➖➖➖➖➖➖➖➖➖
जर तुम्हाला अशी निवांत झोप येत नसेल तर ही चिंतेची बाब असू शकते.शांत व गाढ झोप न येण्यामागे अनेक कारणे असतात.निवांत झोप न लागण्याचे एक प्रमुख कारण तुमची खराब झालेली उशी देखील असू शकते.लक्षात ठेवा पिलो चेंज न केल्यास झोप न लागण्यासोबत तुम्हाला आरोग्याच्या समस्या देखील होऊ शकतात.
🔲🔲🔲
_*🔺आरामदायी झोपेसाठी कशी कराल उशीची निवड ? योग्य वेळी उशी न बदलल्यास काय होते-*_
*▪जुन्या उशीमध्ये धुळीचे कण व जिवाणू असतातात-*
तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्का बसेल की तुमच्या जुन्या उशीमध्ये धुळ व जंतू अाहेत.पण हे खरे आहे की अस्वच्छता,प्रदूषण,घरातील धूळ,स्वयंपाकघरातील काजळी,घरातील पाळीव प्राणांचा वावर या अशा अनेक गोष्टींमुळे तुमची जुनी उशी खराब होऊ शकते.जर तुम्हाला तुमच्या जुन्या उशीमुळे नीट झोप येत नसेल तर प्रथम तुमच्या उशी कव्हरला कोमट पाण्यामध्ये स्वच्छ धुवा.या पिलोच्या कव्हरमध्ये असलेल्या धुळीमुळे तुम्हाला अॅलर्जी होऊ शकते.अश्या उशी कव्हरमधील धुळ श्वासावाटे नाकात गेल्यामुळे तुम्हाला अस्थमाचा देखील त्रास होऊ शकतो.
*▪तुम्हांंला मानदुखी अथवा पाठीचे दुखणे होण्याची शक्यता असते-*
सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या मळक्या व आकार बदलेल्या जुन्या उशीवर झोपलात तर तुम्हाला पाठदुखी, मानदुखीसारख्या वेदनेला सामोरे जावे लागू शकते. अशा अस्वस्थ झोपेमुळे दैनंदिन जीवनात तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. झोपताना तुमच्या मानेला आधाराची गरज असते पण जर तुमच्या जुन्या उशीमुळे मानेला व्यवस्थित आधार मिळाला नाही तर तुमच्या मानेच्या दुखण्यात अधिक वाढ होते.जुनी पिलो तशीच वापरल्यामुळे पुढे मणका व मानेमध्ये मुंग्या येणे किंवा हे अवयव बधीर होण्याची समस्या निर्माण होते. हे नक्की वाचा डाव्या कुशीवर झोपणे का ठरते फायद्याचे ?
*▪जुनी उशी नेमकी कधी बदलावी?*
🔺१.तुम्ही विकत घेतली तशी ती उशी आता दिसते का?
🔺२.उशी मळली अथवा त्याच्यावर धुळ जमा झाली आहे का?
🔺३.उशी डोक्याखाली घेतल्यानंतर अस्वस्थ वाटते का?
🔺४.सकाळी उठल्यावर मान ,पाठ व गुडघे हे अवयव जखडतात का?
🔺५.उशीवरील धुळीमुळे कुबट वास येतो का?
या प्रश्नांची उत्तरे जर होय अशी असतील तर तुमची जुनी उशी बदण्याची वेळ झाली आहे असे समजा.
*▪योग्य उशी कशी निवडाल?*
तुमच्यासाठी योग्य उशी कोणती हे सांगणे तसे कठीण आहे.यासाठी निरानिराळ्या उशीचा वापर करा ज्यामुळे तुमच्या आवडीची व आरामदायक उशी तुम्हाला नक्कीच मिळेल.
यासाठी पहा हे काही उशीचे प्रकार-
*🔺पॉलिस्टर पिलो-*
बाजारात मायक्रोफायबर आणि क्लस्टरफील असलेल्या या पॉलिस्टर पिलो सहज उपलब्ध असतात.या पिलो स्वस्त असल्यानेे सर्वसामान्यांच्या खिशाला परवतात.या पिलो तुम्ही मशीनवॉश करु शकता.त्याचप्रमाणे या पिलो वर्षातून अथवा दोन वर्षातून एकदा बदलणे गरजेचे असते.
*🔺लेटेक्स पिलो-*
फोम कोर आणि ग्रॅन्युलेट फोम या दोन प्रकारात या पिलो उपलब्द असतात.या पिलो खुप आरामदायक असल्यामुळे त्यांच्या वापरामुळे झोप चांगली मिळते.त्याचप्रमाणे लेटेक्स पिलो किमान पंधरा ते वीस वर्ष टिकतात.या पिलो थोड्या महाग असतात मात्र त्यांच्या वापरामुळे डोके व मानेला चांगला आधार मिळू शकतो.
*🔺मेमरी फोम-*
या पिलो वर डोके ठेवल्यास डोके व मानेच्या आकारानुसार त्या पिलोचा आकार बदलतो.तीव्र मानदुुखी अथवा पाठदुखी असणा-या लोकांना या पिलो वापण्याचा सल्ला देण्यात येतो.गर्भवती महिलांनी या पिलोचा वापर करणे योग्य असते.या पिलो देखील पंधरा ते वीस वर्ष टिकतात.
*🔺फेदर पिलो-*
या पिलो महाग असतात.या पॉलिस्टर पिलोपेक्षा अधिक काळ टिकतात.मात्र या पिलोमुळे मानेला योग्य आधार मिळणे कठीण असते.
*🔺वॉटरफ्लो पिलो-*
वॉटरफ्लो पिलो हा पिलोचा एक आधुनिक प्रकार अाहे.या पिलो हायपोअॅलर्जीक असून त्या मऊ असतात.या पिलो मधील वॉटरपाऊचमुळे मानेला योग्य आधार व आराम मिळतो.
*🔺प्रतिबंधनात्मक उपाय-*
जर तुम्हाला तुमची पिलो त्वरीत बदलायची नसेल तर हे जरुर करा.
▪१.दर आठवड्याला उशी हॉट ड्रायर मध्ये ठेवा त्यामुळे त्यांच्यातील जीवजंतूचा नाश होईल
▪२.केस ओले घेऊन उशीवर झोपू नका.
▪३. शक्य असल्यास बेडरुमसाठी dehumidifier खरेदी करा.
▪४.चांगली स्वच्छ उशी निवडा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
😴😴😴😴😴😴😴😴😴