राम कृष्ण हरी,
शुक्रवारी सायंकाळी माऊलींचा पालखी सोहळा सासवड मध्ये पोहोचला,तेव्हा माऊलींचे स्वागत जोरदार पावसाने केले होते.सासवडमध्ये माउलींनी पाऊस आणला अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.या पावसाने पालखीतळावर दिंडी मालक आणि वारकरी माऊलींची दैना उडवली,पाऊस थोड्या वेळाने थांबेल अशी अपेक्षा होती. मात्र सायंकाळच्या पंगती बसण्याच्या वेळेत पावसाने आणखी जोर धरला. पालखी तळ आणि परिसरात मुक्कामाला असलेल्या अनेक दिंड्यांमध्ये स्वयंपाक तयार झालेला होता. मात्र जेवायचे कसे असा प्रश्न होता. पावसाची धार सुरू होती शेवटी बुफे सिस्टीम लावून जेवण सुरू केले. काही वारकर्यानी तंबूत बसून जेवण आटोपले.अनेकांची गैरसोय झाली.दिवसभर सुमारे तीस किलोमीटर चालल्यानंतर माऊलींना भूक लागली होती. त्यामुळे भर पावसात कुठेतरी बसून, उभे राहून मिळेल ते, मिळेल तसे वारकर्यानी जेवण केले. दहा वाजले तरी पाऊस थांबला नव्हता.
जेवणाचा प्रश्न मिटला मात्र आता झोपायचे कसे आणि कुठे? तंबूच्या चारी बाजूने पावसाचे पाणी वाहत होते. या तंबूत रात्र कशी काढायची असा प्रश्न होता? तंबूचे कापड पहिल्या पावसात भिजते तेव्हा पाणी आत झिरपते, पुढे पुढे ठिक होत जाते . पहिलाच पाऊस असल्यामुळे अनेक तंबू गळत होते. मात्र हार मानतील ते वारकरी कसले? परिस्थितीला सामोरे जाणे आणि तडजोड करणे हे फक्त वारकरीच करू शकतात, याचा प्रत्यय सासवडमध्ये आला. वारकऱ्यांनी प्रशासनाविरोधात कसलीही तक्रार न करता पावसाला तोंड दिले.दुसरीकडे ज्ञानेश्वर माऊलींनी पाऊस आणल्याबद्दल सासवडकर मात्र खुश होते.
आमच्या कराडकर 12 नंबर दिंडी मध्ये फार वेगळी परिस्थिती नव्हती,या ठिकाणी तंबूमध्ये पाणी घुसले होते. खालची जमीन पाण्याने झिरपली होती. अंथरलेले कागद कार्टून ओले झाले होते. पाऊस सुरूच होता आता येथे रहायचे कसे हा प्रश्न पडला. शोधाशोध सुरू झाली. याच दरम्यान प्रकाश पाटील आणि रणजित पाटील यांच्या कराड मधील एका मित्राचा फोन आला. सासवडमध्ये माझी सासरवाडी आहे तिकडे राहायला जाता का? असे त्यांनी स्वतःहून विचारले. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे ,अशी आमची अवस्था झाली. आमचे ध्यानी मनी नव्हते ते माऊलींनी पाठवले होते.
कराड येथील ढेबेवाडी फाट्यावर असणारे साँ मिलचे मालक दीपकशेठ पटेल यांचा मुलगा निलेश याची सासरवाडी सासवड आहे. निलेश यांनी तात्काळ आपले मेहुणे राज पटेल यांना फोन करून माझे कराडचे मित्र तुमच्याकडे झोपायला येत आहेत,त्यांची व्यवस्था करा असे सांगितले.पंधरा मिनिटात राज पटेल आणि त्यांचे वडील सासवडच्या शिवाजी पुतळा चौकात भर पावसात आले आणि त्यांनी आम्हाला फोन करून बोलावून घेतले.
गणेश मंगल कार्यालयाच्या शेजारी त्यांनी नुकतेच एक नवीन घर बांधले आहे, खाली बेसमेंट, मध्ये दुकान गाळे आणि पहिला मजला निवास असे हे घर होतं. या घराची अद्याप वास्तुशांती झालेली नव्हती. या घरात पटेल बापलेक आम्हाला घेऊन आले. त्या घरात पोहोचल्यानंतर पाहिले तर अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेल्या या तीन मजली घरांमध्ये दुसऱ्या मजल्यावर त्यांनी आमची व्यवस्था केली. या घराचे अजून वास्तुशांती झाली नाही त्या ठिकाणी पटेल पितापुत्रांनी आमच्यासाठी खूप कमी कालावधीत लाईट व्यवस्था, पाणी बादली या सर्व आणून दिल्या.अतिशय सुंदर अशा या नवीन घराची त्यांनी आम्हाला दारे उघडून माऊली निवांत रहावा,काही गरज लागली तर मध्यरात्री फोन करा असे नम्रपणे सांगितले.
माऊली काय चमत्कार करतात याचा प्रत्यय याची डोळा याची देहा पाहायला मिळाला.आमच्या डोळ्यातून आता पाणी यायचेच बाकी होते.आपल्या जवळच्या कोणीही पाहुण्याने असा वास्तुशांती न झालेला सुंदर बंगला आपल्याला दिला असता का असा प्रश्न डोळ्यासमोर उपस्थित झाला.माऊलीचं हे करू शकतात,त्यामुळे आम्ही कृत्य कृत्य होऊन माऊलीपुढे नम्र झालो.
रात्री उशिरा झोपी गेलो, सकाळी उठलो तर त्या बंगल्यातील टाकीचे पाणी खूप थंड होते. रात्रभर पाऊस चालूच होता.टाकीमधील साठलेल्या थंड पाण्याने आंघोळ करायचे जीवावर आले. बाथरूमचे काँक फिरवले असता सोलरचे कडक गरम पाणी वाहू लागले. पुन्हा एकदा माऊलीचा महिमा पाहायला मिळाला.आदल्या दिवशी गारठून गेलेले शरीर गरम पाण्याने अंघोळ करून आम्ही शेकून घेतले.आंघोळ झाली आणि त्यानंतर आम्ही पालखी तळाकडे माऊली दर्शनासाठी गेलो.
पालखीतळावर फार वेगळी परिस्थिती नव्हती रात्रभर पावसात झाल्यामुळे तळावरील अनेक तंबूमध्ये पाणी शिरले होते .कोणी कपडे सुकवत होते, तंबुमधील पाणी बाहेर काढत होते तर कोणी चिखलातून वाट काढत इतर कामासाठी जात होते. तळावर असलेल्या सोहळ्याचे मुख्य चोपदारांच्या तंबूमध्ये गेलो. राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार यांच्याशी सुमारे तासभर गप्पा मारल्या, वारीसह वेगवेगळ्या विषयांवर बोललो. त्यानंतर माऊली दर्शनासाठी निघालो. मसूरचे लंगडे काका तिथे भेटले

यादरम्यान कराडमध्ये काम केलेले पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांची भेट झाली. त्याचसोबत जुन्या आठवणींना उजाळा दिला. पोलीसांनी पालखीतळावर येणाऱ्या भाविकासाठी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता. सासवड परिसरात माऊलीं पालखीचे आगमन म्हणजे दसरा-दिवाळी सण असतो. परिसरातील ग्रामस्थ, भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येतात. हा दिवस माऊली उत्सवाचा दिवस असतो. माऊली दर्शन घेऊन तृप्त झालो. एकंदरीत आजचा दिवस नेहमीप्रमाणे खूप सुंदर गेला.
Also available at
👇karawadikarad.blogspot.com