रोज काहीतरी लिहीत जा असे माझे बाबा नेहमी सांगत. 1986 साली वाचकांची पत्रे सदरात पुणे तरूणभारत मध्ये पहिलं पत्र प्रसिद्ध झालं.1998 साली लोकमत ओगलेवाडी वार्ताहर म्हणून लेखनासाठी मार्ग खुला झाला. 2001मध्ये पुढारीत वार्ताहर म्हणून रूजू झालो.आजपर्यंत थोडंफार लिहीलं,अजून खुप लिहायचं आहे. करवडी,कराडची शाळा,काॅलेज पुढे ओगलेवाडी बनवडी भागात क्लासेसच्या निमित्ताने तसेच मिडियामध्ये सुंदर लोकांची साथ,सोबत लाभली.करवडी-कराड व्हाया ओगलेवाडी प्रवासात आलेले अनुभव लेखन हौस पुर्ण करण्यासाठी हा ब्लॉग प्रपंच!
फॉलोअर
२६ मार्च २०२१
१९ मार्च २०२१
सांग ना आई !
सांग ना शांतांई!
सांग ना आई,
तु एवढी भोळी का आहेस?
सांग ना आई,
माझ्यावर एवढ़ं प्रेम का करतेस?
सांग ना आई,
तुला कसं कळतं मी दुखी आहे?
सांग ना आई,
तुला कसं कळत मला भुक लागली?
सांग ना आई,
तु एवढी प्रेमळ का आहेस?
सांग ना आई,
तु एवढी सुंदर का आहेस?
सांग ना आई,
स्वतचं दुःख तु कसं लपवतेस?
सांग ना आई,
वेदना तु कशा बरं पचवतेस?
सांग ना आई,
माझ्यावर खोटं कसं रागावतेस?
सांग ना आई,
माझ्यासाठी क्षणोक्षणी का झुरतेस?
सांग ना आई,
तु इतकी नम्र का आहेस?
सांग ना आई,
तु इतकी धाडशी कशी आहेस?
सांग ना आई,
तु स्व:तला कसं सावरतेस?
सांग ना आई,
आम्हाला कसं उभं करतेस?
आई लवकर बरी हो!
सतीश १९.०३.२०२१
आई....आई ...आई
लवकर बरी हो..
....सतीश 😊
१९०३२०२१
०८ मार्च २०२१
तुला कळेल तेव्हा
Featured Post
ना बोलना जरूरी है
*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...
-
*अंतरंग* *परिसे गे सुनेबाई |* *नको वेचू दूध दही ||१* *आवा चालीली पंढरपुरा |* *वेसींपासुन आली घरा ||२* *ऐके गोष्टी सादर बाळे |* *करि जत...
-
मंगला बनसोडे करवडीकर २७ (७२) वर्षाची तमाशा सम्राज्ञी! महाराष्ट्राची तमाशा लोककला ज्यांनी जिवंत ठेवली,कला हेच जीवन असं ब्रीद ...
-
श्रावण महिना आणि या महिन्यातील सण याचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. आजचा श्रावण महिना आणि नव्वदच्या दशकातील श्रावण महिना यात जम...