_*🔺🙇🏻♂ मनातील प्रश्न...*_
🏦💰🏦💰🏦💰🏦
➖➖➖➖➖➖➖
*☑ सीबील/CIBIL आर्थात (क्रेडिट ब्युरो) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड (Credit Information Bureau India Limited) किंवा सिबिल (CIBIL)*
*☑ सिबिल (CIBIL) काय आहे आणि त्याचा कर्जाशी काय संबंध आहे?.....*
➖➖➖➖➖➖➖
एखाद्या बँकेकडून जेव्हा आपण कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा कर्ज द्यायचे की नाही हा निर्णय घेण्यासाठी बँकेला आपल्याबद्दल काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतात.
▪१) तुमचे सध्याचे उत्पन्न किती आहे?
▪२) तुमच्यावर सध्या कुठले कर्ज आहे का आणि असेल तर किती आहे?
▪३) यापूर्वी तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर तुम्ही त्याची परतफेड वेळेवर केली होती का?
बँकेला पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळणे सोपे आहे. तुम्ही बँकेला तुमच्या उत्पनाचे कागद दिले (सॅलरी स्लिप, इनकम टॅक्स रिटर्न) की बँक खात्रीने तुमच्या सध्याच्या उत्पन्नावर तुम्हाला जास्तीत जास्त किती कर्ज देता येईल ते ठरवू शकते.
🔲🔲🔲
पण तुमच्यावर सध्या कुठले कर्ज आहे का हे किंवा यापृवी घेतलेल्या कर्जाची तुम्ही वेळेत परतफेड केली होती का हे जाणून घेण्यासाठी बँकेला जो कर्ज घेतोय त्याने दिलेल्या माहितीवर विसंबून रहावे लागू शकते. बँकेला यात जोखीम आहे कारण कर्ज मागणाऱ्याने दिलेली माहिती नेहमीच खरी असेल याची हमी नाही.
🔲🔲🔲
जसे उत्पन्न दर्शविण्यासाठी स्वतंत्र कागदपत्रे असतात तसेच जर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तराची माहिती देण्यासाठी एखादी स्वतंत्र संस्था असती तर बँकांसाठी चांगले झाले असते. ह्या विचारातूनच २००५ साली एक कायदा पारित करण्यात आला. त्या कायद्याने कर्जाची माहिती गोळा करणाऱ्या कंपन्यांना, ज्यांना क्रेडिट ब्युरो (Credit Bureau) असेही म्हणतात, सक्षम केले गेले आणि त्यांना अधिकार देण्यात आले कि त्या विविध बँका आणि वित्तीय संस्थांकडून माहिती गोळा करू शकतात. अशीच कर्जाची माहिती गोळा करणारी एक कंपनी (क्रेडिट ब्युरो) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड (Credit Information Bureau (India) Limited) किंवा सिबिल (CIBIL).
🔲🔲🔲
सिबिल भारतातील अग्रगण्य बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून सर्वसामान्य व्यक्तींच्या कर्ज आणि क्रेडिट कार्ड बद्दल माहिती गोळा करते. नंतर ही माहिती सिबिल क्रेडिट अहवालाच्या स्वरूपात सादर करते, ज्यास सिबिल क्रेडिट रिपोर्ट किंवा क्रेडिट इन्फॉर्मशन रिपोर्ट (सीआयआर) देखील म्हणतात.
🔲🔲🔲
ह्या माहितीच्या आधारे सिबिल एक आकडा बनवते ज्याला सिबिल स्कोर (CIBIL Score) म्हणतात. सिबिल स्कोर व्यक्तीच्या कर्ज विषयक व्यवहारांची माहिती वापरून बनवलेला असतो. पुढे हाच सिबिल स्कोर बँका एखाद्या व्यक्तीला कर्ज देतांना विचारात घेतात. सिबिल स्कोर चांगला असेल तर बँका कर्ज द्यायला तयार होतात आणि सिबिल स्कोर जर चांगला नसेल तर बँक एकतर कर्ज नाकारू शकतात किंवा कर्ज दिलेच तर नेहमीपेक्षा जास्त व्याज दर आकारू शकतात.
🔲🔲🔲
सिबिल स्कोर कर्जाच्या अर्ज प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. अर्जदाराने अर्ज भरून बँकेला दिल्यावर बँक प्रथम अर्जदाराचे सिबिल स्कोर आणि क्रेडिट रिपोर्ट तपासते. जर सिबिल स्कोर कमी असेल तर बँक त्या अर्जावर विचार करायच्या आधीच त्यास त्यास नकार देऊ शकते. जर सिबिल स्कोर जास्त असेल तर बँक अर्जावर लक्ष देतील आणि अन्य तपशील विचारात घेऊन अर्जदार कर्ज देण्यायोग्य आहे का नाही हे ठरवतील. बँकेसाठी सिबिल स्कोर ही अर्जदाराची पहिली ओळख असल्या सारखे असते, जितका जास्त स्कोर, तितकी कर्ज मिळण्याची शक्यता जास्त .
🔲🔲🔲
क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणजेच सिबिल ही काही एकच कर्जाची माहिती गोळा करणारी कंपनी नव्हे. तिच्या सारख्याच आणखी ३ कंपन्या आपल्या देशात कार्यरत आहेत जसेकी एक्विफॅक्स (Equifax), एक्स्पेरियन (Experian) आणि हायमार्क (Highmark). त्यांचेही सिबिल सारखेच स्वतःचे क्रेडिट स्कोर आहेत.
🔲🔲🔲
*◾क्रेडिट रिपोर्ट मध्ये काय असते?*
कर्ज घेतल्यावर तुमच्या कर्ज खात्यात जे काही घडले असेल त्यापैकी बहुतांश माहिती ही क्रेडिट रिपोर्ट मध्ये दिलेली असते.
जसेकी –
तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि तुम्ही घेतलेल्या गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज या व अशा इतर कर्जाबरोबर क्रेडिट कार्डा ची माहिती दिलेली असते.पूर्वी घेतलेल्या प्रत्येक कर्जाचा प्रकार, कर्जाची रक्कम, परतफेडीची माहिती यामध्ये दिलेली असते.एखादे कर्ज तुम्ही फेडले नसेल तर तेही नमूद केले असते.बँकांशी कधी कर्जफेडीबाबत भांडण / तंटा झाला असेल आणि त्यामुळे कर्जखाते बंद केले असेल तर त्या कर्जसमोर ‘सेटल्ड’ (Settled) असे लिहिलेले असते.तुम्ही कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असेल पण कर्ज घेतले नसेल तर त्याचीही नोंद यात केली जाते.सध्या चालू असलेल्या कर्जाच्या बाबतीत किती कर्ज फेडणे अद्याप शिल्लक आहे तेदेखील यात सांगितलेले असते.मागील ३६ महिन्याचा परतफेडीचा इतिहास प्रत्येक कर्जाच्या बाबतीत सांगितला जातो.तुमच्या क्रेडिट कार्डाची माहिती जसेकी प्रत्येक क्रेडिट कार्डांची क्रेडिट मर्यादा आणि कॅश मर्यादा नमूद केलेली असते.कर्जाचे व क्रेडिट कार्डाचे हप्ते वेळच्यावेळी भरले जातात का ही बाबही ३६ महिन्यांच्या परतफेडीच्या इतिहासाकडे बघून कळते.
🔲🔲🔲
आणि ह्या सर्व मापदंडांचा उपयोग करून बनवलेला सिबिल स्कोर क्रेडिट रिपोर्ट मध्ये दिलेला असतो.
🔲🔲🔲
*◾चांगला सिबिल स्कोर म्हणजे किती?*
सिबिल स्कोर कमीत कमी ३०० आणि जास्तीत जास्त ९०० एवढा असू शकतो. सिबिल स्कोर ९०० च्या जेवढा जवळ असेल तेवढा चांगला आणि बँका तेवढे तुमच्या कर्ज परतफेडण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवतील. सामान्यतः ७५० पेक्षा जास्तचा सिबिल स्कोर हा चांगला समजाला जातो.
🔲🔲🔲
*_सिबिलच्या संकेतस्थळावर (www.cibil.com) वर पैसे भरून तुम्ही स्वतःचा क्रेडिट रिपोर्ट आणि सिबिल स्कोर बघू शकतो._*
🔲🔲🔲
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिबिल स्कोर चांगला आहे म्हणून कर्ज मिळेलच ह्याची कुठलीही हमी नाही. शेवटी कर्ज देण्याचा निर्णय हा पूर्णपणे बँकेवर अवलंबून असतो.
🔲🔲🔲
सिबिल स्कोर हा जसे व्यक्तीच्या क्रेडिट रिपोर्टला थोडक्यात आकड्याच्या स्वरूपात दर्शवतो तसेच सिबिल जेव्हा एखाद्या कंपनीच्या क्रेडिट रिपोर्ट ला आकड्याच्या स्वरूपात दर्शवते तेव्हा त्याला सिबिल रँक (CIBIL Rank) असे म्हणतात. सिबिल रँक १ ते १० मध्ये असतो, जेथे १ हा सर्वोत्तम रँक असतो. सिबिल रँक फक्त अशाच कंपन्यांना प्रदान केला जातो ज्यांच्यावरील कर्ज हे १० लाख रुपयांपासून १० कोटी रुपयांपर्यंत असते.
➖➖➖➖➖➖➖
🏦💰🏦💰🏦💰🏦
