*☑ फायनान्शियल प्लांनिंग का व कसे करावे ?*
➖➖➖➖➖➖➖
आयुष्यात आपण प्रत्येक गोष्टीचे प्लांनिंग करतो ,शिक्षण कसे आणि कुठे करायचे , लग्न कधी करायचे अगदी रिटायर कधी होणार याचे देखील आपले प्लांनिंग असते . पण आपण काहीच व कधीच आपल्या पैश्याचे प्लांनिंग करत नाही कारण याची आपल्याला गरज वाटत नाही किंवा कोणी सांगितले नाही किंवा आपणास माहिती नाही ,पण सगळ्यात जास्त गरज आपल्याला पैशाचे प्लांनिंग कसे करावे किंवा फायनान्शियल प्लांनिंग कसे करावे याचे आहे .
🔲🔲🔲
दैनंदिन गरज आपण लक्षात घेऊन आपले प्लॅनिंग आपण करतो , महिना भर चा किराणा भरताना आपण प्लॅन करतो पण आपल्या आयुष्यात लागणाऱ्या गोष्टी आपण प्लॅन करत नाही . उदाहरण : मुलांचे शिक्षण किंवा त्यांना मेडिकल / अभियंता / वकील /डॉक्टर बनवायचे असेल तर काय प्लान करायचा .
🔲🔲🔲
फायनान्शियल प्लांनिंग का ?
जर आपली नोकरी गेली तर काय ?
कायमचे आजारी पडलो तर काय ?
अचानक खुप पैसे मेडिकल साठी लागले तर काय ?
मुलाच्या ऍडमिश ला एकदम पैसे लागले तर कसे ?
अश्या अनेक गोष्टीसाठी प्लॅनिंग पाहिजे .
🔲🔲🔲
फायनान्शियल प्लांनिंग करताना खालील गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात .
१)अनियमित लागणार खर्च ( Emergency Planning or contingency planning )
२)इन्शुरन्स प्लान किंवा रिस्क प्लांनिंग ( टर्म प्लान /मेडिकल प्लान /रिस्क प्लॅनिंग )
३)शॉर्ट टर्म गोल प्लॅनिंग ( कार घेणे , घराला डाउन पेमेंट ,इत्यादी )
४) लॉन्ग टर्म प्लांनिंग ( घर,मुलाचे शिक्षण ,मुलांचे लग्न )
५)रिटायरमेंट प्लांनिंग
६)नेक्स्ट जनरेशन प्लांनिंग (विल प्लनिंग )
🔲🔲🔲
वरील प्रत्येक गोष्ट ह्या खुप खुप काळजीपूर्वक करणे अत्यंत गरजेचेआहे , आपण आपले बजेट कसे आहे ह्यावर लक्ष देणे खुप गरजेचे आहे , आपण कमावले १०० रुपये येणार कसे व जातात कसे याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
आपण आपले प्लांनिंग कसे करायला पाहिजे
🔲🔲🔲
*🔺योग्यप्रकारे आर्थिक नियोजन कसे कराल.???*
*◼Perfect Financial planning, योग्य प्रकारे आर्थिक नियोजन*
1) आपल्या महिन्याच्या एकूण इनकम पैकी जास्तीजास्त 30%च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे
2) 30% रक्कम ही बँक कर्ज, देणी ई. साठी
3) 30% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी बचत केली पाहिजे.
4) आणि उरलेले फक्त 10% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी
5) कमीतकमी पुढील 6 महिन्यांचा घर-ऑफिस खर्चाची तरतूद अगोदरच असायला हवी, जेणेकरून नोकरी गेली, किंवा व्यवसायात मंदि आली तरी ही त्यावर 6 महिने पुढील सोय होईस्तोपर्यंत आपले खर्च चालतील.
6) सेकंड होम ही इन्व्हेस्टमेंट नाही, सर्व्हे असे दर्शवतो को सेकंड होम हे एकूण व्याज आणि खर्च , आणि वाढती महागाई वगळून जास्तीजास्त 5% फायदा करून देऊ शकते
7) 45 वयानंतर कुठली ही देणी, कर्जे आपल्या अंगावर असू नयेत. मुलांचे उच्चशिक्षण, लग्न ही या काळात होतात त्याचो प्लॅनिंग आपल्या 30 वयापासूनच व्हायला हवेत ….
8) बँकेत पती-पत्नीचे जॉईंट अकौंट असणे अनिर्वार्य आहे
9) आपली प्रॉपर्टी ही पती-पत्नी दोघांच्या नावे हवी, कारण as per legal act पती च्या मृत्यू नंतर पत्नी वारसदार असते आणि नंतर मुले
10) प्रत्येकाचा इन्शुरन्स असणे गरजेचे आहे
11) टर्म इन्शुरन्स असणे ही गरजेचे आहे, हेच पुढे तुमच्या कुटुंबाला संरक्षण देते
12) कुठलेही इन्व्हेस्टमेंट चे निर्णय हे भावनिक दृष्टिकोनातून घेऊ नये
13) मेडिक्लेम हा अत्यन्त गरजेचा आहे,
14) जर बँकेत चोरी, किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकर वर फक्त 1 लाख पर्यन्त रक्कम बँक रिटर्न म्हणून देऊ शकते, उरलेले नुकसान आपले असते
15) तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळू नाही शकत, पण योग्य इन्व्हेस्टमेंट करून टॅक्स कमी करू शकतात, तुमचे इनकम जास्त असो वा कमी असो, टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात, सर्वात मोठा फायदा म्हणजे लोन, हेंच तुम्हाला व्यवसायात पुढे नेऊ शकते
16) सर्व फायनेन्शियल कागदपत्रे ही व्यवस्थित ठेवा, याची माहिती आपल्या कुटुंबाला देऊन ठेवा. जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे फेमिली मेम्बर्स ते योग्यप्रकारे वापरु शकतील
17) आपला प्रोग्रेस ग्राफ दर सहा महिन्यांनी चेक करा. कारण त्या ग्राफ प्रमाणे आपली इनवेसेन्टमेंट, व्यवसाय निर्णय बदलता येतात
18) आपला अकौंटांट फक्त वर्षाची टॅक्स फाईल करणारा असल्यापेक्षा योग्य कन्सल्टंट असेल याची खात्री करा नाहीतर लगेच बदला, कारण योग्य इन्व्हेस्टमेंट हा योग्य सल्लागारच सुचवितो.
➖➖➖➖➖➖➖
🔲🔳🔲🔳🔲🔳🔲
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा