फॉलोअर

२५ जुलै २०२४

नशा आणि आकर्षण


तु माझ्यासाठी नशा नाहीस !

नशा होते ...
प्रसिद्धीची,दारूची,सत्तेची, सौंदर्याची 
पैशातून मिळवलेल्या वस्तूंचीही..!
पण ही नशा उतरते कधीतरी !

तू माझ्यासाठी आकर्षणाचा केंद्रही नाहीस ! 

आकर्षण होतं...,
वस्तूचं, व्यक्तीचं, शरीराचं, सौंदर्याचं !
पण वस्तू किंवा व्यक्ती जशा जीर्ण होतात 
तसं ते आकर्षणही कमी होत जातं...!

एक सांगू लाडके, 

तू माझ्यासाठी एक आधार आहेस !
तू माझ्यासाठी एक परमाणू आहेस !
तू माझ्यासाठी मैलाचा दगड आहेस !
तू माझा आयुष्याचा आधार आहेस !
तू माझ्या आयुष्याची दोरी आहेस !
तू माझ्यासाठी वादळवेल आहेस !
तू माझ्यासाठी एक काठी आहेस !
बुडत्याला काडीचा आधार आहेस !
केवळ आणि केवळ जिच्या समोर,
माझं मन पुर्ण मोकळं करू शकतो ...
अशी तू माझी सखी आहेस !
अशी तू माझी सखी आहेस !

     ..... सतिताभ १३.०७.२०२४

१० जुलै २०२४

कलकी


उन्होंने भूत का किरदार निभाया, जिन्न बने, बच्चा बने, गॉड बने... खास बात ये है कि 65 वर्ष की उम्र की दहलीज पार करने के बाद उन्होंने इस तरह के चुनौतीपूर्ण किरदार निभाए। सब कुछ हटा कर अगर सिर्फ अभिनय की बात करें अमिताभ बच्चन ने 20वीं सदी में बॉक्स ऑफिस पर जितने चमत्कार किए थे, उसका कई गुना करामात उन्होंने 21वीं सदी में कर दिखाया है।

हाल ही में रिलीज हुई #Kalki2898AD की ही बात करें तो इतने बड़े-बड़े अभिनेताओं के होने के बावजूद ये अमिताभ बच्चन की फिल्म बन गई है और यही इस बूढ़े शेर की खासियत है। खासियत है इनकी कि उम्र के साथ इनकी आवाज़ और अधिक दमदार होती चली जा रही है और अभिनय की विभिन्न विधाओं का एक ही दृश्य में प्रदर्शन कर देना इनकी सबसे बड़ी क्षमता बनती जा रही है। अश्वत्थामा के किरदार में #AmitabhBachchan की कद-काठी उनका भरपूर साथ देती है, शेर की दहाड़ जैसी उनकी आवाज़ इस किरदार में जान डालती है और उनकी रहस्यमयी आँखें सचमुच ये एहसास दिलाती हैं कि ये किरदार 5000 वर्षों का इतिहास अपने भीतर समेटे हुए है।

असल में अमिताभ बच्चन ने छा जाने की ये विधा अपनी कमबैक फिल्म 'मोहब्बतें' से ही सीख ली थीं, जब उन्होंने 10 अभिनेता-अभिनेत्रियों के बीच अपने किरदार में ऐसी जान डाली कि इस फिल्म को उनके 'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन' के लिए याद किया जाने लगा। शाहरुख़-सलमान की फिल्मों में एक ज़िंदादिल पिता का किरदार अदा करना हो या फिर 'सरकार' सीरीज में 'गॉडफादर' सदृश किरदार हो, अमिताभ बच्चन ने कभी इसकी परवाह नहीं की कि फिल्म में उनका कितनी देर का किरदार हैं या फिर कौन से और अभिनेता-अभिनेत्री हैं।

आप 'पीकू' को भी इसी श्रेणी में देख सकते हैं, जितने बंगाली अमिताभ बच्चन इस फिल्म में लगे हैं उतने बंगाली शायद बंगाल का कोई अभिनेता भी नहीं लगता। आप उन्हें 15-16 साल के बच्चों के साथ फिल्म में डाल दीजिए या फिर 'ऊँचाइयाँ' में बुजुर्गों के साथ, उन्हें कोई फर्क नहीं पड़ता। 'कल्कि' को और अच्छा बनाया जा सकता था, जिसमें कोई शक नहीं है, लेकिन, इस फिल्म में अगर बिग बी की जगह कोई और अभिनेता होता तो शायद आज प्रभाष गालियाँ सुन रहे होते। अमिताभ बच्चन ने इस फिल्म को ढोया है, उन्हें अधिक स्क्रीन स्पेस देकर निर्देशक ने भी चतुराई बरती है।

भारत के निर्माता-निर्देशकों को मैं यही कहूँगा कि अगर आपके पास कोई ऐसा किरदार है जो आपको अत्यधिक चुनौतीपूर्ण लग रहा हो या फिर आप संशय में हों कि किस अभिनेता को इसे दिया जाए, बेधड़क Amitabh Bachchan को एप्रोच कीजिए। इस व्यक्ति के पास जो भी समय बचा है, उसमें ही ये भारतीय सिनेमा को अपना सर्वश्रेष्ठ देने वाला है। मुझे अभी भी लगता है कि 81 वर्ष की उम्र के बाद अब भी उनका सर्वश्रेष्ठ प्रदर्शन बचा हुआ है। अगर #Kalki के दूसरे भाग में भी वो होते हैं और उम्र व स्वास्थ्य उनका साथ देता है तो वो भारत की सबसे अधिक कमाई करने वाली फिल्म होगी।

इस उम्र तक भला कौन ही अभिनय करता है, आप ही सोचिए न। 75 तक आते-आते धर्मेंद्र भी ठंडे पड़ गए थे, मिथुन चक्रवर्ती ने 74 की उम्र में बिस्तर पकड़ लिया है, विनोद खन्ना 70 की आयु में कैंसर से चल बसे, गोविंदा का तो 45 साल के होते-होते करियर ही खत्म हो गया, राजेश खन्ना ने 60 पार होते ही बी-ग्रेड फिल्मों में काम करना शुरू कर दिया था, शशि कपूर के बुढ़ापे का कोई रोल ही किसी को याद नहीं। हाँ, शम्मी कपूर ने ज़रूर बुजुर्ग होने के बाद कुछ अच्छे किरदार निभाए लेकिन सब में उन्हें गुस्सैल पिता ही बनाया गया। मुन्नाभाई सीरीज छोड़ दें तो सुनील दत्त भी बुढ़ापे के दिनों में सक्रिय नहीं रहे। जितेंद्र जैसे अभिनेता अंत में बड़े भाई का किरदार निभाते-निभाते थक कर निकल लिए। कुल मिला कर देखें तो अपने समय के अभिनेताओं में सबसे अधिक Versatile अमिताभ बच्चन ही निकले। उनकी यात्रा अनवरत जारी है।

०५ जून २०२४

रोहित पवार यांची कराड येथे भेट


रोहीत पवार यांची आळंदी आणि कराड येथील भेट 

महाविकास आघाडीने मिळालेल्या यशानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार आले होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, युवा नेते सारंग पाटील उपस्थित होते. प्रीतीसंगमावर साहेबांच्या समाधीकडे जात असताना रोहित पवार यांच्याशी चालता चालता मी संवाद साधला. 2019 साली मी जेव्हा पंढरीच्या वारीला गेलो होतो तेव्हा रोहित पवार आमदार नव्हते. ते माऊली पालखी दर्शनासाठी आळंदी येथे आले होते. आळंदी येथे मी रणजित पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. पंढरीच्या वारी विषयी त्यांची बाईट मी घेतली होती. तो प्रसंग आज रोहित पवार यांच्या आठवणीत आणून दिल्यानंतर त्यांनी हो मला हे सर्व माहित आहे मला चांगलं आठवतंय असे त्यांनी मला सांगितले. आपण कुठे बोलायला उभं राहिलो होतो? आपण काय बोललो हेही त्यांनी मला सांगितले. रोहित पवार यांच्या स्मरणशक्तीला खरंच दाद दिली पाहिजे. मी आवाक जाहलो.

 जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. राम कृष्ण हरी.

सतीश मोरे सतिताभ 
९८८११९१३०२

आजचा आणि 25. 6. 2019 चा दोन्ही फोटो आपल्या माहितीसाठी पाठवत आहे.

१७ मे २०२४

अमिताभ बच्चन यांच्या सोबत वाढदिवस

*कराडचे ३० जण आज केबीसीमध्ये  सोनी टीव्हीवर*

🆎 *बच्चन सरांसोबत वाढदिवस आणि एबीपी ग्रुपचे बच्चन सरांनी केले कौतुक* 🆎

अमिताभ बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करणारे सर्वात जास्त लोक कोण आहेत, कुठे आहेत असं जर कुणी विचारलं तर सातारा जिल्ह्यात एकच नाव घेतलं जातं ते म्हणजे *अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप कराड,अर्थात ABP.* 

*अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर, गाण्यावर, चित्रपटावर प्रेम करणारा नव्हे तर अमिताभ बच्चन यांच्या लाईफस्टाईलवर आणि एकूण त्यांच्या लाईफ स्टोरी वर प्रेम करणारा ग्रुप म्हणून अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप सर्वज्ञात आहे. बच्चन प्रेमी ग्रुपच्या पुढाकाराने आणि प्रयत्नामुळे आज अखेर कराड तसेच सातारा, पुणे, मुंबई येथील कराड स्थित तीनशे पन्नास हून अधिक लोकांना अमिताभ बच्चन सरांचे दर्शन झाले आहे,भेट झाली आहे.* 

याही वर्षी अमिताभ बच्चन यांना "कौन बनेगा करोडपती" सेटवर भेटण्याचा योग एबीपी ग्रुपमुळे कराडकरांना आला. दिनांक ६ नोव्हेंबर रोजी केबीसी सेटवर कराड येथील आम्ही ३० जण  गेलो होतो. 
'केबीसी चिल्ड्रन स्पेशल' या वेगळ्या भागाचा साक्षीदार होण्याचा आम्हा सर्वांना योग आला. केबीसीच्या हॉट सीटवर किशोरवयीन मुले बसली होती. या लहान मुलासोबत त्याहून अधिक लहान झालेल्या अमिताभ बच्चन यांनी केलेली मजा आम्ही अनुभवली. या मुलांनी खेळ तर चांगला केलाच, पण अशा काही गंमतीशीर गोष्टी सांगितल्या की अमिताभ बच्चन आणि सेटवरील सर्वजण हास्याच्या सागरात बुडाले. अमिताभ बच्चन यांना समोर पाहून आम्ही केलेला दंगा, शिट्ट्या आणि घेतलेला आनंद आपण आज सोनी टीव्हीवर पाहणार आहोत.*आज 27 तारखेला रात्री नऊ वाजता* केबीसीच्या भागात आम्ही 30 जण कराडकर असणार आहे.

आजपर्यंत केबीसीला कराड मधील साडेतीनशे लोक जाऊन आलेले आहेत, ते केबीसी मध्ये दिसले आहेत. मात्र यावेळी आम्ही तीस सर्वजण एकाच ठिकाणी बसलेले आहोत. सेटचा  एक भाग कराडकरांनी व्यापलेला आहे. माझी स्वतःची ही आठवी बच्चन भेट आहे, पण या भेटीत सुद्धा पहिल्या भेटीची उत्कंठता होती.

आम्ही खूप मजा केली, दंगा केला. अमिताभ बच्चन यांच्या सोबत गप्पा मारल्या.आम्हा सर्वांना आज केबीसीमध्ये पहा,आम्ही दिसल्यानंतर स्क्रीनचे फोटो काढा, टाळ्या वाजवा आणि आम्हाला पाठवून द्या.

केबीसीची शूटिंग संपल्यानंतर अमिताभ बच्चन सर आम्हा सर्वांना भेटले, बोलले, आमच्या सोबत फोटो काढले. (हे फोटो नंतर उपलब्ध होणार आहेत) *अमिताभ बच्चन सर यांनी माझ्या 51 व्या वाढदिवसानिमित्त सेटवर मला शुभेच्छा दिल्या. सेटवर वाढदिवस साजरा झाला.* अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपने राबवलेल्या विविध कामाची, उपक्रमाची माहिती मी आणि दिपक प्रभावळकर यांनी अमिताभ बच्चन यांना दिली. 

एबीपी ग्रुपने अमिताभ बच्चन यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त 11 आक्टोबर रोजी *'एक बच्चन प्रेमी एक सोनचाफा झाड'* हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमांतर्गत 81 सोनचाफा झाडे कराड व परिसरात लावलेली आहेत. या सर्व झाडांचे एकत्रित फोटो कोलाज अमिताभ बच्चन यांना भेट देण्यात आले, यावर अमिताभ बच्चन यांनी सही करून दिली.

अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर आधारित मी एक सुंदर कविता तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. *'बच्चन होणे तर सोपं असतं अमिताभ व्हायला मात्र रातंदिन झगडावं लागतं '* असे शीर्षक असलेल्या या कवितेच्या चारोळी अमिताभ बच्चन यांना ऐकवल्या. ही कविता सुलेखनकार प्रशांत लाड यांनी देखण्या अक्षरात रेखाटली आहे तर प्रा. सतीश उपळवीकर यांनी अमिताभ बच्चन यांचे अतिशय सुंदर चित्रं काढले आहे. (लवकरच कॅलेंडर स्वरूपात प्रसिद्ध होणार आहे तसेच माझ्या सतिताभ या यु ट्युब चॅनलवर ती प्रसारित होणार आहे )

रचना मी स्वतः सतिताभ, सुलेखन प्रशांत लाड आणि चित्र प्रा. सतिश उपळावीकर असा त्रिवेणी संगम असलेल्या लखोटा आकारातील कविता अमिताभ बच्चन यांना भेट दिली. *अमिताभ बच्चन यांनी ही भेट आनंदाने स्वीकारली. बच्चन सरांनी केबीसी सेटवर त्यांच्या केबिनमध्ये ही कविता उंच ठिकाणी लावलेली आहे (सोबत तो फोटो दिला आहे). हा माझ्यासारख्या बच्चन प्रेमीचा बच्चन सरांनी केलेला बहुमान आहे, असं मी मानतो आणि बच्चन सरांना धन्यवाद देतो. लव यु 🆎* 


*तर मग आज पहा आम्हाला सोनी टीव्हीवर रात्री ९ वाजता* 


*सतीश मोरे सतिताभ*.
🆎🆎🆎🆎🆎🆎

वेल्लूर किल्ला.. भव्य दिव्य पण मराठ्यांच्या इतिहास लपवला जातोय !


वेल्लूर किल्ला.. भव्य दिव्य 
पण मराठ्यांच्या इतिहास लपवला जातोय !

कांचीपुरमचा मुक्काम आटोपून आम्ही सकाळी लवकरच बाहेर पडलो.आज बुधवार आमचं डेस्टिनेशन होतं वेल्लोर. वेल्लोरला जाण्यासाठी खाजगी बस पकडली. वेल्लोर बस स्थानकावर उतरल्यानंतर रिक्षा केली.गेली तीन-चार दिवस आम्हाला चांगले रिक्षावाले मिळाले होते, मात्र वेल्लोर मध्ये रिक्षा चालकांनी आमच्या कडून अर्धा किलोमीटर साठी हटून, गटून दिडशे रुपये घेतले. उन कडक होते. रूमवर जाऊन आराम केला आणि दुपारी चार वाजता वेल्लोर पाहण्यासाठीसाठी बाहेर पडलो.

वेल्लूर पासून जवळच तिरूमलाईकोडी येथे  लक्ष्मी नारायणी मंदिर सुवर्ण मंदिर आहे लक्ष्मी नारायणी  विष्णू नारायणाची पत्नी आहे. हे मंदिर 40 हेक्टर (100 एकर) जमिनीवर स्थित आहे आणि वेल्लोर-आधारित धर्मादाय ट्रस्ट, श्री नारायणी पीडम यांनी बांधले आहे, ज्याचे अध्यक्ष अध्यात्मिक नेते श्री शक्ती अम्मा ज्यांना 'नारायणी अम्मा' म्हणून ओळखले जातं. सोन्याचे आच्छादन असलेले मंदिर, दिड टन सोन्याचा वापर  केले आहे.मंदिर कलेमध्ये तज्ञ कारागिरांनी जटिल काम केले आहे. सोन्याच्या पट्ट्या सोन्याच्या फॉइलमध्ये रूपांतरित करणे आणि नंतर तांब्यावर फॉइल बसवणे यासह प्रत्येक तपशील जपला आहे.हे मंदिर पाहिला दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी पंधरा मिनिटे मोफत प्रवेश दिला जातो. इतर वेळेला मात्र हे मंदिर पहायचे असेल तर दीडशे रुपये तिकीट आकारले जाते. आम्ही तिकीट घेऊन मंदिर परिसरात गेलो. या ठिकाणी मोबाईल फोन येण्यास परवानगी नाही. मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी आहे. दर्शन बारी फार लांब आहे. या बारी मधूनच आपल्याला मंदिराला गोल वेढा घालून तेथे जावे लागते. सुवर्ण मंदिरातील भव्यता राहून डोळ्याचे पारणे फिटले. दर्शन बारी मध्ये चहापाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.आम्हाला लगेच दर्शन मिळाले.या मंदिराच्या शेजारीच बालाजी मंदिर आहे, येथे लाडूचा प्रसाद दिला जातो. तामिळनाडूमधील अनेक मंदिरे पाहिली मात्र हे  सुवर्ण मंदिर श्रीमंताचे मंदिर असल्याचे माझी भावना झाली आणि इथे सर्व गोष्टीला पैसे आकारले जात होते.
सुवर्ण मंदिर दर्शन घेऊन आम्ही वेल्लोर किल्ल्याकडे निघालो. वेल्लोर किल्ल्याचा इतिहास काय आहे याबाबत थोडीफार माहिती होती. इतिहास तज्ञ व इंटरनेट वरून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे.

वेल्लूर किल्ल्याची मालकी विजयनगरच्या सम्राटांकडून , विजापूरच्या सुलतानांकडे , मराठ्यांकडे , कर्नाटकी नवाबांकडे आणि शेवटी ब्रिटिशांकडे गेली , ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत किल्ला ताब्यात ठेवला . ब्रिटिश राजवटीत, टिपू सुलतानचे कुटुंब आणि श्रीलंकेचे शेवटचे राजा , श्री विक्रम राजसिंहा यांना किल्ल्यात कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. श्रीरंगारायाच्या विजयनगर राजघराण्याच्या हत्याकांडाचाही तो साक्षीदार आहे . 

1650 च्या दशकात, श्रीरंगाने म्हैसूर आणि तंजोर नायकांशी युती केली आणि गिंगी आणि मदुराईवर हल्ला करण्यासाठी दक्षिणेकडे कूच केले . त्याचा पहिला मुक्काम म्हणजे गिंजीचा किल्ला ताब्यात घेतला, परंतु मदुराईच्या थिरुमलाई नायकाने उत्तरेकडून वेल्लोरवर हल्ला करून श्रीरंगाचे लक्ष वळवण्यासाठी विजापूरच्या सुलतानाला विनंती केली . विजापूरच्या सुलतानाने तातडीने मोठी फौज पाठवून वेल्लोरचा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर, मदुराई-विजापूरच्या दोन्ही सैन्याने वेल्लोर-तंजोर सैन्याचा पराभव करून गिंजीवर एकत्र आले. युद्धानंतर दोन्ही किल्ले विजापूरच्या सुलतानाच्या ताब्यात गेले. या पराभवाने विजयनगर सम्राटांच्या शेवटच्या थेट पंक्तीचाही अंत झाला. या घटनेनंतर 20 वर्षांच्या आत मराठ्यांनी विजापूर सुलतानांकडून किल्ला ताब्यात घेतला.


1676 मध्ये, थोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी तंजोर देशाकडे दक्षिणेकडे कूच केले. त्याच वर्षी, छ शिवाजी महाराजांचा भाऊ एकोजी याने तंजावरचा ताबा घेतला, परंतु त्यांच्या जवळच्या शेजारी मदुराई आणि विजापूर सुलतान यांच्याकडून त्यांना धोका होता , जे अनुक्रमे गिंगी आणि वेल्लोर येथे होते. शिवाजी महाराजांच्या सैन्याने 1677 मध्ये प्रथम जिंजीचा किल्ला ताब्यात घेतला, परंतु वेल्लोरवर हल्ला करण्याचे काम त्यांच्या सहाय्यकाकडे सोपवले आणि मुघल सम्राट औरंगजेबच्या प्रदेशावर हल्ला होत असल्याने ते दख्खनकडे गेले. 1678 मध्ये, प्रदीर्घ चौदा महिन्यांच्या वेढयानंतर, किल्ला मराठ्यांच्या ताब्यात गेला. शिवाजी महाराजांच्या प्रतिनिधीने गडाची तटबंदी मजबूत केली आणि त्या भागावर १६७८-१७०७ या कालावधीत शांततेत राज्य केले. 

मराठा साम्राज्याचा प्रतीक असलेलं वेल्लोर किल्ला पाहण्यासाठी खरंतर खूप उत्सुकता होती. हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. या किल्ल्याचे अतिशय चांगल्या पद्धतीने जतन केले जात आहे. किल्ल्याच्या बाहेर समोरच भव्य गार्डन तयार करण्यात आलेले असून या गार्डनमध्ये सायंकाळी वेळेला फार मोठी गर्दी असते. किल्ल्याच्या तटबंदी  भक्कम आहेत ,तटबंदी समोर मोठा खंदक असून त्यामध्ये पाणी वाहत होतं . किल्ल्यावर टिपू सुलतानचा महाल आहे, भव्य मशिद आहे, भव्य सेंट जॉर्ज चर्च आहे आणि त्याहून डोळे दिपवणारे जलकंठेश्वरर मंदीर आहे. यापैकी जलकंटेश्वर मंदिर त्याच्या भव्य कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याची बांधणी काहीशी जलदुर्गासारखी असून त्याच्या सभोवती दुहेरी दगडी चिरेबंदी तट आहे. तटाभोवती खोल व रुंद खंदक आहे. पूर्वेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. किल्ल्यात जलकंठेश्वर विजयानगर वास्तुशैलीतील भव्य मंदिर असून त्याच्या मंडपातील तीरशिल्पात देव-देवतांच्या पूर्णाकृती मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस नृत्यमग्न असलेल्या पार्वतीची त्रिभंगातील मूर्ती लक्षवेधक आहे. किल्ल्यात अनेक शासकीय कार्यालये असून येथील खंदकातील पाण्यावर मत्स्यसंशोधन केंद्र चालविले आहे.

जलकंठेश्वरर मंदीर पाहून झालं. पण हुरहूर लागली होती माझ्या शिवरायांचे नाव कुठे आहे काय याची, मराठा साम्राज्य उल्लेख कुठे आहे काय याची ! छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकला होता याचा इतिहास मात्र या ठिकाणी कुठेही लेखी स्वरूपात पहायला मिळत नाही. याचं फार वाईट वाटलं. या परिसरात फिरताना अनेक जणांना याबाबत विचारलं मात्र याची माहिती कुणालाही नव्हती. रिक्षा ड्रायव्हरला विचारलं, सिक्युरिटी गार्डन विचारलं, आर्किलॉजिकल सर्वे विभागाच्या काही लोकांना विचारलं. मात्र कोणीही या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्य होतं याची माहिती नसल्यास सांगितले. नाही खूप वाईट वाटलं. अशाच प्रकारे इतिहास लपवण्याचा प्रकार आग्रा येथे केला जातो. तिथंही  छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम तेथील गाईड लोक कोणाला सांगत नाहीत. किमान आग्रा किल्ल्याच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा असणारा भव्य पुतळा पाहून उत्साही किंवा उत्सुक पर्यटक विचारतात तरी हा पुतळा कुणाचा आहे. मात्र गाईड फक्त शिवाजी महाराजांचा पुतळा आहे एवढंच सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी देऊन आग्रा येथून स्वतःची सुटका केली होती याची माहिती दिली जात नाही. याचा मी स्वतः साक्षीदार आहे. वेल्लूर किल्ल्याचा परिसर भव्य आहे. हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असला तरी किल्ल्याचा सविस्तर इतिहास इथे लिहिल्याचे कुठेही पाहायला मिळाले नाही. हे खाते भारत सरकारचे आहे की तामीळनाडू सरकारचं आहे याबाबत शंका आली..यावर काय करता येईल याचा विचार महाराष्ट्रातील गडप्रेमी, शिवप्रेमी आणि सत्ताधारी राजकारण्यांनी करण्याची गरज आहे.


सहा दिवसाचा दक्षिण भारत अभ्यास दौरा झाला. आता परतीच्या प्रवासाचे वेध लागले होते. रात्री साडेबारा वाजता वेल्लूर कंन्टेटमेंट स्टेशनवरती पोहोचलो आणि आमच्या कराडच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. गुरुवारी रात्री उशिरा पोहचणार आहे. भेटू लवकरच 

उद्या वाचा ..
दक्षिण भारतात आणि भारतीयांत वेगळे काय दिसलं?

*सतीश वसंतराव मोरे सतिताभ* 
9881191302

१६ मे २०२४

कांचीपुरम मी निशब्द...पृथ्वी वरील मंदीराची शंभर नंबरी राजधानी..!



कांचीपुरम मी निशब्द...
पृथ्वी वरील मंदीराची शंभर नंबरी राजधानी..!

महाबलीपुरम येथील दिव्य आणि भव्य मंदिराचे सौंदर्य डोळ्यात साठवून आता आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. साडेदहाच्या दरम्यान महाबली परम येथील रूम सोडली आणि आम्ही बस स्टॅन्ड वर आलो. येथून कांचीपुरमचे  अंतर केवळ 60 किलोमीटर होतं. हा प्रवास आम्ही तामिळनाडूच्या खाजगी बस म्हणून करायचा ठरवले. बस मध्ये बसलो तर 60 किलोमीटर साठी फक्त 25 रुपये तिकीट होतं. रमत गमात किनारपट्टीवरून निवांत आमचा प्रवास सुरू झाला. या बस मध्ये मोठ्या आवाजात तमिळ गाणी लावली होती. गाण्याचा अर्थ कळत नव्हता मात्र आवाज सुंदर होता संगीत तर अतिशय ठेका लावणारे होते. तो आनंद खरंच वेगळा होता. पूर्ण बसमध्ये  खचाखच गर्दी होती. आम्हाला जागा मिळाली होती. मात्र गाणी ऐकत, शेजारच्या लोकांशी संवाद साधत आमचा प्रवास कधी संपला हेच आम्हाला कळलं नाही. दुपारी दोन वाजता आम्ही कांचीपुरम येथील हॉटेलमध्ये पोहोचलो.आम्ही जेव्हा येथे आलो तेव्हा येथे पाऊस सुरू होता, संपूर्ण पावसाळी वातावरण होते. पाचच्या दरम्यान आम्ही लोकल एक रिक्षा बुक केली आणि कांचीपुरम सिटी पाहायला सुरुवात केली. 


हजारो मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर, कांचीपुरम.  हे शहर मंदिर वास्तुकला, 1000-स्तंभांचे हॉल, विशाल मंदिराचे मनोरे आणि रेशमी साड्यांसाठी ओळखले जाते. कांचीपुरम हे भारतातील सर्वात महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून काम करते. कांचीपुरम हे परदेशी पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. हे शहर कांचीपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. 

सहाव्या शतकाच्या शेवटी सिंहरिष्यम राजानं कांचीपुरम इथं आपली राजधानी स्थापन केली. या राजाने कृष्णा ते कावेरीपर्यंतचा मुलूख काबीज करून आपल्या राज्याची व्याप्ती वाढवली. पुरु महेंद्रवर्मा हा मोठा प्रसिद्ध मंदिरनिर्माता होता. त्यानी महाबलीपुरम इथं मोठमोठ्या एकसंध पाषाणांतून देव खोदून काढण्याचं काम करून घेतल . त्यानंच 'गविलासप्रहसन नावाचं संस्कृत प्रहसन लिहिलं. संस्कृत भाषेत आज अस्तित्वात असल पहिले प्रहसन !

दुसरा नरसिंहवां यानं कांचीपुरममध्ये कैलासनाथ राजसिंहवर नामक शिवालय बांधलं. नगरेषु कांची' या शब्दात साक्षात् कविकुलगुरू कालिदासानं ज्या कांचीपुरमनगरीचं वर्णन केलं आहे, ते कांचीपुरम अगदी आजही तिथल्या मंदिरांसाठी आणि हातमागावर विफलेल्या झोकदार जरी-पदराच्या कांचीपुरम साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. अगदी आजही या शहरात अक्षरण पावलागणिक एक मंदिर आहे. आज कांचीपुरम कामाक्षीदेवीच्या मंदिरासाठी ओळखले असले तरी कांचीपुरममध्ये शिवाची  आणि देवीची हजारभर तरी लहान- मोठी मंदिरं असतील. त्यातले सगळ्यात पुरातन मंदिर म्हणाजे 'कैलासनायार कोविल' किंवा कैलासनाथाचं मंदिर.

कांचीपुरम हे शहर पाहताना माझ्या मनात अनेक विषय येत होते. खरंच पृथ्वीवरचा आजपर्यंत मी पाहिलेला मंदीराचा स्वर्ग कुठे असेल तर कांचीपुरम येथे असेल. आयुष्यात पहिल्यांदाच इतकी भव्य आणि दिव्य मंदिरे पाहिली. 100 ते 1000 मंडपाचे खांब असणारे दगडी बांधकाम, अप्रतिम कलाकृती, जिकडे पाहील तिकडे फक्त सौंदर्य.. सौंदर्य आणि कल्पकता. कांचीपुरमचे वर्णन खरंच शब्दात करणे अवघड आहे.  आजपर्यंत मी पंढरपुरात अनेक मंदिरे पाहिली होती मात्र कांचीपुरम येथील भव्य दिव्य मंदिरे पाहिल्यानंतर मंदिरे कशी असावी आणि कुठे असावीत याचे उत्तर फक्त कांचीपुरम एवढंच येतं.

 एक नव्हे दोन नव्हे तर पंधरा गुंठे, वीस गुंठे, 30 गुंठे, दोन एकर तीन एकरात वसलेली ही मंदिरे खरंच उत्तम कलाकारीचा नमुना आहेत. दुरुन मंदिराचे प्रवेशद्वार म्हणजेच आपल्याला ते मंदिर वाटते. दक्षिणेमधील मंदिराची हीच खासियत आहे. मंदिराचे प्रवेशद्वार हे मंदिरासारखे वाटते की जे पन्नास ते सत्तर फुटाचे उंचीचे असते. संपूर्ण दगडी बांधकाम असलेली 700 ते 800 दशकातील ही मंदिरे डोळ्याचे पारणे फेटतात. कांचीपुरम येथील शिवमंदिर पाहिले, कामाक्षी मंदिर पाहिले, बालाजी मंदिर पाहिले आणि चित्रगुप्ता चे मंदिर पाहिले. वेळेअभावी आणखी चार-पाच अशी दहा बारा मंदिरे पाहिली. या मंदिराविषयी काय बोलावे हेच कळत नाही. अतिशय विस्तीर्ण ठिकाणी, पवित्रता राखून ही मंदिरे जपली आहेत. मंदिरात कुठेही अस्वच्छता दिसत नाही, कचरा नाही. देवाचे दर्शन लांबून घ्यायचे, दर्शनासाठी कोणतीही फी नाही, ओळीने दर्शन घ्यायचे,अशी ही मंदिरे तात्कालीन राजाने बांधलेली आहेत. मंदिराचे कळस आणि मंदिराचे भव्य सभा मंडप बघतच राहावे लागतात. 

आपल्या महाराष्ट्रातील मंदिरे प्रवेश केला की  दोन मिनिटात संपतात. मात्र या मंदिरात प्रवेश केल्यापासून दहा फूट, वीस फूट नव्हे शंभर फूट, दोनशे फूट ते तीनशे फुटापर्यंत फक्त सभा मंडपच आहेत. सभा मंडप पार करून पुढे गेल्यानंतर मग मुख्य गाभारा लागतो. कांचीपुरम मध्ये 1000 दगडी खांब असलेले एक कैलासनाथ मंदिर आहे. हे मंदिर पहायला दोन ते तीन तास लागतील. सर्व मंदिराच्या परिसरात पाण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे,मोठे तलाव बांधण्यात आलेले आहेत, ही दुरदृष्टी निर्मात्याने ठेवलेली आहे.. मंदिराच्या आसपास कुठेही तुम्हाला राहण्याची सोय पाहायला मिळणार नाही. पावित्र्य राखण्यासाठी राहण्याची सुविधा मंदिराच्या बाहेरच करण्यात आलेली आहे. मंदिराचे पुजारी स्वयं पुर्ण आहेत.

कांचीपुरम हा पृथ्वीवरील स्वर्ग म्हणावे लागेल. मी स्वतः केवळ दहा बारा मंदिरे पाहिली मात्र कांचीपुरम मध्ये शंभरहून अधिक मंदिरे आहेत आणि ही सर्व मंदिरे 200 ते 700 वर्षांपूर्वीची आहेत. मंदिरे पाहताना मन एकदम शांत होतेच, पोटही भरतं .येथील पावित्र्य आणि समर्पण पाहिल्यानंतर मंदिरे असावीत तर कांचीपुरम सारखीच असावेत असे वाटले. शंकराचार्यांना अतिशय प्रिय असणारे कांचीपुरम पाहायचे असेल तर वेळ काढायला हवा.

एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधलेली भव्य दिव्य मंदिरे, विराट रुप पाहून खरंच मी हँग झालो. सर्वात आनंदमय मंदिर वाटले ते बालाजी मंदिर. आपण सर्वत्र एक मजली मंदिर पाहिले असेल परंतु कांचीपुरम येथील बालाजी मंदिर तीन मजली आहे. या मंदिरात  चढून जाताना अतिशय सुंदर असे बांधकाम केलेले आहे. पायऱ्यावरून वर चढत जाताना कसलाही त्रास होत नाही. तिसऱ्या मजल्यावर तिरुपतीच्या बालाजी इतकं सुंदर असे येथील बालाजी मंदिराचे दर्शन होते. या मंदिरात गेल्यानंतर दहा फुटी मूर्ती पाहून डोळ्याचे पारणे फिटते. कांचीपुरम येथील प्रत्येक मंदिराचा एक इतिहास आहे. येथील शंकराचे भव्य मंदिर जितके प्रसिद्ध आहे तितकेच कामाक्षी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी मंदिर पाहायला तर अर्धा तास लागतो. देशातील चित्रगुप्ताचे एकमेव मंदिर कांचीपुरम येथे आहे. चित्रगुप्त आपल्या पाप पुण्याचा इतिहास लिहितात असे म्हटले जा.ते या मंदिरात जाऊन चित्रगुप्तांना पाहण्याचे परम भाग्य आपल्याच लाभू शकते.

शब्द मर्यादा...

सतीश वसंतराव मोरे सतिताभ 
9881191302

उद्या वेल्लूर शहर आणि मराठ्यांनी जिंकलेला वेल्लोर किल्ला

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...