फॉलोअर

०३ मार्च २०२६

ग्रहण लागलं आहे चंद्राला आणि नात्याला

चंद्रग्रहण विशेष 🌙 

सखी...

इथं 
धरतीवर ग्रहण लागलं आहे
बुद्धीला आणि नात्यालाही...
शब्द जिवंत आहेत पण
भावना मात्र हरवल्यात...

आतमध्ये कुठंतरी
खोलवर खंडग्रास ,
प्रकाश दिसतो बाहेरून
आत मात्र खोल अंधार..

तिथं,
नभात ग्रहण लागलंय चंद्राला,
तो चंद्र खुप सोसतोय—
त्यालाही त्रास होतोय...

क्षणभर काळी सावली येते,
प्रकाश त्याचा झाकून टाकते;
पण चंद्र हार मानत नाही,
तो पुन्हा तेजानं उजळतो रात्रीला...!

आपल्या मनालाही कधीतरी
अशाच सावल्या कवेत घेतात,
संशयांचे ढग दाटून येतात
आणि नात्यांवर काळी रेष ओढतात.

सखी,
पण लक्षात ठेव—
ग्रहण कायमचं नसतं,
ते फक्त थोडा काळ असतं;
सावली सरली की
प्रकाश पुन्हा उमलतो.

चंद्रासारखंच आपणही
थोडं सहन करायचं, 
थोडं समजून घ्यायचं;
कारण प्रत्येक अंधारानंतर
उजेड तिथं वाट पाहत असतो..
उजेड तिथं वाट पाहत असतो....!

@सतिताभ
०२.०२.२०२६
चंद्रग्रहण विशेष 
हॉटेल निवांत सातारा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...