सुरू असते. मराठी माणूस 15 ते 18 तास काम करतो आणि काम केले तर किती पैसा मिळू शकतो याचा प्रत्यय मला शिवाजीरावांशी बोलताना आला.

नोकरीपेक्षा धंदा किती श्रेष्ठ आहे याचे मूर्तिमंत उदाहरण मला मला पाहायला मिळाले. शिवाजीराजांच्या मुलाने पुण्यात नोकरी केली असती तर आज त्याला चार आकडी  पगार मिळाला असताही मात्र त्याहून अधिक पैसे गावात राहून धंद्याच्या माध्यमातून त्याला मिळत आहेत. गेली अनेक दिवस मराठी माणूस उद्योगात कमी पडतो असे मी ऐकले होते मात्र करवडीच्या शिवाजीराव पाटील यांना पाहून मराठी माणूसही उद्योग चांगला करू शकतो याचा मला अनुभव आला. मराठा समाजाने आरक्षणासाठी मोर्चा काढला होता त्या काळात मराठी माणसाने कोणताही उद्योग करावा असा एक सूर उमटला होता  शिवाजीराव पाटील यानी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली चहावजा टपरी आता चांगली चालत आहे. शिवाजीरावांनी मराठी मुलांसाठी आदर्श आहेत . करवडीच्या आजच्या भेटीत मला एका चांगल्या व्यक्तीला भेटता आले याचा मला आनंद झाला.

ही मुलाखत घेऊन मी परत शेतात आलो. आता उजाडलं होतं. सकाळ सकाळी निसर्गाच्या सानिध्यात बसण्याचा मला अनुभव आला. विहीरी जवळ बसून हे सर्व लिहून काढलं. किती शांतता होती यावेळी.  पक्ष्यांचा चिवचिवाट आणि मोराचा आवाज अशा प्रसन्न वातावरणात मी हे सर्व लिहून काढलं. काय सांगू तुम्हाला किती आनंद मिळाला मला आज!

०३ मार्च २०१८

F1 to F10 keys on keyboard

_*🙇🏻‍♂🔺मनातील प्रश्न..*_

🖥⌨🖥⌨🖥⌨🖥
➖➖➖➖➖➖➖
*☑ कॉम्प्युटर/लॅपटॉप च्या की बोर्ड वरील F1 ते F12 या Functional Keys चा वापर नेमका कसा करावा…???*
➖➖➖➖➖➖➖
_आजकाल प्रत्येक काम आपण कॉम्प्युटर/लॅपटॉप द्वारेच करतो. मग ते कुठल्या मोठ्या कंपनीतील काम असो किंवा एखाद्या छोट्याश्या दुकानातील अकाऊंटिंगच काम. कम्प्युटरने आपले जीवन सोपे केले आहे. या यंत्राचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे की-बोर्ड, ज्याद्वारे आपण हवं ते लिहू शकतो, करू शकतो. पण की-बोर्ड हा काय फक्त लिहिण्याच्याच कामाचा आहे का…? तर नाही. या की-बोर्ड द्वारे आपण अनेक कामे हाताळू शकतो. तुम्ही बघितलं असेल या की बोर्डवर *F1 ते F12 अशी १२ बटणे असतात ज्यांना Functional Keys* म्हणतात, पण आपल्याला या सर्व बटणांचा उपयोग काय आणि त्याचा वापर कसा करायचा हे माहितीये का…??? तर जाणून घ्या त्याचा वापर कसा करायचा..._
🔲🔲🔲

*▪1. F1 –* ही नेहमी हेल्प-की म्हणून वापरली जाते, जेव्हा आपण कम्प्युटर सुरू करतो, तेव्हा आपण ही की दाबल्यानंतर, आपण थेट कम्प्युटरच्या सेटअपमध्ये पोहचतो. जिथे आपण सेटिंग्ज तपासू शकतो तसेच हवे असल्यास त्या सेटिंग्समध्ये बदल करू शकतो.
*▪2. F2 –* ही की विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये फाईलचे नाव बदलण्यासाठी वापरली जाते. तसेच मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण या F-12 की ने त्या फाईलचा प्रिंट प्रीव्ह्यू पाहू शकता.
*▪3. F3 –* विंडोजमध्ये या की चा वापर करून आपण सर्च बॉक्स उघडू शकतो, ज्यामुळे कुठलीही फाईल अथवा फोल्डर आपण सर्च करू शकतो. या व्यतिरिक्त MS-DOS मध्ये ही की प्रेस केल्याने आधी दिलेली कमांड परत टाईप होते.
*▪4. F4 –* माइक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करत असताना ही की प्रेस केल्याने आधी केलेलं काम रिपीट होत, जसे एखादा शब्द पहिले टाईप केलेला असेल तो परत टाईप होईल, तसेच जर एखादा शब्द बोल्ड किंवा अंडरलाईन केला असेल तर तो परत होऊन जाईल.
*▪5. F5 –* या की चा उपयोग आपल्या सर्वांनाच माहित आहे, F-5 या की चा वापर मुख्यकरून कम्प्युटर रिफ्रेश करण्याकरिता केल्या जातो. याव्यतिरिक्त या की ला पावरपॉईंटमध्ये प्रेस केल्यास स्लाईड शो सुरु होतो.
*▪6. F6 –* ही की प्रेस केल्याने विंडोजमध्ये ओपन असलेल्या फोल्डर्सचे कन्टेन्ट दिसतात तसेच, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ओपन असलेले वेगवेगळे डॉक्युमेंट्स एक-एक करून बघण्यासाठी Control+Shift+F6 यांचा उपयोग केला जातो. याव्यतिरिक्त काही लॅपटॉप्समध्ये स्पीकरचा आवाज कमी करण्यासाठी देखील या की चा उपयोग होतो.
*▪7. F7 –* मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये या की ला प्रेस केल्यावर आपण जे काही लिहितो त्याचं स्पेलिंग तसेच व्याकरण तपासलं जातं. Shift + F7 प्रेस केल्याने हायलायटेड केलेल्या शब्दाची शब्दकोश तपासणी केली जाते. याव्यतिरिक्त काही लॅपटॉप्समध्ये स्पीकरचा आवाज वाढविण्यासाठीही या की चा उपयोग होतो.
*▪8. F8 –* मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेक्स्ट ला सिलेक्ट करण्याकरिता या की चा उपयोग केला जातो.
*▪9. F9 –* मायक्रोसॉफ्ट आउटलूकमध्ये ई-मेल सेंड किंवा रिसिव्ह करण्याकरिता या की चा वापर होतो. तर काही लॅपटॉप्समध्ये या की चा उपयोग करून स्क्रीनची ब्राईटनेस कमी करता येते. तसेच मायक्रोसॉफ्ट वर्डमधील डॉक्युमेंट्स रिफ्रेश करण्यासाठीही या की चा वापर होतो.
*▪10. F10 –* कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये काम करत असताना या की ला प्रेस केल्याने मेन्यू ओपन होतो, तसेच Shift+F10 प्रेस केल्याने हे माउसच्या राईट क्लिकचं काम करत. तर काही लॅपटॉप्समध्ये या की चा उपयोग करून स्क्रीनची ब्राईटनेस वाढवता येते.
*▪11. F11 –* इंटरनेट ब्राउजर्समध्ये फुल स्क्रीन व्ह्यू करण्यासाठी या की चा उपयोग केला जातो.
*▪12. F12 –* मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये ही की प्रेस केल्याने Savs As चे ऑप्शन ओपन होते, तसेच Shift+F12 प्रेस केल्याने मायक्रोसॉफ्ट फाईल सेव्ह होऊन जाते.
🔲🔲🔲
तर अश्याप्रकारे या की-बोर्डवरील Functional Keys चा उपयोग होत असतो, या Functional Keys कम्प्युटर किंवा लॅपटॉप हाताळत असताना आपले काम सुकर करण्यासाठी आहेत, त्यामुळे त्यांचा नेमका उपयोग आपल्याला माहिती असायला हवा जेणेकरून आपण आपले काम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात करू शकू…
➖➖➖➖➖➖➖
🖥⌨🖥⌨🖥⌨🖥

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...