फॉलोअर

०४ मार्च २०१७

लष्कर / सेना नसलेले देश

_*🔺जगाच्या पाठीवर.....*_

*☑असे देश ज्यांच्याकडे....*
*स्वतःचे लष्कर/सेना नाही.......*
➖➖➖➖➖➖➖➖➖
जगाच्या अर्थकारणात आज प्रत्येक देशाचे रक्षा म्हणजे संरक्षण बजेट हा चर्चेचा विषय असतो. कोणत्या देशाने किती बजेट संरक्षणासाठी ठेवले आहे यावरही कांही आडाखे बांधले जात असतात. अमेरिकेचे रक्षा बजेट सर्वाधिक म्हणजे ६१० अब्ज डॉलर्सचे आहे. त्या खालोखाल चीनचे बजेट आहे तर भारताचे संरक्षणासाठीचे बजेट आहे ४१ अब्ज डॉलर्स. मात्र जगाच्या पाठीवर असेही कांही देश आहेत, जेथे लष्कर हा प्रकार नाही. गरज भासली तर हे देश भाड्याने दुसर्या देशांचे सैनिक बोलावतात. अशा देशांची संख्या २२ च्या वर आहे. त्यातील कांही देशांची ही माहिती

*🔺१) कोस्टा रिका....*
मध्य अमेरिकेतील या देशात १९४८ साली राष्ट्रपती निवडणूकीत गडबड होऊन बडखोरांनी हा देश ताब्यात घेतला व १९५३ साली सत्ता स्थापन केली. त्यानंतर येथे १४ वेळा राष्ट्रपती निवडणुका झाल्या मात्र त्या अतिशय शांततेत पार पडल्या. या देशात लष्कर नाही.1948 ला झालेल्या गृह-युद्धानंतर इथून सेना हटवली आहे.

*🔺२)लिंचेनस्टाईन....*
मध्य युरोपातील हा छोटासा देश. त्यानी १९६८ साली स्वतःची सेना भंग केली कारण लष्कराचा खर्च भागविण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती सबळ नव्हती. तेव्हापासून युद्ध होईल अशी शंका आली तर पुन्हा लष्कराची स्थापना करायची असा निर्णय त्यांनी घेतला मात्र अजून तरी तशी वेळ त्यांच्यावर आलेली नाही. हा देश काळ्या पैशांबाबतच्या चर्चेने नेहमीच प्रसिद्धीत असतो.

*🔺३) सामोआ.....*
१९६२ साली न्यूझीलंडच्या गुलामीतून मुक्त झालेल्या या देशाला स्वतःचे सैन्य नाही. मात्र स्वातंत्र्य देतेवेळी न्यूझीलंडने त्यांना गरज असेल तेव्हा सैन्य पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. पश्चिम सामोआ द्विपसमुह पोलेनेशियाचा भाग मानला जातो.

*🔺४)अंडोरा......*
युरोपतील या देशाची स्थापना १२७८ साली झाली आहे. ४६८ चौरस किलोमीटरचा परिसर असलेला हा देश स्की रिसॉर्ट आणि ड्यूटीफ्री दुकानांसाठी प्रसिद्ध आहे. हे करचुकवेगिरी करणार्यांचे नंदनवन म्हटले जाते. स्पेन व फ्रान्सने या देशाला गरज असेल तेव्हा सैनिक पुरविण्याचे आश्वासन दिलेले आहे.

*🔺५)तुवालू.......*
भारत प्रशांत द्विप सहयोग संघटनेतील हा देश २०१४ साली स्थापन झाला आहे.२०१५ मध्ये जयपूर परिषदेत १४ देशांचे संमेलन झाले त्यात या देशाचा समावेश होता. अवघा २६ चौरस किलोमीटरचा हा चिमुकला देश. त्याची लोकसंख्या आहे १० हजार. या देशाला स्वतःचे लष्कर नाही. हा देश कॉमनवेल्थचा सदस्य आहे आणि ब्रिटन प्रमाणे त्यांचे संसदीय राजतंत्र आहे.

*🔺६)व्हेटिकन सिटी.....*
इटलीची राजधानी रोमच्या पोटातच असलेल्या हा स्वतंत्र देश. जगातील सर्वात छोटा देश असून त्याचे क्षेत्रफळ अवघे ०.४४ चौरस किलोमीटर आहे. याची लोकसंख्या आहे केवळ ८४०. कॅथॉलिक चर्चचे मुख्यालय असलेल्या व्हेटीकन सिटीमध्ये पोप आणि चर्चचे अन्य अधिकारी राहतात. येथे स्वतंत्र सेना नाही.

*🔺७)ग्रेनेडा.....*
मोठे बेट अन्य छोटी बेटे असा ३४४ किमीचा परिसर असलेला व १ लाख ५ हजार लोकसंख्येचा हा देश कॅरेबियन व अटलांटिक समुद्राच्या मध्यात आहे. मसाल्यांसाठी जगभर प्रसिद्धी असलेल्या या देशात १९८३ साली सैनिकांची बंडाळी झाली ती अमेरिकेच्या हस्तक्षेपाने विरली. मात्र तेव्हापासून या देशात नेहमीचे सैन्य नाही.

*🔺८) नाऊस.....*
पॅसिफिक महासागरातील एक बेट म्हणजे हा देश. त्याचे क्षेत्रफळ आहे २१.१० किमी व लोकसंख्या आहे १० हजार. हा देश मायक्रोनेशिया बेटाचा भाग असून करारानुसार या बेटाच्या सुरक्षेची जबाबदारी ऑस्ट्रेलियाकडे आहे.

*🔺९) मॉरिशस....*
भारताला जवळचा असलेला हा देश १९६८ पासून नो स्टँडींग आर्मी असलेला देश आहे. सर्व लष्करी, पोलिसी आणि सुरक्षा संबंधी जबाबदार्या पार पाडण्यासाठी १० हजार ड्यूटी पर्सनल येथे नेमले गेले आहेत. त्यातील ८ हजार नॅशनल पोलिस फोर्स मधले असून ते अंतर्गत सुरक्षा व कायदा सुव्यवस्था सांभाळतात. १५०० चा स्पेशल मोबाईल फोर्स व नॅशनल कोस्ट गार्डचे ५०० सदस्य अशी ही सुरक्षा व्यवस्था असून या दलांना अगदी छोटी शस्त्रेच दिली जातात.

*🔺१०) किरीबाटी.......*
या देशाच्या घटनेने फकत पोलिस दलासाठी परवानगी दिली आहे. हे पोलिस दल मेरीटाईम सर्वेलन्स वर लक्ष ठेवून असते. त्यांच्याकडे छोटी शस्त्रे व १ पेट्रोलिंग बोट इतकीच सामग्री आहे. देशाला सैन्य नाही मात्र गरजेनुसार ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड देशांकडून भाड्याने सैनिक पुरविण्याचा करार केला गेला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔲◼🔲◼🔲◼🔲◼🔲

०३ मार्च २०१७

मी आणि माझं, माझ्यासाठी

मी ,माझं, माझ्यासाठी!

नाऊ अफ्टर अॅन्ड देन
सारं पाहिजे फक्त मला
माझं ते मला आणि तुझं बी मला
आहे कुठं वेळ इथं इतरांचा विचार करायला ?

वाढत जाईल माझी संपत्ती
जमीन झुमला घरदार आणि इस्टेट
प्राॅपर्टी वाढविण्यातच मला इंट्रेस्ट
आहे कुठं वेळ इथं इतरांचा विचार करायला ?

सोने शेअर्स इमले गाडी न् स्टेटस
रोज वाढवत जाऊया फक्त असेटस
इंटरेस्ट मिळत जाईल मला कॅशलेस
आहे कुठं वेळ इथं इतरांचा विचार करायला ?

         .......सतीश मोरे

०१ मार्च २०१७

प्रेम हे

1
उगाचच्या रुसव्यांना
एकमेकांना  मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असत.
2
एकमेकाना आठवायला
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असत.
3
न भेटता, न बोलता
एकमेकांना समजून घ्यायला
प्रेम म्हणायचं असतं
4
तो चुकतोय
माहित असूनही सावरायला
प्रेम म्हणायचं असतं
5
सख्या सजणाला
आहे तसा स्वीकारयला
प्रेम म्हणायचं असतं
6
अव्यक्त व्यक्त
न करताही समजायला
प्रेम म्हणायचं असतं
7
सोबत द्यायला
सोबतीला असायला
प्रेम म्हणायचं असतं
8
तु सोबत असलीस की
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही...

आणि मिटिंग सुरू झाली

२७ फेब्रुवारी २०१७

संज्ञा defination कशा तयार होतात

*🔺🙇🏻मनातील प्रश्न...*

*☑ संज्ञा कशा तयार होतात...*
*या बाबतीतला रंजक लेख.....*
➖➖➖➖➖➖➖➖➖
_कोणताही शब्द रुळायला काही वर्षे जावी लागतात आणि तोवर लोकांनी तो सातत्याने वापरात ठेवला पाहिजे. तरीही शब्दकोशातील काही शब्द मागे पडतात आणि मग कालांतराने तो शब्द मागे पडतो._

🔺पदनाम कोश अस्तित्वात आला, तेव्हा लोक हैराण झाले होते. आचार्य अत्रे यांनी तर त्याला ‘पदनाम कोशा’ऐवजी ‘बदनाम कोश’ म्हणून हिणवले होते.
🔺परिभाषा संचालनालयातर्फे शासनाने मराठीत सिद्ध केलेली परिभाषा शालेय पाठ्यपुस्तकात, वर्तमानपत्रात व वक्त्यांनी आपल्या भाषणातही वापरावी, अशी शासनाची सर्वांना विनंती आहे.
🔺बालभारती हे शासनाचेच एक खाते शालेय पाठ्यपुस्तके प्रकाशित करीत असल्याने, पाठ्यपुस्तकात परिभाषा कोशातील शब्द वापरले जात आहेत.
🔺यातील काही संज्ञा वर्तमानपत्रांनी व वक्त्यांनी जरूर उचलल्या आहेत. मात्र, काही अवघड संज्ञा वर्तमानपत्रांनी आणि वक्त्यांनी वापरल्या नाहीत.
🔺उदाहरणार्थ, मोठ्या मेंदूला ‘प्रमस्तिष्क’ आणि छोट्या मेंदूला ‘अनुमस्तिष्क’ म्हणतात. हे शब्द लोकांना अवघड वाटले.
🔺१९६५ च्या सुमारास शासनाने काढलेल्या पदनाम कोशात इंजिनीअरला ‘अभियंता’ हा सुचवलेला शब्द तेव्हा लोकांना अवघड वाटला.
🔺लोक म्हणायचे, ‘अभियंता’ या शब्दापेक्षा सरळ ‘इंजिनीअर’ असेच म्हणा ना. जवळ जवळ १० वर्षांनी मग लोकांनी तो शब्द स्वीकारला. कारण शासनाने तो सातत्याने लावून धरला.
🔺या परिभाषा समितीत इंग्रजीतील संज्ञा मराठीत आणताना चर्चा कशी होते, त्याची काही उदाहरणे मी येथे देतो.
🔺रसायनशास्त्राच्या समितीमध्ये ‘प्लास्टिक’ या शब्दावर चर्चा चालू होती. ‘प्लास्टिक’ हा शब्द विशेषण म्हणून वापरल्यास, त्याला....
▪अ) आकारी म्हणजे आकार देण्यास योग्य असा किंवा
▪आ) घडण सुलभ हे दोन पर्याय निवडण्यात आले, पण नाम म्हणून ‘प्लास्टिक’ हा शब्द रूढ असल्याने तो तसाच ठेवण्यात आला.
🔺दुसरा शब्द क्रोमोग्राफी. क्रोम म्हणजे कलर-वर्ण आणि ग्राफी म्हणजे आलेखन. म्हणून क्रोमोटोग्राफीला वर्णलेखन हा पर्याय घेण्यात आला.
🔺ग्राफचा अर्थ आलेख असा जरी होत असला, तरी या संदर्भात लेखन हा शब्द सुटसुटीत व अर्थाला पुरेसा आहे.
🔺एकदा तो निश्चित झाला की, कॉलम क्रोमोटोग्राफीला स्तंभ वर्ण लेखन, सर्क्युलर पेपर क्रोमोटोग्राफीला चक्रिय कागद वर्णलेखन आणि पार्टिशन क्रोमोटोग्राफीला विभाजन वर्ण लेखन हे शब्द ठरवणे सोपे झाले.
🔺तिसरा शब्द पिगमेंट, डाय आणि कलर. या तिन्हीचा ढोबळ अर्थ रंग असला, तरी शास्त्रीयदृष्ट्या त्यांच्या अर्थछटेत फरक आहे. ते लक्षात घेऊन मग वर्णक, रंजक व रंग असे पर्याय ठरवण्यात आले.
🔺काही वेळी चर्चा रंजक स्वरूपही घेत असे. हा ‘रंजक’ शब्द आणि मघाशी वापरलेला ‘रंजक’ यात फरक आहे.
🔺अनंत काणेकर हे साहित्यिक एका समितीवर असताना, लाउडस्पीकरला मराठी शब्द ठरवायचा होता. ते म्हणाले, ‘समितीत कोणीतरी ‘बोंबल्या’, ‘ओरड्या’ असे शब्द सुचवले, पण ते सभ्य वाटेनात आणि शेवटी ‘ध्वनिवर्धक’ शब्द तयार झाला.’
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔲◼🔲◼🔲◼🔲◼🔲

२४ फेब्रुवारी २०१७

हॅलो हॅल्लो


➖➖➖
_* मनातील प्रश्न....*_

*☑तुम्हाला माहिती आहे का, फोन आल्यावर आपण सर्वजण Hello का म्हणतो;फोन रिसिव्ह केल्यानंतर ‘हॅल्लो’ बोलण्यामागील एक रोमांचक इतिहास...*
➖➖➖➖➖➖➖➖➖
_मोबाईल फोन आणि टेलिफोन आपण सर्वचजण वापरतो. फोन आल्यानंतर आपल्या तोंडातून सर्वात आधी उच्चारला जाणारा शब्द म्हणजे ‘हॅल्लो’. फोनचा वापर करण्यापूर्वी आपणही इतरांना फोनवर हॅल्लो बोलताना पाहिलेलं किंवा ऐकलेलं असतं त्यामुळे अनेकांनी फोन आल्यावर हॅल्लो या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली. तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही सांगाल कि आमचे पप्पा म्हणतात म्हणून मी पण म्हणतो... मात्र, तुम्हाला माहिती आहे का की, फोन रिसिव्ह झाल्यावर किंवा केल्यावर ‘हॅल्लो’ का म्हणतात?  माहिती नाहीये ना?...._

फोन रिसिव्ह केल्यानंतर ‘हॅल्लो’ बोलण्यामागे एक रोमांचक इतिहास आहे. याबाबत कदाचितच कुणाला माहिती असेल. हॅल्लो हा शब्द जर्मन शब्द ‘होला’ पासून बनला आहे. ‘होला’ या शब्दाचा अर्थ आहे ‘कसे आहात’. १३ व्या शतकानंतर हा शब्द हालो (Hallow) बनला. यानंतर २०० वर्षांनी हा शब्द हालू (Halloo) बनला.

१८७६ मध्ये टेलिफोनचे जनक अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. सुरुवातीला लोक Are you there ? असे म्हणायचे...

ग्रॅहम बेल यांची गर्लफ्रेंडचं नाव मारग्रेट हैलो असे होते. सर्वात आधी त्यांनी एक-सारखे दोन फोन्स बनविले. यापैकी एक फोन आपली गर्लफ्रेंडला दिला. यानंतर ग्रॅहम बेल यांनी तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर सर्वात आधी आपल्या गर्लफ्रेंडला फोन केला आणि प्रेमाने ‘हैलो’ असे म्हटले.

यानंतर ज्यावेळी ते आपल्या गर्लफ्रेंडला फोन करत होते त्यावेळी ते ‘Hello’ बोलत असतं. यामुळे तेव्हापासून सर्वांनी ‘Hello’ या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याकाळात टेलिफोन एक्सचेंजमध्ये काम करणा-या महिला ऑपरेटर्सला ‘हॅल्लो गर्ल्स’ असे म्हटले जात असे.
➖➖➖➖➖➖➖➖➖


१६ फेब्रुवारी २०१७

लाईव्ह टेलिकास्ट कसे होते?

📡📺📡📺📡📺📡📺📡
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙇🏻मनातील प्रश्न...

☑Live Telecast करण्यामागचं
तंत्रज्ञान “कसं” असतं?
➖➖➖➖➖➖➖➖➖
टीव्हीवर घरी बसून एखादा कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची जी सोय उपलब्ध झाली आहे ती मनुष्य जीवनातील सर्वात उपयुक्त शोधांपैकी एक मानली गेली पाहिजे. अहो या लाईव्ह प्रक्षेपणामुळे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी घडत असलेली गोष्ट थेट घर बसल्या पाहायला मिळते. मग तो क्रिकेटचा सामना असो किंवा बातम्यांच्या वाहिन्यांवर सुरु असलेला लाईव्ह रिपोर्ट असो, जास्त कष्ट न घेतना आपल्याला जे पाहायचं आहे ते आपल्या समोर सादर केलं जातं. अश्या या लाईव्ह टेलिकास्टच्या नाविन्यपूर्ण शोधाचं तुम्हाला देखील कुतूहल असणारच!
🔲🔲🔲

🔺लाईव्ह टेलिकास्ट कसं काम करतं?

दुसरीकडे सुरु असणारी गोष्ट नेमकी त्याच क्षणी आपल्याला टीव्हीवर कशी काय दिसते? ही गोष्ट कोणत्या माध्यमातून सक्रिय होते? जाणून घेऊया लाईव्ह टेलिकास्ट शोधाबद्दल इत्यंभूत माहिती!
🔲🔲🔲
लाईव्ह टेलिकास्ट काम करतं खास उपग्रहांच्या (Satellites) माध्यमातून! जगाच्या एका कोपऱ्यातून संपूर्ण जगभर दृश्य रुपात संवाद साधण्यासाठी या खास उपग्रहांची निर्मिती करण्यात आली आहे. हे उपग्रह प्रत्येक देशाच्या अवकाश संशोधन केंद्रांमार्फत आकाशात सोडले जातात. या उपग्रहांमार्फत लाईव्ह टेलिकास्टचं सगळं कार्य नियंत्रित करण्यात येतं.
🔲🔲🔲
जगामध्ये कुठेही एखादी घटना घडली की त्याच कॅमे-याद्वारे शुटींग करून त्या कॅमे-याला जोडलेल्या खास सिस्टमद्वारे हे संदेश संबंधित उपग्रहापर्यंत विशिष्ट कोड लँग्वेजमध्ये लहरींच्या स्वरूपात पाठवले जातात. त्यानंतर आकाशात फिरत असलेले उपग्रह पृथ्वीवरून आलेल्या कोड लँग्वेज लहरींच्या स्वरूपातील संदेश दुस-या ठिकाणच्या अ‍ॅन्टिनाकडे परावर्तित करतात. या अ‍ॅन्टिनामध्ये या संदेशाचं वाचन करणा-यासाठी खास प्रणाली बसवलेली असते.
🔲🔲🔲
या यंत्रणेद्वारे कॅमे-याने चित्रित केलेली दृश्यं मशिनमध्ये सेव्ह झाली की त्याचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू होतं. उपग्रहांकडे पाठवले जाणारे संदेश आणि टेलिव्हिजनवर दिसणाऱ्या दृश्यांमध्ये काही सेकंदांचा फरक पडतो. याच तंत्रज्ञानामुळे आपल्याला दररोजच्या बातम्यांपासून ते खेळांच्या सामन्यापर्यंतचे सर्व कार्यक्रम थेट आपल्या घरी बसून पाहायला मिळतात.
🔲🔲🔲

🔺सुलभ कम्युनिकेशनसाठी लाईव्ह टेलिकास्टचा उपयोह इतरही अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो.

जसे की अतिशय खोल समुद्रात टेहळणीसाठी तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या नौकांशी आणि पाण्याखाली असलेल्या पाणबुडयांमधील सैनिकांसोबत संवाद साधण्यासाठी लाईव्ह टेलिकास्ट सॅटेलाईट कम्युनिकेश सिस्टमचाचं वापर होतो. दररोज ऐकायला येणा-या रेडिओवर प्रसारित होणारे कार्यक्रम देखील याच उपग्रहांची देणं आहेत. सध्या बहुतांश घरांमध्ये पाहायला मिळणाऱ्या डायरेक्ट टू होम म्हणजेच डिश टी.व्ही.द्वारे वाहिन्यांची सेवा पुरवणा-या कंपन्या देखील लाइव्ह टेलिकास्ट करणा-या उपग्रहांचाचं वापर करतात. २१ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट शोधांपैकी एक शोध म्हणून लाईव्ह टेलिकास्टकडे पाहिले जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📡📺📡📺📡📺📡📺📡

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...